साहित्याचे भामटे कॉपीपेस्टर

ISBN नंबरसाठी शोधनिबंध प्रकाशित करणारे भामटे विद्यापीठीय अध्यापनकाळात बरीच भेटत असत. मी कधी त्यांना तुकडा टाकला नाही.  एमफील करणारे किंवा तुलनात्मक अभ्यास नामक पीएचडी करणारे अनेक महाभाग अशा प्रकारचे कथित इंटरनॅशनल 'रिसर्च जर्नल' काढत असतात. 
बोले तो भिडू ही लोकं आपल्या बेरोजगारीचा मोबदला निष्पाप विद्यार्थ्यांकडून वसुल करीत असतात. अशा प्रकारचे सो कॉल्ड रिसर्च पेपर संकलित करून प्रत्येकी तीन ते चार हजार रुपये रग्गड कमाई करणारे जसे बामूत पाहिले तसेच यूओपी आणि मुंबई विद्यापीठातदेखील आढळले. 
पीएचडी किंवा नेट-सेटधारक भाऊ लोकांचे वीसएक लेख जमा करायचे आणि त्याचे पुस्तक रूपात संकलन करायचे असा हा धंदा असतो. 
हे पुस्तक किंवा कथित इंटरनॅशनल रिसर्च जर्नल इंटरव्यूच्यावेळी उपयोगी पडतो म्हणे. या आमिषाला बळी पडून अनेकजण रुपये पाच हजारापर्यंत खर्च करण्याची तयारी ठेवतात. 
सदर संकलक २० लेखकांसाठी वीसच कॉपी काढतो. प्रत्येकी वाटून टाकल्यानंतर त्यांची प्रिटिंग कॉस्ट जाऊन लाखभरापर्यंत शुद्ध कमाई होते. ही कमाई बघता हा धंदा सदैव तेजीतच असतो. संशोधकही ISBNची खात्री करीत नाही. मुळात हजार रुपये टाकल्यास ऑनलाईन ISBN नंबर ढिगाने मिळतात.
असे गंडलेले संशोधक विद्याथी ते संकलन आपल्या जिगरी यारलासुद्धा दाखवत नाही, पण रेझ्युमेवर मात्र १०-१५ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रेजेट्स केले म्हणून शेखी मिरवतो. (मुळात इंटरव्यू वेळी तोही हे संकलन आपल्या बोचक्यातून बाहेर काढत नाहीत, कारण ते आपलेच आहेत व आपणच लिहिले/ढापले आहेत, म्हणण्याइतपत आत्मविश्वास त्यांच्याकडे नसतो.) 
अपून को भी ऐसे लोकं भेटलीत. माझे मासिकातले दीर्घ लेख वाचून अनेकांनी मला गंडवण्याचा प्रयत्न केला. पण मी खमक्या होतो. कारण त्यांच्या ब्लॅक प्रॅक्टीसच्या उडानटप्पू कारवाईची भांडणे दोन्ही विद्यापीठात बघितली होती.
गेल्या आठवड्यात शहाजिंदे सरांना भेटायला सोलापुरला गेलो होतो. गप्पानंतर ते एका कार्यक्रमासाठी घेऊन गेले. तिथं एका साहित्यिक विषयावर मार्चएण्डी राष्ट्रीय परिसंवाद सुरू होता. त्या कार्यक्रमाचे शहाजिंदे अध्यक्ष होते. तिथे कुणीतरी शोधनिबंधाचे एक संकलन माझ्या हाती दिलं. मी ते न वाचता सॅकमध्ये टाकलं. पुण्याकडे निघताना रेल्वेत बसून सहज चाळलं. हे तीनशे पानी पुस्तक चक्क प्लेज्जारिजमची (कॉपी पेस्ट) क्रोनोलॉजी होती. 

रद्दीत टाकून देण्याआधी सहज नजर फिरवावी वाटलं. पाने उलटून बघतो तोच माझी नजर एका लेखावर खिळली. या कथित रिसर्च पेपर दिसला. आपण वाचलेली व लिहिलेली भाषा अपून याददाश्त जाने के बाद भी पड सकता हैं. हा लेख (पेपर) विकिपीडियाचा मीच तयार केलेल्या एका पानाची कार्बन कॉपी होती. संशोधक प्राध्यापक महाशयांनी वीकिपीडियाचा लेख थेटच उचलून रिसर्च पेपर म्हणून पेस्ट केला होता. त्या लेखाची कॉपी इथं देतोय. त्यासोबत वीकीचीदेखील JPEG व लिंक (https://goo.gl/m9kcYW) देतोय. विकीपीडियासारख्या दुय्यम संदर्भ साधनांना महत्त्व अशीच जमात देते. त्यातून फेसबुकी विचारवंत निपजतात.
