गेल्या महिन्यात जगभरातील १०० महत्त्वाकांक्षी महिलांची यादी बीबीसीनं जाहीर केली आहे. दरवर्षीं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांची निवड बीबीसी करते. यात समाजकार्य, संशोधक, डॉक्टर, उद्योजक, इंजीनियर, खेळाडू आणि फॅशन क्षेत्रातील महिलांचा समावेश असतो.
बीबीसीचा हा सन्मान सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांमध्ये नवी स्फुर्ती व चैतन्य मिळवून देते. महिलांच्या कर्तृत्वात सकारात्मक बदल घडवणारी प्रक्रिया म्हणून या निवडीकडे पाहिले जाते. त्यामुळे या यादीला महत्त्वाचे मानले जाते. चालू वर्षं ‘जागतिक स्त्री हक्क वर्षं’ म्हणून साजरे केले जात असताना या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या.
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
वाचा : हाँगकाँगमध्ये चीनविरोधात तरुणांचा उद्रेक
जगातील महिलांच्या समस्या व प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम बीबीसीची 'विमेन ऑफ द ईयर' सीरिज करते. या माध्यमातून दरवर्षी महिला प्रश्नांवर काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो. १५ ते ९४ वयोगटातील तब्बल ६० देशातून बीबीसीनं या कर्तृत्ववान महिला निवडल्या आहेत. या सर्व स्त्रिया इतरांचे दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरू असावे, यासाठी झटणाऱ्या सामान्य महिला आहेत.
यंदा भारतातील तीन महिलांचा सामावेश ‘बीबीसी १०० विमेन’ यादीत करण्यात आलाय. यात अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे या मराठी महिला आहेत. जिल्ह्यातील कोंभाळणे गावात त्या पारंपरिक पिकांचे जतन करण्याचे काम करतात.
दुसरं नाव विजी पेंकुट्टू या पन्नास वर्षीय महिला केरळमध्ये स्त्री कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी काम करतात. तिसरं नाव मीना गायेन यांचे आहे. त्या पश्चिम बंगालमधील सुंदरबनमधील ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क सुकर व्हावा, यासाठी विटांचा रस्ता बांधण्याचे काम करतात. याशिवाय पाकिस्तान, बाग्लादेश व नेपाळसारख्या शेजारी राष्ट्रांच्या कर्तृत्वान महिलांचादेखील या यादीत सामावेश आहे.
निमको अली या सोमालियापासून वेगळ्या झालेल्या सोमाली राज्यातील ३५ वर्षीय लेखिका मुस्लिम समाजातील महिलांच्या खतनासारख्या अघोरी प्रथेविरोधात जाग्रृती निर्माण करण्याचे काम करतात. तर मलेशियाच्या शरिया हायकोर्टाच्या न्यायाधीश म्हणून काम पाहणाऱ्या नेनी शुशाइदा या विवाहबाह्य संबध, बहुविवाह, घटस्फोटासारखे प्रकरणे हाताळतात.
गेल्या दशकभरात आपल्या निर्वाळयातून महिला हक्कांचे जतन करण्याचे व अनेक संसार वाचवण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेले आहे. याशिवाय पाकिस्तानची पहिल्या दलित सिनेटर कुष्णाकुमारी, नोबेल पुरस्कार विनर डोना स्ट्रीकलँड आणि फ्रान्सिस अर्नोल्ड, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षा स्टेसी कनिंगहॅम यांचाही समावेश आहेत. यांच्या कर्तृत्वावर ‘जगभर’ सदरातून आपण सविस्तर वाचलेले आहे.
वाचा : बंडखोर पॉप स्टार सुलीचा एकाकी अंत
वाचा : दोन महिला वैज्ञानिकांचे ऐतिहासिक स्पेसवॉक
ब्रिटनच्या निवृत्त फॅशन डिझायनर ज्युडिथ बल्काझर यांचाही सामावेश यादीत आहे. काही कारणामुळे मुत्र विसर्जनावरील नियंत्रण गमावलेल्या महिलांसाठी खास प्रकारचे अंतर्वस्त्र त्या तयार करतात. त्याच देशातील दुसऱ्या कर्तृत्ववान महिला बार्बरा बर्टन आहेत. त्यांनी पौढ वयात जेलचा अनुभव घेतल्यानंतर बाहेर पडल्यावर जेलमधील महिला कैद्यासाठी उदरनिर्वाहासाठी आवश्यक कौशल्ये शिकवतात.
त्यासाठी त्यांनी एका कंपनीची स्थापना केली आहे. सुटका झालेल्या महिला कैद्यांना त्या रोजगार देतात. ब्रिटनची तिसरी महिला चायदेरा इग्र ब्लॉगर आहेत, समाजाने स्त्री देहाचे सन्मान करावे अशी मोहिम राबवून त्यांनी नवीन मतप्रवाहाचे अभिसरण घडविले आहे.
ब्रिटनची चौथी व सर्वात कमी वय असणारी हॅवेन शेपर्ड अवघ्या १५ व्रषांची आहे. तिने पालकांनी आत्महत्या करण्यासाठी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात तिने आपले पाय गमावले होते. ती एक स्वीमर असून आगामी पॅरालाम्पिक स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहे.
याशिवाय इतर महिलादेखील विविध क्षेत्रात उल्लेखीन कार्य करणाऱ्या प्रतिभाशाली स्त्रिया आहेत. या बीबीसी विनर महिला रेडियो, ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी संवाद साधणार आहेत. आपल्या कामाबद्दल त्या लोकशिक्षण घडवून समाजामध्ये आणणार आहेत.
जगभरातील महिलांचा आवाज मेनस्ट्रीमध्ये आणून त्यावर चर्चा घडविण्यात बीबीसी ही संस्था अग्रणी राहिली आहे. दरवर्षी विविध थीमवर आधारित कार्यक्रम घेऊन बीबीसी समस्याग्रस्त महिलांचा आवाज जागतिक पातळीवर मांडते. जगात अशी मान्यता आहे की, बीबीसीच्या पटलावर आलेला महिलांचा प्रश्न पटकन निकाली लागतो. त्यामुळे बीबीसीच्या नोंदीकडे जगभरातील माध्यमांचे व सरकारचे लक्ष असते.
(सदरील लेख 11 डिसेंबर 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com