मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोशल मीडियावर एक अफगाण महिला आपल्या लहान बाळाला घेवून परीक्षा देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. जहांताब अहमदी असं या 25 वर्षीय महिलेचं नाव होतं. अहमदीच्या जिद्दीचे जगभरातून केलं जात आहे. या महिलेच्या धाडसाला जगभरातून लाखों जणांनी सलाम केला आहे. सीसीएनने या संदर्भात दिलेल्या एका बातमीत म्हटलं आहे की जहांताब अहमदीच्या शिक्षणाच्या जिद्दीमुळे अनेक अफगाण महिलांना प्रेरणा मिळू शकेल. तर बीबीसीने अहमदीला मिळालेल्या कौतुकावर विषेश स्टोरी प्रसारित केली आहे.
19 मार्चला अफगाणिस्तानच्या एका इंस्टिट्यूटमध्ये वार्षिक परीक्षा सुरु होत्या. ही परीक्षा देण्यासाठी जहांताब अहमदी आपल्या 2 महिन्याच्या बाळाला निली शहरात आली होती. मोकळ्या मैदानात होणाऱ्या या परीक्षेला कंकोर परीक्षा म्हटलं जातं. परीक्षा सुरू होताच काही वेळातच तिचं बाळ उन्हाच्या तीव्रतेने रडू लागलं.
बाळाच्या रडण्याने इतर परीक्षार्थींना त्रास होत होता. अहमदीला भीती वाटली की एग्झामीनर तिला बाहेर जायला सांगेन, त्यामुळे ती खुर्चीच्या आडोशाच्या सावलीत बसून बाळाला स्तनपान करत पेपर लिहू लागली. हा क्षण पाहून तिथल्या एग्झामीनर याहया इरफानला भरून आलं. त्याने चोरुन अहमदीचा फोटे काढले व एका कॅप्शनसह आपल्या फेसबुक अकाऊंटला पोस्ट केले. भीतीपोटी काही वेळातच याहयाने हे फोटो डिलीट केले. पण फोटो तेवढ्या वेळात व्हायरल झाले होते.
हेच फोटो शहजाद अकबर नावाच्या एका मुलीने ट्वीट केला. बघता-बघता साडे तीन हजार ट्विटर यूजर्सनी हे फोटो रीट्वीट केले. दिवसभरात जहांताब अहमदीचा हे फोटो जगभरात पोहचले होते. 20, 21 आणि 22 मार्चला जगातील सर्वच प्रतिष्ठीत मीडिया संस्थानी अहमदीच्या व्हायरल फोटोची बातमी प्रकाशित केली.
सीसीएनने 20 मार्चला फोटो काढणाऱ्या एग्झामीनर याहया इरफान याची प्रतिक्रीया प्रकाशित केली आहे. यात याहया म्हणतो, ‘तो फारच शानदार क्षण होता, सर्वच परीक्षार्थी तिचं कोतुक करत होते. मी स्वत:ला फोटो काढण्यापासून रोखू शकलो नाही. याच कौतुकापोटी मी फोटो पोस्ट केले, पण या महिलेच्या कुटुंबीयांच्या भीतीमुऴे लागलीच डिलीट करून टाकले. तिच्या या जिद्दीला मी त्याचक्षणी सलाम केला’
बीबीसीने 12 एप्रिलच्या ‘दुनिया’ या विषेश बातमीपत्रात जहांताब अहमदीवर एक विषेश स्टोरी प्रसारित केली. बीबीसीने जहांताब अहमदीच्या शिक्षणाच्या साहसाचे कौतुक केलं आहे. या बातमीपत्रात तिला मिळालेल्या पुरस्कार व कौतुकाची लीस्ट वाचून दाखवण्यात आली. तिची शिक्षणाची जिद्द पाहून काबूल विद्यापीठाने अर्थशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी अहमदीला निमंत्रित केले आहे.
तसंच एका अफगाणच्या महिला मंत्र्यांनी तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आहे. इतकंच नव्हे तर अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींकडून तिला वर्षभर काबूल शहरात विना भाड्याचा फ्लॅट देण्यात येणार आहे. या घोषणेनंतर तिनं बीबीसीला खूप भावनिक प्रतिक्रीया दिली. त्यात कती म्हणते, ‘मला शिकण्याची खूप हौस होती, पण लग्नानंतर शिक्षण माझं सुटलं, भविष्यात याची रुखरुख वाटून नये म्हणून मी पुनहा शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे’
जहांताब अहमदीवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तिने सर्वांचे आभार मानले आहेत. विशेष करून सोशल मीडिया यूजर्सचे तिने अभिनंदन केलं आहे.
जहांताब अहमदी एक गरीब कुटुंबातील गृहिणी महिला आहे, तिला तीन मुलं आहेत. शिक्षणाच्या वेडापायी ती आपल्या गावांपासून तब्बल 700 किलोमीटर लांब परीक्षा देण्यासाठी एकटीच आली होती. तिनं शिक्षणानंतर आपल्या गावातील महिलांसाठी पूर्णवेळ काम करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.
तिचं म्हणणे आहे की गावातील महिलांना शिक्षणाची कुठलीच साधने नाहीत, त्यामुळे त्या शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना शिक्षित करणे माझं कर्तव्य आहे. अहमदीला वाटतं की तिच्या गावातील महिलांनी काबूलसारख्या महिलाप्रमाणे बाहेर जाऊन कामं करावी. अहमदीच्या या जिद्दीमुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळो हीच अपेक्षा..
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 23 एप्रिल 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com