जी भविष्यात कथित विचारवंत म्हणून मरवणारे असतात. संबधित रिसर्च पेपरवर उल्लेखित मजकूरावर हे महाशय पुणे विद्यापीठात मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. तसेच या मजकूरातून ते प्रवरानगर स्थित एका महाविद्यालयाचे प्राध्यापक दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या युगात लिखित मजकूराची चोरी काही नवीन नाही. पण केवळ इन्क्रिमेंट वाढवण्यासाठी अशा प्रकारची भामटेगिरी करणे प्राध्यापकीला शोधून दिखाता क्या रे.
सदर (रिसर्च) पेपरमध्ये चार-दोन शब्दांचा बदल सोडला तर ९९ टक्के मजकूर आहे तसा चिकटवला आहे. 
बोले तो भाई अब क्या कहे.
इसलिए कहेता हूँ असा भामट्यांच्या नादी लागू नका, तुमच्यात गुणवत्ता व डेअरिंग असेल तर असा छाटू-फाटूर रिसर्च पेपरची तुम्हाला गरजच पडणार नाही. दुसरा बोले तो, जब भी रिसर्च पेपर कराल, त्यावेळी तो उत्तमच असला पाहिजे, अशी खुणगाठ मनाशी बाळगा.





(2)
लेखक-साहित्यिक म्हणवणाऱ्यांचा बेगडीपणा
अजित अभंगच्या पुस्तकाच्या वादावर चर्चा सुरूय. मलाही अगदी असेच दोन अनुभव आले.
पुण्यातल्या एका समाजवाद्याला एका मासिकातले विशिष्ट विषयावरील निवडक लेख जमा करून त्याचे पुस्तक करायचेचर्चेतून कळालं की, सदरील लेखकांची परवानगीदेखील मलाच मिळवायची आहे. ​तसेच लेखावर संपादन​प्र​क्रिया​देखील​ ​मलाच ​पार पाडायची आहे. पण पुस्तकावर ते ​महाशय ​आपले नाव टाकणार होते. ​माझ्या मानधन व क्रेडिटबद्दल ते काहीच बोलले नाही. कदाचित त्यांना गुडवीलमध्ये काम करून घ्यायचे असावे. ​ब​ररर​रं म्हणून मी बाहेर पडलो. 
पुढची भेट मी टाळली.
असंच एका अपघाती भेटीत ते महाशय​ ब​घुया, वेळ कसा काढता येईल! ​कामात रस दिसत नसल्याचे सांगत ते मला सुनावत राहिले. ​त्यांना पुस्तक काढण्याची इतकी घाई झाली होती की​आपण​ ​धुंदीत का​य बोलताय याचाही विसर पडला होता. त्यावेळी मी ​त्यांना ​खूप काही सुनावणार होतो. पण गप्प झालो. श्रेयाचं बाशींग पाहून मी ​सपेशल ​माघार घेतली.​ नंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले की लांब झाई. वाटलं म्हाताऱ्याला कसाला दुखवायचं. न बोललेलंच बरं.​
दरम्यानच्या काळात मी 'सामाजिक सौहार्द'वर एक पुस्तक संपादनसाठी घेतलं. हे पुस्तक गुरूवर्य प्रा. बेन्नूर यांच्या
​प्रकाशकाला ही बाब कळताच ते म्हणाले
प्रा. रणसुभे राष्ट्रीय स्तरावरचे प्रसिद्ध समीक्षक आहेतदरम्यानच्या काळात प्रा बेन्नूर सर निवर्तले. पण कामात खंड पडू दिला नाही. संपादनाचे काम सुरूच होते. मी व सरफराज संपादनाच्या कामात व्यस्त होतो. 
