‘आय अॅम फ्रॉम हॉँगकॉँग, नॉट चायना’ असे फलक जगभरात पसरलेले हॉँगकॉँगचे तरुण-तरुणी सध्या हातात घेत आहेत. तसं लिहिलेले शर्ट घालून फिरत आहेत.
हॉँगकॉँगच्या तरुण आंदोलकांनी गेल्या सात-आठ महिन्यांपासून चीनच्या वर्चस्ववादाला प्रखर विरोध सुरू केला आहे. जागतिक मीडियाने या आंदोलनाला गेल्या 30 वर्षातलं सर्वात मोठं आंदोलन म्हटलं आहे. हॉँगकॉँगमध्ये हजारो तरुण मुलं-मुली रस्त्यावर उतरून स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांसाठी निदर्शनं करत आहेत.
त्या प्रचंड मोठय़ा लढय़ाचा चेहरा बनलाय एक जेमतेम 23 वर्षाचा, बारकुडासा मुलगा. त्या मुलाच्या शांत चेहर्याकडे पाहून असं वाटतही नाही की एका महासत्तेच्या ताकदीला आव्हान देण्याचं बळ या कोवळ्या तरुणात असेल?
मात्र तरीही जगभर त्याच्या हिमतीचीही चर्चा आहे. ‘ द फेस ऑफ द प्रोटेस्ट’- आंदोलनाचा चेहरा म्हणून तो जगभर गाजतो आहे.
त्याचं नाव जोशुआ वांग. हा फक्त 22 वर्षाचा तरुण आहे. एका साध्याशा मध्यमवर्गीय घरात तो वाढला. त्याचे वडील आयटीत नोकरी करायचे, तर आई वंचित मुलांना सेवासुविधा मिळाव्यात म्हणून काम करायची.
2019 र्पयत जोशुआचंही आयुष्य एकदम चारचौघांसारखंच नाकासमोर चाललं होतं. शाळेतही तो जेमतेम हुशार होता. कारण त्याला डिसलेक्सिया या आजाराचा त्रास होता. मात्र 2010 साली त्यानं पहिल्यांदा लोकशाही आंदोलनात सहभाग घेतला. 2014 मध्ये हे आंदोलन अधिक तीव्र झालं आणि एक मोठी चळवळ उभी राहिली. तिचं नाव अम्ब्रेला मुव्हमेण्ट. या चळवळीत जवळपास दोन महिने पूर्ण शहर ठप्प झालं होतं. त्या चळवळीचं नेतृत्वच जोशुआनं केलं. तेव्हा तो जेमतेम 19 वर्षाचाही नव्हता. मात्र त्याच्या नेतृत्वगुणाची चर्चा झाली. आणि जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या टीन्स स्पेशल मुखपृष्ठावर तो पर्सन ऑफ द इअर म्हणून झळकला.
वाचा : हाँगकाँगचा वादग्रस्त कायदा
म्हणता म्हणता हॉँगकॉँगच्या लोकशाही आणि स्वायत्ततेसाठीच्या लढय़ाचा तो चेहरा बनत गेला. 2017 साली त्याला अटक झाली. खटला दाखल होऊन शिक्षाही झाली. मात्र 2018 ला त्याची मुक्तताही करण्यात आली.
चीनचं सरकार वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक हॉंगकाँगवासीयांवर लागू करू पाहत होतं. या विधेयकामुळे चीनमध्ये गुन्हे करून हाँगकाँगला फरार झालेल्या नागरिकांना ताब्यात घेण्याचा अधिकार चीनला प्रदान करण्यात आला होता. अर्थात यातून हाँगकाँगवर दमण व छळाचे नवे तंत्र वापरण्याची मुभा चीनला मिळणार होती. चीनचा हा डाव लाखो तरु णांनी हाणून पाडला.
अजूनही जोशुआचा लढा सुरूच आहे. हॉँगकॉँग लोकशाही हक्कासाठी भांडत आहे आणि त्या लढय़ाचा चेहरा ठरला आहे जोशुआ वांग. वय वर्षे फक्त 22.
मात्र त्याची जिगर मोठी आहे.
तरु णांनी हे आंदोलन आता ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करून चीनला हॉँगकॉँगमधून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. चीन हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्याला न जुमानता हाँगकाँगवासीयांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाने हाँगकाँगला राजकीय नेतृत्व मिळवून दिलं आहे. अनेक तरु ण आंदोलनाचे चेहरा बनले आहेत. भविष्यात प्रदेशाच्या सत्तेची सूत्रं हातात घेऊन ते लोकशाही सत्ता स्थापन करतील, अशी अपेक्षा आहे.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com