तालिबानचे रिस्टोर आणि भारतीय मुस्लिम

वी
स वर्षांच्या युद्धानंतर अंकल सॅम अफगाणिस्तानात अपयशी ठरले आहेत. परिणामी अफगाणची सत्ता पुन्हा एकदा तालिबानच्या ताब्यात दिली जाणार आहे. तेही अधिकृतरित्या. या संदर्भात अमेरिका आणि तालिबानचे प्रतिनिधी दोघांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कतरमध्ये वाटाघाटीचा संवाद सुरू आहे.

अमेरिकेने अफगाणमधून नाटो सैन्य पूर्णपणे काढण्याची घोषणा केली असून हळूहळू ते काढलेही जात आहे. त्यामुळे आता तालिबानी अफगाणमध्ये कधीही सत्तेवर आरुढ होऊ शकतात. म्हणजे... (विचार करा)

भारताने (भाजप सरकारने) तालिबानच्या सत्तेला वेळोवेळी नाहरकत नोंदवली आहे. इतकंच नाही तर स्वागतही केलं आहे. परवा एका संवाद बैठकीला भारताचे प्रतिनिधी कतरला गुपचिपरित्या जाऊन आले, त्यावरून सध्या चर्चा रंगली आहे.

उपलब्ध माहितीप्रमाणे यापूर्वी दोनदा भारताने अधिकृतरीत्या तालिबानच्या सत्तेला मंजूरी देऊन स्वागत केलं आहे. म्हणजे तालिबानी अफगाणच्या सत्तेत विराजमान होऊ शकतात, याला भाजपचा कुठलाही विरोध नाही.



भारतीय मुस्लिमांनी यातली खरी गेम समजून घेतली पाहिजे. भारतात भाजपचं राजकारण मुस्लिम द्वेशावर आधारित राहिलं आहे. रोज पाकिस्तान, रोहिंग्या, इस्रायल केलं जातं. परिणामी भारतीय मुसलमानांना छळलं, सतावलं व लक्ष्य केलं जात असते. २० वर्षांपूर्वी अमेरिका अफगाणमध्ये घुसली त्यावेळी भाजपने तालिबानींनी उखडून टाकण्यासाठी अमेरिकेचं समर्थन केलं होतं.

त्यावेळीही भाजपने भारतीय मुस्लिमांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात मोहिमादेखील सुरू केलेल्या होत्या. त्याचे परिणामम्हणून महाराष्ट्रात काही भागात मुस्लिमविरोधी दंगली घडल्या. काही महिन्यात २००२ची गुजरातची वंशविच्छेदी दंगल घडली. असो..

आज भाजप सत्तेत आहे, त्याने अफगाणिस्थानमध्ये तालिबानी सत्तेचं समर्थन व स्वागत केलं आहे. याचा अर्थ त्यांना भारतात मुस्लिमद्वेषाच्या बळकटीचं एक मजबूत साधन मिळणार आहे. भविष्यात ते याचा वापर निवडणुकांत भारतीय मुस्लिमाविरोधात हिंदूंचे राजकीय एकत्रिकरणाकरिता करतील.

२० वर्षापूर्वी भारताने एक राष्ट्र म्हणून अमेरिकेच्या नीतीचा विरोध केला होता. इराक युद्धाचाही निषेध केला होता. परंतु भाजपने त्यावेळी अमेरिकेचे समर्थन करून अमेरिकेच्या हिंसक कार्यवाहीचा जल्लोष घडवून आणला होता. पेढे, मिठाई वाटून फटाके फोडून उत्सव साजरा केला होता. इराक युद्धाला भारताचा विरोध असताना भाजपने सद्दामचा पराभव झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढल्या होत्या. आता हिच भाजप तालिबानींच्या सत्तेचा उत्सव करीत आहे.

त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी विशेषत: युवकांनी तालिबानच्या समर्थनाची भूमिका घेण्यापासून स्वत:ला आवरलं पाहिजे. रॅडिकल फोर्सेस मग त्या कुठल्याही धर्मातील असो, त्या हानीकारकच असतात. तालिबान्यांचं समर्थन केल्याने आपल्या घरी राशन येणार नाही, गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ कमी होणार नाही किंवा आपला इथला छळ कमी होणार नाही, उलट तो वाढणारच. कारण ते तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत टपून बसलेत.

