पाणवठ्यावरील वाद ग्लोबल होताना

लेखाच्या शिर्षकावरुन प्रथम वाचकांच्या मनात एक भला मोठा प्रश्न पडला असेल, पण एकाकाळचे पानवठ्यावरचे भांडण  जागतीक स्वरुप घेऊन आपल्या समोर उभे आहे. या भांडणाचे स्वरुप वेग-वेगळे असलं तरीही वादाचे मूळ एकच आहे. पाण्याचे राजकारण जागतीक पातळीवर सुध्दा तापलं आहे. 
भारत-भूतान सचीतू नदी, भारत- चीन ब्रम्हपुत्रानदीभारत-बांग्लादेश तीस्तानदी, भारत-पाकिस्तान सिंधु नदी अशा आंतरराष्ट्रीय वादाचा कोणताच तीढा वर्षानुवर्ष सुटण्यासारखा दिसत नाही. त्याचप्रमाणे राज्या-राज्यात मोठ्या प्रमाणे पाण्यावरुन वाद-विवाद सुरु आहेत. कृष्णा, कावेरी, नर्मदा, या नद्याचे वाद महाराष्ट्रासंबधी आहेत. हे वाद देखील आंरराष्ट्रीय वादासारखेच चिघळलेले आहेत. एका भल्यामोठ्या पाणवठ्यावर आपण एकत्र भांडत आहोत.
गल्ली-मोहल्ल्यातील पाण्याच्या भांडणाने आता राजकीय स्वरुप घेतलं असून पाण्याचे राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. आपण पाण्यासंबधीच्या अनेक बातम्या दररोज वर्तमानपत्रात वाचतो आणि चर्चा करतो. तीन एक महिण्यापूर्वीची दुष्काळी परिस्थीती  आपण जवळून पाहिली आहे. यंदा पाऊस वेळेवर व अती पडलातरीही पिण्याच्या पाण्यासाठी आपणास स्थानिक स्वराज्य संस्थेशी भांडावे लागत आहे. असे का व्हावे???? यामागे बरेचशे प्रश्न दडले आहेत. हे प्रश्न कसे सोडवता येईल याचा विचार प्रथमत: आपणास करावा लागणार आहे.
सिंचनाच्या साधनांची कमतरता
वाचा : माळीण संकट : गरज शाश्वत विकास योजनांची
पाऊस पडला व वाहून गेला पण त्यास साठवण्यासंबधी आपण कोणती उपाययोजना केली हा मोठा प्रश्न,दुष्काळ काळात साठवण तलावाची व धरणांची  खोली व उंची आपण वाढविली नाही व नेहमीच्या वाद व भांडणाला आपण मोकळे. त्यासंबधी कायमस्वरुपी उपाययोजना आपण केली नाही.
पावसाळ्याच्या सुरवातीलासंपूर्ण महाराष्ट्रभर चांगला पाऊस पडला. नंतर तो काही भागातच पडला त्यामुळे पुन्हा दुष्काळी परिस्थिती उदभवण्याची चिन्हं दिसत आहेत. काही ठिकाणची धरणं भरली आहेत तर बरीच धरणं अजूनही कोरडीच आहेत. परिणामी पाण्यावरुन वाद होणार हे निश्चित. मराठवाड्यात आत्ताच नगर व नाशिक जिल्ह्यात अड्वून ठेवलेले पाणी सोडण्याची मागणी होऊ लागलीआहे,अजून तर उन्हाळा  बाकी आहे.
महाराष्ट्र व उर्वरित भारतात दरवर्षी अनेक अंदोलनं पाण्यासाठी होतात. कृष्णा- कावेरी, नर्मदा सारख्या अतीमह्त्वाच्या नद्या संदर्भात अनेक वाद सुरु आहेत. काही वाद  धरणाची उंची कमी करण्यासाठी होतात तर काही उंची वाढविण्यासाठी, तर काही पाणी मिळत नाही म्हणून तर काहींना पाण्याच्या खासगीकरण नको आहे.  
मागील वर्षी याच महिन्यात मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील जल आंदोलनाप्रमाणेच हरदा मधील शेतकर्‍यांनी  इंदिरा सागर धरणाची पाणी पातळी दोन मीटरने कमी करावी म्हणून सुमारे सतरा दिवस पाण्यात उभे राहून अंदोलन केलं..1  अजूनही याच इंदिरा सागरसाठी खंडवा जिल्ह्यातील मालुदा मधे जलसत्याग्रह सुरु आहे. 2  उत्तरप्रदेशमध्ये जुन 2013 ला रामसनेहीघाट (बाराबंकी) येथे अशाच प्रकारे स्थानिकांनी गोमती नदीत उभं राहून जलांदोलन केलं होतं.3
महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर चिपळूणला मे 2008 साली पुराचे पाणी शहरात येण्यापासून रोखण्यासाठी वसिष्ठी नदीच्या पात्रात जलअंदोलन करण्यात आली.4  डिसेंबर 2012 मध्ये मराठवाड्यात नगर जिल्ह्यातील भांडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी अनेक अंदोलनं झालीत. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. तरीदेखील पाणी सोडण्यात आलं नाही. शेवटी न्यायालयाने आदेश दिल्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडावे लागले.  
