जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या बहुचर्चित विधेयकावर कैलिफोर्नियाचे गव्हर्नर गैविन न्यूसम यांनी हस्ताक्षर केले. अशा प्रकारचा कायदा करणारे कैलिफोर्निया अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. १ जानेवारी २०२० पासून ‘क्राउन अॅक्ट’ म्हणजे 'क्रिएट अ रिस्पेक्टफुल अँड ओपन वर्कप्लेस फॉर नेचुरल हेयर' कायदा राज्यभर लागू होणार आहे.
अमरिकी-अफ्रिकी लोकांचा रंग कृष्णवर्णीय (ब्लॅक) असतो. त्यांची शरिरयष्टी धिप्पाड व उंच असते. मुली कमी उंचीच्या असतात. अफ्रिकी लोकांचे केस कुरुळे, अस्तव्यस्त व गुंतलेले असतात. अफ्रिकी लोकांना त्यांच्या दिसण्यावरून श्वेतवंशीय (गोऱ्या) लोकांकडून भेदभावाचे वर्तन केलं जातं. श्वेतवंशीयाकडून त्यांच्यावर वर्णद्वेशी जीवहल्ले केले जातात. अशा घटनांमुळे आत्तापर्यंत लाखो अमेरिकी-अफ्रिकींना आपला जीव गमवावा लागला आहे.
केसांच्या या नैसर्गिक रचनेमुळे दररोज अनेक मुली व महिलांना अमेरिकेत भेदभावाचा सामना करावा लागतो. शाळेत बालकांसोबतही त्यांच्या केसांमुळे दुजाभावाची वागणूक मिळते. काळ्या रंगामुळे सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी, कंपन्या, कारखाने इत्यादी जागी वंस-वर्णभेद केला जातो. कृष्णवर्णीय लोकांना घरे नाकारण्यापर्यत मजल गेली आहे. प्रांतीय सरकारकडे येणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता क्राउन अॅक्ट’चा फास आवळण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत वर्णभेदाच्या घटना बहुसंख्येने घडत आहेत. केवळ अफ्रिकीच नाही तर भारतीयदेखील अशा प्रकारच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. वर्ण, वंश, रंग, वेशभूषा इत्यादी कारणावरून कृष्णवर्णीय लोकांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी न्यू जर्सीमध्ये गोऱ्या रेफरीने एका कुस्तीपटूला त्याचे लांब केस कापायला लावले होते. खेळाडूचे केस कात्रीने कापतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. परिणामी जगभरात अमेरिकेची टीका केली गेली. ही घटना ‘क्राउन अॅक्ट’ मंजूर करण्यासंदर्भात पुरेशी ठरली.
लॉस एंजिल्सच्या डेमोक्रेट सीनेटर होली मिशेल यांनी हे विधेयक विधिमंडळात सादर केलं. त्यांचे केसही कुरुळे आहेत. कायदा पारित झाल्यानंतर त्या म्हणाल्या, “हा मुद्दा आत्मसन्मान आणि खासगी हक्कांचा आहे. सदरील विधेयकामुळे कार्यस्थळी, शाळा व कॉलेजमध्ये वर्णद्वेषी हेट क्राईमच्या रोखणे शक्य होईल. संबधित विधेयक त्या संस्थाना चपराक ठरू शकते, जे अशा दावा करतात की आमच्याकडे वांशिक व वर्णीय भेदभाव होत नाही. परंतु कृष्णवर्णीय लोकांशी ते असभ्य व असमान वर्तन करतात.”
अमेरिकेत ‘ब्लॅक विरुद्ध व्हाईट’ हा संघर्ष तसा फार जुना आहे. वसाहतवादी काळापासून म्हणजे सतराव्या शतकात अफ्रिकी लोकांना अमेरिकेत आणून त्यांना गुलाम केलं जात होतं. दोनशे वर्षे अफ्रिकनांची खरेदी-विक्री सुरू होती. एकोणिसाव्या शतकात गुलामगिरी प्रथेविरोधात बंड केलं गेलं. १८६१मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झाले. यातून कृष्णवर्णीय नेतृत्व अब्राहम लिंकन यांच्या उद्य झाला. लिंकन राष्ट्रपती झाल्यानंतर १८६५ साली दास प्रथा संपुष्टात आली.
लिंकनच्या काळापासून अफ्रिकी लोकांविरोधात वर्णद्वेशी हल्ल्यांना व भेदभावाला रोखण्यासाठी अनेक कायदे केले गेले. हळूहळू करत अफ्रिकनांना त्यांचे हक्क प्रदान करण्यात आले. रंग, रूप, प्रकृतीविरुद्धच्या शेरेबाजीविरोधातील असंख्य मानवी हक्क कायदे अस्तित्वात आहेत. परंतु वांशिक भेदभाव व जातीयतेचे पूर्णपणे उच्चाटन होऊ शकलं नाही. विसावे शतक येता कृष्णवर्णीयांचे प्रश्न बिकट बनत गेले.
बराक ओबामांच्या काळात संशोधन करून वर्णद्वेशाविरोधातील कायदे आणखी कडक करण्यात आले. वर्णद्वेशी भेदभावाविरोधात मानवी अधिकार संघटनानी अनेक दिशानिर्देश जारी केलं होतं. इतकं करूनही वांशिक हल्ल्यावर अमेरिकी सरकार कुठलेच अंकुश लावू शकलं नाही. यावर संतप्त प्रतिक्रिया देत ओबामांनी एकदा म्हटलं होतं की, ‘अमेरिकनांच्या डीएनएमध्ये जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था आहे.’
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात वर्णद्वेषाच्या घटना घडणे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. मीडिया रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत वर्णभेदी हल्ल्याच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मिळते. फैडरल ब्यूरो ऑफ इंवेस्टिगेशनच्य़ा एका अहवालानुसार वर्षे २०१६ आणि २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये हेट क्राईमच्या घटनेत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झालीय. २०१७ची आकडेवारी पाहिली तर वर्षभरात ७ हजार १७५ धार्मिक, वर्णीय भेदभावाचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यात ८ हजार ४९३ लोक प्रभावित झाली. नॅशनल क्राइम विक्टिमाइजेशनच्या सर्वेनुसार २००५ ते २०१५ मध्ये अडीच लाख प्रकरणे दाखल झाली आहेत.
सदरील गुन्हे कायदा अस्तित्वात असताना घडले आहेत, म्हणजे सर्व कायदे कुचकामी ठरले आहेत. वास्तविक, अमेरिकनांच्या नेणिवेत वंश व वर्ण बसला असल्याने असे गुन्हे घडत आहेत. अमेरिका स्वतला महासत्ता म्हणून घेते, पण वर्णभेदी गैरकृत्यामुळे त्याची प्रतिमा जगभरात मलीन होत आहे. त्यामुळे महासत्ता म्हणून जगावर अधिराज्य गाजवण्यापूर्वी अमेरिकेने सामाजिक सुधारणाकडे भर द्यावा.
(हा लेख लोकमतच्या ऑक्सीजनमध्ये 18 जुलै 2019ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com