मंटो आणि अब्बास यांच्या उर्दू कथांमध्ये वृद्धांचे चित्रण

मस्कार, सलाम आणि आदाब...

मला इथं बोलावून सन्मान दिल्याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो. गावच्या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत बोलणं, हे खरंच माझ्यासाठी खरोखरच भूषणावह बाब आहे.

मी अंबानगरीचा रहिवासी.. इथल्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक घडामोडी बघत-बघत मोठा झालो, विचारप्रवण होत गेलो, संवादी होत गेलो, तसा एककल्लीही होत गेलो, लिहिता आणि बोलता झालो. आणि याच लिहित्या कौशल्याने मला महाराष्ट्रभर ओळख दिली.

खरंतर मी भाषणे देण्यात पटाइत नाही, किंवा तसा पट्टीचा वक्ताही नाही. लिहिण्यात; तेही आवडणाऱ्या विषयात लेखन करण्यात मला गती आहे. पण मोठ-मोठ्या परिसंवादात, सभेत किंवा कार्यक्रमात भाषणांचे सादरीकरण मला करता येत नाहीत. त्यामुळे हे भाषण रटाळ, निरस किंवा एकतर्फी होऊ शकते, कृपया सावरून घ्यावं..

तीन-एक महिन्यापूर्वी अमर काकांचा फोन आला. म्हणाले, उर्दू साहित्यात वृद्धांना किती स्थान मिळालंय. त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का?” त्यांना कोणालातरी सांगायचं असेल, असा विचार मनात सर्वप्रथम आला.. म्हणालो, खूपच रेलचेल आहे.काही लेखक, रचना व कादंबऱ्याची नावं घेतली. त्यांच्या साहित्यकृतीबद्दल बोललो. चार-एक मिनिट संवाद झाला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं.. वाटलं, त्यांचं समाधान झालं असेन. परंतु त्यांनी पुढची केलेली शब्दफेक माझ्यासाठी अवघडात टाकणारी होती. म्हणाले, गावच्या साहित्य संमेलनात तुम्ही यावर बोला.

कोणा लेखक, भाष्यकाराला विषय देणं व त्यावर काम करून घेण्याची अमर काकांची ही पद्धत संपादक म्हणून मला आवडली. साहित्यावर बोलणे, तेही संमेलनात हे माझ्यासाठी संकटात टाकणारी बाब होती. पण उर्दू साहित्यका आवडता प्रांत असल्याने; त्यांना ठीक आहेम्हणालो.

उर्दू अदबबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. सगळंच जर बोलायचं म्हणलं तर संमेलनाचे दोन दिवस कमी पडतील.. त्याचा विस्तार पाहता, शिवाय आपली व श्रोत्यांची सोय म्हणून त्यातील कथा हा साहित्य प्रकार आजच्या परिसंवादासाठी निवडला आहे.

एकेकाळी उर्दू ज्ञान भाषा होती. लोक आणि व्यवहारभाषाही होती. त्यामुळे ती रोजगार भाषाही सहज होऊ शकली. पुढच्या काळात ती शेरो-शायरी व साहित्याची भाषा झाली. अलीकडे ती लोकभाषा फक्त शेरो-शायरीपुरती मर्यादित राहिली आहे. आज जगभरात उर्दू आवडणारे असंख्य आहेत. पण उर्दूला व्यवहार व ज्ञानभाषा करण्याच्या बाबतीत औदासिन्यता दिसून येते. अगदी आजच्या व्यवहारी मराठीसारखीच तिची अवस्था आहे.

उर्दू अदब जसे जीवनसंघर्षाशी दोन हात करणारे, नागरी व सामाजिक प्रश्न, समस्या मांडणारे तसेच सांस्कृतिक संघर्ष घडवणारे एक विद्रोही साहित्य राहिलं आहे. इतकंच नाही तर अस्मितावादी शिवाय गुढकथांनी (तिलिस्म) भारावलेले, प्रेमप्रणय, रंजनवादी, अभिजनवादी साहित्यिकही उर्दू भाषेत चिकार आहेत. जीवनासाठी साहित्य की, साहित्यासाठी जीवन हा संघर्षही उर्दू साहित्यविश्वात मोठा राहिला आहे. त्यामुळे गेल्या तीसएक वर्षांत मराठी साहित्याबद्दल जी समीक्षा, चर्चा, चिकित्सा, टीका व हेटाळणी होते, ती उर्दूत सुमारे १०० वर्षांपूर्वी होऊन गेलेली आहे.

वाचा  : उर्दू ही मुसलमानांची नव्हे तर भारतीय भाषा !

