भाजपविरोधकांची वज्रमूठ

त्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा जबर धक्का बसला आहे. हे अपयश सत्ताधारी पक्षाच्या जिव्हारी लागलं आहे. पराभव स्वीकारायचा कसा? या पेचातून सत्तापक्षानं नेहमीप्रमाणे राष्ट्रीयवाद उभा करून त्याला धार्मिक रंग दिला आहे. बिहारच्या अररियामध्ये काही मुस्लिम तरुणांनी देशविरोधी घोषणा केल्याचा आरोप भाजयुमोनं केला आहे. या संदर्भात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. पण ऐनवेळी ऑल्ट न्यूजनं हे प्रकरण बनावट (डॉक्टर्ड) असल्याचं सांगत भाजपची पोल-खोल केली. त्यामुळे भाजपची अवस्था तोंड लपवता रुमाल कमी अशी झाली आहे.

एका मागोमाग एक अशा भाजपच्या धार्मिक ध्रुव्रीकरणाच्या अजेंड्याला ठिकठिकाणाहून चाप बसत आहे. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या द्वेषी अजेड्याला मतदारांनी उत्तर दिलं आहे. बिहारच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपनं राष्ट्रद्रोहाचा अस्त्र बाहेर काढलं. बिहारचे नवनिर्वाचित खासदार सरफराज आलम यांच्या विजय रॅलीत देशद्रोही घोषणाबाजी झाल्याचा दावा भाजपनं केला. 

सदर व्हिडिओ व्हायरल करून मुस्लिमविरोधात वातावरण तयार करण्यात आलं. या आरोपातून काही मुस्लिम तरूणांना अडकवण्यात आलं. प्रकरण फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीला गेले, पण त्याआधीच ऑल्ट न्यूजने भाजयुमोचा हा बनाव उघडकीस आणला आहे. ऑल्ट न्यूजनं व्हिडिओच्या ऑडिओ वेव तपासून ते फेक असल्याचं पुराव्यादाखल सिद्ध केलं. यापूर्वी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप सिंह यांनी एनडीटीव्हीला मुलाखत देताना म्हटलं होतं की, माझ्यासमोर अशा प्रकारच्या कुठल्याही घोषणा दिल्या गेल्या नाहीत. हा सर्व भाजपचा बनाव असू शकतो.  तर खासदार सरफराज आलम यांनीही हा आरोप धुडकावून लावला होता. पण फॉन्सरिक तपास होम्यपूर्वीच ऑल्ट न्यूजने ही बोगसगिरी उघड केल्यानं भाजप व मीडियाचा मुस्लिम ट्रायल फेल गेला.



भाजपला दुसरा मोठा दणका झारखंडमध्ये बसला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात 45 वर्षीय अलीमुद्दीन अन्सारीला गाय तस्करीचा आरोप करत मॉब लिंचिंगमध्ये ठार मारण्यात आलं होतं. या प्रकरणात कोर्टानं तब्बल 11 गौरक्षकांवर हत्येचा दोष निश्चित केला आहे. येत्या 21 मार्चला (बुधवारी) कोर्ट या आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. कोर्टाचा निर्णय भाजपच्या अजेंड्याला मोठी चपराक मानली जात आहे. अलीमुद्दीन अन्सारीच्या पत्नीने आरोपींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केली आहे. कोर्टाच्या शिक्षेमुळे कथित गौरक्षकांना चाप बसेल व भविष्यातील हल्ले रोखले जातील. या प्रकरणात मानव सुरक्षा कायद्याची मागणी करणाऱ्य़ा याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. लवकरच कोर्ट त्यावरही सुनावणी करेन अशा अपेक्षा आहे. भाजपच्या या खेळीला चहू बाजुंनी टीका होत आहे. त्यामुळे भाजपविरोधात देशात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. सहयोगी पक्ष भाजपविरोधात बंड करून उठत आहेत. 

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीच्या जबर धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असताना आंध्रप्रदेशच्या खासदारांनी सरकारची डोकेदुखी वाढवली. शुक्रवारी राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करत राज्यसभेत गदारोळ झाला. गोंधळ इतकी वाढला की राज्यसभा तहकूब करावी लागली. तर लोकसभेत आंध्र खासदारांनी प्रधानसेवकांविरोधात अविश्वास प्रस्तावाचा ठराव केला. या ठरावाला वायएसआर काँग्रेस, तेलुगु देसम, काँग्रेस, डावे, समाजवादी पार्टी, एआयएडीएमके आणि एमआयएमने पाठिंबा दिला आहे.  आंध्रला विषेश दर्जा देण्याचं आश्वासन पाळलं नसल्यानं भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम सत्तेतून बाहेर पडला, इतकंच नाही तर त्याने सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. येत्या काळात भाजपहून दुखावले गेले मित्रपक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याआधी अरुण शौरी, माजी मंत्री यशवंत सिन्हा, खासदार नाना पटोले, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, राम जेठमलानी यंनी मोदींना विरोध करत आपलं नवं राजकीय दुकान सुरु केलं आहे. हे भाजप फुटीर पुरोगाम्यांचं विचारपीठ बळकावत सरकारला शिव्या घालत आहेत. आर्थिक विषय सोडला तर या भाजप फुचीरवाद्यांना इतर विषयात काहीच स्वारस्य नाही. त्यामुळे ते पुरोगामी किंवा विरोधकांच्या गैरसोयीचे आहेत का याची चाचपणी काँग्रेस-भाजपकडून सुरु आहे. तीन राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपला हरवू शकतो हा विश्वास विरोधकांमध्ये निर्माण झाला आहे. गुजरातमधील बाजीगर काँग्रेस पुन्हा नव्याने कात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार काँग्रेस तरुणांना संघटीत करून पक्षबांधणी करत असल्याचं ऐकिवात आहे.