प्रस्तावनेसाठी मी रणसुभेंना सांगितलं त्यांनी नकार देत म्हणालेतुम्ही संपादन करताय प्रस्तावनादेखील तुमचीच असावी. मी म्हणालोसर.. सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. तुम्ही लिहून द्या. त्यांनी प्रस्तावनेत सदर बाबींचा सविस्तर उल्लेख केलेला आहे. शेवटी प्रकाशकाच्या आग्रहाखातर मीदेखील एक मनोगत लिहिलं. पण ते औपचारिक स्वरूपाचेच ठेवले,
प्रकाशकांनी मला विचारूनच बाकी कायदेशीर सोपस्कार केले. अलताफ भाईंनी तीनएक फायनल कव्हर पेज करून थेट प्रकाशकाला पाठविली. मी सीसीत होतो. प्रिटिंगचं काम सुरू झालेले होतं. एका छोट्याशा करेक्शनसाठी मी आठवडाभरानंतर कव्हरची फाईल उघडली. कव्हर पेजवर मला, सरफराज व रणसुभे सरांना मुख्य संपादक म्हणून ठेवण्यात आलेलं होतं. मला ते योग्य वाटले नाही. आतमध्ये असलेली आमच्या दोघांची नावं बाहेर आली होती. सॅम्पल फाईल थेट प्रिंटरकडे गेली होती. मी लागलीच प्रिंटरला फोन करून काम थांबवलं. तासाभरात नवीन कव्हर आलं तसं फॉरवर्ड करत प्रिटिंग सुरू करा म्हणालो. हा संवाद माझा व प्रिंटरचाच होता. प्रकाशकाला ही बाब काहीच माहिती नव्हती. दोन दिवसानंतर सॅम्पल कॉपी प्रकाशकाच्या हाती पडली. त्यांनी एकच नाव पाहून मला फोन केला. होयमीच केलं म्हणून त्यांना सांगितलं. ते म्हणाले आम्हाला वाटलं तुमचे नाव असावंत्यामुळे आम्हीच ती फाईल तुम्हाला वन कळविता प्रिंटरकडे पाठविली होती.
माझ्याकडे पहिल्या फाईलशिवाय दुसरे कव्हर नव्हते. या सॅम्पल फाईलमध्ये मी व सरफराज संपादक होतो. नवे कव्हर येण्यास उशीर झाल्याने मी अखेर तेच कव्हर फेसबुकला प्रकाशनाचे निमंत्रण देत टाकले.
रणसुभे सरांनी आणि प्रकाशकांनीदेखील आमचे नाव संपादनावर असावे असा आग्रह वारंवार धरला. पण आम्ही तो वेळोवेळी मोडून काढला. आम्ही हे ठरवून केलेलं होतं. आमचा आदर व प्रेमभाव त्यामागे दडलेला होता. पण अजितचा प्रसंग पाहून धक्का बसला. नावाचे श्रेय लाटणारे किती क्रूरपणे तरुणांना वापरतात याचाही राग आला. मी बेसावध कधीही नव्हतोपण आता सावधानतेची पुन्हा दक्षता घ्यावी लागेल.
दुसरा अनुभव महाशय म्हणालेअरे चांगली कल्पना आहे आपण दोघे मिळून करूया की, मी त्याविषयावर असी मांडणी केलेली आहे. मी ह्यो.. मी त्योह... मी सावधतेने फोन कट केला व नवे संकलन थंडे बस्ते में डाल दिया..

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,50,इस्लाम,41,किताब,26,जगभर,131,पत्रव्यवहार,4,राजनीति,307,व्यक्ती,25,संकलन,65,समाज,267,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: साहित्याचे भामटे कॉपीपेस्टर
साहित्याचे भामटे कॉपीपेस्टर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8-pagFS3B38mRE4XkhY4fbToarTleEJG2UiJWuIBYT2zsTc1_XtUFbXMjHIFAr-XlziQvRqMiipv2nM9H5MmoYDrNGseJAfy-sl1TYWPKf2XeVTV7b_koytAesyS3w3ijQGLmeEBIRYSp/s640/New+Doc+2019-03-16+08.39.40_1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8-pagFS3B38mRE4XkhY4fbToarTleEJG2UiJWuIBYT2zsTc1_XtUFbXMjHIFAr-XlziQvRqMiipv2nM9H5MmoYDrNGseJAfy-sl1TYWPKf2XeVTV7b_koytAesyS3w3ijQGLmeEBIRYSp/s72-c/New+Doc+2019-03-16+08.39.40_1.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/03/blog-post_19.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/03/blog-post_19.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content