पढ़े : किसान और मजदूरों के मुक्तिदाता थें मख़दूम मोहिउद्दीन

उर्दूचा इतका प्रचंड मोठा विस्तार पाहता कथा ह्या साहित्य प्रकारावर बोलणं म्हणजे पाण्यात मिठासारखं आहे. जेवणात मिठाची चव म्हणून आज मी प्रसिद्ध उर्दू कथाकारांच्या एक-एक कथांवर बोलणार आहे. बोलणार काय तर त्याचे व त्यांच्या रचनेचा परिचय करून देणार आहे. त्यांच्या ह्या रचनेमध्ये वृद्धांचं चित्रण, व त्यावर भाष्य करणार आहे.

प्रथम, सआदत हसन मंटो यांची अभिजात कथा खोल दोघेऊ..

ह्या प्रसिद्ध लेखकाला आपण मंटो नावाने ओळखतो. त्यांचा जन्म लुधियानाजवळ असलेल्या समायरा गावात ११ मे १९१९ला झाला. कमी वयापासून ते लेखनाकडे खेचले गेले. उच्च शिक्षणानंतर त्यांनी अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. पण शेवटी ते लिखाण क्षेत्रात पूर्णवेळ स्थिरावले, त्यांची पहिली कथा ही तमाशा नावाने होती. त्याला जालियावाला बाग हत्याकांडाची पार्श्वभूमी होती. पहिल्याच कथेने ते साहित्य विश्वात एक उत्तम कथाकार म्हणून नावारुपास आले.

४३ वर्षांच्या अल्प कालावधीत मंटो भरभरून जगले. आयुष्याची तब्बल २०-२२ वर्षे त्यांनी लिहिण्यात व्यतीत केली. लिखाण त्यांचे पॅशन आणि जगण्याचा आधार होता. खोल दो ही त्यांची कथा भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना, स्थलांतर, स्वकीयांची ताटातूट, होलपट, दु: ख इत्यादींवर भाष्य करते.

कथा सुरू होते, सीमावर्ती भागातील स्थलांतरितांच्या निर्वासित कॅम्प येथून.. अमृतसर से स्पेशल ट्रेन दोपहर दो बजे चली और आठ घंटों के बाद मुगलपुरा पहुंची। रास्ते में कई आदमी मारे गए। बहोत से जख्मी हुए और कुछ इधर-उधर भटक गए।

सुबह दस बजे कैम्प के ठंडी जमीन पर जब सिराजुद्दीन ने आंखें खोलीं और अपने चारों तरफ मर्दों, औरतों और बच्चों का एक उमड़ता समंदर देखा तो उसकी सोचने-समझने की कुव्वते और भी बूढ़ी हो गईं।

वह देर तक धुंदले आसमान को टकटकी बांधे देखता रहा। यूँ तो कैम्प में शोर मचा हुआ था, लेकिन बूढे सिराजुद्दीन के कान जैसे बंद थे। उसे कुछ सुनाई नहीं देता था। कोई उसे देखता तो यह सोचता की वह गहरी निंद में डुबा हैं। मगर ऐसा नहीं था, उसके होश ओ हवास गायब थे। उसका सारा वजूद सिफर (शून्य) में लटका हुआ था।

धुंदले आसमान की तरफ बगैर किसी इरादे के देखते-देखते सिराजुद्दीन की निगाहें सूरज से टकराईं। तेज रोशनी उसके वजूद की रग-रग में उतर गई और वह जाग उठा। ऊपर-तले उसके दिमाग में कई तस्वीरें दौड़ गईं - लूट, आग, भागम-भाग, स्टेशन, गोलियां, रात और.. और सकीना... सिराजुद्दीन एकदम उठ खड़ा हुआ और पागलों की तरह उसने चारों तरफ फैले हुए इनसानों के समंदर को खंगालना शुरु कर दिया।

देशाची फाळणी झाल्याने सिराजुद्दीन अमृतसरहून आपल्या कुटुंबासह मायभूमी सोडून डोक्यावर छप्पर शोधत नव्या देशाकडे निघालाय. वाटेत त्यांची व त्याच्या कुटुंबीयांची ताटातूट झालीय. त्याचे एकुलते एक मूल, त्याची तरुण मुलगी सकीना स्थलांतराच्या प्रवासात – तिची ताटातूट झालीय, बापापासून ती हरवली आहे.

असंख्य वेदना, दु:ख, अंगावर झालेल्या भीषण जखमा विसरून सिराजुद्दीन सकीनाचा शोध घेतोय. प्रत्येक, निर्वासित कॅम्प, पोलीस ठाणे, चौक्या, चेक नाके, सगळीकडे शोधून झालंय. सकीना कुठेच आढळली नाहीये. तीन तास शोध घेऊन आता तो थकलाय.

