सौदी अरेबिया गेल्या दोन वर्षापासून जगभरात चर्चेचा विषय झालेला आहे. त्यातले पहिले ‘वीजन 2030’ मिशन आणि दुसरे जमाल खाशोजी या पत्रकाराची निर्घुण हत्या. खाशोजीचा मुद्दा बाजुला ठेवला तर ‘वीजन 2030’ धोरण काय आहे, असा प्रश्न पडेल.
2018 साली सौदी सरकारने आर्थिक व सामाजिक सक्षमतेसाठी हे अभियान सुरू केलं आहे. या अंतर्गत विविध सार्वजनिक क्षेत्रात महिलांसाठी असलेले निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. पब्लिक सेक्टरमध्ये महिलांची सहभागिता वाढवून अरब जगतात वेगळा पायंडा सौदी पाडू पाहतोय. पण त्याचवेळी मूलभूत हक्काची मागणी करणाऱ्या एक्टिविस्टना जेलमध्ये टाकलं जात आहे. त्यामुळे जगभरातील मानवी हक्क संघटना सौदीला लक्ष्य करीत आहेत.
दोन वर्षापूर्वी सरकारने महिलांसाठी ड्रायव्हिंगवर असलेले निर्बंध उठवले. या निर्णयामुळे सौदी महिला आता कार, ट्रेलर व ट्रक चालवू शकतात. हा क्रांतिकारक निर्णय होता. 2013 पासून ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ सुरू झालेली होती. त्यात प्रमुख होत्या ‘लुजैन अल हथलौल’ या तिशीतल्या कार्यकर्त्या. वीमेन ड्रायव्हिंग चळवळीला 5 वर्षानंतर यश आले मात्र, चळवळ राबवणाऱ्या जवळपास सर्वच महिला एक्टिविस्टना सरकारने जेलमध्ये टाकलं.
वाचा : सौदीतली महिलांची मॅरॉथॉन
देशद्रोहाचे आरोप
‘लुजैन अल हथलौल’ या त्यापैकी एक. गेली तीन अडीच वर्षे त्या तुरुंगात होत्या. गेल्या वर्षी म्हणजे 28 डिसेंबरला सौदीच्या रियाध कोर्टाने त्यांना पाच वर्षे आठ महिन्याची शिक्षा सुनावली. दहशतवादी कृत्य, राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहचवणे, त्यासाठी इंटरनेटचा गैरवापर करणे, परदेशी अजेंडा चालवण्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं.
जगभरातील मानवी हक्क संघटना व कार्यकर्त्यांनी लुजैन यांच्या समर्थनार्थ मोहिम सुरू केली. जगभरातील वाढता दबाव पाहता, 10 फेब्रुवारीला त्यांची सुटका करण्यात आली. गल्फ न्यूजच्या मते तब्बल 2 वर्षे 10 महिन्यानंतर त्या मुक्त झाल्या. त्यांची बहिण लिना हथलौल यांनी लुजैन यांच्या मुक्ततेचा आनंद ट्विटरवर जाहिर केला.
लुजैनला वीडियो कॉलवरून संवाद झाला असून आता ती 1000 दिवसानंतर घरी येणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. वीडियो कॉल केल्याच्या स्क्रीन शॉट त्यांनी टाकला आहे. बीबीसी वर्ल्ड सर्विसच्या मते तुरुंगात असताना त्यांच्यावर अमानूष अत्याचार झाला. त्यांना मारहाण करण्यात आली, फरफटून नेण्यात आलं, लैंगिक बळजबरी झाली, असाही आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी जेल प्रशासनावर लावला होता.
2010 मीडल-इस्टमध्ये जॅस्मिन क्रांती झाली. इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया इत्यादी देशामध्ये तिथल्या हुकूमशाही सरकारला जनतेने खुर्चीवरून खाली खेचले. वर्षानूवर्षापासून सत्तेला चिटकून असलेल्या हुकूमशहांना रस्त्यावर आणले. या चळवळीचे लोण हळूहळू संपूर्ण अरब राष्ट्रात पोहोचले. त्यातून सौदी अरेबियात महिलांनी आपल्या अधिकारांची मागणी करत चळवळी सुरू केल्या. महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यात प्रामुख्याने होती.
यापूर्वी सौदीत महिला कार चालवित होत्या. 1990 साली महिलांच्या ड्रायव्हिंगला निर्बंध लादले. त्या काळात शाही परिवाराविरोधात उघड बंड करणे अशक्य होते. त्या काळात बंडखोरांना थेट जेलमध्ये टाकण्यात येई, तरीही परिणामांची पर्वा न करता तब्बल 47 महिलांनी शाही परिवाराच्या निर्णयाचा बहिष्कार करत रियाधच्या रस्त्यावर गाड्या चालवल्या.
1980ला सौदी सरकारने महिलांना सिनेमा हॉलमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यास बंदी लावली होती. महिलांना स्वतंत्र अधिकार प्रदान करावे, शिवाय अन्य निर्बंध त्वरीत हटवावे, अशी प्रमुख मागणी
महिलांनी केली.
नियमांचा केला भंग
आंदोलनाची दखल घेत सरकारने एक कमिटी स्थापन केली. समितीने महिलांना ड्रायव्हिंगचे अधिकार कदापि देऊ नये, असा निर्वाळा दिला. सरकारी धोरणांच्या विरोधात ऑक्टोबर 2013 ला पुन्हा महिलांनी आंदोलने तीव्र केली. तब्बल 11 हजार महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पुरुषांनी ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ला समर्थन दिले.
