घरात रिकामं असणं अस्वस्थ करतं. पीसी, मोबाइल आणि पुस्तकाशिवाय रिकामं राहणं कल्पनाच करवत नाही. हाती मोबाईल रुपी खेळणं आल्यापासून रात्र आणि दिवस कमी पडतोय. भरपूर वेळ हातातून निसटून जातो, त्याचं कधी मोजमापही होत नाही.
10 वर्षांपूर्वीचा काळ स्मृतिपटलावर गर्दी करतोय. त्यावेळी काय करायचो हे देखील आता आठवत नाही. कळू लागल्यापासून शिलाई मशिनवर होतो. कामाच्या व्यापात रिकामा वेळच मिळाला नाही.
आम्ही भावंडं शाळा सुटली, जेवण झालं की रात्री आठपर्यंत अब्बूच्या हाताखाली दुकानात असू. 1999ला घरात टीव्ही आला. मग रात्री बारापर्यंत एकतर टीव्ही किंवा हाती अभ्यासाचं किंवा अवांतर वाचनाचं एखादं पुस्तक असायचं. बाजी एम.ए. इतिहास करायच्या. त्यावेळी मुघल, फ्रेंच राज्यक्रांती, माओ, मार्क्सची जाडजूड पुस्तकं डोळ्याखालून जायची. लहान भाई हिंदी करायचा. त्यामुळे प्रेमचंद, महाश्वेतादेवी, ओमप्रकाश वाल्मिकी, ममता कालिया आदी लेखक रिकामा वेळच द्यायचे नाही. हा कित्ता गाव सोडुस्तर.
औरंगाबादलाही डिपार्टमेंट व बाकी वेळ वाचनातच गेला. कधी-कधी अंबा-अप्सरासाठी वेळ राखीव ठेवावा लागे. पुण्यात गप्पातच वेळेने बाजी मारली. डिपार्टमेंट सुटलं की हॉस्टेल. जेवणानंतर रात्री विद्यापीठाच्या थंडीत गप्पांचा फड रंगे. वाचन फारसं झालं नाही. मुंबईला बराचसा वेळ कॉर्पोरेटची महाली करण्यातच जायचा. त्यातून वेळ काढून कधी सी फेस, तर कधी मरीनला बसायचो. उरलेला वेळ लोकलच्या गर्दीत लोटायचा. रात्री अलारम्ची रिंग बाहेर पिकअपवाला आला असेल , याची आठवण करून द्यायची. कधी कोल्हापूरचा विनायक तर कधी मुगलसरायचा सिद्धू बिल्डिंगखाली पार्किंगमध्ये येऊन झोपी जायचा. कधी वाटायचं कंपनी झोपेवरही पहारा लावतेय की काय? पण बिचारे ड्रायव्हर कुठं हिंडावं म्हणून रात्री एकलाच बिल्डिंगकाली येऊन झोपायचे. तिथंही वेळ तसा मिळालाच नाही.
पुण्यात परतलो ते वेळेसाठी. इथं भरपूर वेळ मिळणार होता. वेळ सत्कर्मी लागेल म्हणून परतलो. वाचनात जुंपलो. वाचन, लिखाण व एडिटिंग. वेळच वेळ. पण वाचन फारसं होत नाही. आता कोरोनामुळे कामाशिवाय बराच वेळ मिळतो. रिकामं बसवत नाही. पीसी बंद झाला की मोबाइल. तो इरिटेड झाला कि पुस्तक. पण त्याशिवाय काय, अशी कल्पना होत नाही.
अम्मीला विचारलं तुम्ही अशावेळी काय करत होता. म्हणतात, गप्पा, नातेवाईकाचं उणं-दुणं, भांडी-कुंडीत वेळ निसटायचा. इथंही अम्मी दर दोन दिवसाला पाहुण्याचं उणं-दुणं काढत असतात. फजरनंतर घेतलेली हातातली तसबीर सकाळी अकरा-बाराला ऩाश्ता करताना रॅकवर जाते. बाकी वेळ रेडिओ ऐकण्यात जातो. पुन्हा दुपारनंतर बाजी वर येतात, अन् त्यांचं सुरू होतं असरपर्यंत. पुण्यातही त्यांचं रुटीन काही बदललं नाही. फरक एवढाच की इथं त्यांना फ्लॅटमध्ये बंदिस्त वाटतं.
अब्बू कॉलेज वयापासून व्यावसायिक पेटिंग व नंतर टेलरिंग. त्यांनाही रिकामा वेळ आयुष्यात लाभला नाही. आता मशिनचा कंटाळा आला की लोळतात किंवा झोपतात. दिवसभराच्या नमाजनंतर उरलेला वेळ समवयीन लोकांशी गप्पांत व उरलेला टीव्हीत जातो.
