कुठलंही लोक कल्याणकारी काम करत असताना त्यात अनेक अडचणी येतात. या अडथड्यांना घाबरल्यास ते काम संथ होऊन जातं किंवा कायमचं थांबतं. पण अडचणींवर मात करण्याची जिद्द असेल तर कुठलही अशक्य काम सहज सोप्पं होऊन जातं. आजच्या लेखात पाकिस्तानच्या ‘अनफस झैदी’ची कथा पाहूया. ही बावीस वर्षाची मुलगी सध्या पाकिस्तानात चर्चेचा विषय आहे. सैय्यदा अनफस झैदी ‘कराची’ शहरात निराधार व गरीब लहान मुलांसाठी गेल्या तीन वर्षापासून ‘फूटपाथ स्कूल’ चालवते.
2014 साली पाकिस्तानच्या पेशावरमधील एका आर्मी स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बांधकाम व्यावसायिक असलेली अनफस झैदी या घटनेनं खूप व्यथित झाली. समाजाचं देणं लागतं या उद्देशानं तिनं निराधार व गरीब मुलांना शिक्षण देण्याचा निश्चय केला.
पाकिस्तानात दर्गा परिसरात अनेक निराधार व गरीब मुलं फिरत असतात, या मुलांची निवड अनफस झैदीनं केली. पार्किंग व बेकायदा कामांसाठी वापरली जाणारी शहरातल्या पूलाखालची जागा तिनं शाळेसाठी निवडली. निर्णयाच्या काहीच दिवसात कराची शहरातील क्लिंफ्टन पूलाखाली तिचं ‘फुटपाथ स्कूल’ सुरु झालं. पहिल्याच दिवशी 2 मुलांना घेऊन तिनं शाळा सुरु केली. हळुहळू मुलांची संख्या वाढली. आज या फूटपाथ स्कूलमध्ये 9 ते 13 वयोगटातील एक हजारपेक्षा जास्त लहान मुलं शिक्षण घेतात.
वाचा : प्री एज्युकेशन म्हणजे अबोध बालकांवर अत्याचार
वाचा : दुबईच्या सारा अल् अमीरीचं 'होप मिशन'
दररोज सकाळी सहा वाजता हे स्कूल सुरु होते. या स्कूलमध्ये विविध वर्गातील मुलं-मुली आहेत. विविध स्तरांवरील शिक्षण या मुलांना दिले जाते. तिच्या शाळेत अशी मुलंही आहेत, ज्यांना साधं वही-पेन काय असते हेदेखील माहीत नाही. अशा गरीब मुलांना अनफस आधुनिक शिक्षणाचे धडे देत आहे.
शाळेतील प्रत्येक मुलांना तिनं युनिफॉर्म दिला असून ब्लॅकबोर्ड, मायक्रोफोन, इंग्रजी टेक्सबूक, कलर पेन्सिल, स्कूल बॅग, पुस्तके असं इतर साहित्य ती वर्गातील मुलांना उपलब्ध करून देते. स्वखर्चातून अनफस या मुलांना शिक्षण देते. या शाळेसाठी ‘ओशियन फाँऊडेशन’ नावाची संस्था तिनं रजिस्टर केली आहे. काही शिक्षकांची नियुक्तीही तिनं केली आहे.
बीबीसीच्या आकडेवारीनुसार सध्या पाकिस्तानात 12 कोटी गरीब व निराधार लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. अशा स्थितीत अनफस झैदीची कराची शहरातील शाळा एक आशेचा किरण आहे. पण सरकार ती बंद करण्याच्या मार्गावर आहे. ‘दी न्यूज’ या पाकिस्तानातील वेबसाईटनं मार्च 2017मध्ये ‘स्ट्रीट चिल्ड्रन’ नावानं एक लेख प्रकाशित केला आहे.
यात देशातील निराधार लहान मुलांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. वेबसाईटनं ‘स्मार्ट स्ट्रीट’ नावानं प्रकाशित केलेल्या एका अन्य लेखात अनफस झैदीच्या फुटपाथ स्कूलचा उल्लेख केला आहे. यात वेबसाईटनं म्हंटलं आहे की सरकारनं या निराधार मुलांच्या शिक्षणासाठी 50 वर्षापूर्वी विचार करायला हवा होता, पण सरकारचं काम अनफस झैदी करत आहेत.
वाचा : दोन महिला वैज्ञानिकांचे ऐतिहासिक स्पेसवॉक
वाचा : सुहाई अजीज : पाकची सुपरकॉप लेडी
सरकारनं त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावं अशी विनंतीही ‘दी न्यूज’नं केली होती. सरकारने कुठलीही मदत या फुटपाथ स्कूलला केली नाही, उलट ही शाळा बंद करण्याचा आदेश नुकताच स्थानिक सरकारने काढला आहे.
केवळ शालेय शिक्षणच नाही तर मूल्य शिक्षणाचे धडेही तिनं या मुलांना दिले आहेत. पदपथावर फुलं, पुस्तकं, पेन विकणारे अनेक मुलांचे आयुष्य अनफस झैदीच्या फूटपाथ स्कूलनं बदलवले आहे. स्थानिक प्रशासनाने ‘डेव्हलपिंग प्लॅन’चं धोरण पुढे करत तिला शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पण तिनं शाळा बंद करण्यास ठामपणे नकार दिला असून ती प्रशानाविरोधात एकटीच उभी राहिली आहे. अनफस झैदीची बाजू घेत अनेक जागतिक वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली आहे. जगभरातून मिळणारा पाठींबा पाहता तिचं बळ वाढलं आहे. तिच्या फेसबुक वॉलवर तिला अनेकांनी पाठींबा दर्शवला असून तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
(सदरील लेख लोकमतच्या 13 फेब्रुवारी 2018च्या अंकात प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com