मंटो लिहितात, सिराजुद्दीन थक-हारकर एक तरफ बैठ गया और दिमाग पर जोर देकर सोचने लगा कि सकीना उससे कब और कहां अलग हुई, लेकिन सोचते-सोचते उसका दिमाग सकीना की मां की लाश पर ठहर जाता, जिसकी सारी अंतड़ियां बाहर निकली हुईं थीं। उससे आगे वह और कुछ न सोच सका।

सकीनाची आई दंगलीत मरून पडली होती. तिने सिराजुद्दीनच्या डोळ्यांसमोर जीव सोडला. पण सकीना कुठे दिसत नव्हती, सकीनाच्या चिंतेत मरता-मरता तिने आपल्या नवऱ्याला - सिराजुद्दीनला सांगून ठेवलं होतं, मुझे छोड़ दो और सकीना को लेकर जल्दी से यहां से भाग जाओ।

सकीना उसके साथ ही थी। दोनों नंगे पांव भाग रहे थे। सकीना का दुप्पटा गिर पड़ा था। उसे उठाने के लिए उसने रुकना चाहा था। सकीना ने चिल्लाकर कहा था, अब्बाजी छोड़िए! लेकिन उसने दुप्पटा उठा लिया था। ....यह सोचते-सोचते उसने अपने कोट की उभरी हुई जेब का तरफ देखा और उसमें हाथ डालकर एक कपड़ा निकाला, सकीना का वही दुप्पटा था, लेकिन सकीना कहां थी?

सिराजुद्दीन थकलेल्या मेंदूवर ताण देत आठवत राहिला की, सकीनाची आणि त्याची ताटतूट नेमकी कुठं व कशी झाली? तो विचार करू लागला की, त्याने सकीनाला आपल्यासोबत स्टेशनपर्यंत आणलं होतं? ती त्याच्यासोबत गाडीत बसली होती? वाटेत ट्रेन थांबवली गेली आणि दंगलखोर आत घुसले. त्यांनी सकीनाला उचलून नेलं, त्याचवेळी तो बेशुद्ध झाला होता....

सिराजुद्दीनच्या डोक्यात अनेक विचार घोंगावू लागले. पण उत्तर कुठेच नव्हते. त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक मानवी तांड्याचे दु:ख सारखंच होतं. सिराजुद्दीनचे दु:ख शब्दांच्या पलीकडचे होते. सिराजुद्दीन ने रोना चाहा, मगर आंखों ने उसकी मदद न की। आंसू न जाने कहां गायब हो गए थे।

सहा दिवसानंतर सिराजुद्दीन काहीसा भानावर व शुद्धीवर आला, तो अशा लोकांना भेटला जे त्याची मदत करायला तयार होते. आठ नौजवान थे, जिनके पास लाठियां थीं, बंदूकें थीं। सिराजुद्दीन ने उनको लाख-लाख दुआऐं दीं और सकीना का हुलिया बताया, गोरा रंग है और बहुत खूबसूरत भी है... मुझ पर नहीं अपनी मां पर थी... उम्र यहीं सत्रह साल के करीब है। ...आंखें बड़ी-बड़ी ...बाल स्याह, दाहिने गाल पर मोटा सा तिल ...मेरी इकलौती लड़की है। ढूंढ लाओ, खुदा तुम्हारा भला करेगा।

त्या तरुणांनी सकीनाला शोधून काढण्याची हमी दिली. हे तरुण जीव मुठीत घेऊन अमृतरसला गेले. अनेकांना संकटातून बाहेर काढून मदत पुरवली, त्यांना सुरक्षित स्थानी पोहोचवले. दहा दिवस लोटले पण त्यांना सकीना कुठेच आढळली नाही.

एका दिवशी सेवाकार्यासाठी ते ट्रकमधून अमृतसरला जात होते. रस्त्याच्या एका चौकावर त्यांना एक मुलगी दिसली. ट्रकचा आवाज ऐकून ती अजून भयग्रस्त होऊन बेफाम पळू लागली. तिला पळताना बघताच सर्वजण लक्ष्याला टिपण्यासाठी तिच्यामागे पळू लागले. अखेर त्यांनी तिला धरलं. एक लड़के ने उससे कहा, घबराओ नहीं-क्या तुम्हारा नाम सकीना है? लड़की का रंग और भी जर्द हो गया। उसने कोई जवाब नहीं दिया, लेकिन जब तमाम लड़कों ने उसे दम-दिलासा दिया तो उसकी दहशत दूर हुई। उसने मान लिया की वह सिराजुद्दीन की बेटी सकीना हैं।

इकडे सिराजुद्दीन हॉस्पिटल, मुर्दाघर, कॅम्प, ऑफिसेस, नदी, नाले, गटारीत आपल्या लेकीचा शोध घेतच होता. अनेक दिवस लोटले, पण सकीनाचा पत्ता काही सिराजुद्दीनला लागत नव्हता. एकेदिवशी सिराजुद्दीनला ते आठ तरुण दिसले. ट्रक सुरू करून ते निघण्याच्या तयारीतच होते. सिराजुद्दीनने पळत-पळत जाऊन त्यांना आर्जव करीत म्हणाला, सकीनाचा काही पत्ता लागला का?” सर्वांनी एकसुरात म्हटले, लागेल... लागेल…” आणि त्यांनी ट्रक चालू केला व निघून गेले. सिराजुद्दीनने त्या तरुणांना यश मिळण्याची भरभरून दुआ केली.

