दक्षिण कोरिया सौंदर्यप्रसाधने निर्मितीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. वार्षिक ५३२ अब्ज डॉलर्सचा ही बाजारपेठ ‘डिस्ट्रॉय मेकअप’ चळवळीमुळे अडचणीत येण्याची चिन्ह आहे. विशेष म्हणजे कोरियन लोकांनीच या ब्युटी प्रॉडक्टविरोधात मोठं आंदोलन उभं केलं आहे. ‘एस्केप द कॉर्सेट’ या हॅशटैग अंतर्गत सोशल मीडियावर सौंदर्याच्या कथित बाजारू संकल्पनेविरोधात अनेक महिला पुढे सरसावल्या आहेत. एकेकाळी दोन-दोन तास मेकअपमध्ये घालवणाऱ्या कोरियन महिला आपल्याकडील सौंदर्य प्रसाधने नष्ट करत आहेत.
जूनमध्ये सुरू झालेली ही चळवळ आता व्यापक स्वरुप धारण करत आशिया खंडात पसरली आहे. गेल्या दोन महिन्यापासून इन्स्टा व ट्विटरवर या कॅम्पेननं धुमाकूळ माजविला आहे. जगभरातील ब्युटी प्रॉडक्ट कंपन्यांनी या मोहिमेची मोठी धास्ती घेतली आहे. गुगलमध्ये ‘एस्केप द कॉर्सेट’ टाईप करताच आधी ब्यूटी कंपन्यांच्या अनेक जाहिरातीच्या पॉपअप्स व बुलेट्स दाणादण आदळत आहेत. याशिवाय प्रॉडक्टचा प्रचार करणाऱ्या सात-आठ बातम्या टिमटीम करत आपल्या नजरेपुढे येतात. यातून कंपन्यानी घेतलेला धसका लक्षात येऊ शकतो.
कोरियन ब्यूटी ब्लॉगर लिना बेई नावाच्या स्थूल दिसणाऱ्या एका २६ वर्षीय मुलीनं यू ट्यूबवर जून महिन्यात एक व्हिडिओ पोस्ट केला. ‘आय एम नॉट प्रिटी’ शीर्षकाचा हा व्हिडिओ ३ मिनटे ३२ सेंकदाचा आहे. सुरुवातीला व्हिडिओत लिना मेकअपशिवाय दिसते. हळूहळू ती कॉस्मेटिकचा वापर करून आपला चेहरा रंगवते. मग ‘मी जशी आहे तशी बरी’ म्हणत ती आपला मेकअप अक्षरश: खेचून, ओरबाडून काढते. व्हिडिओत तिने अवास्तविक सौंदर्य टैबूविरोधात लढण्यासाठी तिनं मुद्दामहून जड मेकअप केलेला आहे, असं शेवटच्या स्लाईडमध्ये मॅसेज येतो.
व्हिडिओच्या शेवटी तिनं एक महत्त्वाचा मॅसेज दिला आहे. लिना म्हणते, ‘मी सुंदर नाही पण आहे तशी बरी आहे’ ‘आपली तुलना मीडियातील चकचकीत प्रतिमेशी करू नका’. ‘तुम्ही तुमच्यासाठी स्पेशलच आहात’, असे एका मागून एक अनेक स्लाईड स्क्रीनवर आदळतात आणि व्हिडिओ संपतो. या संदर्भात न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या एका प्रतिक्रियेत लिना म्हणते, ‘मला प्रत्येक महिन्यात मेकअपसाठी ७०० डॉलर खर्च करणे शक्य नव्हते. माझ्यासारख्या अनेक मुली अशा आहेत ज्या बराच पैसा मेकअपवर उडवतात, यातून बाहेर पडण्यासाठी मी तो प्रयोग केला.’