कलीम अजीम, पुणे

२४ जून २०२१

*
वाचा : कमर गुलची रायफल आणि वायरल असत्य

वाचा : अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट

पाच लाख अफगाणी शहीद

२० वर्षे युद्ध लढून पराभव स्वीकारत अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. हे कृत्य करताना अफगाणी नागरिकांचा त्याने काहीच विचार केला नाही. विशेष म्हणजे मानवतेसाठी आम्ही युद्ध करीत आहोत, अशी आगळिक करत अंकल सॅम अमेरिकेत घुसले होते.

युद्ध सुरू केल्याच्या तब्बल १० वर्षे अमेरिकची जगसमोर हीच ओरड होती. इतर नेटो सदस्य देश व इतर राष्ट्रांनी त्याच्या या मानमानीला मूक संमती दर्शवली. इथपर्यंत ठिक होतं. पण अमेरिकेच्या ह्या दृष्कृत्याचा जगभर प्रसार केला, ही बाब सबंध मानवतेविरुद्ध गुन्हा ठरावी, इतकी भीषण होती.

आज पुन्हा अफगाणमध्ये तालिबान या संघटनेचा ताबा झाला आहे. राष्ट्रपती अशरफ गणी यांनी लग्झरी विमानात बसून कुटुंबीयासह मायदेशातून पळ काढला आहे.

अमेरिकेने त्यांना पदावर बसविले होते, त्यांनी अंकल सॅमची इमान-इतबारे सेवा केली, त्याच अमेरिकेने त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. अखेर त्यांना आपली सत्ता हस्तांतर करून पळ काढावा लागला. लाखो नागरिकांना वाऱ्यावर सोडून ते पसार झाले. आता ते ताश्कंदमध्ये बसून अलिशान घरात किंवा हॉलेटमध्ये चहा ढोसत असतील. दोन दशकाच्या या युद्धात लाखो अफगाण नागरिक व हजारो अफगाणी सुरक्षा कर्मी शहीद झाले. शिवाय टारगेट किलिंगचा आकडा वेगळाच आहे.

११ सप्टेंबर २००१च्या पेंटागन हल्यानंतर अमेरिकने तालिबानला सत्तेतून बाहर करण्यासाठी अक्टोबर, २००१ मध्ये अफ़गाणवर युद्ध लादले. त्याचा आरोप होता की, अफगाण ओसामा आणि त्याच्या अल-क़ायदा ला सरंक्षण देत आहे.



तब्बल १ लाख १० हजारांचे सैन्य घेऊन जॉर्ज बुश अफगाणमध्ये दाखल झाले. शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली चोहिकडे, विध्वंस, हत्या, लूट, अत्याचार सुरू झाला. हा शारीरिक व मानसिक अत्याचार अद्यापपर्यंत म्हणजे १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू होता.

वीस वर्षे अमेरिकेचे सैन्य अफगाणमध्ये होतं. या कामी वर्षाकाठी १०० अब्ज डॉलर तो खर्च करीत होता. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २००१ ते २०१९ सप्टेंबरपर्यंत अमेरिकेने एकूण ८२२ अब्ज डॉलर खर्च केले. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात त्याने पाकिस्तानवर कलेला खर्च यात समाविष्ट नाही. म्हणजे अमेरिकन करदात्यासाठी या युद्धासाठी अंदाजे गुंतवणुक सरासरी १ ट्रिलियन अमेरिकी डॉलर होती.

बीबीसी म्हणते, “अफ़ग़ानिस्तान और पाकिस्तान में अमरीकी ख़र्च पर ब्राउन यूनिवर्सिटी में साल 2019 में हुए एक शोध के मुताबिक़ अमेरिका ने लगभग 978 अरब डॉलर ख़र्च किए हैं.”

युद्ध सुरू झाल्यानंतर सप्टेंबर २०१९ पर्यंत २३०० पेक्षा अधिक अमेरिकी महिला व पुरुष सैन्य अफगाणच्या धरतीवर मारले गेले. आणि २० हजारपेक्षा अधिक जखमी झाले. शिवाय ४५० ब्रिटिश सैनिक आणि शेकडो अन्य देशाचे सैन्यदेखील मारले गेले. त्याची रितसर आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही.

अशरफ गणी यांनी २०१९ साली म्हटलं होतं, “राष्ट्रपती झाल्यानंतर पाच वर्षाच्या काळात ४५ हजार अफगाण जवानांनी जीव गमावला. शिवाय इतर शासकीय अधिकारी मिळून हा आकडा ६० हजार जातो.”