बरेच दिवस लोटले, सिराजुद्दीन सकीनाचा शोध घेतच राहिला. एका संध्याकाळी रेल्वे ट्रॅकवर काहीतरी गडबड जाणवली, चार माणसे काहीतरी उचलून आणत होते. मुलगी तिथे बेशुद्ध पडल्याचे त्याने ऐकले. सिराजुद्दीन त्यांच्या मागोमाग चालू लागला. ते मुलीला हॉस्पिटलवाल्यांच्या सुपुर्द करून निघून गेले.

सिराजुद्दीन कुछ देर वह ऐसे ही अस्पताल के बाहर गड़े हुए लकड़ी के खंभे के साथ लगकर खड़ा रहा। फिर आहिस्ता-आहिस्ता अंदर चला गया। कमरे में कोई नहीं था। एक स्ट्रेचर था, जिस पर एक लाश पड़ी थी। सिराजुद्दीन छोटे-छोटे कदम उठाता उसकी तरफ बढ़ा। कमरे में अचानक रोशनी हुई। सिराजुद्दीन ने लाश के जर्द चेहरे पर चमकता हुआ तिल देखा और चिल्लाया - सकीना....!

डॉक्टर, जिसने कमरे में रोशनी की थी, उसने सिराजुद्दीन से पूछा, क्या है?

सिराजुद्दीन के हलक से सिर्फ इस कदर निकल सका, जी मैं... जी मैं... इसका बाप हूं।

डॉक्टर ने स्ट्रेचर पर पड़ी हुई लाश की नब्ज टटोली और सिराजुद्दीन से कहा, खिड़की.. खोल दो।

सकीना के मुर्दा जिस्म में जुंबिश हुई। बेजान हाथों से उसने नाड़ा खोला और सलवार नीचे सरका दी।

बूढ़ा सिराजुद्दीन खुशी से चिल्लाया, जिंदा है - मेरी बेटी जिंदा है? या खुदा, मेरी बेटी जिंदा हैं।

डॉक्टर सर से पैर तक ठंडे पसीने में भीग गया।

.

.

.

कथा इथे संपते. कथेचा शेवट फारच धक्कादायक आहे. कथाकार म्हणून मंटो एका व्यक्तीला, गटाला, परिस्थितीला किंवा राजकीय व्यवस्थेला; कोणालाच जबाबदार ठरवत नाहीत. सकीनाचे अपहरण करून तिच्यावर रोजच सामूहिक अत्याचार होतोय, अत्याचार करणारे, घडवून आणणारे कोण आहेत, त्यांनी असं का केलं? बिचारा सिराजुद्दीन, घर, गाव, सकीना, सकीनाची आई, पळापळ, हिंसा, भीषण दंगल, सर्वकाही मंटो तटस्थपणे मांडत, निवेदन करीत जातात.

चारएक पानांची ही कथा, उर्दू साहित्यात एक मैलाचा दगड म्हणून गणली गेली. अनेक दिग्गज लेखकांनी, ज्यात राजेंद्रसिंह बेदी, कृश्न चंदर, मंटो, ख्वाजा अहमद अब्बास, कुर्रतूल ऐन हैदर, इस्मत चुगताई, राही मासूम रज़ा, कमलेश्वर, अनिसा किडवई इत्यादी अदीबांनी म्हणजे साहित्यिकांनी फाळणीच्या वेदना शब्दबद्ध केल्या आहेत. या दिग्गजांच्या कथा वाचून आपणास उत्तरेकडची फाळणी किती विदारक होती, त्याचा मानवी समूहावर काय परिणाम झाला, हत्या, लूटालूट, बलात्कार, विनाश, नासधूस, स्थलांतर इत्यादींबद्दल एक संपूर्ण पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.

मंटो यांनी फाळणीवर अनेक कथा रचल्या आहेत, विशेष म्हणजे बहुतेक पात्रांचे चरित्रनायक पालकम्हणजे वृद्धआहेत. तर त्यांच्या काही कथा स्त्रीप्रधान आहेत. स्त्रियांच्या व्यथा, समस्या, भावविश्व, शोषण, पुरुषार्थ गाजवणारे, अबला, निराश्रित स्त्री त्यांच्या कथेत विद्रोह करून पुढे येते.

