बशर नवाज़ : जिंदगी वाचणारा शायर


बहुत था ख़ौफ़ जिस का फिर वही क़िस्सा निकल आया 
मिरे दुख से किसी आवाज़ का रिश्ता निकल आया 
किस तरह किनारों को है सीने से लगाए 
ठहरे हुए पानी की अदा तुम भी तो देखो

औरंगाबादला असताना एका मुलाखतीच्या निमित्ताने २०११मध्ये प्रसिद्ध शायर बशर नवाज यांना भेटण्याचा योग आला. त्यानंतर झालेल्या मैत्रीनंतर वारंवार भेटणं होत असे. बामू विद्यापीठाच्या उर्दू विभागासमोर असलेली टपरीवजा कँटीन आमच्या दिर्घ चाललेल्या गप्पांची साक्षीदार होती. बुजूर्ग शायर अदब’ (साहित्य) शौकीनाचे खूप लवकर मित्र होत असे. मग आमच्या भेटी वारंवार होऊ लागल्या. 
भडकल गेटसमोर असलेल्या ज्युबली कॉम्प्लेक्सच्या त्यांच्या चार नंबर फ्लॅटच्या सोफ्यावर बशर साहेबासोबत पांढर्‍या कागदाच्या खचात बसून मनसोक्त गप्पा मारणे, हा प्रत्येक भेटी दरम्यान नित्यक्रम असायचा. पंचाहत्तरी उलटलेले बशर प्रचंड उत्साहाने शायरीबद्दल बोलत.
घारे डोळे, मानेवर रुळलेले पांढरे केस, गुडघ्यपर्तंत आलेला पांढरा कुर्ता-पायजमा, चेहऱ्यावर काळे-पांढरे व्रण, भडकल गेट, औरंगपुरा, टाऊन हॉल परिसरात पायी फिरत सिगारेटचा धूर सोडणारे बशर अगदी सहज कोणालाही भेटत. मराठवाड्यातील साहित्य परंपरेला बेवारस सोडून आज बशर आपल्यातून कायमचे निघून गेले आहेत. अगदी लहानशा साहित्यविषयक कार्यक्रमातही बशर सहज दिसत. औरंगाबादला असताना त्या तीन व्रषांत बशर नवाज यांचे अनेक कार्यक्रम मी एकले आहेत.
आहट पे कान दर पे नज़र इस तरह न थी
एक एक पल की हम को ख़बर इस तरह न थी
एकदा नंबर मिळवून त्यांना सहज फोन लावला. म्हणालो, “असाईमेंट म्हणून तुमची मुलाखत करायची आहे. कधी वेळ मिळेल?” लागलीच ते म्हणाले, “तासाभरात याहोकार मिळताच मी उडालोच. तशी मुलाखतीसाठी दोन-तीन दिवसांपासून तयारी करत होतो. तासाभरात पोहोचलो. हाय-बाय नंतर ते सुरू झाले. माझे ठोकळेबाज प्रश्न बाजूला पडले. उत्तरातून प्रश्न प्रश्नांतून विषय असे करत वेळ कसा गेला कळालेच नाही.
सोव्हियत युनियन, टॉलस्टॉय, कम्युनिझम, शालेय जीवन, गल्लीच्या आणि कट्ट्यांच्या गप्पा, जवानीतील रंगीनीयाँ, सामाजिक चळवळी, लढविलेली पहिली महापालिका निवडणूक, औरंगाबादचं सामाजिक/राजकीय वातावरण, दखनी साहित्य अशा अनेक विषयांवर गल्ली ते दिल्ली गप्पा झाल्या होत्या. ते शायरीबद्दल बोलता-बोलता अधून-मधून हॉलमध्ये फेर्‍या मारत असे. मध्येच पांढर्‍या कागदातून काढून एखादी मधाळ शायरीची तरन्नूम ऐकवत.
नंतरही शहरातील कुठल्याही कार्यक्रमात भेटले की सहज ओळखत. कलीम मियाँ किधर हो!हे त्यांचं नेहमीचेच वाक्य. अगदी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात वेळेची मर्यादा तोडत बुजूर्ग शायर तेवढ्याच आत्मियतेने आणि उत्साहाने गझलप्रेमींशी गप्पा मारायचे. (त्याच ऊत्साहाने बामू विद्यापीठात तीन-तीन तास अगदी परवापर्यंत लेक्चर देत असे.) 
