पुण्यात कोविड१९ बाधितांचा दैनंदिन आकडा सरासरी २०० आहे. आगामी काळात अनलॉकमुळे तो वाढण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने सांगावं लागतंय की लॉकडाउनच्या तीन महिन्यातही लोकांनी शिस्त शिकली नाही. आज बाजारात बिफोर कोरोनासारखी परिस्थिती दिसली. भविष्यात धोके वाढणार हे नक्की.
मरीन ड्राइव्हचे फोटो धक्कादायक होते. उद्या शहराशहरात असं भीषण चित्र दिसेल. जी लोकं शहरं सोडून गावाकडे गेली व नियमबाह्य फिरत आहेत. त्यांनी आमंत्रित केलेलं संकट भयाण असेल.
मुंबई पुण्यात उपचाराअभावी पेशंटचे हाल सुरू आहेत. या शहरात पुरेसे मनुष्यबळ व संसाधने असून ही अवस्था आहे लातूर, बीड, परभणी, नांदेड सारख्या शहरात मनुष्यबळ तर सोडा आरोग्य व्यवस्थेच्या बेसिक सुविधा सुद्धा उपलब्ध नाही. अशा वेळी या महाभयंकर रोगराईच्या काळात पेशंट काय होईल ही कल्पनासुद्धा सहन होत नाही.
अंबाजोगाईत राजकीय प्रयत्नांमुळे काही वेटिलेंटर मिळवता आले. इतर छोट्या शहरातली मला माहिती नाही. थोडक्यात जगभरात वेटिलेंटरचा तुटवडा आहे, तिथं महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांत काय?
अंबाजोगाईतलं सरकारी हॉस्पिटल ग्रामीण भागातलं सर्वात मोठं मानलं जातं. तिथले प्रतिष्ठित डॉक्टर मुंबईला हलवले. कारण मु़ंबईला त्यांची अधिक गरज आहे. पण छोट्या शहराकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाहीये.
उदभवणाऱ्या संकटाचं भयाण रूपाचं सोलापूर उदाहरण म्हणून पाहता येईल. मध्यंतरी मुंबईच्या काही हॉस्पिटलची वेदनादायी दृश्य वायरल झाली होती. दुर्दैवाने ही अनास्था पाहून सुद्धा लोकांना संकटाची गंभीरता कळली नाही.
आज दिव्य मराठीने राज्यातील ३ हजार मृतांना श्रद्धांजली वाहत घटनेबद्दल गंभीर होण्याचा सूचना वजा इशारा दिला आहे. पण तीन महिने लॉकडाऊनमध्ये राहील सुद्धा आम्हाला त्याचे भान नाहीये.
आपली सुरक्षेची जबाबदारी आपणच घेतलेली बहीण साध्या गोष्टी पाळा स्वच्छतेची व नियमांची शिस्त बाळगा. काळाने पुण्यात भयानक भविष्य मांडून ठेवले.
ताजी आकडेवारी सांगते की, जगभरात भारत हा कोरोना संक्रमणात चौथ्या क्रमांकावर आलेला आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि इटली या देशातले मृतांचे आकडे धक्कादायक आहेत.
प्रसारमाध्यमातून जेवढं येतं त्यावरच त्याची भिषणता दिसून येत आहे. ब्राझीलनं आता मृतांचा आकडा सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या देशातही गुजरातसारखी काही राज्य अशी आहेत, जिथं संक्रमणाचा नेमका स्वरूप अजूनही कळलेलं नाही. त्यामुळे धोका हा मोठा आहे आपली काळजी आपणच या.
आताच्या ताज्या आकडेवारीनुसार जगात एकूण संक्रमणाची प्रकरणं ६९ लाख ५२ हज़ार झाली आहेत. त्यात मृत झालेली माणसं ४ लाखांपेक्षा अधिक आहेत.
अमेरिका सर्वाधिक प्रभावित देश झालाय. तिथं एकूण १ लाख ९ हज़ार माणसं आपल्या नातेवाईकांना व मित्रांना सोडून इहलोकात गेली आहेत.
फिजी नंतर न्युझीलँडनेही स्वतःला कोरोनामुक्त घोषित केलंय. शिवाय अजून काही देश आहेत ज्यांनी स्वतःला कोरोनाची लागण होऊ दिलेली नाही. म्हणजे त्यांनी नियम व पथ्यांची काटेकोरपणे पालन केले आहे. आपल्यालाही ते शक्य आहे. वेळ गेलेली नाहीये.
मस्जिदा, मंदिरं आणि अन्य प्रार्थनास्थळी गर्दी करू नका. बाजार व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळा. हे समजून चर्या की कोरोनानं आपली पाठ सोडलेली नाहीये. फक्त लोकांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने थोडीशी शिथिलता दिलीय. परिणाम विदारक आले तर ही तात्काळ मागे घेतली जाणार आहे...
काळजी घ्या. सुरक्षित राहा आणि अंतर ठेवून व्यवहार करा....

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com