वाचा : अला सलाह: सुदानी राज्यक्रांतीची नायिका

मानवतेचा मोबदला

अमेरिकने या युद्धात माजवलेल्या उत्पातामुळे आतापर्यंत १ लाख ११ हजार अफगाणींनी जीव गमावला. हा अमेरिकेचा सरकारी आकडा आहे. विविध सर्वे, रिपोर्ट व अहवाल म्हणतात की युद्धात तब्बल ५ लाख सामान्य अफगाणी मारले गेले.

एक अमेरिकी रिपोर्ट सांगतो, “The report went on to note that the years-long conflict in Afghanistan “continues to wreak a shocking and detrimental toll” on women and children, who accounted for 43 per cent of all civilian casualties – 30 per cent children and 13 per cent women.”

“....Office of the UN High Commissioner for Human Rights (OHCHR) and the UN Assistance Mission in the country (UNAMA) documented some 8,820 civilian casualties (3,035 deaths and 5,785 injuries) in 2020, about 15 per cent less than in 2019.

There was, however, a “worrying rise” in targeted killings by such elements – up about 45 per cent over 2019. The use of pressure-plate improvised explosive devices (IEDs) by the Taliban, air strikes by the Afghan Air Force, and ground engagements also resulted in increased casualties, the report said.”

हजारो अब्ज डॉलरचे नुकसान झाले. लाखो नागरिक देशोधडीला लागले. भारत, पाकिस्तान, इराण, कॅनडा, अमेरिका व ब्रिटिनमध्ये निर्वासित म्हणून त्यांना जावे लागले. या दोन दशकात अफगाणी नागरिकांनी जी संकटे सोसली, ज्या यातना भोगल्या, त्याची गणती अजून मानवतेच्या नात्याने झालेली नाही, होईल का नाही माहीत नाही. आज तेथील परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रपती देश सोडून पळून गेला आहे. सामान्य जनता हवालदिल झाली आहे. त्यांच्यासमोर अस्तित्वाचे प्रश्न उभे ठाकले आहेत.

या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण, हा प्रश्न विचारला जाईल. साहजिकच त्याचे उत्तर मिळणार नाही...

२०१२ साली पुण्यातील रानडेत पत्रकारितेचं शिक्षण घेताना हसीब नावाचा एक अफगाणी वर्गमित्र होता. दोन वर्षे त्याचा सहवास लाभला. आज त्याची चिंता सतावत आहे. गेली महिनाभर तो संपर्कात नाही. त्यांनी ओपचारिक चर्चेत सांगितलेले मुद्दे मी इथं डकवले नाहीत.

कधी कुठला एखादा अफगाणी भेटला तर त्यास सहज गळाभेट घ्या... ज सर्वांना अफगाणची चिंता लागलेली दिसते. त्या वीस वर्षात एकानेही ही मगरीचे अश्रू ढाळले नाही.

अमेरिकेने केलेल्या या दृष्कृत्यावर कुठलाही न्यूरेनबर्ग खटला चालणार नाही. त्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होऊ शकणार नाही..

कलीम अजीम, पुणे

१६ ऑगस्ट २०२१

(फेसबुकसाठी लिहिलेल्या दोन पोस्ट)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,306,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,266,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: तालिबानचे रिस्टोर आणि भारतीय मुस्लिम
तालिबानचे रिस्टोर आणि भारतीय मुस्लिम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnlUq97cDO19SCrJXLVeMWqPQu6MVacE52TenI26_Apsws8PjWHH3NkSngt3vgtSfY6T5NSiXKGXGd2x2hKR8kgAQPAx9jDnOcLz59tQZYEJ1Ldg_TxDlSXIHX9soFSwtZE-GGiIOwRjvyjsC6pvbhdsLlruh2slS5dB2hqFiuUOArRgnG7e9LM9dwTeVZ/w640-h426/1629770626920297-4.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnlUq97cDO19SCrJXLVeMWqPQu6MVacE52TenI26_Apsws8PjWHH3NkSngt3vgtSfY6T5NSiXKGXGd2x2hKR8kgAQPAx9jDnOcLz59tQZYEJ1Ldg_TxDlSXIHX9soFSwtZE-GGiIOwRjvyjsC6pvbhdsLlruh2slS5dB2hqFiuUOArRgnG7e9LM9dwTeVZ/s72-w640-c-h426/1629770626920297-4.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2021/08/blog-post_16.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2021/08/blog-post_16.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content