आमची पहिली २ तासाच्या बैठकीच्या स्मृती आजही त्याच अवस्थेत मी जपून ठेवल्या आहेत. तो क्षण आणि दिवस आजही माझ्या तसाच स्मरणात आहे. याच चार नंबरच्या टूबीएचकेमध्ये आज (गुरुवारी) पहाटे साडे पाचच्या सुमारास बशर नवाज यांनी शेवटची सांसघेतली.
जागती आँखें देख रही थीं क्या क्या कारोबार हुए...
प्यार के बंधन ख़ून के रिश्ते टूट गए ख़्वाबों की तरह
जागती आँखें देख रही थीं क्या क्या कारोबार हुए
औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक भडकल गेट समोरच्या गल्लीत एका छोट्याशा घरात दख्खनचे प्रसिद्ध शायर राहत होते. केवळ निवांत शायरी आणि मनसोक्त वाचन करता यावे, यासाठी जुन्या घराच्या मागे असलेल्या ज्युबली कॉम्प्लेक्सच्या ४ नंबरमध्ये ते एकटेच राहत. याच कॉम्प्लेक्सच्या खाली प्रतिभावंत शायरला शेवटचा अलविदाकरण्यासाठी शहरातील थोर साहित्यिक आणि कवींचा मोठा जमाव उभा होता.
आयुष्यभर हलाखीच्या परिस्थितीत जगलेल्या शायराचे अंतीमदर्शन घेणार्‍यांची गर्दी वाढत होती. दखनच्या या ज्येष्ठ शायरने वली दखनी, सिकंदर अली वज्द, शफीख फातिमा शेरा’, काजी सलीम, वहीद अख्तर, कमर इकबाल अशा थोर शायरांची परंपरा लाभलेल्या औरंगाबाद शहराला शायरांची एक कसदार शायरी करणारी पिढी जन्मली. त्यात प्रामुख्याने बशर नवाज यांचे नाव समोर येते.
बशर नवाज यांनी शायरीला बुकशेल्फमधून बाहेर काढले. शायरीबद्दल ते नेहमी म्हणत, “मोटी किताबे पढकर की गयी शायरी, बुकशेल्फ में बंद हो जाती हैं. पर लोगो के चेहरे और जिंदगी पढकर कि गयी शायरी सदीयों तक जिंदगी के साथ चलती है”  त्यांचे शायरी संदर्भातील वाक्य विद्यापीठाच्या प्राध्यापकांना लाजवेल असं होतं.
१८ ऑगस्ट १९३५ मध्ये औरंगाबादला जन्मलेले बशर नवाज यांनी १९५४ पासून गझल लेखनाला सुरुवात केली. १९५२ साली दहावीच्या परीक्षेत अपयश आल्याने पोटा-पाण्यासाठी मोटार गॅरेजमध्ये कामाला लागले.   गॅरेजमधून वेळ मिळताच सामाजिक चळवळी आणि शहरातील गझल कट्ट्यावर रमत. शायरीसोबतच सामाजिक चळवळीत त सक्रीय झाले. बापूसाहेब काळदाते व अन्य समाजावादी कार्यकर्त्यांसह त्यांनी साम्यवादावर वर्गदेखील चालविले. 
शहरात समाजवादी व साम्यवादी चळवळीची रुजूवात त्यांनी केली. बशर नवाज आणीबाणीविरोधी चळवळीत सक्रीय होते. सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांना तुरुंगावासही घडला. तरुण साहित्यमित्र जमवून गझल मैफिली तांसतास चाले. याच काळात औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय उर्दू मुशायऱ्यामध्ये त्यांनी आपली पहिली गझल सादर केली. 
मैं कहाँ जाऊँ कि पहचान सके कोई मुझे
अजनबी मान के चलता है मुझे घर मेरा

