सत्ता स्थापनेपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प बेधडक निर्णय आणि धोरणामुळे चर्चेत आहेत. वादग्रस्त विधाने, शेरेबाजी, विरोधकांवर
अत्यंत हीन दर्जाची टीका, बदलेले शरणार्थी व अप्रवासी कायदे, इत्यादींमुळे
ट्रम्प नेहमीच मीडियाकेंद्री असतात. स्वपक्षाच्या खासदारांनी विरोधात आघाडी उघडल्याने
ते अलीकडे चर्चेत आहेत. ट्रम्प यांच्याविरोधात प्रतिनीधी सभेत एक निषेध प्रस्ताव मंजूर
करण्यात आला. विरोधकच नाही तर सत्ताधारी खासदारांनी ट्रम्पविरोधात भूमिका घेतली आहे.
आपल्याच पक्षातून अशा प्रकारे ट्रम्पंचा विरोध प्रथमच
होतोय. नेमक्या प्रकरणाचा शोध घेतला असता अनेक बाबी पुढे आल्या. शरणार्थी संदर्भात
सरकारच्या अमानवी धोरणांवर टीका केल्याने ट्रम्पंनी विरोधी पक्षातील ४ महिला खासदारांना
अमेरिकेच्या शत्रू ठरवत त्य़ांना देश सोडून जाण्यास सांगितलंय. अलेक्झांड्रिया ओकासियो
कोरटेज, रशीदा तलीब,
इयाना प्रेस्ली आणि इल्हान ओमर या चारही
खासदार कृष्णवर्णीय आहेत, ज्यांना ट्रम्पनी अमेरिका सोडण्यास सांगितलं होतं.
या महिला सिनेटरनी ट्रम्प यांच्यावर वंशवादी शेरेबाजी
केल्याचा आरोप लावला आहे. इतकंच नाही तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ट्रम्पंवर वर्णभेद
पोसल्याचा ठपका ठेवलाय. त्या म्हणाल्या, “प्रशासनाच्या भ्रष्ट संस्कृतीपासून लक्ष वळविण्यासाठीचा
हा केविलवाणा प्रयत्न आहे. राष्ट्राध्यक्षांनी वादग्रस्त विधानापेक्षा हितकारी धोरणांकडे
लक्ष द्यावं. आरोग्य, हिंसाचाराला आळा घालावा, तसेच
त्यांनी मेक्सिको सीमेवरील स्थलांतरितांचे प्रश्न सोडवावित.”
या महिला खासदारांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील
एका शऱणार्थी शिबिराला भेट दिली होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत एका समितीसमोर शरणार्थींच्या
प्रश्नांवर प्रकाश टाकला होता. या परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचंही त्यांनी
संसदेला सांगितलं. या नंतर १४ जुलैला राष्ट्राध्यक्ष ट्रम्पंनी एकापोठापाठ चार ट्विट
करत या विरोधी पक्षातील महिला खासदारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. नेहमीच तक्रार करणाऱ्या
अमेरिकेच्या शत्रू असणाऱ्यांनी देश सोडून जिथून आला होता तिथे निघून जावं, अशी
शेरेबाजी केली. इतकंच नाही तर त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार वार्तामध्ये
याची पुनोरोक्ति केली. विषेश म्हणजे, त्यातील तीन महिला खासदार अमेरिकेत जन्मलेल्या आहेत
तर इल्हान ओमर सोमालियन निर्वासित आहेत.
या घटनेचे पडसाद जगभरातील मीडियात उमटले. अनेक राष्ट्रांनी
ट्रम्पंच्या टीकेचा समाचार घेतलाय. इंग्लंड व कॅनडाने ट्रम्पंच्या विधानाला निषेधार्य
म्हटलंय. आंतरराष्ट्रीय समुदायानेदेखील ट्रम्पंच्या वक्तव्याचा निषेध केलाय. संबधित
प्रकरण अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत गाजलं. १६ जुलैला अमेरिकी संसदेत ट्रम्प यांना विरोधकांनी
चांगलंच घेरलं. सभापती नॅन्सी पैलोसी यांनी ट्रम्पंच्या या शेरेबाजीला अपमानकारक म्हटलं.
असं अभोनीय कृत्य व्हाईट हाऊसमधून घडत आहे,
हे दुर्दैवी आहे, असंही
त्यांनी म्हटलं.
अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांचा ट्रम्प कायम
द्वेष करतात. त्यामुळे ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांच्याविरोधात
महाभियोग चालवावा अशी मागणीही डेमोक्रॅटिक खासदारांनी केलीय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पविरोधातला
हा निषेध प्रस्ताव २४० मतांनी मंजूर झाला. इतकेच नाही तर सत्ताधारी पक्षातील ४ रिपब्लिकन
सिनेटरनीदेखील ट्रम्पविरोधात मते दिली. ब्रेयन फिट्जपॅट्रिक, (पेनसिल्वेनिया)
फ्रेड अपॉन (मिशिगन), विल हर्ड (टेक्सॉस), सुसन
ब्रुक्स (इंडियाना) अशी या सत्ताधारी खासदारांची नावे आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्णभेदाच्या आरोपाचे खंडन
केलंय. मुळात, ट्रम्प हे उजव्या व प्रतिगामी विचारसरणीचे म्हणून
ओळखले जातात. आपल्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात त्यांनी मेक्सिकन निर्वासितांविरोधात
अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. हफ्गिंटन पोस्टच्या मते ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान
केलेल्या विधानामुळे कृष्णवर्णीयांविरोधात तब्बल ९०० वर्णवादी हल्ले झाले.
सत्तास्थापनेच्या वर्षभरात निर्वासित अमेरिकनांवर
२८ वर्णद्वेशी हल्ले झाले होते. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेत वंशवाद वाढल्याचे
अनेक रिपोर्ट्स आहेत. दि वांशिग्टन पोस्टने तर ट्रम्पंना ‘रेसिस्ट
प्रेसिडेंट’ म्हटलंय. व्हाईस ऑफ अमेरिका या मीडिया संस्थेच्या
मते सत्ताबदलाच्या या तीन वर्षांत ज्यू वंशीय,
मुस्लिम, आफ्रिकी कृष्णवर्णीय आणि एलजीबीटी समुदायांवर
वर्णद्वेशी हल्ले वाढले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील अमेरिका व युरोपीय राष्ट्रात
वाढणाऱ्या हेट क्राईमवर चिंता व्यक्त केली आहे.
सत्ताधारी पक्षात देखील ट्रम्पंच्या वादग्रस्त धोरणांबद्दल
रोष व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतील ५३ सदस्यांनी ट्रम्पविरोधातील निषेध प्रस्तावाला
मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की ट्रम्पंना आपल्या नितीतत्त्वात बदल करावा लागणार
लागेल.
(संबंधित लेख लोकमतच्या २५ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे)
कलीम अजीम,
पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com