13 मार्चला उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागले, त्याच दिवशी रात्री दिल्लीत तब्बल 19 विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. सोनिया गांधींनी बोलावलेल्या या डीनर बैठकीत भाजपविरोधी अजेंडा ठरविण्याची रणनिती आखण्याचा विचार झाला. बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृतानुसार येत्या 28 मार्चला या सर्व विरोधकांची एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे याची धुरा असणार असल्याचं बिझनेस स्टँडर्डनं म्हटलं आहे. 2012 साली राष्ट्रपती निवडणुकाच्या वेळीही शरद पवार किंगमेकरच्या भूमिकेत होते. त्यांनी पक्षनेते पी. ए. संगमा यांना राष्ट्रपती निवडणुकीतून माघार घ्यायला लावली होती. पण संगमा यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. राष्ट्रवादीतून संगमा बाहेर पडले. आत्ता नागालँण्डमध्ये पी. ए. संगमा यांच्या मुलाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. 2017च्या राष्ट्रपती निवडणुकीतही शरद पवार यांनी महत्वपूर्ण रोल अदा केला होता. आत्ता पुन्हा एकदा शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मैदानात आहेत. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यात पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतली.

शनिवारी दिल्लीत काँग्रेसचे 48वं अधिवेशन सुरु झालं. यात पक्षाअध्यक्ष राहुल गांधींनी तरुणांना उद्देशून प्रभावी भाषण केलं. देशाला जोडण्याची ताकद तरुणांमध्ये असून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाहीअसे राहुल गांधी अधिवेशनाच्या उद्घाटन भाषणात म्हणाले.  पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखील पहिल्यांदाच हे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात तरुण कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. विरोधकांच्या एकत्र येण्यानं भाजपच्या अडचणीत वाढ होईल.

एप्रिल महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, अलिकडे कर्नाटक राज्यात पराजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचा स्वंतत्र ध्वज असा अशी कल्पना सत्ताधारी काँग्रेस पक्षानं मांडली  आहे. त्यामुळे भाजपला ध्रुव्रीकरणाचं आयतं मिळू शकतं. दुसरं म्हणजे टीपू सुलतान हा तुरुप का इक्का दोन्ही पक्षाकडे आहे. त्यामुळे तिथलं राजकारण कुठल्या वळणावर जाईल हे पहावं लागेल. पण तूर्तास भाजपला कोंडीत पडकण्यासाठी मित्रपक्ष व विरोधकही सज्ज झाले आहेत. त्यामुळे मोदी पुन्हा एकदा  'ग्रोथ ओरिएंटेड पॉलिटिक्स' खेळू शकतात. तसेच इतर पक्षातून पॉलिटिकल पिलीग्रिम्सची आयात वाढवू शकतात. भाजपला विरोध करणारे नीतिशकुमार, नारायण राणे व नरेश अग्रवाल भाजपला मोठा आसरा (पोलिटिकल शस्त्र) मिळवून देऊ शकतात.

नुकतीच भाजपने मेघालयची सत्ता बळकावत त्रिपुरा व नागालँण्डमध्ये सत्ता स्थापन केली आहे. इशान्य भारतात नागरिकांनी भाजपला मतं देऊन बदल स्वीकारला असला तरी भाजपच्या इशान्य भारताचे एथनिकीकरण मान्य करेलच असं नाही. आपल्या भौगोलिक व सांस्कृतिक अस्मिता जपताना इशान्य भारतीयांची कसौटी लागेल. त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा पाडून भाजपने आपला रंग पहिल्या दिवशी दाखवला आहे. त्यामुळे इशान्य भारतातही येत्या वर्षभरात अस्वस्थेचं वातावरण पहायला मिळेल इथूनही काँग्रेस व विरोधकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळू शकेल.

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: भाजपविरोधकांची वज्रमूठ
भाजपविरोधकांची वज्रमूठ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIlkSh96OZe9fPCTtlT9xqIXV6-Ml_45TH7pedS08rbtMqGxQJfstAfpvM6SPlF10IYQMq-modADDQQW3l5awU7hu8AFiYEM4mymnOhul24P7VxvZ3vGzmj0whAYw73BwiYpOaSucHW6RQ/s640/61283-ygzsnigocz-1499711639.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIlkSh96OZe9fPCTtlT9xqIXV6-Ml_45TH7pedS08rbtMqGxQJfstAfpvM6SPlF10IYQMq-modADDQQW3l5awU7hu8AFiYEM4mymnOhul24P7VxvZ3vGzmj0whAYw73BwiYpOaSucHW6RQ/s72-c/61283-ygzsnigocz-1499711639.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/03/blog-post_18.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/03/blog-post_18.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content