बांगलादेशी महिलांच्या खासगी अधिकारांविरोधात सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आलंय. गेल्या आठवड्यात बांगलादेशाच्या सर्वोच्च कोर्टाने हा आदेश जारी केलाय. निकाहनाम्यातून ‘वर्जिन’ शब्द हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. बंगाली महिलांचं हे सर्वात मोठे यश मानलं जात आहे. एक शब्द हटवण्यासाठी त्यांना तब्बल ६० वर्षे संघर्ष करावा लागला आहे.
२५ ऑगस्ट, रविवार बांगलादेशी महिलांसाठी मुक्तीचा दिवस. यादिवशी पुरुषसत्ताकतेच्या जोखडातून सुटण्याची धडपड थोडीशी सैल झाली. मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर मुलींसाठी ‘कुमारी’ असा पर्याय निवडण्याची सक्ती होती. स्थानिक मुस्लिम विवाह कायद्यानुसार लग्न करताना ‘कबीननामा’च्या प्रमाणपत्रावर वधूला ‘कुमारी’, ‘विधवा’ किंवा ‘घटस्फोटित’ अशा तीनपैकी एका पर्यायाची निवड करावी लागे. कुमारी शब्द व्यक्तींच्या खासगी हक्कांचं उल्लंघन करतो, असा आरोप करत काही महिला संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला.
संयुक्त पाकिस्तानमध्ये एका विधेयकाद्वारे १९६१ साली विवाह नोंदणी कायद्यात स्त्रियांसाठी ‘कुमारी’ शब्द टाकण्यात आला होता. १९७१ला फाळणीनंतर बांग्लादेशात या शब्दावर आक्षेप नोंदवत तो काढून टाकण्याची मागणी सुरू झाली होती. १९७४च्या संशोधन विधेयकातून ही बाब दुर्लक्षित झाली. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०१४ला या लढ्याला संघटनात्मक स्वरूप आलं. ‘संशोधन विधेयकातील उपकलम ७ला’ आव्हान देत महिला संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करून वादग्रस्त शब्द हटविण्याची मागणी केली. १४ सप्टेंबर २०१४ला न्या. नईमा हैदर आणि न्या. मो. जहांगीर हुसेन यांनी याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत, उपकलम-७ वर सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचं आदेश दिलं होतं.
संबंधित याचिकेवर गेल्या काही दिवसापासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २५ ऑगस्टला (रविवारी) एक छोटा निर्णय देत कोर्टाने हा शब्द त्वरीत काढून टाकण्याचा आदेश दिलाय. न्या. नईमा हैदर यांनी आदेश देताना म्हटलं, “बांग्लादेशातील ‘कबीननाम्यात’ (मुस्लिम विवाह नोंदणी प्रमाणपत्र) असलेला हा शब्द महिलासाठी ‘अपमानास्पद’ आणि ‘भेदभाव’ करणारा आहे. प्रमाणपत्रातून ‘कुमारी’ हा शब्द काढून टाकला जाणं आवश्यक आहे.”
हा वादग्रस्त शब्द काढून त्याजागी ‘ओबिबाहिता’ (अविवाहित) बंगाली शब्द ठेवावा, असा आदेश कोर्टाने सरकारला दिल्याची माहिती डेप्युटी अॅटर्नी जनरलनी दिली आहे.
अल झजिराच्या वृत्तानुसार ‘बांगलादेश लिगल एड अँड सर्व्हिस ट्रस्ट’ व ‘बांगलादेश मोहिला परिषद’ या संस्थांनी वर्जिन (कुमारी) शब्दाला याचिकेद्वारे कोर्टात आव्हान दिलं होतं. याचिकाकर्त्या आयन नाहर सिद्दीकी यांनी निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्या म्हणतात, “आम्ही कुमारिका आहोत की नाहीत हे विचारणे त्या व्यक्तिच्या गोपनीयतेच्या अधिकारांच्या विरोधात आहे. या हक्कभंगाविरोधात आम्ही ही रिट याचिका दाखल केली होती. या निर्णयाने आम्हाला बळ दिलं असून भविष्यात आपण लढा देऊ शकतो आणि येणाऱ्या काळात महिलांसाठी अधिक बदल घडवू शकू असा विश्वास दिला आहे.”