दुष्काळी काळात मार्च ते मे महिण्यात महाराष्ट्रातील अनेक भागात अंदोलनं झालीत. याहीवर्षी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामचे औचित्य साधून आमदार कल्याण काळे यांनी औरंगाबादला याच मागणीसाठी उपोषण केले. दरम्यान ध्वजवंदनसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी “पाण्याच्या न्याय वाटपबाबत ठोस घेतला जाईल”. असे आश्वासन दिले आहे. 
आता ठोस भूमिका किती लवकर घेतली जाईल हे लवकरच कळेल.5 नुकतीच 22 ऑक्टोबरला वरच्या (नगर आणि नाशिक) धरणातून 40 टीएमसी पाणी नाथसागरात सोडण्याची मागणी करत  पैठण येथील जायकवाडी धरणात उतरून आंदोलन करण्यात आले6 जायकवाडीतील अंदोलनं नेहमीचेच आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात  गोदावरी नदीवर बांधलेल्या धरणामुळे अतिरिक्त पाणी अडविले जाते. ही धरणे पूर्ण भरल्याशिवाय पाणी पुढे सोडले जात नाही. परिणामी जायकवाडीचे पात्र कोरडंच राहतं.
अंदोलनाचे राजकीय भांडवल
मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यात व  जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. हा विषय वृत्तपत्रव वाहिन्यांतनेहमी विकला जाणारा. आपण या बातम्या  चहा-नाष्ट्यासोबत बघून फक्त चर्चा करतो. “चहा संपला, चर्चा संपली.”यंदाच्या वर्षीही पाणीप्रश्न भेडसावणार असं असले तरी, पाणी हा पूर्णपणे प्रशासकीय भाग आहे. याचा योग्य व समन्यायी वाटप शासनदरबारीच शक्य आहे. पाणीटंचाई, दुष्काळ, पूर, पीकबुडी, नासाडी, आपत्ती निवारणावर हजारो कोटी  खर्च होतो आहे. परिणामी काहीच साध्य होत नाही.
याखेरीज राज्याचा अर्थसंकल्प तसेच वार्षिक योजना, पंचवार्षिक योजनांद्वारे मोठा खर्च होतो. शिवाय पाणी-वीज-रस्ते, आरोग्य-आवास व अन्य पायाभूत सुविधांच्या देखभालीचाही खर्च आहेच. या सर्वाची फलश्रुती अपेक्षेनुसार झाली असती तर राज्यात पाणी-वीज उपलब्धता, दारिद्र्य-दुष्काळ व कुपोषणाचा प्रश्न एव्हाना इतिहासजमा व्हायला हवा, पण आज महाराष्ट्रात 60 टक्के जनतेला साधं शुध्द व पुरेसं पिण्याचे पाणी मिळत नाही. खेड्यातच नव्हे तर शहरातही निम्म्या लोकसंख्येला मुलभूत सुविधा शासन पुरविण्यास असमर्थ ठरलं आहे. तसेच, महाराष्ट्रातील प्रत्येक दुसरं बालक कुपोषित आहे. 7
एकीकडे मुंबई-पुणे यासारख्या शहरांत दरमाणसी 200 लिटर पाणीपुरवठा होतो, तर राज्यातील इतरा भागात हंडाभर पाण्यासाठी आमच्याआया-बहिणींना दर दिवशी पाण्यासाठी मैलो-मैल भटकावे लागतं, हे विदारक सत्य आहे. याचंकारण निसर्गाची अवकृपा नसून मानवनिर्मित, सरकारच्या दिवाळखोर धोरणं आहेत. पिण्यासाठीपाणी आरक्षीत ठेवणे बंधनकारक असूनराष्ट्रीय व राज्याच्या पाणी धोरणात कागदोपत्री हा पहिला अग्रक्रम आहे. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नाही. परंतु उद्योगधंद्याना पाणी देण्याचं धोरण मात्र  सरकारने ठरविलं आहे. त्यामुळे पाऊच व बाटलीबंद पाण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
गावांगावात बाटलीबंद पाणी व  पाकिटं सर्रास विकली जात आहेत. पाण्याचा अपव्ययतर  सोडा,किमान पर्यावरणाच्या होणार्‍या हानी संबधी विचार सरकारने करावा. पिण्यासाठी आठवड्यातून एकदा तर उद्योगासाठी रोजच पाणी पुरविले जात आहे. पाणी सिंचन व पाणीवाटपाचे धोरण सरकार दरबारी नेहमीच फसलं आहे.
