विचारवंताच्या हत्या : ते, आणि आम्ही..!



पुण्यातलं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल उर्फ दाभोळकर रस्ता, चार तरुण भर उन्हात आमरण उपोषणाच्या बॅनर समोर बसलेत. दाभोळकर आणि पानसरे यांच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे, ज्या जागी दाभोळकरांची हत्या झाली होती तीच जागा उपोषणासाठी त्यांनी निवडलीय. उपोषणाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच उपोषणस्थळी शहरातील समविचारी तरुणांनी धाव घेतलीय. पानसरेंच्या हत्येची तात्काळ प्रतिक्रिया म्हणून आम्ही उपोषण सुरु केलं असल्याचं उपोषणकर्ता तरुण म्हणतोय. 
आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही” असे चारही तरुण म्हणत आहेत. तिशीतले चार तरुण आश्विनी सातव-डोके एक मोठ्या माध्यमसमुहातील सिनियर बीट सांभाळणारी महिला पत्रकार, हनुमंत पवार स्पर्धा परिक्षांचे वर्ग घेतोय, राजन दांडेकर सामाजिक कार्यकर्ता आणि हर्षल लोहकरे मुक्त पत्रकार असे चारजण. चार-पाच तासात इथं कॉलेज तरुण मोठ्या संख्येने जमा झालेत.
बघता-बघता जाम गर्दी जमलीय, तरुणाई कडक उन्हात हातात माईक घेऊन विद्रोही गात आहेत घोषणाबाजी करत आहेत. “दाभोळकर आणि पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध असो”  “सरफोरोशी कि तमन्ना...  “इन्कलाब जिंदाबाद  "लाठी गोली खाएगे फिर भी आगे जायगे "  "लढेगे जीतेगे" सारख्य घोषणांनी परिसर दुमदुमलाय. दिवसभर तरुणांची बेफाम गर्दी या पुलावर आहेत, व्हॉट्सअप, फेसबुकवरुन सेल्फी अपलोड करत तरूणांना उपोषणाला पाठींबा देण्याचे आवाहन करत आहेत. 