१९५४ साली दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या शायराहया वाडःमयीन नियतकालिकात त्यांची पहिली गझल प्रकाशित होऊन तिला वर्षातील सर्वोत्कृष्ट गझलेचा सन्मान मिळाला. १९७१मध्ये त्यांचा पहिला गझलसंग्रह रायगाँप्रकाशित झाला. १९७३ या वर्षी त्यांचे नया अदब नये मसाईलहे समीक्षापर लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक आजही उर्दू साहित्य विश्‍वातील एक महत्वाचे पुस्तक म्हणून गणले जाते. १९९८ मध्ये प्रकाशित झालेली अजनबी समंदरया संग्रहातील गझल आणि नज्मरसिक वाचकांना प्रचंड भावल्या. २००८मध्ये प्रकाशित झालेल्या करोगे याद तोया गझलसंग्रहाने लोकप्रियतेचे नवे कीर्तीमान प्रस्थापित केले.
बशर नवाज यांनी बाजार’, ‘लोरी’, ‘जाने वफा’, ‘तेरे शहर मेंया हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखनही केले आहे. त्यांच्या अनेक गझला गुलाम अली, लता मंगेशकर, मुहंमद अजीज, तलत अजीज, भूपिंदरसिंग, मेहदी हसन यांसारख्या नामवंत गायकांनी गायलेल्या आहेत. निदा फाजली यांनी बशर नवाज यांना मुंबईत पाय रोवण्यास बरीच मदत केली. परंतु केवळ सातच वर्षांत मुंबईला कंटाळून त्यांनी चित्रपट्सुष्टीला अलविदा केला. त्यानंतर औरंगाबादला पूर्णवेळ शायरी करू लागले.
बशर नवाज यांनी उर्दू अदब (साहित्य)ला समृद्ध करत जागतिक स्तरावर नवीन ओळख प्राप्त करुन दिली. त्यांची शायरी समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरली. त्याचप्रमाणे जगभरातील साहित्यरसिकांच्या देखील पसंतीला उतरली. समकालीन शायरांबद्दल ते भरभरुन बोलत असे, जावेद नासीर, शमीम खान, फारुख शमीम, कनीज फातेमा, राणा हैदरी यांचा उल्लेख ते आवार्जून करायचे. त्यांचे शेर आणि गझल वाचून दाखवायचे. यांना उमेदीचे शायर मानत.
चाहते तो किसी पत्थर की तरह जी लेते
हम ने ख़ुद मोम की मानिंद पिघलना चाहा

१९८३ साली दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या अमिर खुसरौं या मालिकेच्या २३ भागांचे लिखाण व संवादलेखन तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन प्रसारित झालेल्या अनेक कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केलेले आहे. इंग्रजी, मराठी, पंजाबी, कन्नड, आदी भाषांमध्ये त्यांच्या गझलांचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या शायरीवर अनेकांनी पीएच. डी. केली आहे. देश-विदेशात त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या अनेक गझला मराठी, हिंदी व पंजाबी भाषेत अनुवादित झालेल्या आहेत.
१९८२ साली महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यानंतरही बरीच वर्ष ते हलाखीचे जीवन जगत राहिले. २०१० साली यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीने त्यांच्यावर ख्वाब, जिंदगी और मैंनावाचा माहितीपट तयार केला. (कार्यक्रमाच्याभाषणाचा ऑडिओ) त्यानंतर एकदम बशर नवाज प्रकाशझोतात आले. लगोलग त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव सुरू झाला.
(बशर नवाज यांच्या निधनाची वार्ता एकताच मी मराठीमधील प्रकाशित झालेले माझे छोटेसा स्फूट लेख)

बशर यांची शायरी

(१) फासला

बहते पानी की तरह दर्द की भी शक्ल नहीं
जब भी मिलता है नया रूप हुआ करता है
न फिर वो मैं था
न फिर वो तुम थे
न जाने कितनी मसाफ़तें दरमियाँ खड़ी थीं
उस एक लम्हे के आईने पर
न जाने कितने बरस परेशान धूल की तरह से जमे थे
जिन्हें रिफ़ाक़त समझ के हम दोनों मुतमइन थे
इस एक लम्हे के आईने में
जब अपने अपने नक़ाब उलट कर
ख़ुद अपने चेहरों को हम ने देखा
तो एक लम्हा
वो एक लम्हे का आईना कितनी सदियों कितने हज़ार मीलों की शक्ल में
दरमियाँ खड़ा था
न फिर वो मैं था न फिर वो तुम थे
बस एक वीराँ ख़मोश सहरा बस एक वीराँ ख़मोश सहरा
(२) मुझे जिना नही आता

