कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या माहितीत कसाबला रोज मटन बिर्यानी देण्यात येते, हे खोटे कथानक रचल्याचेही सांगून टाकले. अर्थात कसाबला बिर्यानी नाही पण अगदी वरण भात तरी का द्यावा, असा प्रश्न प्रत्येक देशप्रेमी नागरिकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. याकुबच्या फाशीच्या वेळी तर किती मोठा वाद उभा राहिला.
वाचा : याकूब मेमन : सिलेक्टिव्ह न्याय और असुविधाजनक सत्य
याकुब स्वतःहून रॉ या आपल्या गुप्तचर संघटनेच्या संपर्कात आला होता. नेपाळमध्ये त्याच्या व रॉच्या अधिकाऱ्यांच्या भेटी वगैरेही झाल्या. त्यातूनच त्याला नेपाळमार्गे भारतात आणले गेले. याकुबने आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा सख्खा भाऊ व १९९३च्या बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार टायगर मेमन तसेच कुविख्यात डॉन दाऊद इब्राहीम, यांच्या पाकिस्तानातील राहत्या घरांच्या पत्त्यांसह त्यांच्या सर्व काळ्या धंद्याची संपूर्ण माहिती दिली तशी माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांना कधीही मिळाली नसती, असे काही कर्तव्यनिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले होते.
आता समजा याकुबने ही मदत केली जरी असली तरी त्याला बॉम्बस्फोटाच्या वेळी या कृत्याची माहिती होतीच ना. मग याकुब रहात असलेल्या मुंबईतील माहिम विभागातील मुस्लिमांनी या देशद्रोह्याच्या फाशीनंतर त्याच्या प्रेताला इतकी गर्दी कशापायी केली, असाही प्रश्न देशप्रेमी नागरिकांच्या मनात पडणे स्वाभाविक होते.
खरेतर असा प्रश्न पडलेल्या आणि प्रसंगानुरूप वारंवार असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी एक सूचना आहे. स्टिव्हन स्पिलबर्गचा एक सिनेमा सध्या सुरू आहे. ब्रिज ऑफ स्पाईज हे त्याचे नाव. स्पिलबर्गला इटी, जुरासिक पार्क वगैरे सिनेमे बनविल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासच्या कालावधितील ऐतिहासिक घटनांवर सिनेमे बनविण्याच्या वेडाने घेरले असावे.
शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रायन वगैरे त्याच्या अनेक सिनेमांनी जगभरातील सिनामा वेड्यांना अक्षरशः वेड लावले. मात्र हा सिनेमा केवळ सिनेमा वेड्यांनी पाहण्यासाठीचा नाही. तर कायम मध्य धारेतील प्रसिद्धी माध्यमे व सोशल मीडियावरून जोक्स कवितांपासून ते ठाम राजकीय मतांची अनंत देवाणघेवाण करणाऱ्यांकडून अनेकदा देशप्रेमाची जी साचेबद्ध कल्पना मांडली जाते व त्यात थोडेसे वेगळे किंवा आपल्या विरोधातील मत देणाऱ्याला अगदी आभासी फाशी देण्यापर्यंत अनेकांची मजल जाते त्या सगळ्यांनी किमान गंमत म्हणून तरी हा सिनेमा जाऊन पहावा.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागाणी अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमध्ये झाल्यानंतरचा जो शीत युद्धाचा काळ समजला जातो. त्या काळात घडलेले ही एक सत्य राजकीय कहाणी आहे. जेम्स डोनोव्हॅन (टॉम हॅन्क्स) हा एक वीमा वकील असतो.
सिआयएने पकडलेल्या अॅबेल नावाच्या एका सोव्हिएत हेराचा खटला चालविण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. शीत युद्धाच्या काळात अमेरिकी जनतेमध्ये सोव्हिएत युनियनबद्दल असलेला प्रचंड द्वेष पहाता एका हेराला पकडल्यानंतर त्याच्यावर खटला वगैरे कशाला चालवला जावा, असा देशप्रेमी विचार तेथील अनेक सूज्ञ नागरिकांच्या मनात येतो.
मात्र डोनोव्हॅन हा खटला थातूरमातूर पद्धतीने न चालवता, अत्यंत गांभीर्याने घेतो व अॅबेलला इलेक्ट्रीक चेयरची शिक्षा मिळण्यापासून वाचवते. जो सोव्हिएत युनियन अमेरिकेचे अस्तित्वच नष्ट करायला निघालाय, जो अमेरिकेच्या विरोधात अणु युद्धाची तयारी करतो आहे. जो अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या विरोधात अनेक घृणास्पद कृत्ये करतो आहे, त्या सोव्हिएत युनियनच्या हेराला मृत्यूदंडापासून सुटका करून दिल्यामुळे डोनोव्हॅन हा अमेरिकी जनतेच्या दृष्टीने तात्काळ द्वेषाचा विषय होतो. आपल्याकडेही नाही का फेसबूक किंवा न्यूज चॅनेलवरून याकुबच्या फाशीच्या काळात फाशी या शिक्षेच्या विरोधात भूमिका घेणारे अनेकजण तात्काळ द्वेषाचे विषय झाले होते, अगदी तंतोतंत तसाच प्रकार.
