बौद्धिक मैफली मुसलमानात का नाहीत?



पुण्यात रविवारी २० जानेवारीला सामाजिक समतेचा प्रवाहया प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. गाजियोद्दीन रिसर्च सेंटर व द युनिक फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी केंद्रिय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्य मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी दि वायरच्या सिनियर एडिटर आरफा खानम शेरवानी प्रमुख पाहुण्या होत्या. तर अध्यक्षस्थानी अमरावतीचे माजी पोलीस उपायुक्त सुलतान शेख होते. प्रकाशन सोहळ्यानंतर आरफा खानम यांचे सामाजिक सौहार्द आणि त्याचे मानंबिंदूया विषयावर विषेश व्याख्यान झाले.
दलित समुदायासारखा मुस्लिम समाज घटनात्मक अधिकाराला घेऊन सजग नाहीत. सच्चर समितीने हे स्पष्ट करून दाखवलं आहे की, दलितांपेक्षा अधिक मागास मुस्लिम आहेत, पण आज आपल्या घटनात्मक अधिकारासाठी जो प्रयत्न दलित समाज करतोय तो प्रयत्न मुसलमानांकडून होताना दिसत नाही. घटनात्मक अधिकारांचे महत्व समजून घेण्यासाठी दलितासारख्या बौद्धिक मैफली मुसलमानांकडून तयार करण्याची गरज आहे. असे जर झाले तर येत्या वीस वर्षांत मुसलमानांची सामजिक व आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत दि वायरच्या वरीष्ठ संपादिका आरफा खानम शेरवानी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचा वृत्तांत नजरिया वाचकांसाठी देत आहोत.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता येणे, ही धर्मनिरपेक्ष विचारांच्या लोकांसाठी जणू इष्टापत्ती ठरली आहे. स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांच्या काळात जोपासलेल्या मूल्यांचे काय झाले? या काळात आपण नेमके काय केले होते? महत्त्वाचे काय हरवलले आहे? याची शोधाशोध सुरू आहे. त्यामुळे आपल्याला आपले मूळचे सापडणे शक्य होणार आहे. यामुळे ही जणू इष्टापत्ती आहे. आरफा खानम यांनी देशातली सद्यस्थितीकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, सत्ता टिकवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी धडपडणारे असे दोन पक्ष आहेत. मात्र, दोन्ही बाजूने भारतीय संस्कृती दिसून येत नाही. अनेकविध परंपरा, संस्कृतीने नटलेल्या देशात एकमेकांविषयी कधी आकस नव्हता. मात्र, सध्या एकारलेपणाचा सांस्कृतिक साम्राज्यवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. देश अतिशय नाजूक वळणावर आहे. योग्य दिशा धरली तर चांगली प्रगती शक्य आहे. मात्र, वळण चुकले तर भरून न निघणारे असे अपरिमित नुकसान होईल, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाजपच्या मुस्लिमद्वेषावरदेखील आरफा खानम यांनी हल्ला चढविला, त्या म्हणाल्या, ‘भाजप आणि आरएसएसची लोकं मुसलमानांना वेगळं पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेच प्रयत्न मुसलमानांतील कट्टरपंथीयांकडून केली जात आहेत. त्यांना वाटते की भारतातील मुसलमानांची संस्कृती सौदी अरेबियासारखी असावी. या दोन्ही वृत्ती सांस्कृतिक वर्चस्ववादाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना वेगेवगळ्या संस्कृतीला एकसारखे बनवायचे आहे. आमचा प्रयत्न त्या दोन शक्तीशी मुकाबला करून त्यांचा पराभव करायचा आहे.
