माझ्या सुंबरान
मासिकातील फ़ेब्रु-मार्चच्या अंकात 'लव्ह जिहाद' या लेखाबद्दल मला फ़ोन व इ-मेलने
बऱ्याच प्रतिक्रीया आल्या. काहींनी लेखावर टोकाची भूमिका घेतली तर अनेकांनी
लिखाणासंबधी कौतुक तर काहींनी टीका केली.
माझ्या वर्गमित्रांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. बहुतेकांवर मिथकांचे गारूड असल्याने ते हट्टी राहिले. काहींनी लिखाणाच्या भाषेवर प्रश्न उपस्थित केले. तुझ्या लिखाणाची भाषा अशी असूच शकत नाही, तू अशी भाषा कसा वापरु शकतो, तू तर सामनासारखी भाषा वापरत आहे. इत्यादी इत्यादी."
काहींनी संदर्भ कुठले वापरले असा निर्रथक प्रश्न उभा केला. काही हिंदू मूलतत्ववादी कार्यकर्त्यांनी धमकीवजा फ़ोन केले व करवले. लिखाणावर टीका करणाऱ्यात काही जवळची मित्र होती, तर काही अनोळखी. ज्यांनी समीक्षा केली त्यांची दखल मी घेतली. पण ज्यांनी फ़क्त मुस्लिमद्वेशी प्रचारी साधनांचा आधार घेत उलटतपासणी केली, ते माझ्या खिजगणतीतही नाही. कारण झोपेचे सोंग घेतलेल्या किंवा पूर्वग्रह ठेवून वावणाऱ्यांपुढे कसला तर्क व युक्तिवाद!
फक्त मुस्लिमांना टारगेट करुन त्यांच्या विरोधात कार्नर बैठका, सभा संमेलने भरवून माथी भडकवणारी व्याख्याने केली जातात. हे खोटे आहे असे हिंदुत्ववादी म्हणतील का? या दृष्कृत्याचे कितीतरी पुरावे, पत्रके, पुस्तिका माझ्याकडे संग्रही आहेत. अशा बातम्या काही वृत्तपत्रात येत नाहीत
किंवा यांचे परिपत्रक काढले जात नाहीत. ही एक विकृती आहे. जी या गटांनी समाजाच्या नसा-नसात द्वेशाच्या माध्यमातून पेरली आहे.
याचे कितीही पुरावे
सादर केले तरी हिंदुवादी ते नाकारतात. म्हणजे आपल्या चुका, कारस्थाने ते मान्य करत नाही. तशी ही जुनी परंपरा आहे. राहिली गोष्ट मी अशी भाषा का वापरली? तर
त्यांचे उत्तर असे की हिंदुवादी मुखपत्रातून सतत एका जाती धर्माला अधोरेखित करुन इस्लामी दहशतवाद, हिरवी गरळ, हिरव्यांचा हैदोस,
पाकधार्जीने, कटवे, दाढीवाल्यांची
धुडगूस अजूनही बरेच हिंदू धर्मांधांना चुचकारण्यासाठी शब्दप्रयोग कुठल्या नैतिकतेत माजता येतील?
कुरघोड्या करणारे, धर्म व जातीसूचक शब्द काय तुम्हीच वापरु शकता, मग मी वापरले तर बिघडले काय? अजुन एक मुद्दा मला
येथे नमूद करावासा वाटतो, तो असा हा लेख 'कलीम अजीम' यांनी
लिहिला असल्यामुळे यावर "रंगीय टीका" केली जात आहे, असे मला वाटते.
जर हा लेख माझे सहकारी मित्र जे मुस्लिम प्रश्नांवर नेहमी
बोलत असतात, त्यांनी लिहिला असता तर कोणीही आक्षेप घेतला
नसता. तसेच ज्यांना आक्षेप घ्यायचाच असेल तर इतर अशा लिखाणावर आक्षेप घ्यावा.
अस्तित्वात
नसलेल्या गोष्टींचे मृगजळ निर्माण करुन, सतत ती गोष्ट होत असल्याचे दाखवून आणीबाणीची परिस्थीती उद्भवू नये.
कोणत्याही घटनेला धार्मिक रंग देऊन प्रसार प्रचार करु नये.
माझ्या मनात
खदखदत असलेली भावना भूमिका घेऊन मांडण्यासाठी मला जागा उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मी संपादक कुणाल
गायकवाड आणि मुख्य संपादक प्रथमेश पाटील यांचे आभार मानतो.
*टीप - मुक्त चर्चेस वाव आहे मात्र, त्यासाठी मिथके बाजुला ठेवून बसावे लागेल.
कलीम अजीम, पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com