हा द्वेष इतका पराकोटीला जातो की डोनोव्हॅनच्या घरावर काही अज्ञात थेट गोळीबार करतात. नशिबाने त्यात कुणीही जखमी वगैरे होत नाही. पुढे सिनेमाचे कथानक वेगळीच कलाटणी घेते. अमेरिका सोव्हिएत युनियनमध्ये हेरगीरी करण्यासाठी एका तंत्रकुशल विमानाची निर्मिती करते.
आकाशात ७० हजार फूटांवर उडत असताना सोव्हिएत युनियनमधील काही महत्त्वाच्या ठिकाणची फोटोग्राफी करण्याचे काम एका तरुण पायलटवर सीआयए सोपवते. मात्र हे विमान सोव्हिएत युनियन पाडते व वैमानिक जिवंत पकडला जातो. काही घातपात झाल्यास तात्काळ सायनाईड खाऊन मरून जा असे त्याला सांगण्यात आलेले असते. मात्र त्यात काही तो यशस्वी होत नाही. पुढे अॅबेल आणि हा अमेरिकी वैमानिक या दोन युद्ध कैद्यांची आदलाबदल करण्याची जबाबदारी डोनोव्हॅनवर सरकार टाकते आणि कथानक पुढे सरकते.
या सिनेमात हा खटला सुरू असताना डोनोव्हॅनच्या मागे सीआयएचे काही गुप्तचर लागतात. एका पावसाळ्यातील रात्री सुनसान रस्त्यावरून जाताना कोणीतरी मागून येत आहे हे जाणवल्यावर घाबरलेला डोनोव्हॅन आडोशाला लपण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही त्या गुप्तचराला ते समजते.
हा गुप्तचर आणि डोनोव्हॅन नंतर जवळच्या कॉफीशॉपमध्ये कॉफी घेतात. गुप्तचर त्याला सांगतो की, अॅबेलला वकील म्हणून भेट घेत असताना तो जे काय बोलतो ते सर्व तू आम्हाला सांगायला हवेस. डोनोव्हॅन त्याला स्पष्ट नकार देतो. ही माझ्या अशीलाशी प्रातारणा होईल, असे त्या गुप्तचराला सांगतो. त्यावर तो गुप्तचर तुझ्या व्यक्तिगत नैतिकतेपेक्षा देशाचे हितसंबंध मोठे नाहीत का, असे विचारल्यावर डोनोव्हॅन जे सांगतो ते कायम लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो त्या गुप्तचराला सांगतो तुम्ही जर्मन वंशाचे आहात. मी आयरीश आहे. तरीही आपण दोघे अमेरिकी आहोत. म्हणजे नक्की काय आहोत? आपण नियमांच्या पुस्तकाने बांधलेले आहोत. ज्याला घटना (कॉन्स्टिट्यूशन) असे म्हणतात. जर ही घटना नसेल तर काहीच उरणार नाही.
घटना किती चांगली आहे यापेक्षा तिचे पालन जर योग्य रित्या झाले नाही तर त्याला काहीही अर्थ नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगून ठेवले आहे. विविध वंशाचे लोक एका महाप्रचंड भूखंडाचा जगातील सर्वात शक्तीशाली देश म्हणून कसा आणि का विकास करू शकले हे खरे तर एका वाक्यात सांगता येणे कठीण आहे पण माझ्या मते स्पीलबर्गने ब्रिज ऑफ स्पाईजमधील या वाक्याने ते सांगण्यात यश मिळवले आहे.
देशप्रेमाच्या नावाखाली काळे फासणे, धर्मावर आधारित संशयाचे वातावरण बळकट करणे, आंतरराष्ट्रीय हितसंबंध व राजकीय मुत्सद्देगीरी लक्षात न घेता बेधडक बेभान विधाने करणे यातून हाती काहीच लागत नाही.
भारताला अमेरिका बनविणे हे कुणाचेच उद्दीष्ट असता कामा नये, मात्र बलशाली भारत कसा असावा यासाठी थोडा शांतपणे विचार करायला हवा. नाहीतर अमेरिकेचा बटिक असलेल्या इस्रायलप्रमाणे भारताची वाटचाल झाल्यास पुढच्या पिढ्या शांततेत जगू शकतील का, याचा विचार करायला हवा.
(ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांचा हा लेख २२ ऑक्टोबर २०१५ला महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com