2014 साली सामाजिक कार्यकर्त्या ‘लुजैन अल हथलौल’ यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सीमेवरुन कार चालवत सौदीत प्रवेश केला. ट्विटवर एक वीडियो जारी करत सर्व निर्बंध तोडत असल्याचे घोषित केले. त्यांच्याकडे दुबईचे ड्रायव्हिंग लायसन्स होते. सौदी पोलिसांनी त्यांना अटक केली. परिणामी जगभरातून सौदी सरकारला मानवी हक्क संघटनांनी लक्ष्य केले. सोशल मीडियावरून मोहिम उभी राहिली. अखेर 73 दिवसानंतर त्यांची सुटका झाली.
लुजैन या उच्च शिक्षित महिला आहेत. त्यांनी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून डिग्री घेतली आहे. 2015 साली अरब देशातील मोस्ट पावरफुल वीमेन यादीत तिसरे मानांकन लाभले होते. 2018 साली त्यांचे पती फहद अलबुतेरी यांनी पत्रकार खाशोजी हत्या प्रकरणी क्राउन प्रिन्सवर टीका केली होती. सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात टाकलं होतं.
सुटका झाल्यानंतर लुजैन स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी अरब देशातून चळवळीला समर्थन मिळवणे सुरू केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी महिला हक्काचा आवाज बुलंद केला. 2017मध्ये पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली. त्याच्यांवर दहशतवादाचे आरोप ठेवून जेलमध्ये डांबलं.
अनेक देशातून लुजैन यांच्या अटकेचा निषेध झाला, एमनेस्टी इंटरनेशनल, ह्यूमन राइट वॉच अशा मानवी अधिकार संघटनांनी सौदीच्या शाही परिवारावर टीका केली. पण ड्रायव्हिंग बंदी विरोधात ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ सुरुच होती.
किंग सलमानचे धोरण
2017ला सलमान बीन अब्दुल अजीज गादीवर आले. त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेत सर्वात आधी महिलांना ड्रायव्हिंला मुभा दिली. त्याचवर्षी क्राउन प्रिन्सनी ‘वीजन 2030’ धोरण जाहिर केले. आर्थिक सक्षमीकरणासाठी सार्वजनिक क्षेत्रात महिलांची सहभाग वाढवण्याची घोषणा केली. महिलांवरील विविध निर्बंध उठवले. या कार्यक्रमाअंतर्गत महिला कल्याणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
गेल्या दोन वर्षात महिलासाठी विविध सवलती जाहिर केल्या. खासगी सेक्टरमध्ये जॉब मार्केट खुले केले. स्पोर्ट्स स्टेडियममध्ये प्रवेश, वीमेन मॅरेथॉनला परवानगी, सिनेमागृह खुले केले, स्वैच्छिक सैन्य भरतीला मान्यता इत्यादी धोरणे जाहिर केले. सौदी विरोधक कर्मठ अरब राष्ट्रांनी या निर्णयावर टीका केली. पण क्राउन प्रिन्सने त्याकडे दुर्लक्ष करत आधुनिक विचारांचे वाहक म्हणून जगभरात आपली प्रतिमा तयार केली.
सुधारणा केल्या मात्र त्याची मागणी करणाऱ्या व चळवळी राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये ठेवले. एककीकडे महिला हक्काचे समर्थन करत होते, त्याचवेळी लुजैन यांच्या अटकेवर गप्प राहण्याचे धोरण स्वीकारले होते. बीबीसीने या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एमबीएस म्हणाले होते, “प्रत्येक देशाचे कायदे असतात, त्यांचा सन्मान राखला पाहिजे.”
मूलभूत हक्कासाठी आंदोलन
दरम्यान 20 डिसेंबरच्या घटनेनंतर जगभरातून लुजैन अल हथलोल यांच्या समर्थनार्थ मोहिम सुरू झाली होती. त्यात अमेरेकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मध्यस्थी केल्यानंतर सौदी सरकारने लुजैनच्या सुटकेचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहेत. लुजैन यांच्या सुटकेवर बायडन यांनी ‘स्वागतार्ह बातमी’ म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
काही अटी-शर्थीवर लुजैन हथलोल यांना सोडण्यात आलेलं आहे. पाच वर्ष त्या परदेश वारी करू शकत नाही. शिवाय त्यांच्या घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध लादले आहेत.
अडीच वर्षानंतर लुजैन मुक्त झाल्या असल्या तरी त्यांच्या अनेक सहकारी अजूनही जेलमध्ये कैद आहेत. त्यांच्या सुटकेसाठी स्थानिक सरकारने अजूनही कुठलाही ठोस भूमिका घेतलेली नाही.
21व्या शतकात जगाची प्रगतीकडे झेप सुरू असताना सौदियन महिलांना मूलभूत हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे. कर्मठ पुरुषसत्ताक व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं आहे. महिला आणि पुरुष अशा ठळक भेदामुळे सौदीत महिलांचा विरोधी सूर जोर धरत आहे. काही अंशी महिलांना यश आलं आहे. पण अनेक बाबतीत अजूनही निर्बंध आहेत. त्यासाठी लुजैन अल हथलोल सारख्या अनेक महिला सघर्षरत झालेल्या दिसून येतात.
(सदरील लेख 23 फेब्रुवारी 2021च्या लोकमत सखीमध्ये प्रकाशित झालेला आहे.)
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com