उपोषणाचा चौथा दिवस, आता इथं मंडप लावला गेलाय, पहिल्यापेक्षा गर्दी चौपट वाढलीय, नोंदणी रजिस्टर पाहिल्यास सुमारे चारशे परिवर्तनवादी गोटतील नावं इथं येऊन गेली असल्याचं दिसतंय, प्रादेशिक आणि राष्ट्रीय मीडियाने मोठी दखल घेतलीय, महाराष्ट्रभर सोशल मीडियात एकच चर्चा सुरु आहे,माणूसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमूचे सुरु” नावाच्या फेसबुक पेजला चार दिवसात दोन हजार लोकांनी भेट देऊन आपली संतप्त प्रतिक्रिया नोंदवलीय, फोटो, मजकूर, स्लोगन्स, निषेध देशभरातून इथं नोंदवलं जातंय. 
दुपारी अचानक उपोषणकर्तांची तब्येत खालावलीय, त्यांना पोलिसांनी ससूनमधे दाखल केलंय पण उपचार घेण्यास उपोषणकर्त्याचा नकार, परत उपोषणस्थळी दाखल. माध्यमानं याचं रान उठवलंय, दिवसभर बातम्या फिरताहेत प्रशासनात चल-बिचल सुरु केलीय, अनेक बडी मंडळी उपोषणस्थळी दाखल झालीय. भाषणं, चर्चा, घोषणा सुरु आहेत. मुंख्यमंत्र्यांना निषेधाचं पत्र लिहली जाताहेत. 
सोशल मीडियावर पत्र लिहण्याचे आवाहन सुरु आहे. शहर व उपनगरातून येऊन बरीच मंडळी निषेधाची पत्रे इथं असलेल्या पेटीत टाकत आहेत. माध्यमाची बातमी बघून राज्याचे पालकमंत्री तथा अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट उपोषणस्थळावर दाखल झालेत. पूलावरुन 100 फुट लांब घर असलेल्या  बापट यांना सुमारे चार दिवस लागलेत इथ पोहचायला. राज्याचे जबाबदार मंत्री म्हणतात, “मी तुम्हाला उपोषण सोडा म्हणणार नाही, फक्त आमरण न करता साखळी उपोषण तुम्ही सुरु ठेवा, जेणेकरुन शासनावर दबाव राहील आणि तपासाला गती येईल” पालकमंत्र्याचं विधान हास्यास्पद होतं. खाजगी वाहिन्यांना निषेधाचं बाईट देऊन बापट गेले.
रात्री अकराला पानसरे आण्णा गेल्याची बातमी कळाली, उपोषणस्थळी भेट देण्यास मी निघालो, तिथं पोहचलो, शोकमग्न अवस्थेत सर्वजण बसले होते. भयाण शांतता चारीकडं पसरली होती. बर्‍याच वेळानंतर आदरांजली वाहली गेली. पाचव्या दिवशी आंदोलन तीव्र झालं. शहरातून तरुण कार्यकर्त्यांचे जत्थेच्या-जत्थे दाभोळकर रस्त्यावर येत असल्यामुळे या भागाला जत्रेचं स्वरुप आलं आहे. 
शहरातील सर्वच कॉलेजमधील शेकडो तरुण इथं जमून अगदी शांततेत निषेधाची पत्रकं येणार्‍या-जाणार्‍यांना वाटत आहेत. आपल्या पॉकेटमनीतून “शिवाजी कोण होता?” या माईलस्टोन ग्रंथाचं वाटप करत होती. फेसबुकला पुस्तक वाचण्याचं आवाहन करत होती, पीडीएफ स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून शेअरिंग करत होती. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर येऊन घोषणा देत होती, चक्काजाम करत होती. पोलिस अटक करण्याचं आपलं काम चोखपणे पार पाडत होती. पण पुण्यात मात्र शांतपणे प्रत्येकजण आपलं काम करत होतं, शहरात दिवसभर आदरांजलीचे कार्यक्रम झाली. सर्वच स्तरातून हत्येचा निषेध व्यक्त केला गेला. महाराष्ट्रभर सोशल मीडियावर पानसरे व्यतिरिक्त अन्य कोणताच कंटेट नव्हता. फेसबुकवर देशभरातून हत्येचा निषेध नोंदवला जात होता.
सहाव्या दिवशी मोठी निषेधसभा याठिकाणी होणार होती, शहरातील पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार होते. सहा वाजता सभेसाठी मोठी गर्दी जमली. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, युवक क्रांती दल, जमात-ए-इस्लामी हिंद, सेवा दल, सोशालिस्ट फॉऊडेंशन,  महिला आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत भाई वैद्य, अन्वर राजन, मिलिंद चंपानेरकर, प्रा. सुभाष वारे, अजित अभ्यंकर, शमसुद्दीन तांबोळी, परशुराम वाडेकर, विश्वजित कदम, विलास वाघ, रझिया पटेल, संभाजी भगत, उल्हास पवार, असिम सरोदे यांचा सहभाग होता. 
सर्वांनी प्रतिगामी संघटना आणि शक्तीविरोधात मोठ-मोठी भाषणं दिली. या निषेध सभेत एकमताने ‘सनातन प्रभात’ सारख्या विखारी वृत्तपत्रावर बंदी आणण्याचा ठराव एकमताने पारीत केला. प्रतिगामी संघटनांशी मुकाबला करण्यासाठी शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करावा लागेल, आपली एनर्जी अशी उपोषणाच्या माध्यमातून वेस्ट जाता कामा नये असा सूर सभेत प्रत्येकांनी मांडला व उपोषण सोडण्याची विनंती केली.
उपोषणकर्ता हर्षल लोहकरे यावेळी म्हणतो “पानसरेंच्या हल्ल्यानंतर शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा तात्काळ प्रतिक्रिया म्हणून आम्ही उपोषण सुरु केलं. आमचा कोणत्याही संघटनेशी कसलाच संबध नाही, कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हल्ल्याने आम्ही खुप व्यथीत झालो होतो त्यामुळे आम्ही उपोषणास बसलो. हणुमंत पवार यावेळी म्हणतो सनातन प्रभात सारख्या दैनिकाने दाभोळकर आणि पनसरेंच्या फोटोवर फुली मारल्याचे चित्र प्रकाशित केले त्या दोघांचीही हत्या झाली, तरी अजून सनातन प्रभातवर  कसलीच कारवाई झाली नाही. 
उलट इथल्या पोलिस आयुक्ताने दाभोळकर हत्येचा तपास लावण्यासाठी  प्लँचेंट सारखा अघोरी प्रकार राबवला. याचा एक हजार पानी अहवाल आशिष खेतान यांनी राज्य सरकारला दिला आहे, तत्कालिन सरकारनं दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना शोधण्याचं काम तर  सोडाच पण गुलाबराव पोळ यांच्यावर कारवाईसुद्धा पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणार्‍या आघाडी सरकारने केली नाही. आज तर हे विरोधी पक्षात हे बसले आहेत तरीही यांना अजून सदबुद्धी येत नाही. 
दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना शह देण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. तेच काम विकासाचे अच्छे दिनाचे भंकस स्वप्न दाखवणारं राज्य सरकार पानसरेंच्या बाबतीत करत आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. आम्ही आमच्या कष्टाच्या कमाईतून पोलिसांना पगार देतो, त्यांची जबाबदारी बनते की, सामान्य माणसाची रक्षा करावी पण तसे घडत नाही. आमचे संरक्षण करु शकत नसेल तर पोलिसांना पगार घ्यायचा अधिकार नाही. आश्विनी सातव-डोके म्हणाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेहमी संविधानाची भाषा करतात, संविधानचा मार्गाचा मात्र अवलंब करत नाही, सत्ताधार्‍यामधे जेवढी ताकत असते तेवढीच ताकत विरोधी पक्षात असते. पण या हल्ल्याची त्यांना साधी दखलसुद्धा घ्यावी वाटली नाही. 
बापट इथं आले त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो सुशासनाचे स्वप्न दाखवणारे तुमचे सरकार सत्तेत येताच भाषा बदलत आहेत, चार पोरं काढा, सहा पोरं काढा, म्हणजे महिला काय पोरं काढायची मशिनी आहेत. रामजादे, घरवापसी, लव्ह जिहाद हेच का तुमचे विकासाचे स्वप्न..! आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून तरुणाईला आवाहन करतो की, समता आणि बंधुतेसाठी रस्त्यावर उतरा.
सुमारे सहा दिवस चाललेलं हे आमरण उपोषण लढ्याला नवीन उभारी देण्यासाठी सुटलं होतं.
लढा संपला नव्हता “माणूस संपवला तर विचार संपत नाही” असे या उपोषणकर्त्यांनी दाखवून दिलं होतं. इथं येणार्‍या प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांनी सहा दिवसात हजार एक प्रति शिवाजी कोण होता? च्या प्रती वाटल्या आहेत. तर पीडीएफ कॉपीची गणतीच नाही. दाभोळकर हत्येनंतर जेवढी तरुणाई रस्त्यावर होती, त्यापेक्षा दुप्पट यंगस्टर्स यावेळी रस्त्यावर होते. सबंध तरुणाई प्रतिगामी शक्तींविरोधात आवाज उठवत होते. 