मैं जैसे दर्द का मौसम
घटा बन कर जो बस जाता है आँखों में
धनक के रंग ख़ुशबू नज़्र करने की तमन्ना ले के जिस मंज़र तलक जाऊँ
सियह अश्कों के गहरे कोहर में डूबा हुआ पाऊँ
में अपने दिल का सोना
प्यार के मोती
तरसती आरज़ू के फूल जिस दर पर सजाता हूँ
वहाँ जैसे मकीं होता नहीं कोई
बना हूँ एक मुद्दत से सदा-ए-बाज़गश्त ऐसी
जो दीवारों से टकराए
हिरासाँ हो के लौट आए
धड़कते दिल के सूने-पन को सूना और कर जाए
मैं अपने आप को सुनता हूँ
अपने आप को छूता हूँ
अपने आप से मिलता हूँ ख़्वाबों के सुहाने आइना-घर में
तो मेरा अक्स मुझ पर मुस्कुराता है
ये कहता है
सलीक़ा तुझ को जीने का न आना था नहीं आया
सदाएँ पत्थरों की तरह मुझ पर
मेरे ख़्वाबों के बिखरते आइना-घर पर बरसती हैं
उधर तारा इधर जुगनू
कहीं इक फूल की पत्ती कहीं शबनम का इक आँसू
बिखर जाता है सब कुछ रूह के सुनसान सहरा में
मैं फिर से ज़िंदगी करने के अरमाँ में
इक इक रेज़े को चुनता हूँ सजाता हूँ नई मूरत बनाता हूँ
धनक के रंग ख़ुशबू नज़्र करने की तमन्ना में क़दम आगे बढ़ाता हूँ
तो इक बे-नाम गहरी धुँद में सब डूब जाता है
किसी से कुछ शिकायत है न शिकवा है
कि मैं तो दर्द का मौसम हूँ
अपने आप में पलता हूँ अपने आप में जीता हूँ
अपने आँसुओं में भीगता हूँ मुस्कुराता हूँ
मगर सब लोग कहते हैं
तुझे जीना नहीं आता
२०१० मध्ये दिल्लीच्या गालीब अ‍ॅकॅडमीने त्यांना उर्दू भाषेत मानाचा असा गालिब पुरस्कार” दिला.  त्याचवर्षी महाराष्ट्र अल्पसंख्यक कार्य मंत्रालयाने इफ्तेखार-ए-अदब” पुरस्कार दिला. यानंतर लहान-मोठे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. याबद्द्ल खंत व्यक्त करताना ते एकदा ते म्हणाले होते, “देर से ही सही अदब को मेरी याद आयी.” दोन वर्षापूर्वी झालेलया सहचारिणीच्या निधनाने ते बरेच खचले होते. त्यानंतर औरंगाबदच्या रस्त्यावर ते क्वचीतच दिसायचे. अशा महान शायराला पुन्हा एकदा मानाचा मुजरा.

कलीम अजीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: बशर नवाज़ : जिंदगी वाचणारा शायर
बशर नवाज़ : जिंदगी वाचणारा शायर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpvpTcmxmKwtvwHFaTW0HSGQX7Vm9dTmuT2odSifGr5v4CCIzfGX2uqjf9LfTOoVjhq3S0BlqIqGv6R4a4CWzagw7JCWOi23008T5-OwKXOowBYnpxtdkA1odRWi9pGsJdY0nB9Wdsd6LT/s640/bashar+nawaz.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpvpTcmxmKwtvwHFaTW0HSGQX7Vm9dTmuT2odSifGr5v4CCIzfGX2uqjf9LfTOoVjhq3S0BlqIqGv6R4a4CWzagw7JCWOi23008T5-OwKXOowBYnpxtdkA1odRWi9pGsJdY0nB9Wdsd6LT/s72-c/bashar+nawaz.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/07/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/07/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content