ज्या वाचकांना उर्दू भाषा येत नाही, त्यांच्यासाठी मंटो समग्र देवनागरीत उपलब्ध आहे. शिवाय त्यांच्या अनेक कथांचे मराठीकरण झालं आहे, यातले बहुतांश भाषांतर निरस असले तरी त्यातून कथासूत्र समोर येते. त्यांच्या अनेक कथा ऑडियो-व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये आलेल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच कथांवर सिनेमे, मालिका तयार झाल्या आहेत. भारतात आर. जे. सायमा या विदूषीने मंटोंच्या अनेक कथांवर एक पुरानी कहानीनभोनाट्य मालिका म्हणजे रेडियो रुपांतरण केलेलं आहे. त्यातून मंटोंनी रेखाटलेल्या कथा नेमक्या प्रसंगासह आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.

मंटो दीर्घकाळ मुंबईत वास्तव्याला होते. काही मराठी लेखक, साहित्यिक असे मानतात की, साहित्यात मंटोनी रेखाटलेली घाटन लडकी म्हणजे मराठी स्त्री ही अद्याप कोणीही रेखाटली नाही. मुंबई मंटोंच्या आत्म्यात निवास करीत होती. चुकीचा निर्णय मंटोला मुंबई सोडून लाहोरला घेऊन गेला. त्याबद्दल ते अखेरपर्यंत स्वत:ला दोष देत राहिले.

*

वाचा : मंटो : शोषित महिलांचा 'बदनाम' लेखक

वाचा : बशर नवाज़ : जिंदगी वाचणारा शायर

ख्वाजा अहमद अब्बास हे मुंबईत राहणारे आणखी एक उर्दूचे श्रेष्ठ कथाकार.. देशाला त्यांचा परिचय वास्तववादी (रियलिस्टिक) सिनेमा निर्मिती करणारे दिग्दर्शक, निर्माता व पटकथाकार असा आहे. पण अब्बास मुळात एक उत्तम लेखक, कथाकार होते. त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेत विपुल लिखाण केलं आहे. तब्बल ५२ वर्षे त्यांनी रुसी करंजिया या प्रसिद्ध संपादकाचे बहुचर्चित टॅब्लॉइट ब्लिट्झमध्ये दि लॉस्ट पेज नावाचं सदर आपल्या निधनापर्यंत चालवलं.

माझ्या माहितीत सर्वाधिक काळ चाललेलं हे एकमेव वृत्तपत्रीय सदर असावं. हे सदर एकाच वेळी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजीत येत. उर्दू आवृत्तीत आज़ाद कलमतर हिंदीत आखरी पन्नेया नावाने हा कॉलम प्रकाशित होई.

अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ला हरयाणाच्या पानिपतमध्ये झाला. त्यांचे पंजोबा अलताफ हुसैन हाली महात्मा फुलेंचे समकालीन होते. सर सय्यद यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुधारणा चळवळीचे ते एक प्रमुख संघटक होते. त्यांची ओळख तत्त्वज्ञानी, विद्वान, चरित्रकार, शायर आणि समाजसुधारक अशी होती. अब्बास यांचे वडीलही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते.  

स्वातंत्र्य सेनानींचा वारसा लाभलेले अब्बास देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी बाळगून सक्रिय राजकारणात आले. अल्पावधीतच ते साम्यवादी चळवळीकडे खेचले गेले व नेहरूंच्या समाजवादी भारत साकारण्याच्या दूरदृष्टीसाठी कार्यमग्न झाले.

अलीगड विद्यापीठात शिकत असताना ते बॉम्बे क्रॉनिकलनावाच्या प्रतिष्ठित वृत्तपत्राशी जोडले गेले. या वर्तमानपत्रात बातमीदार व चित्रपट समीक्षक म्हणून त्यांनी १९४७ पर्यंत काम केले. बॉलीवूडमध्ये पब्लिसिस्ट म्हणून त्यांचे मुंबईत पदार्पण झाले. एकाच वेळी ते पत्रकारिता, कथालेखन, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संस्कृतीकर्मी, साहित्यकार, संघटक इत्यादी अशा हरफनमौला भूमिका बजावत होते.

हयातीत तब्बल ७५ पुस्तकांची रचना करणाऱ्या अब्बास यांनी अनेक कालजयी म्हणजे अभिजात कथांची रचना केली आहे. आज आपण त्यांच्या अबाबील या अभिजात कथेचा परिचय करून घेणार आहोत.

अबाबीलतसा मूळ शब्द अरबीतून आलेला आहे. छोट्या आकाराच्या पक्ष्याला उद्देशून तो वापरला जातो. हे पक्षी कथेचे चरित्र नायक आहेत. त्यांचं घरटं व त्याची पिलं आणि रहीम खानया वृद्ध शेतकऱ्याचं घरटं आणि त्याची पिलं असा ह्या कथेचा पट आहे.

