
एक राजकुमारी सामान्य मुलाच्या प्रेमात पडते आणि त्या दोघांचे लग्न होते. ही रुपक कथा आपण अनेकदा ऐकली असेल. या उलट सिनेमात कधी दोघांचे प्रेम यशस्वी होतं, तर कधी व्हिलन येऊन प्यार का दुश्मन बनतो.. पण जपानच्या राजकन्येची कथा यापेक्षा जरा वेगळी आहे. अयाको नावाच्या या राजकुमारीनं केई मोरियो नावाच्या एका सामान्य मुलाशी अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न केलंय. मोरियो हा एका पार्सलच्या दुकानात काम करतो. विषेश म्हणजे राणीमातेच्या मर्जीनं हे लग्न झालं आहे.
गेल्या महिन्यातली की घटना जगभरातील प्रसारमाध्यमासोबत सोशल मीडियानंदेखील उचलून धरली. वर्षभरापूर्वी डिसेंबरमध्ये अयाको आणि मोरियो एका कार्यक्रमात भेटले. ही भेट राणीमाता हिसाको यांनी घडवून आणली होती. राजमाता हिसाको मोरियोला लहानपणापासून ओळखत होत्या. मोरियोचा प्रेमळ स्वभाव राजमातेला खूपच भावला होता. राजमातेला मनोमन वाटत होतं की, आपल्या मुलीनं कुठल्यातरी सामान्य मुलाशी लग्न करावं. ही भेट घडवण्याचे लग्न हेच प्रयोजन होतं. त्यानंतर वर्षभर ते दोघे भेटत राहिले. अखेर सप्टेबरमध्ये त्यांनी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं.
वाचा : जपानमध्ये पीरिएड महिलांसाठी बॅज सक्तीचा
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
मोरियो आणि अयाको या दोघांना ग्लोबल वेलफेयर, स्क्रीइंग, पुस्तके आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे. अयाकोनं सोशल वर्कमध्ये आपली मास्टर डिग्री केली आहे. मोरियोदेखील सोशल वर्कमध्ये पीजी आहे. प्रेमासाठी रॉयल फॅमिलीचा राजकन्या अयाकोनं त्याग केलाय. तशी ही गोष्ट सामान्य नाही. लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी जापानी राजकुमारी अयोकानं आपलं रॉयल स्टेटस सोडलं. २९ ऑक्टोबरला राजधानी टोकयोतील मेइजी जिंगु मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हे लग्न पार पडलं. या विवाह सोहळ्यात दोन्ही कुटुंबातील मोजके लोकं हजर होते.
अयाको ही जापानचे प्रिन्स अकिहितो यांची चुलत बहिण आहे. जापानच्या शाही कुटुंबात ही गोष्ट पहिल्यांदा घडते असं नाही. शाही परिवारातील तीन पिढ्या आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करत आहेत. सम्राट अकोहितो असे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी एका सामान्य मुलगी मिचिकोशी लग्न केलं होतं. ही सामान्य मुलगी मिचिको नंतरच्या काळात जापानची महाराणी बनली. गेल्या वर्षी सम्राट अकोहितोची मोठी नात राजकुमारी किमोनोनं आपल्या वर्गमित्र कोमुरोशी लग्न केलं होतं.
जापानी मीडियाच्या मते शाही कुटुंबात असा नियम आहे की, शाही परिवाराबाहेर जाऊन लग्न केलं तर त्या व्यक्तीला राजशाही थाट-बाट व संपत्ती सोडावी लागते. पण हा नियम पुरुषांना लागू होत नाही. मुलानं बाहेर लग्न केलं तरी त्याचं रॉयल स्टेटस तसंच राहतं. उत्तराधिकारीची अट बदलण्याची चर्चा अनेक वर्षांपासून राजपरिवारामध्ये सुरू आहे. शाही कुटुंबाचे घटत असलेलं संख्य़ाबळ पाहता हा नियम बदलला जाईल अशा शक्यता ‘जापान टाइम्स’नं व्यक्त केली आहे. सध्या शाही परिवारात ४ पुरुष उत्तराधिकारी आहेत. सम्राट अकिहितो पुढच्या वर्षी राजगादी सोडत आहेत, त्यांच्याजागी क्राउन प्रिंस नारुहितो विराजमान होणार आहेत.
जापानच्या शाही परिवारीतल मुलींनी रॉयल फॅमिली सोडल्यास त्यांना बोनस दिला जातो. राजकन्या अयाकोलादेखील अशा प्रकारचा बोनस मिळणार आहे. जापानच्या रॉयल फॅमिलीकडून अयाकोला तब्बल १०७ मिलियन येन म्हणजे तब्बल १० लाख डॉलर देण्यात येणार आहेत. विषेश समारंभात ही रक्कम सम्राट अकोहितो उभयतांना देणार आहेत.
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
वाचा : डेन्मार्कमध्ये बुरखा बंदीविरोधात आंदोलन
प्रेमाखातर शाही संपत्तीला तिलांजली देण्याचा मोठा इतिहास राहिला आहे. मध्ययुगापासून चालत आलेली ही परंपरा अजूनही सुरू आहे. भारतात सल्तनतकाळ व मोघल साम्राज्यात अशी अनेक उदारहणे आहेत. सल्तनतकाळात तर गुलामांना राजगादी मिळाल्याचा मोठा इतिहास आहे.
जगात अलीकडच्या काळात अशी अनेक उदाहरणे बातम्या म्हणून वाचण्यात आलेल्या आहेत.
काही उदाहरणे
- स्वीडनच्या प्रिंसेज विक्टोरियानं २०१० साली सामान्य घरातील डेनियल वेस्लिंगशी लग्न केलं. डेनियल प्रिंसेजचे पर्सनल ट्रेनर होते. लग्नानंतर मात्र डेनियलला आपलं आडनाव सोडावं लागलं.
- प्रिंसेज विक्टोरियायांची लहान बहिण राजकुमारी मेडेलाइननंदेखील एका सामान्य माणसाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. त्यांनी फायनान्स सेक्टशी संबधित असलेल्या क्रिस्टोफरशी लग्न केलंय.
- डचेज ऑफ अल्बाच्या राजकुमारीनं २०११ साली एका सामान्य मुलाशी दुसरं लग्न केलं होतं. १९७२ साली त्यांचे पहिलं लग्न झालं होतं. पतीच्या मृत्युनंतर त्यांनी दुसरं लग्न एका कॉमन मॅनशी केलं.
- युगांडाच्या टोरो राज्याच्या प्रिंसेज रूथ कोमोंटेलेनं २०१२ साली क्रिस्टोफर थामसशी लग्न केलं. क्रिस्टोफर डिज्नी चॅनलमध्ये अकाउंटेंट म्हणून काम करत होते. बऱ्याच विरोधानंतर शाही परिवारानं क्रिस्टोफरला शाही दर्जा दिला. नंतर ते टोरो राज्याचे प्रिंस झाले.
- मोनाकोची राजकुमारी स्टेफ़नी यांनी २००३ साली पुर्तगाली ट्रैपेज़ आर्टिस्ट एड्स लोपेज पेरेसशा लग्न केलं. हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही, वर्षभरातच गोधांत घटस्फोट झाला.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com