देशात सुरु असलेल्या दार्मिक उन्मादावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘माझ्या भारतात नमाज अदा करणाऱ्याला बघून कोणी भीत नाही, तर नमाजसाठी त्याला आपली जागा सोडतो, वुजू करण्यासाठी पाणी दिलं जातं. जिथं नमाजसाठी एक पंडित मुसलमानांपुढे आपला गमछा अंथरतो, मी अशा देशातून आहे. मला माहीत नाही की या लोकांना कोणता देश बनवायचा आहे. जिथं दाढी-टोपीला बघून लोकं भयभीत होतात. जिथं कपाळावरच्या टिळा पाहून लोकं दहशतीत जातात, असा माझा देश असू शकत नाही
प्रा. बेन्नूर यांच्याबद्दल ते म्हणाले की, ‘प्रा. बेन्नूर यांच्याबद्दल नेहमी सांगितलं जातं की, त्यांना राष्ट्रीय ओळख मिळू शकली नाही, त्यांना देशपातळीवर नाव मिळू शकलं नाही, माझं म्हणणे आहे की, ‘एक सूरज से अच्छा हैं की, छोटे छोटे चराग हर जगह जला दिए जाए.प्रा. बेन्नूर अशा पद्धतीचे एक छोटा दिवा होते, जे हयातभर स्थानिक पातळीवर असलेल्या अंधाराला संपवण्याचा प्रयत्न करीत राहीले. त्या व्यक्तीचा प्रभाव इतका आहे की, ते निघून गेल्यावर आज आपण त्यांच्या वैचारिक वारसा समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
खानम पुढे म्हणतात, ‘जे लोक बुद्धिजीवी असतात, ज्या लोकांकडे एक विशिष्ट प्रकारची दूरदृष्टी असते, अशी लोकं काळाच्या पुढे असतात. ही वेळ प्रा. बेन्नूर आणि त्यांच्या साहित्याला समजून घेण्याची आहे. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे, ज्याची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. आज आम्हाला त्यांचे साहित्य समजून घेण्याची गरज आहे.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचे बालपणीचे मित्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रा. बेन्नूर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी बेन्नूर यांच्यासह कोर्टात काम केल्याच्या आठवणी जाग्या केल्या. मी राजकारणी झालो तर ते बुद्धिजीवी व महान विचारवंत झाले. त्यांनी (प्रा. बेन्नूर) राष्ट्रवादाच्या कथित मिथकांवर हल्ला चढविला, ते मौलाना हसरत मोहानी, के. एम. अशरफ, एम. ए. अन्सारी, खुंदमिरी आणि रफिक जकेरियासारखे बेन्नूर एक प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांनी राष्ट्रवादाची पुनर्चना केली. बहुसंख्यांकाचा राष्ट्रवाद त्यांनी खोडून काढला
रफिक जकेरिया यांच्या आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले, ‘मी जकेरियांसोबत काम केलेलं आहे, आम्ही एकत्र मंत्रिमंडळात होतो. त्यांनी मुस्लिमांच्या समाजिक व शैक्षाणिक उन्नतीसाठी केलेलं कार्य अतुलनीय असं आहे. बेन्नूर त्यांचे सहकारी होते. बेन्नूर यांनी दलवाईंसोबतही मतभेद असतानादेखील काम केले. दलवाईंचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एकांगी होता, दलवाई मुस्लिमांवर सतत हल्ला चढवायचे, बेन्नूर यांना ते पटले नाही. अखेर बेन्नूर यांनी दलवाईंची साथ सोडली. कुणासोबत मतभेद असतानाही काम करणे ही बेन्नूर यांची उदारता होती, त्यामुळेच त्यांचे अनेक लोकांशी चांगले संबध होते.
प्रा. बेन्नूर यांच्या वैचारिक लेखनाबद्दल बोलताना शिंदे म्हणतात, ‘देशातील मूलतत्त्ववादी विचारांचा त्यांनी नेहमी समाचार घेतला. त्यांनी उभं केलेलं काम हे सध्याच्या संकुचित कट्टरवादी परिस्थितीला उत्तर देणारे आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात जी सामाजिक व राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीला सामाजिक समतेचा प्रवाहहा स्मृतिग्रंथ उत्तर आहेअसं मतंदेखील शिंदे यांनी व्यक्त केलं. पुस्तकातून देशातला सर्वधर्मसमभाव जपला जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गाजियोद्दीन रिसर्च सेंटरच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केला. गाजियोद्दीन संस्था आर्थिकदृष्ट्या गरीब असली तरी त्यांचे काम अतुलनीय आहे, असे मत सुशीलकुमार शिंदेनी व्यक्त केलं. 
अध्यक्षीय भाषणात सुलतान शेख यांनी देशातील विविधता जपण्याचे आवाहन केले. देशात संघ-भाजपकडून जी वातावरण निर्मिती केली जात आहे, त्याला उत्तर भारतातील हिंदु-मुस्लिमांचे सहजीवन व संस्कृती आहे. त्यांनी कितीही प्रयत्न करावेत पण भारताच्या य़ा गंगा-जमुनी संस्कृतीला ते धक्कादेखील पोहोचवू शकत नाही. भारतातला सुफी प्रवाह अखंड आहे, अनेकांनी प्रय्तन करूनही तो विभाजित होऊ शकला नाही, सामाजिक समतेचा प्रवाह हा ग्रंथ सामाजिक सद्भाव बिघडवण्याचा प्रयत्न करण्याला शक्तींना चोख उत्तर आहे,’ असेही सुलतान शेख म्हणाले.