मला इकडं पुण्यात काही न करता रिकामं कसं बसावं, असा प्रश्न सतावत असतो. सतत कामात व्यस्त असतो. माझी अवस्था बघून सबीन वैतागते. म्हणते, “अब्बू कब खेलोंगे मेरे साथ?” पीसी बंद झाला की तिची नजर माझ्या कृतीवर असते.
मला तिच्या खेळण्यात तसा रस नसतो. त्यामुळे ती डॉमिनेट करते. “कितना लिखते अब्बू, ये काम बंद करो ना! तूम थक नही जाते क्या?” तिचे उच्चार आता स्पष्ट झालेत. येत्या जूनमध्ये तिला पाचवं लागेल. खेळायला वेळ काढा, असा तिचा अट्टहास असतो. खेळण्यातला पराभव तिला आवडत नाही. मग उगाच चेहऱ्यावर कृत्रिमता आणावी लागते. मग गुमान रमावं लागतं.
बाकी वेळी ती संडेची वाट पाहते. तिला हक्काचा बाप काही वेळासाठी मिळतो. मग चोरुन काढलेला वेळ पीसीत खपतो किंवा न्यूज फिडमध्ये वाया जातो. कधी कधी वाटते की मोबाईलरूपी ड्रॅगन वेळेसहित मलाही खाऊन टाकेल.
तसं पाहिलं मला वेळ अपुरा पडतो. बरीच कामं स्वतःवर लादून घेतलीत. काही गुडवीलची बोकांडी बसली. दिवस उगवतो पीसीवर तर दिवा मावळतो ही पीसीवर. सिनेमा व तत्सम मनोरंजनाला वेळच नसतो. कामाचा कंटाळा येत नाही. सिलाई मिशनवरही कामाचा कधी कंटाळा केला नाही. रात्री 2-3 वाजेपर्यंत मशिनची सुरू असायची. नदीम-श्रवण साथ करायचे. कधी वाटायचे त्यांची मधाळ गाणी ऐकण्यासाठीच काम करतोय की काय?
डोळे व पाठीचा विचार करून ठरवून पीसी बंद करतो. वाचन आनंदात व ऐहिक सुखात रमवतो ते एक बरं आहे. दुपारी बेगम म्हणाली, “समझो, तुम्हारे पास खूब पैसा आया तो क्या करोंगे?” म्हणालो, “जाडजूड व घ्यायची राहून गेलेली पुस्तकं घेईन व वाचत बसेन.” ती म्हणाली, “मी व सबीन कुठे असणार?” क्षणात दचकलो. हा विचारच केला नव्हता म्हणालो.
इंटरनेट, तंत्रज्ञान व मोबाइल नसलेल्या काळात वाढलो. पण अजूनही प्रश्न पडतो की तंत्रज्ञान विरहित काळात/भूतकाळात लोकं काय करत असतील? आता स्वप्न देखील यंत्रवत झालीय. कुणाल म्हणतो, “बक्कळ पैसा आला तर टर्कीला जाईल व अरबी मुजऱ्यावर पैसा उधळेल.” मला असा तुफानी विचार कधी सूचला नाही. हां, बालपणी पैसा व ऐशोआरामच्या रम्य स्वप्नात रमायचो. आता ते आठवून हसू येतं.
बरं मुद्दा रिकामा वेळ काढायचा कसा व तो घालवायचा असा होता! उत्तर सापडत नाही म्हणून पुस्तकं हाती घेतो. लॉकडाऊनने वेळ दिलाय. सोने पे सुहागा, आणखीन काय हवंय. आज तब्येत जराशी बरी नाहीये. सर्दी-पडसं नियमित आजार, पण जराशी शिंक आली की जीव धास्तावतो. वाटते कोरोना संक्रमित होऊ नये, म्हणजे मिळवलं. असो.
स्टे होम किती दिवस चालेल माहीत नाही. त्यात वाचत राहीन. बरीच पुस्तकं जमवून ठेवलीत. लिखाण व एडिटिंग जराशी थांबवेल, वाचणं महत्त्वाचं आहे. अभ्यास गरजेचा आहे. अभ्यासाशिवायही ललित व कथा संग्रह वाचेनच. वाटतं कुर्रतुल ऐन हैदर व इस्मत चुगताई कम्प्लिट करावा. काही कथा झाल्यात अनुवाद, अजून दहाएक आहेत. होतील.
फेसबुक वेळ कापतोय. तो बंद होत नाही. प्रतिक्रियावादी लिखाण वाचणे कधीचच सोडून दिलंय. पण वेळ कुठे जातो कळत नाही. मुद्दा रिकामा वेळ आहे. तो कुठे आहे? वेळेची किंमत आठवली, तसे हे विचार डोक्यावर आपटले. नुसतं न्यूज फिड चाळत राहाण्यापेक्षा टाइपिंग करमे बरे आहे. त्यातून आत्मशोध होतो. या निमित्तानं वर्तमानातून भूत व भविष्य काळात डोकावणं तरी होतं.
कलीम अजीम
Twitter@kalimajeem
मेल-

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com