जगभरात लैंगिक अत्याचाराविरोधात रोष व्यक्त होत आहे, अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पंवर लैंगिक छळाचे आरोप होत आहेत. १२ जानेवारीला 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने ट्रम्प संदर्भात एक धक्कादायक बातमी छापला.
वृत्तपत्राने आरोप केला आहे की ट्रम्प यांनी गर्लफ्रेंडसोबतचे संबध उघडकीस येऊ नये म्हणून मोठी आर्थिक डील केल्याचा वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटलंय.
या घटनेमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर लैंगिक अत्याचारासंबधी चर्चा सुरु झाली आहे. लैंगिक शोषणाविरोधात सुरु असलेल्या #MeeTo कॅम्पैनला ४ महिने उलटले, पण आजही अमेरिका, ब्रिटन व युरोपमध्ये हे अभियान टॉप ट्रैंडमध्ये आहे. चीनमध्ये या कैम्पेनच्या समर्थनार्थ #WoYeShi (It's Also Me) म्हणजे 'मीसुद्धा आहे' अभियान सुरु आहे.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले आपली व्यथा ऑडिओ स्वरुपात रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. गेल्या महिनाभरात लाखो धक्कादायक कहाण्या ऑडियो स्वरुपात अपलोड झाल्या. अनेक सेलिब्रिटींनी या कैम्पेनमध्ये सहभाग घेतला असून देशभरात विविध स्वरुपात लैंगिक अत्याचारविधोत जागरुकता वाढवली जात आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हॉलीवूडच्या ‘एशले जड’ या नटीने ऑस्कर विनर प्रोड्यूसरवर बलात्काराचा आरोप केला होता. एशले नंतर अनेक अभिनेत्रींनी प्रोड्यूसर वाइन्सटाइनने लैंगिक छळ केल्याचे आरोप लावले. या सेलिब्रिटी 'सेक्स स्कैंडल’च्या बातमीने जगभर खळबळ माजली. लैंगिक अत्याचारावर राग व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर #MeeToo अभियान सुरु झालं. जगभरातील पीडित महिला व मुलींनी लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक कहाण्या मांडल्या.
मी टू कॅम्पैन अंतर्गत लैंगिक शोषणाबद्दल उघडपणे बोलणाऱ्या ५ निवडक महिलांचा सत्कार 'टाईम' मॅगझीनने केला होता. टाईमने डिसेंबर अंकाच्या फ्रंट पेजवर या महिलांचा फोटो छापला होता. टाईमने महिलांच्या धाडसाला प्रोत्साहन दिलं.
मी टू च्या धर्तीवर चीनमध्ये २७ नोव्हेंबरला #WoYeShi म्हणजे 'मीसुद्धा आहे' हे कॅम्पैन सुरु झाले. शू यालू नावाच्या एका अठ्ठावीस वर्षीय महिलेनं हे कॅम्पैन सुरु केलं. वूई चैटवर तिने या संदर्भात WoYeShi हैशटैग करत व्यथा कथन केली. २ दिवसात १.१९ मिलीयन लोकांनी तिला वाचलं. १७ हजार लाईक व नऊ हजार कमेंट या लेखावर आल्या.
महिलांनी सुरु केलेल्या या अभियानात अनेक पुरुषही सहभागी झाले. चीननंतर हे कॅम्पैन ऑस्ट्रेलियातही सुरु झालं. १८ जानेवारीला 'दी ऑस्ट्रेलियन' या प्रतिष्ठित वेबसाईटने ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या कॅम्पेनवर दीर्घ लेख प्रकाशित केला. ऑस्ट्रेलियात अनेक पुरुषांनी आपण कशा पद्धतीने मुलींचा लैंगिक छळ केला याबद्दल कन्फेशन दिलंय. अनेक कॉलेजवयीन मुलांनी या अभियान सहभाग घेतलाय. राजकारणी खेळाडू, कलाकारांनी आपल्या गुन्ह्यांची स्वीकारोत्ती दिली. काहींनी कशा पद्धतीने लैंगिक शोषणाला बळी पडलो, याबद्दल धक्कादायक किस्से टाकले.
वाचा : सन्मान #MeToo कॅम्पेनचा
पाकिस्तानमध्ये ८ जानेवारीला एका आठ वर्षाच्या जैनब नावाच्या बालिकेची रेप करुन निर्दयी हत्या करण्यात आली. तीन आठवड्यापासून या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. मृत चिमुरडी पंजाब प्रांताच्या कसूर शहरातली होती. आरोपीच्या अटकेची मागणी करत लोकं रस्त्यावर उतरली.
सरकारविरोधात जाळपोळ व आंदोलने सुरु होती. लोकांनी घटनेचा वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. 'समा न्यूज' टीव्हीची एंकर किरन नाझने ६ महिन्याच्या आपल्या मुलीला कैमेऱ्यासमोर घेऊन बातमीपत्र वाचलं. न्यूज देताना किरन वारंवार आपल्या मुलीबद्दल काळजी करत होती. या बातमीपत्राची जगभरात चर्चा झाली.
भारतीय मीडियानेदेखील ही बातमी लावून धरली. अनेक आंतरराष्ट्रीय मीडियाने किरन नाझचा मुलीसह बातम्या देताना फोटो फ्रंट पेजवर छापला. जैनबच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात 'मी टू' कॅम्पैन जोर धरत आहेत. राजकारणी, समाजसेवक व सेलिब्रिटी मी टू हैशटैग अंतर्गत सरकार व पोलिसांना धारेवर धरत आहेत.
जगभरात लैंगिक अत्याचाविरोधात उद्रेक सुरु आहे. अमरिका, युरोप खंडात सुरु असलेली ही मोहीम आशिया खंडात पोहचली आहे. भारतात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक सेलिब्रिटींनी 'मी टू' अभियानात सहभाग घेतला होता.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 29 जानेवारी 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com