ढाका ट्रिब्यून या बांगलादेशी वृतपत्राने निर्णयावर स्थानिकांच्या प्रतिक्रिया छापल्या आहेत. त्यात विवाह निबंधक अधिकारी म्हणतो, “मला लोकं नेहमी प्रश्न विचारायचे, पुरूषांना वर्जिनिटी लपवण्याचं स्वातंत्र्य आहे, मग महिलांना का नाही? आता मी अशा लोकांना म्हणू शकतो, ते स्वातंत्र्य आता तुमच्या हातात आहे.”
याच दैनिकात मिझानूर रहमान यांनी लेख लिहून कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत सरकारने हा शब्द रद्द करण्यासाठी इतका वेळ का लावला असं म्हटलं आहे.
‘कुमारी’ हा शब्द लग्न न झालेल्या अविवाहित मुलींसाठी वापरला जातो. त्याला बोलीभाषेतील शब्द वेगळा असला तरी लिखित भाषेसाठी हाच शब्द वापरण्याची प्रथा आजही भारतीय उपखंडात आढळते. पण बांगलादेशात पुरुषसत्ताक व्यवस्थेने या शाब्दिक गोंधळाचा ‘धक्कादायक’ अर्थ काढला. लग्न झालेलं नाही, अशा आशयासाठी हा शब्द फॉर्ममध्ये होता, मात्र याचा अर्थ 'वर्जिन आहात की नाही' असाही निघत. निकाहनाम्यात ‘कुमारी’ हा शब्द औपचारिक पद्धतीने आला होता, पण त्याला पुरुषांनी वर्जिनिटीशी जोडून बघितले. जो महिलांच्या ‘राईट टू प्रयव्हसी’चा भंग होता. या शब्दामुळे वैवाहिक नातेसंबधात कटुता आल्याचे निष्कर्ष काही संस्थानी काढले आहे. वेगवेगळ्या निरीक्षणानंतर या शब्दाविरोधात लढा सुरू झाला.
या शब्दाला कायदेशीर आव्हान दिसले गेले. विवाह कायद्यात दुरुस्ती करावी अशी याचिका पाच वर्षांपूर्वी दाखल करण्यात आली. कोर्टाने या संदर्भात अजून पूर्ण निर्णय अजून दिलेला नाहीये. हा आदेश निर्णयाचा एक तुकडा आहे. पूरण निर्णय ऑक्टोबरला येईल. ढाका ट्रिब्यूनने म्हटलंय, की, ऑक्टोबरच्या आदेशानंतर सरकारला १९७४च्या मुस्लिम वैवाहिक कायदे संशोधन विधेयकात बदल करावे लागतील.
निर्णय देताना कोर्टाने हेदेखील स्पष्ट केले आहे की, निकाहनाम्यात पुरुषांसाठी ‘अविवाहित’, ‘विधुर’ किंवा ‘घटस्फोटित’ असे पर्याय सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच कबीननाम्यात स्त्रियासाठी असलेले 'विधवा' आणि 'घटस्फोटित' हे दोन शब्द कायम राहतील, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
बांगलादेश हे जगातील तिसरं सर्वात मोठं मुस्लिमबहुल राष्ट्र आहे. त्याची लोकसंख्या १33 दशलक्ष आहे. १९९१ पासून दोन महिला पंतप्रधानांनी देशाचं नेतृत्व केलं. महिलांच्या हक्कांचा समृद्ध इतिहास असताना ‘कुमारी’ हा गैरअर्थ काढणारा शब्द त्या महिला पंतप्रधानाच्या नजरेतून सुटला कसा, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सीजनमध्ये 4 सप्टेंबर 2019ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com