रहीम खानहेकट, तिरसट आणि रागीट व्यक्ती म्हणून गावात प्रसिद्ध आहे. अब्बास यांच्या मते, राग आणि कठोरता हा त्याच्या स्वभावातला अवगुण आहे. कथा सुरू होते अशी, उसका नाम तो रहीम ख़ान था, मगर उस जैसा ज़ालिम भी शायद ही कोई हो। गाँव भर उसके नाम से कांपता था न आदमी पर तरस खाए न जानवर पर। एक दिन रामू लुहार के बच्चे ने उसके बैल की दुम में कांटे बांध दिए थे तो मारते-मारते उसको अध मुआ कर दिया।

अगले दिन ज़मींदार की घोड़ी उसके खेत में घुस आई तो लाठी लेकर इतना मारा कि लहूलुहान कर दिया। लोग कहते थे कि कमबख़्त को ख़ुदा का ख़ौफ़ भी तो नहीं है। मासूम बच्चों और बेज़बान जानवरों तक को माफ़ नहीं करता। ये ज़रूर जहन्नम में जलेगा। मगर ये सब उसकी पीठ के पीछे कहा जाता था। सामने किसी की हिम्मत ज़बान हिलाने की न होती थी।

त्याच्या निर्दयी स्वभावामुळेच त्याचा मुलगा नूरू घर सोडून काकाकडे निघून गेलाय. बीवी ने एक दिन डरते-डरते कहा, ‘बिलासपुर की तरफ़ जाओ ज़रा, नूरू को लेते आना।बस फिर क्या था आग बगूला हो गया। मैं उस बदमाश को लेने जाऊं। अब वो ख़ुद भी आया तो टांगें चीर कर फेंक दूँगा।

रहीम ख़ान तिरसट असल्याने गावातील प्रत्येकांनी त्याच्याशी बोलणं टाकलंय. मगर उस पर कोई असर न हुआ। सुबह-सवेरे वो हल कांधे पर धरे अपने खेत की तरफ़ जाता दिखाई देता था। रास्ते में किसी से न बोलता। खेत में जा कर बैलों से आदमियों की तरह बातें करता। उसने दोनों के नाम रखे हुए थे। एक को कहता था नत्थू, दूसरे को छिद्दू। हल चलाते हुए बोलता जाता, “क्यूँ-बे नत्थू तू सीधा नहीं चलता। ये खेत आज तेरा बाप पूरे करेगा। और अबे छिद्दू तेरी भी शामत आई है क्या?” और फिर उन ग़रीबों की शामत आ ही जाती। सूत की रस्सी की मार। दोनों बैलों की कमर पर ज़ख़्म पड़ गए थे।

दोन वर्षांनंतर त्याचा लहान मुलगा बिंदूदेखील बापाच्या क्रोर्याला कंटाळून निघून गेला. रहीम ख़ानच्या रौद्र रूपाचे संकट आता पत्नीवर ओढावले. एकेदिवशी त्याने बेगमला इतके मारले की, तीदेखील आपल्या भावाला बोलावून त्याच्यासोबत निघून गेली.

आता रहीमखान खूपच एकटा पडलाय. कथा पुढे सरकते अशी, अगले दिन रहीम ख़ान जब सो कर उठा तो दिन चढ़ चुका था। लेकिन आज उसे खेत पर जाने की जल्दी न थी। बकरियों का दूध दूह कर पिया और हुक़्क़ा भर कर पलंग पर बैठ गया।

अब झोंपड़े में धूप भर आई थी। एक कोने में देखा तो जाले लगे हुए थे। सोचा कि लाओ सफ़ाई ही कर डालूं। एक बाँस में कपड़ा बांध कर जाले उतार रहा था कि खपरैल में अबाबीलों का एक घोंसला नज़र आया।

दो अबाबीलें कभी अंदर जाती थीं कभी बाहर आती थीं। पहले उसने इरादा किया कि बाँस से घोंसला तोड़ डाले। फिर मालूम नहीं क्या सोचा। एक घड़ौंची ला कर उस पर चढ़ा और घोंसले में झांक कर देखा। अंदर दो लाल बूटी से बच्चे पड़े चूं चूं कर रहे थे। और उनके माँ-बाप अपनी औलाद की हिफ़ाज़त के लिए उसके सर पर मंडला रहे थे। घोंसले की तरफ़ उसने हाथ बढ़ाया ही था कि मादा अबाबील अपनी चोंच से उस पर हमलावर हुई।

अरी, आँख फोड़ेगी?” उसने अपना ख़ौफ़नाक क़हक़हा मार कर कहा। और घड़ौंची पर से उतर आया। अबाबीलों का घोंसला सलामत रहा।

रहीम खान आपल्या नित्य दिनक्रमात व्यस्त झाला. गावातील लोकांनी बोलणं टाकलं, मुले-पत्नी घर सोडून निघून गेली, याचा त्याच्या आयुष्यावर फारसा फरक पडला दिसत नाही. तो दररोज शेतावरून आल्यावर अंगणात खाट टाकून हुक्का धरतो आणि अबाबीलच्या घरट्याकडे टकटक पाहत राहतो.

