ऐंशीच्या दशकात भारतात टी.व्ही.चे कार्यक्रम
प्रायोगिक तत्वावर सुरू झाले. घरबसल्या राज्य , राष्ट्र व जागतिक पातळीवरील सर्वच
क्षेत्रातील माहिती क्षणार्धात घरबसल्या मिळू लागली. त्यामुळे टी.व्ही. अतिशय अल्पवेळात लोकप्रिय झाला.
80च्या काळात पहिली दैनंदिन मालिका 'हम लोग’ सुरू झाली व टी.व्ही.ची लोकप्रिता आणखीन
वाढली. नंतरच काळात बुनियाद, महाभारत, रामायण, यह जो है जिंदगी, नुक्कड अशा मालिका सुरू झाल्या. ऐतिहासिक मालिका वगळता इतर
मालिकात महिलांची भूमीका सोज्वळ, आदर्शवादी, पतीव्रता याच पठडीतील होत्या त्यामुळे मालिकाची लोकप्रिता इतकी वाढली होती की अक्षरशः रस्ते ओस
पडत असत. त्याकाळी दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं. त्यावरील कार्यक्रमाचा दर्जा देखील उत्कृष्ट होता.
नव्वदीत खाजगी वाहिन्याचे आगमन झाले. छोट्या पडद्याच्या लोकप्रितेबरोबरच टी.व्ही.संचाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आपली लोकप्रिता
अबाधीत ठेवण्यासाठी व्यवसायिक स्वरूपाचे कार्यक्रम सुरू झाले. या वाहिन्यांनी 2000 च्या दशकात कहरच केला. महिला वर्ग लक्षात घेता
महिलाप्रधान कार्यक्रम मोठ्या संख्येने सुरू झाले. सुरवातीच्या काळात हे कार्यक्रम चांगले होते. नंतर
दर्जा घसरत दर्जाहीन झाले.
कुटुंबातील अंतर्गत कलह, नवरा बायकोचे भांडणे, सासू-सुनेचा वाद, नणदेचं वर्चस्व, मामा मामीचे कारस्थाने अशा विषयाच्या मालिकांचे पेव फुटले. खाजगी
वाहिन्यांच्या संख्येसोबत अशा मालिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
याच काळात 'अधिकारी ब्रदर्स' या मालिकांच्या
निर्मात्याने आपली स्वतंत्र वाहिनी सुरू केली. यासोबतच अनेक महिलाप्रधान
दर्जेदार मालिका सुरू झाल्या. दामिनी, बंदीनी, उडान, तेजस्विनी, शांती, कविता या मालिकेतून धडाडी महिलेचं प्रथमच दर्शन झालं. या मालिका
महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यास
हितकारक ठरल्या मालिकात आदर्शवादी स्त्रीचं चित्रण केलं गेलं, तर दुसरीकडे नकारात्मक शेडच्या महिलांची भूमिका असलेले पात्रं या मालिकात सुरू झाले.
अशी पात्र सक्तीचं म्हणून वापरणस सुरुवात
झाली. शोषित व पीडित महिलांचे चित्रण देखील याच काळात सुरुवात झाले. अशी पात्रे
आजतागात सुरू आहेत. नंतरच काळात हा प्रकार बदलत गेला, कपटी, अविचारी, स्वार्थी प्रकारचे महिला पात्र रंगवण्यास
सुरुवात झाली.
"क्योकी...." सारखी मालिका दर्शकांनी आठ वर्ष पाहिली.
नंतरच काळात अशा प्रकारच मालिकांचा ऊत आला. घराघरात अशा प्रकारच मालिका चवीने पाहू जाऊ लागल्या. घरातील आंतरकलह चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. अशा कितीतरी बातम्या दररोज
वर्तमानपत्रात येण्यास सुरुवात झाली.
सुन, आई, बहिण, मामी, सासू मावशी , सारखे चारित्र महिलांचे शोषण करत असल्याचे दाखवू जाऊ लागले. महिला हे चविष्टपणे पाहू लागल्या परिणामी वाद-विवाद, कट कारस्थाने प्रत्यक्षात येऊ लागली.
अशा मालिकातून महिलांचे भांडणे, सासू-सुन, नवरा बायको, जाऊ-भावजय, नणंद-भावजय यातील कलहाचे पात्र सर्रास वापरले जात
आहेत. पर्यायी महिला दर्शकांची संख्या लक्षणीय वाढली. वाहिन्या टी.आर.पी.साठी असे कार्यक्रम प्रसारीत
करू लागल्या. तसेच लैंगिक संबंध, प्रणय दृष्य सर्रास वापरले जाऊ लागले
आहेत.
रात्री 8-10 प्राइम टाईमच्या काळात असे कार्यक्रम दाखवले जाऊ लागले आहेत. आदर्शवादी, पतीव्रता, नातेसंबंध जपणारी, आपली इच्छा-आकांक्षा दाबून कुटुंबासाठी
सतत झटणारी, कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारी स्त्रीची
प्रतिमा अशा मालिकामुळे मलीन झाली आहे. याचे
रुपांतर द्वेशवादी, भोगवादी, स्वार्थी, व्यवसायिक हीत जपणारी, नातेसंबंधाला तिलांजली देणारी, वैवाहिक संबंधाला न जुमानणारी स्त्रीत झाले आहे.
महिलांनी अशा कार्यक्रमाविरुद्ध आवाज
उठवला पाहिजे. महिलांच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होईल असे कार्यक्रम न पाहण्याचे स्वंबंधने लादली पाहिजे. या बाबतीत
समाजजागृती निर्माण केली पाहिजे. वेळोवेळी जनहित याचिका दाखल केली पाहिजेत. तरच या मालिका बंद होतील किंवा
दर्जा सुधारणी होईल.
तसेच महिलांनी या संबंधी तक्रार दाखल करावी, गुन्हा दाखल करावा, नाही तर भविष्यात अशा मालिकामुळे भयावह परिस्थितीला आपणास सामोरे जावे लागेल. अशा अश्लील, विभत्स चित्रणासाठी विरोधी भूमिका घेण्यास महिला संघटनांनी पुढाकार घेतला
पाहिजे, जेणेकरून असे प्रकार थांबतील.
कलीम अजीम, पुणे
(*सदर लेख आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त ‘विवेक सिंधू’ दैनिकात प्रकाशित
झाला आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com