प्रत्येकांचे हितसंबध वाटप धोरणाशी जोडले असल्यामुळे सत्ताधारी पक्षातही वाद-विवाद होत आहेत. निवडणुकीत उद्योगपतींची (आर्थिक) मदत व्हावी, त्यासाठी राजकीय पक्ष  शेतीच्या व नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. नागरिकांना फक्तआश्वासन तर उद्योगपतींना हमी  देतात. असं दिसून येत आहे.  पाणी प्रश्नावर अंदोलनं केली, तरी  सरकारने याकडे लक्ष दिले नाही. उलट ते हाणून पाडण्याचे काम वेळो-वेळी केलं आहे. न्यायालयाने आदेश देवूनही धोरण ठरत नाही. मग शासनाला पाणी यासंबधी सक्ती कशी करता येईल...?
पाणीटंचाईच्या संदर्भात या राजकीय-आर्थिक पार्श्वभूमीवर विचार केला तरच याचे कूळ आणि मूळ लक्षात येईल. पाणी मुळात कमी नाही. होय…! यंदाचा मान्सून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत-तालुक्यांत सरासरीच्या 50 ते 75 टक्के इतका आहे.8  तथापि, 200 ते 300 मि. मी. पाऊस म्हणजे दर हेक्टरी जमिनीवर किमान दहा लाख लिटर पाणी पावसाद्वारे पडते. एवढे पाणी काळजीपूर्वक नियोजन केले तर केवळ पिण्याच्या पाण्याची नव्हे तर एका पिकाची हमखास हमी घेता येते. मुख्य प्रश्न आहे,  याचा वापर-विनियोग, जमिनीच्या पोटात, भूगर्भात, ओढे, नद्या तसेच छोट्या जलाशयात-तलावात, याची साठवण करणं सहज शक्य आहे.
पाणी वापराच्या काही उपाययोजना
    * आजघडीला उपलब्ध असलेले  पाणी फक्त पिण्यासाठी तसेच किमान आवश्यक घरगुती वापरासाठी राखून ठेवावे.
     *  साखर, मद्यार्क, रसायने, ऑटोमोबाइल, जलतरण आदींच्या वापरासाठीचा पाणीपुरवठा त्वरित बंद करावा.
    * ऊस, केळी, द्राक्षे आदी पिकांच्या अफाट पाणी वापरावर बंदी, मर्यादा घालावी.
   * पंचतारांकित हॉटेल्स, मल्टिप्लेक्स, मॉल, लग्नसमारंभ, पार्ट्या, उत्सवांच्या पाणीवापरावर तत्काळ मर्यादा घालणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे पाण्याचे नियोजन ठरविल्यावर उपलब्ध असलेले पाण्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो.

कलीम अजीम, पुणे
संदर्भ - 
1.   www.24taas.com 
2.   12 September 2012.
3.   लोकमत समाचार 11 सप्टेंबर 2013.
4.     जागरण हिंदी12 जुन 2013.
5.     म. टा.1 मे 2008.
6.     23 ऑक्टोबर 2013, लोकमत, औरंगाबाद 
7.     दिव्य मराठी, फेबु 18 2013.
8.     हवामान खाते पुणे दि. 20 सप्टेंबर.


9.     फोटो  23 ऑक्टोबर 2013, लोकमतऔरंगाबाद 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: पाणवठ्यावरील वाद ग्लोबल होताना
पाणवठ्यावरील वाद ग्लोबल होताना
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhbtwpuBZHABEi_XliLZmdNJAQDbJHFYaD5TE_oxXP4zro7ugPpHPfCm6-tImft8p9GCtT1z12AMfGV2kWI_otUF5dwZWJk55alwvi7WSXjo71CMBP3W4e_z_a4eKboHl4v4SzNVDQPhDyo/s640/lokmat.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhbtwpuBZHABEi_XliLZmdNJAQDbJHFYaD5TE_oxXP4zro7ugPpHPfCm6-tImft8p9GCtT1z12AMfGV2kWI_otUF5dwZWJk55alwvi7WSXjo71CMBP3W4e_z_a4eKboHl4v4SzNVDQPhDyo/s72-c/lokmat.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2013/10/blog-post_6286.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2013/10/blog-post_6286.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content