अब दोनों बच्चे भी उड़ने के क़ाबिल हो गए थे। उसने उन दोनों के नाम अपने बच्चों के नाम पर नूरू और बिंदू रख दिए थे। अब दुनिया में उसके दोस्त ये चार अबाबील ही रह गए थे। लेकिन उनको ये हैरत ज़रूर थी कि मुद्दत से किसी ने उसको अपने बैलों को मारते न देखा था। नत्थू और छिद्दू ख़ुश थे। उनकी कमर से ज़ख़्मों के निशान भी तक़रीबन ग़ायब हो गए थे।

ऐकेदिवशी तो शेतावरून घरी येत होता. रस्त्यात काही मुले खेळत होती. लांबूनच रहीम ख़ानला येताना पाहून ती आपली बूट सोडून पळून गेली. तो जोरजोरात ओरडून सांगत राहिला, अरे, मी आता, मारतोय़ थोडच! या की!”

त्या दिवशी आभाळ भरून आलं होतं. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यासोबत जोरदार पाऊसही.. धावत धावत तो घरात आला व दरवाजा बंद करून घेतला. नेहमीसारखे अबाबीलच्या घरट्याजवळ जाऊन भाकरीचे शिळे तुकडे त्यांच्यासमोर टाकले. अरे, ओ.. बिंदू आणि नुरू..” त्याने आवाज दिला पण पिलं काही बाहेर आले नाहीत.

घोंसले में जो झाँका तो चारों अपने परों में सर दिये सहमे बैठे थे। ऐन जिस जगह छत में घोंसला था वहां एक सुराख़ था और बारिश का पानी टपक रहा था। अगर कुछ देर ये पानी इस तरह ही आता रहा तो घोंसला तबाह हो जाएगा और अबाबीलें बे-चारी बे-घर हो जाएँगी। ये सोच कर उसने किवाड़ खोले और मूसलाधार बारिश में सीढ़ी लगा कर छत पर चढ़ गया। जब तक मिट्टी डाल कर सुराख़ को बंद कर के वो उतरा तो शराबोर था। पलंग पर जा कर बैठा तो कई छींकें आईं। मगर उसने परवाह न की और गीले कपड़ों को निचोड़ चादर ओढ़ कर सो गया।

अगले दिन सुबह को उठा तो तमाम बदन में दर्द और सख़्त बुख़ार था। कौन हाल पूछता और कौन दवा लाता। दो दिन उसी हालत में पड़ा रहा।

इकडे गावकरी दोन दिवस रहीम शेताकडे का गेला नाही म्हणून चिंतेत होते. कालू ज़मींदार आणि काही शेतकरी संध्याकाळी त्याच्या झोंपड़ीत पाहायला गेले. पाहिलं तर हा पलंगावर पडून स्वत:शीच बडबड करतोय. अरे बिंदू, अरे नूरू। कहाँ मर गए। आज तुम्हें कौन खाना देगा?” काही अबाबील खोलीत फडफड करीत होती.

बेचारा पागल हो गया है।कालू ज़मींदार ने सर हिला कर कहा। सुबह को शिफा-ख़ाना वालों को पता देंगे कि पागलख़ाना भिजवा दें।

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे शेजारी डॉक्टरांना घेऊन आले. त्यांनी त्याच्या झोपडीचा दरवाजा उघडला, तेव्हा पाहिलं की, रहीम खान कधीचाच मरून पडलाय. चारही अबाबील मान खाली घालून त्याच्या पायाशी गप्प बसली होती.

*

वाचा : मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे तीन दशकं

वाचा : प्रतिकांचे साहित्यकारण किती दिवस?

कठोर स्वभावाचा रहीम खान पावसाच्या पाण्यापासून पक्ष्यांचे रक्षण करतो. त्यांच्यासाठी तो भर पावसात गच्चीवर जाऊन छिद्र बुजवतो. पावसात भिजल्याने त्यांला सर्दी व पुढे न्यूमोनिया होतो आणि वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा जीव जातो.

अब्बास यांनी रेखाटलेला नायक रहीम खान हा सामाजिक अर्थाने कठोर, क्रूर व रागीट असला तरी तो प्रचंड हळवा, संवेदनशील आहे. रहीम खान गावकऱ्यांसाठी रागीट असला तरी तो पक्ष्यांसाठी देवदूत ठरला आहे. त्याच्या मृत्युनंतर पक्षी त्याच्या पायाशी शोकमग्न बसले आहेत.

ख्वाजा अहमद अब्बास एक उत्तम लघुकथाकार होते. मानवी संवेदना, भाव व त्यात समाजमन टिपणारे ते हळवे लेखक होते. त्यांनी रेखाटलेल्या अनेक कथा अशाच संवेदनशील आहेत.  राज कपूर यांनी अब्बास यांच्या अनेक कथांवर सिनेमे तयार केले आहेत. त्यामुळेच त्यांचे सिनेमे आपल्याला अधिक भावतात.

