‘विकिपीडियानं महत्व न दिलेल्या महिलेला नोबेल’
हो अशीच बातमी होती ती..
दि गार्डियनच्या मते डोना स्ट्रीकलँड यांचे विकी प्रोफाईल मार्चमध्ये लीस्टेड झाली होती. पण विकीपीडियानं प्रोफाईल तयार करण्यास नकार दिला. कॅनडातील प्रतिष्ठित अशा वॉटर्लू विद्यापीठाच्या प्राध्यापक व शास्त्रज्ञ महिलेचं प्रोफाईल विकीपीडियाला महत्त्वाचं वाटलं नाही; याचं एक वेगळे कारण दि गार्डियननं दिलं आहे.
वाचा : अबी अहमद इथियोपियाचे मंडेला
वाचा : नागपूरच्या अमेरिकन सिनेटर गझाला हाशमी
वृत्तपत्राच्या मते, विकीपीडिया महिलांसोबत लैंगिक भेदभाव करतो. गार्डियन म्हणतो की, नवे प्रोफाईल तयार करणाऱ्या केवळ 16 टक्के संपादक महिला आहेत आणि त्यातही अनेकांच्या प्रोफाईल मॉडरेट आहेत. विकीपीडिया पेजचा एकूण धांडोळा घेतला तर फक्त १७ टक्के महिला प्रोफाईललाच विकीनं स्वीकृती दिली आहे, असं गार्डियननं म्हटलं आहे. विकीपीडिया महिलांच्या बाबतीत लिंगभेद करणारा आहे, अशी स्पष्टोक्ती वृत्तपत्रानं दिली आहे.
या चर्चेसह दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे वृत्तपत्रानं लक्ष वेधलं आहे. महिला शास्त्रज्ञांनी अनेक महत्त्वाचे व युनिक शोध लावले आहे, पण त्यांची फारशी दखल घेतली जात नाही असं वृत्तपत्र म्हणतेय. बीबीसीनंदेखील ४ ऑक्टोबरला नोबेलवर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये हीच चर्चा केंद्रस्थानी ठेवली.
तब्बल ५५ वर्षांनंतर फिजिक्सचं नोबेल एका महिलेला मिळालं आहे. गेल्या ११७ वर्षांच्या इतिहासात डोना फिजिक्सच्या तिसऱ्या महिला आहेत. यावर बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत डोना नाराजी व्यक्त करताना म्हणतात, ‘अनेक महिलांनी चांगले शोध लावत आहेत, पण त्यांच्या कामाला ओळख मिळायला इतके वर्षे लागणे दुर्दैवी आहे.’ स्ट्रीकलँड यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की, संशोधन कार्यात असलेल्या तरुण महिला शास्त्रज्ञांकडे सर्वांचे मत बदलण्याची शक्ती आहे.
बीबीसीच्या मते इतर क्षेत्रापेक्षा फिजिक्समध्ये महिला संशोधक कमी आहेत, या क्षेत्रात महिलांची संख्या पुरुषाइतकी व्हायला अजून दोन शतकं लागू शकतात. १९६३ मध्ये न्यूक्लियर स्ट्रक्चरवर शोध लावणाऱ्या मारिया मेयर यांना फिजिक्सचं नोबेल मिळालं होतं, १९०३ मध्ये मॅरी क्युरी या फिजिक्समध्ये नोबेल मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांना पती पियरे क्युरीसोबत संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला होता.
यंदा दोन महिला वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनासाठी नोबेल देण्यात आला आहे. डोना स्ट्रीकलँडसह अमेरिकेच्या फ्रान्सिस अर्नाल्ड यांना केमिस्ट्रीत नोबेल मिळाला आहे. एकूण तीन-तीन अशा सहा जणांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. केमिस्ट्रीत नोबेल मिळवणारे अमेरिकेचे अन्य वैज्ञानिक आर्थर एश्किन सर्वांत वयोवृद्ध शास्त्रज्ञ ठरले आहेत. त्यांना वयाच्या ९६व्या वर्षी नोबेलचा सन्मान मिळाला आहे.
डोना यांनी सर्वात सूक्ष्म व गतिशील लेझर तरंगांचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे, डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकणार आहे.
तर फ्रान्सिस अर्नाल्ड यांनी एंझाइम, पेपटाइड्स आणि अँटिबॉडीजवर संशोधन केले आहे. केमिस्ट्रीत नोबेल मिळवणाऱ्या अर्नाल्ड या आत्तापर्यंतच्या पाचव्या महिला आहेत. त्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या प्राध्यापिका आहेत.
१९०१ साली सुरू झालेला हा मानाचा पुरस्कार आत्तापर्यंत 892 व्यक्तींना देण्यात आला आहे, त्यात फक्त ५१ महिला आहेत. २०१४ व २०१५ साली दोन-दोन तर २००९मध्ये एकदाच ५ महिलांना नोबेल देण्यात आलेला होता. केमिस्ट्रीत ५ तर फिजिक्स तीन, तर सर्वांधिक १५ नोबेल शांततेसाठी महिलांना मिळाले आहेत.
त्यापाठोपाठ १४ नोबेल हे महिलांना साहित्यात मिळालेले आहेत. मलाला युसूफजाई ही सर्वांत कमी वयाची म्हणजे सतरा वर्षांत तिला २०१४चं शांततेचं नोबेल मिळालं आहे.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com