विरोधी विचारांच्या प्रतिगामी संघटनांनी आपल्या तात्कालीक समाधानाची बाब म्हणून वैचारिक लोकं संपवायला सुरु केली आहेत. पण त्यांनीहे लक्षात असू द्यावं की त्यांना विचार संपवता येणार नाही. माणूस मारला की त्याक्षणीच्या धोक्याच्या शक्यता संपवता येतात. ज्याप्रमाणे माणूस मारून अऩेक ‘भौतिक’ शक्यता संपवता येतात तशाच निर्माणही करता येतात. दाभोळकरनंतर पुन्हा विवेकी विचार प्रकर्षाने पुढे येत आहे. 

माणूस संपला की विचार संपेन ही ‘अ’राजकीय विचार आहेत. दाभोळकर हत्येनंतर महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलं होतं, तरीही माध्यमं इवळून-इवळून म्हणत होती ‘पुरोगामी महराष्ट्रात पुन्हा भ्याड हल्ला’ कुठेय पुरोगामीत्व. 80-82 वर्षाच्या म्हातार्‍या माणसांवर गोळ्या झाडणारे याच महाराष्ट्रात जन्मले आहेत. महाराष्ट्र देशा म्हणण्यापेक्षा अमानवीय ‘महाराष्ट्र देशा’ म्हणण्याची पाळी आणली गेली आहे. 

हल्ल्याचे सुत्रधार कोण हे कदाचित व्यवस्थेला माहित असावं. प्रत्येक दुष्कृत्याची पूर्वखबर गृह विभाग व पोलिस यंत्रणेला असते, या प्रकरणाचीदेखील खबर मिळाली असेलच ना. योग्य व पारदर्शक तपास केल्यास आरोपी नक्कीच सापडतील. दोन्ही हल्ल्याचे आरोपी शोधण्यास राज्य सरकार व पोलिस यंत्रणेला कसरत करावी लागेल. अन्यथा महाराष्ट्रात मोठी लोकचळवळ उभी करुन शासन यंत्रणेला वेठीस धरावं लागेल. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी म्हटल्याप्रमाणे “क्रांती, परिवर्तन माझ्याच डोळ्यासमोर होणार नाही, म्हणून मी मैदानातून पलायन करणार नाही. माझ्या नंतरच्या पिसढीला माझ्या लढाईचे श्रेय मिळाले तरी चालेल”

कलिम अजीम, पुणे
Follow On Twitter @kalimajeem

दैनिक प्रजापत्र रविवारीय अंकात प्रकाशित

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: विचारवंताच्या हत्या : ते, आणि आम्ही..!
विचारवंताच्या हत्या : ते, आणि आम्ही..!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVWFg2q_yXTvOEbXQTTntY9GgdGLXs8aXug7TbeOhiu45z0xcPrdXjP5IGlebYH7l6qfz9pkuYe91fcHum51AmsJC8ZVP2Qk7VXz5304FKmGhweq-7KQq0GzebfQnxgQdzen5EeYvDLgKc/s1600/10378130_1578874602383547_5998678296854356996_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhVWFg2q_yXTvOEbXQTTntY9GgdGLXs8aXug7TbeOhiu45z0xcPrdXjP5IGlebYH7l6qfz9pkuYe91fcHum51AmsJC8ZVP2Qk7VXz5304FKmGhweq-7KQq0GzebfQnxgQdzen5EeYvDLgKc/s72-c/10378130_1578874602383547_5998678296854356996_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content