अबाबीलकथेत कुटुंब सोडून गेल्यावर रहीम खान असाहाय होतो. पण आपल्या वेदना तो व्यक्त करू शकत नाही, त्यामुळेच तो दोन्हीं पिलांना आपल्या मुलांच्या नावाने हाका मारतो. जणू ती त्याचीच पिलं आहेत, असं मानून त्यांचं संरक्षण करतो. मृत्युशय्येवर देखील त्याला त्या पक्ष्यांच्या पिलाची काळजी वाटते.

अब्बास यांनी रेखाटलेला रहीम खान मानवी प्रवृत्तीचे दोन कोन आहेत. अबाबीलशी मैत्री झाल्यावर त्याच्या रागीट स्वभावात ९० अंशी बदल झालाय. तो आता पहिल्यासारखा बैलांना मारीत नाही, शिवाय गांवकऱ्यांवरदेखील अकारण खेकसत नाही. त्याचे अवगुण संपुष्टात आले आहेत. बोलू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या पिलाकडे पाहून त्याला जगणे सुंदर वाटू लागलंय.

मानवी प्रवृत्तीची दोन टोक व त्यात झालेला लक्षणीय बदल अब्बास यांनी उत्तम रेखाटला आहे. त्यामुळेच अबाबीलअभिजात कथेत मोडते. अब्बास जेवढ्या अस्खलित उर्दूत लिहित, तेवढंच ओघवत्या इंग्रजीत मांडीत. दोन्ही भाषेवर त्यांनी मजबूत पकड होती. उर्दू न जाणणाऱ्या वाचकांसाठी अब्बास यांचं बरेचसं लेखन देवनागरीत आलेलं आहे. शिवाय त्यांनी लिहिलेल्या अनेक सिनेमांमधून त्यांची सामाजिक मांडणी येत राहते.

नेहमीच त्यांच्या कथेत सामान्य माणूस हा मुख्य नायक व पात्र असतो. गरीब, निराश्रीत, शोषित घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कथा रचल्या आहेत. त्यांच्या सर्वच कथा सामाजिक प्रथा-परंपरा, रुढी, विषमता, जाति-व्यवस्था, सावकारी पाश, शेतकरी, भूमीहिन मजूर, कामगार, राजकीय दुर्भिक्ष्य इत्यादींवर प्रहार करतात.

मंटो असो की अब्बास दोन्ही कथाकार सामाजिक प्रवृत्ती टिपण्यात पटाइत होते. त्यांचा साम्यवादी दृष्टिकोन मानवी हित व कल्याण पाहतो. सामान्य माणसांच्या जगण्याचा संघर्ष, त्याची गरीबी, दारिद्र्य, असाहयात उपरोक्त लेखक तटस्थपणे मांडत जातात. त्या पात्राच्या सामाजिक संघर्षाचे चित्रण करताना ते कोणालाही दोष देत नाहीत, हे दोन्ही कथाकारांचे एक वैशिष्ट्य म्हणूया...

धन्यवाद..

पुनश्च एकदा, मला इथे बोलाविल्याबद्दल अंबानगरीतील साहित्यरसिक व संयोजकांचे आभार!

शुक्रिया और सलाम

.......

कलीम अजीम, अंबाजोगाई

मेल-kalimazim2@gmail.com

 (१६ व १७ ऑक्टोबर २०२१ रोजी अंबाजोगाईच्या बहुभाषिक साहित्य संमेलनात वृद्ध आणि उर्दू साहित्यया विषयावर केलेली मांडणी.)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मंटो आणि अब्बास यांच्या उर्दू कथांमध्ये वृद्धांचे चित्रण
मंटो आणि अब्बास यांच्या उर्दू कथांमध्ये वृद्धांचे चित्रण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwfMFjirKjqKtAphhB5RZi_if9yRKPQ3w8VBlVOPTUmvVPQpi4i5D3AbHVvRDezjTMlhtIwV5WcFCP2SqaQSKDF6ZnwEnm6syu_QHvIWBIr_7OH7JHJQY-LIX-CROkx4uzlVhPem9lrxw3GuTwxzm1pB7ofYEYvTcWnniEPYPDrPrHyAJfSerupJNoOA/w640-h360/mANTO.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwfMFjirKjqKtAphhB5RZi_if9yRKPQ3w8VBlVOPTUmvVPQpi4i5D3AbHVvRDezjTMlhtIwV5WcFCP2SqaQSKDF6ZnwEnm6syu_QHvIWBIr_7OH7JHJQY-LIX-CROkx4uzlVhPem9lrxw3GuTwxzm1pB7ofYEYvTcWnniEPYPDrPrHyAJfSerupJNoOA/s72-w640-c-h360/mANTO.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/12/blog-post_20.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/12/blog-post_20.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content