याकूब
मेमनला फाशी दिली गेली, याचा मुस्लिम समाजमानसावर काय परिणाम झाला असावा,
हे कदाचित कुणी सायकॉलॉजिस्टच सांगू शकेल. मला जे दिसलं,
ते मी सांगतो. २६/११च्या नापाक घटनेत, मुंबईतील
त्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध लोकांचा बळी गेला. हल्ला करणारे दहशतवादीही
मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या प्रेतांना पाकिस्तानने स्वीकारलं
नाही.
देशातील मुस्लिमांनीही ही प्रेतं आमच्या दफनभूमीमध्ये दफन करावयाची नाहीत, अशी भूमिका घेतली. सहा-सात महिने ही प्रेतं पडून होती. पुढे मग गुप्त रीतीने त्यांचं काय करण्यात आलं, कुणास ठाऊक? या हल्ल्यादरम्यान जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतरही देशातल्या मुस्लिमांनी तीच भूमिका घेतली.

वाचा : याकूब मेमन : सिलेक्टिव्ह न्याय और असुविधाजनक सत्य
वाचा : ख्वाजा युनूसच्या आईचा हुंकार 'मला न्याय मिळणार का?'
“आमच्या कब्रस्तानात त्याला जागा नाही,” असं ठणकावून सांगितलं. संसद हल्लाप्रकरणातील दोषी अफजल गुरूच्या फाशीनंतर देशात तशी काही फारशी मोठी प्रतिक्रिया उमटली नाही. थोडीफार कुजबुज झाली तेवढीच. पण मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील दोषी याकूब मेमनच्या दफनविधीला २० हजार लोक उपस्थित राहिले. काय संदेश मिळतो यातून? इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी तिथे उपस्थित राहण्यामागे काय कारण असू शकतं? या प्रश्नांचा विचार मी नव्हे, तर सत्ताधारी पक्ष आणि जे महत्त्वाच्या पदांवर बसले आहेत, त्यांनी करण्याची गरज आहे.
प्रसारमाध्यमांनीही याचा विचार करण्याची गरज आहे. फाशीच्या शिक्षेसंदर्भात देशात राजकीय पक्ष बिनदिक्कत राजकारण करताहेत. ज्यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ आहे, ते फाशीपासून वाचवले गेले. ज्याच्या मागे राजकीय पाठबळ नव्हतं, त्याला फासावर चढवण्यात आलं. हे फक्त मी एकटाच बोलतोय असं नाही. आणखी कितीतरी बिगर-मुस्लिम व्यक्तीही हेच सांगताहेत. ज्यांनी यासंदर्भात राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली होती, तेही हेच म्हणत होते. इतरही अनेकांना असंच वाटतं.

याकूबच्या
फाशीच्या संदर्भात सर्वसाधारणपणे असं बोललं गेलं की, मुंबईतील
बॉम्बस्फोट मालिकेत अडीचशेहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यांना व त्यांच्या
कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी याकूबला फाशी देणं आवश्यक
होतं. मग, ९२-९३ च्या दंगलीतील बळींचं काय? या दंगलींमध्ये तर ९०० च्या आसपास माणसं मारली गेली. मात्र, या प्रकरणांत फक्त तिघांना शिक्षा झाली आहे. तीही फक्त आठ-आठ महिन्यांचीच.
मी मुंबईतील बॉम्बस्फोटांचं समर्थन करत नाही; पण श्रीकृष्ण आयोगानेच बॉम्बस्फोटांबद्दल बोलताना मुंबईतील दंगली हा या बॉम्बस्फोटांसाठीचा causative factor ठरल्याचं म्हटलं होतं. म्हणजे दंगलींच्या परिणामस्वरूपी बॉम्बस्फोट घडल्याचं मत आयोगाने व्यक्त केलं होतं, हेही लक्षात घेतलं गेलं पाहिजे. याकूबच्या फाशीनंतर अनेक शिखांनी मला भेटून असं सांगितलं की, दिल्लीतील दंगलीत तीनेक हजार शिखांची कत्तल झाली; पण या प्रकरणांत किती जणांना फाशी झाली? नऊ चौकशी समित्यांचे रिपोर्ट तेवढे आले.

बाबरी
मस्जिद पाडण्याच्या घटनेतील आरोपी देशाचे उपपंतप्रधान बनले. या साऱ्या प्रकरणांत
न्याय होण्याची गरज नाही का? मुंबई दंगलीतील बळींना न्याय
मिळायला नको का? गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया प्रकरणातील
आरोपी बाबू बजरंगीच्या जामिनाला विरोध का झाला नाही?
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी याकूब मेमनच्या दफनविधीला उपस्थित राहिलेल्या लोकांना संभाव्य दहशतवादी म्हटलं. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती एका संपूर्ण समाजाला अशा तऱ्हेने दहशतवादी म्हणते, हे अशोभनीय नाही? ही अशी मानसिकता इतक्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीची असेल, तर लोकांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल काय विश्वास टिकून राहील? अशा मानसिकतेच्या व्यक्तीकडे दयेचा अर्ज गेल्यानंतर ते त्याच्याशी काय न्याय करणार?
इतकं बेजबाबदार विधान करणाऱ्या व्यक्तीला कुणीही साधं ते मागे घेण्यासही सांगितलं नाही. याउलट, याकूबच्या दफनविधीला जमलेल्या लोकांचं वर्तन मात्र अतिशय शांततापूर्ण होतं. मग त्यांना उकसवणारी ही विधानं कशासाठी? महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेला लोक अद्याप विसरलेले नाहीत.
बाबरी मशिदीला विसरलेले नाहीत. शिखांच्या कत्तलीचा अद्याप विसर पडलेला नाही. नाइन्साफी ला लोकांनी का बरं विसरावं? सामान्य माणूस काहीच विसरत नाही. मुस्लिम समाजाला मी इतकंच सांगेन की, कुणीही हताश होण्याची गरज नाही. आपली लढाई आपण लोकशाही मार्गाने लढत राहू.
(खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा हा लेख 5 ऑगस्ट 2015च्या 'मी मराठी लाईव्ह'मध्ये 'नाइन्साफी को कोई क्यूं भूलेगा?' या शिर्षकाखाली प्रकाशित झालेला आहे.)त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी याकूब मेमनच्या दफनविधीला उपस्थित राहिलेल्या लोकांना संभाव्य दहशतवादी म्हटलं. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती एका संपूर्ण समाजाला अशा तऱ्हेने दहशतवादी म्हणते, हे अशोभनीय नाही? ही अशी मानसिकता इतक्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीची असेल, तर लोकांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल काय विश्वास टिकून राहील? अशा मानसिकतेच्या व्यक्तीकडे दयेचा अर्ज गेल्यानंतर ते त्याच्याशी काय न्याय करणार?
इतकं बेजबाबदार विधान करणाऱ्या व्यक्तीला कुणीही साधं ते मागे घेण्यासही सांगितलं नाही. याउलट, याकूबच्या दफनविधीला जमलेल्या लोकांचं वर्तन मात्र अतिशय शांततापूर्ण होतं. मग त्यांना उकसवणारी ही विधानं कशासाठी? महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेला लोक अद्याप विसरलेले नाहीत.
बाबरी मशिदीला विसरलेले नाहीत. शिखांच्या कत्तलीचा अद्याप विसर पडलेला नाही. नाइन्साफी ला लोकांनी का बरं विसरावं? सामान्य माणूस काहीच विसरत नाही. मुस्लिम समाजाला मी इतकंच सांगेन की, कुणीही हताश होण्याची गरज नाही. आपली लढाई आपण लोकशाही मार्गाने लढत राहू.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com