सीन पहिला- तुम्ही तुमच्या ऑफीसमध्ये कामात दंग आहात.
सीन दुसरा- गगनचुंबी अपार्टमेंटच्या २२व्या मजल्यावर तुम्ही निवांत क्षणी बाल्कनीत चहा घेत उभे आहात.
या दोन फ्रेममध्ये एकात तुम्ही कामात आहात तर दुसऱ्यात निवांत क्षणी. पण थांबा दोन्हीत तुम्ही सेफ नाहीयेत. तुमच्यावर पाळत आहे. आता प्रश्न पडला असेल ते कसं? थांबा सांगतो. या दोन प्रसंगात तुमच्यावर ‘स्पाय कॅमेऱ्या’तून चित्रित झालेल्या क्षणाला कुणी पॉर्न म्हणून चवीनं बघतोय, तर कुणी त्यावर मिलीयनची कमाई करतोय. बसला ना झटका!
होय, हे खरं आहे. ७ सप्टेंबरला सीएनएननं दक्षिण कोरियातली ही स्टोरी केलीय. साऊथ कोरियातली ही एकमेव घटना नाही, अशा हजारो घटनांनी तिथल्या महिला त्रस्त झाल्या आहेत. ऑफीस, सार्वजनिक निवारागृह, भुयारी मार्ग, पार्क, कम्यूनिटी सेंटर, पब्लिक जीम, अंडरग्राऊंड व्यावसायिक प्रतिष्ठाने, पब्लिक टॉयलेट आदी भागात तुमच्यावर पाळत ठेवून अश्लिल व्हिडिओ क्लीप्स बनविल्या जात आहेत.
डोळ्यांना सहजासहजी न दिसणाऱ्या सुक्ष्म कॅमेऱ्यातून असे व्हिडिओ चित्रित करण्यात येतात. या क्लीप्स पॉर्नोग्राफीक वेबसाईटला अपलोड करून कोरियन महिलांची प्रायव्हसी धोक्यात आणली जात आहे. या घटनांमुळे स्थानिक महिलांचं सामाजिक आरोग्य धोक्यात आलंय.
वाचा : दक्षिण कोरियाची 'एस्केप द कॉर्सेट' मोहीम
वाचा : हाँगकाँगमध्ये चीनविरोधात तरुणांचा उद्रेक
गेल्या चार महिन्यापासून दक्षिण कोरियन महिला, मुली रस्त्यावर उतरून हिडन पॉर्नोग्राफीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजधानी सियोलमध्ये हजारो महिलांनी पोलीस व सरकारविरोधात निदर्शनं केली. जगभरातील सर्वच मीडिया संस्थांनी हे वृत्त प्रकाशित केलंय. ‘माय लाईफ इज नॉट इन यूवर पोर्न’ असे प्लेकार्ड घेवून महिला घोषणा देत होत्या. याला सीएनएननं साऊथ कोरियन इतिहासातले सर्वांत मोठं आंदोलन म्हटलंय.
या आंदोलनानं सरकार व पोलीस प्रशासन पुरतं हादरलंय. तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे, पोलिसांनी तब्बल ४० हजार प्बलिक टॉयलेटचा तपास केला, या कारवाईत २० हजार स्पाय कॅमेरे पोलिसांनी जप्त केली आहेत. कॅमेरे लावणाऱ्या ६५० आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. सरकारने हजारो कोटी खर्च करून कर्मचाऱ्यांना गुप्त कॅमरे शोधण्याचं काम सोपवलंय.
गेल्या सात-आठ वर्षांपासून दक्षिण कोरियन महिला या प्रकारामुळे त्रस्त झाल्या आहेत. सुरुवातीला पब्लिक टॉयलेटमधून असे चित्रण होत असे, पण अलीकडे बाल्कनी, सार्वजनिक स्थळी, मोकळी पटांगणे, भुयारी मार्ग, पार्क, कम्यूनिटी सेंटर, पब्लिक जीम, एक्सलेटर, रेल्वे स्टेशन, अंडरग्राऊंड व्यावसायिक प्रतिष्ठाने आदी भागात महिलांचं बिभत्स चित्रण सुरु झालंय.
छतावरून, जमीनीवरून, पायर्याखालून गुप्त कॅमेऱ्यातून महिलांच्या हालचाली टिपून पोर्न वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत. या घटनांमुळे कोरियन महिला भितीच्या सावटाखाली जगत आहेत. अनेक महिलांनी पब्लिक टॉयलेट वापरणं बंद केलंय, परिणामी नव्या आजारानं महिलांना घेरलं आहे.
वाचा : बंडखोर पॉप स्टार सुलीचा एकाकी अंत
वाचा : दोन महिला वैज्ञानिकांचे ऐतिहासिक स्पेसवॉक
गेल्या काही वर्षांत जगभरात पॉर्नोग्राफीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावतोय. दरवर्षी कोट्य़वधीचे उत्पन्न या व्यवसायातून कमावलं जातं. आशिया खंड पॉर्नोग्राफीचा सर्वांत मोठा मार्केट म्हणून ओळखला जातो. इंटरनेट क्रांतीचा आधार घेत चीन, साऊथ आशिया व ईस्ट आशियात पॉर्नोग्राफी आपले पाय रोवत आहे.
‘इकोनॉमी वॉच’च्या आकडेवारीनुसार साऊथ कोरियात २५.७३ बिलियन डॉलरचा पॉर्नोग्रफीचा बिझनेस आहे. डेली न्यूजच्या मते दक्षिण कोरियात तब्बल ३९.५ टक्के लहान मुले पॉर्न बघतात, पॉर्न बघणाऱ्यांत तरुणांचे प्रमाणही मोठं आहे. इकोनॉमीस्टच्या मते ५-जी सुविधा पॉर्नोग्राफी वाढण्यामागचं एक कारण आहे,
दुसरं म्हणजे फ्री इंटरनेटची सुविधा हेदेखील पॉर्न व्हिडिओचा व्य़वसाय वाढण्याचं कारण आहे. इकोनॉमीस्टनं दिलेले कारण पुरेसं असलं तरी अशा प्रकारची अनेक वेगळी कारणे स्थानिक एनजीओंनी नोंदवली आहेत. दि टेलिग्राफच्या मते सतत वाढत जाणाऱ्या सेक्युअल फँटसीमुळे स्पाय व्हिडिओची मागणी वाढली आहे. दक्षिण कोरियातच नव्हे तर अनेक देशात स्पाय कॅमेऱ्यातून तयार केलेल्या व्हिडिओला मागणी आहे.
दक्षित कोरियात अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने चित्रण करणे गुन्हा आहे. सरकारने गेल्या वर्षी पॉर्न कंटेट व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या 23 हजार कोरियन वेबसाईटला ब्लॉक केलं होतं. या कारवाईला सामाजिक संघटना पुरेसं मानत नाहीत. या विकृतीच्या मुळावर घाव घालावा अशी मागणी महिला करत आहेत.
अशा गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना शिक्षेच्या प्रमाणावर फोर्ब्सनं भाष्य केलंय. फोर्ब्सच्या मते केवळ दोन टक्के आरोपींना शिक्षा होते, तर बाकीचे आरोपी मोकाट सुटतात. कोरियन वूमन बार कौन्सिलनं या व्यवसायात असलेल्या बड्या माशांना शोधण्याची मागणी करत निदर्शनंही केलेली आहेत.
(सदरील लेख 18 सप्टेंबर 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com