प्रास्ताविक करताना कलीम अजीम यांनी ग्रंथाच्या गंगा-जमुनी संकल्पनेची मांडणी केली. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांना सबा नकवी यांचे गुड फेथ इन आणि योगिंदर सिंकद यांचे सेक्रेड स्पेसेस अशी प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती मराठी करायची होती. त्यासाठी त्यांनी कामही सुरू केलं होतं. पण अवेळी ते गेल्याने त्यांचे काम अर्धवट राहिले. त्या कामाचा एक चोटासा भाग आज पूर्ण होत आहे, पण ते पाहायला बेन्नूर उपस्थित नाही. या ग्रंथातून भाषा, साहित्य, संस्कृती, सभ्यता, स्थापत्य, इतिहास व एकात्मतेची प्रतिकं एकत्रित केल्याचं कलीम अजीम म्हणाले. भारताची बहुसांस्कृतिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सामाजिक समतेचा प्रवाह या ग्रंथातून होते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सरफराज अहमद यांनी सामाजिक सद्भभावनेच्या प्रतिकांच्या राजकारणाची चर्चा केली. बेन्नूर यांनी तहयात सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची बांधणी केल्याचे सरफराज म्हणाले. गाजिय़ोद्दीन रिसर्च सेंटरमार्फत अशा प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती केली जाईल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला.
प्रकाशन सोहळ्यासाठी मंचावर डॉ. युसूफ बेन्नूरदि युनिक फाँऊंडेशनच्या संचालिका मुक्ता कुलकर्णीयुनिक अकेडमीचे मल्हार पाटील व युनिक फाऊंडेशनचे विवेक घोटाळे हजर होते. या कार्यक्रमाला प्रा. बेन्नूर यांचे कुटुंबीयजेष्ठ पत्रकार अरुण खोरे, अंबाजोगाईचे प्रा. मुजीब हमीद, सोलापूरचे सरफराज अहमद, मुंबईचे अलीमुद्दीन अलीम हजर होते. 
तसंच कार्यक्रमासाठी पुण्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती, त्यात मित्रवर्य कुणाल गायकवाड, अविनाश किनकर, राजरत्न कोसम्बी, शाल्मली रेडकर, राहुल झोरी, स्नेहा कोंडलकर, केशव वाघमारे, मोहसीन शेख, पैगंबर शेख, अली मालेगांवकर सुजीत ढेपे इत्यादी  मित्रगण हजर होते. तसेच मान्यवरांमध्ये अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा व युनिक एकेडमीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचे लिखाण संकलीत केल्याबद्दल बेन्नूर कुटुंबीयांनी लेखकाचा सत्कार केला. प्रा. युसूफ बेन्नूर व अजीज बेन्नूर यांनी पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
युनिक फाऊंडेशनचे चंपत बोड्डेवार यांनी प्रकाशकांची भूमिका मांडताना युनिक फाऊंडेशनच्या वैचारिक कार्य़ाचा आढावा घेत वैचारिक प्रवाह व संसोधनाची बंधिलकी मांडली. ग्रंथाची कल्पना व त्यामागील उद्देशांची मांडणी करताना मुस्लिम समुदायातील बहुविध संस्कृती व समाजाची मांडणी अधिक स्पष्टपणे या ग्रंथातून स्पष्ट होते असे मत मांडले. कार्यक्रमाचे आभार युनिकचे केदार देशमुख यांनी मानले.

संकलन- ब्लॉगकर्ता

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: बौद्धिक मैफली मुसलमानात का नाहीत?
बौद्धिक मैफली मुसलमानात का नाहीत?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxP9DAhXob17W-RvmNIejYTDuOcfkjnxVGz3V1s4H9biVXbTMbFVAXg1Aj3sA3FsuwtgzhpdO91NtGt992Fx3DoKIl0jHokDPlfXYBrDojPQpQnszNSeNNLxHvUvsl5kPdiWzD6rfPJzkn/s640/50522216_2436596643234174_8350488507390623744_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxP9DAhXob17W-RvmNIejYTDuOcfkjnxVGz3V1s4H9biVXbTMbFVAXg1Aj3sA3FsuwtgzhpdO91NtGt992Fx3DoKIl0jHokDPlfXYBrDojPQpQnszNSeNNLxHvUvsl5kPdiWzD6rfPJzkn/s72-c/50522216_2436596643234174_8350488507390623744_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_26.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/01/blog-post_26.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content