लिना बेईनं हा व्हिडिओ अपलोड करताच यूट्यूब खंडीत झाला. पण तो पुन्हा सुरू होताच हजारो व लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला व शेअर केला. आत्तापर्यंत ५ मिलियन लोकांनी लिनाचा व्हिडिओ पाहिला आहे. तिचे फॉलोव्हर झटक्यात २० हजारचे दीड लाख झाले. लिनानं सुरू केलेली ‘एस्केप द कॉसेट’ म्हणजे झिरो फिगरच्या स्वप्नरंजनातून बाहेर पडा, ही मोहिम साऊथ कोरियात जोर धरत आहे. अनेक मुली आपली मेकअप कीट नष्ट करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत. एकट्या इन्स्टाची संख्या मोजली तर ‘नो मेकअप’ या हॅशटैग अंतर्गत तब्बल १६ मिलियन पोस्टी पडल्या आहेत.
दक्षिण कोरियात कृत्रिम सुंदरतेला प्रचंड मागणी आहे. कोरियामध्ये, यशस्वी कारकीर्द आणि रिलेशनशिपसाठी स्त्री-सौंदर्याला बहुतेक कारणांपैकी एक मानले जाते. परिणामी आकर्षक दिसण्याचे फॅड दक्षिण कोरियात वाढले आहे. त्यामुळे तिथे कॉस्मेटिकचा मोठा व्यवसाय भरभराटीला आलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दररोज कोरियन महिला किमान दोन तास आरशासमोर घालते. एक मुलगी महिन्याला मेकअपसाठी सरासरी २०० डॉलर खर्च करते. केवळ मुलीच नाही तर कोरियन मुलंदेखील सौदर्यप्रसाधनावर अमाप खर्च करतात. एअर होस्टेस, सेल्सगर्ल्स, रिसेप्सनिस्ट, मीडिया आदी क्षेत्रात स्त्री कर्मचारी आकर्षक दिसावी अशी अट आहे. त्यासाठी स्त्रियांना कॉर्सेट (पोट व कंबर दाबून ठेवण्याचा एक पट्टा) घालण्याची सक्ती केली जाते. ज्यामुळे कोरियन स्त्रियांना नव्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
दक्षिण कोरिया सौंदर्य प्रसाधने, केसांची देखभाल, त्वचेची काळजी, केमिकल रंग, कॉस्मेटिक, सुगंध, नेल-पॉलिश, साबण आणि जेल आदी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हा कॉस्मेटिकचा अब्जावधीचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. याशिवाय सेलफ़ोन, कंप्यूटर, महागड्या गाड़्या, मशीनरी, रोबोटिक, एयर-कंडिशनरसाठीदेखील दक्षिण कोरिया ओळखला जातो. गाल, हनुवटी, डोळे, कान, दात, कपाळ शरीराचा असा कुठलाच फ़ीचर नाहीं ज्याचे सौंदर्यीकरण कोरियात होत नसावे. रशियन, चीनी, मंगोलिया आणि जापानी नागरिक प्लास्टिक सर्जरी आणि मेडिकल टूरिजमसाठी महिन्याला दक्षिण कोरियाला भेटी देतात. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते दक्षिण कोरिया जगातील पहिल्या 10 सौंदर्य बाजारांपैकी एक मोठा देश आहे.
कोरियात ब्यूटी प्रॉडक्टच्या जाहिरातीवर महिन्याला मिलियन यॉन खर्चे केले जातात. तिथे शॉपिंग सेंटर, मॉल, हॉटेल्स मेकअपची विषेश सुविधा पुरवतात. अशा मिलियन डॉलरची भरमसाठ कमाई असलेला हा उद्योग महिलांनी बंड करून बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हेल्थ तज्ज्ञाच्या मते अधिक प्रमाणात कॉस्मेटिक सौंदर्यप्रसाधने वापरल्यानं चेहरा अधिक निस्तेज व मृत होतो. टी गार्डियननं यासंबधी केलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे की, अति कॉस्टमेटिकच्या वापरामुळे कोरिय़न महिला अनेक आजारांशी दोन हात करत आहेत. थोडक्यात काय तर सुंदर दिसण्याच्या प्रयत्नानं कोरियन महिलांनी नव्या आजारांना आमंत्रण दिली आहेत. अशा परिस्थितीत ‘एस्केप द कॉर्सेट’ मोहिमेला महत्त्व प्राप्त होते.
या मोहिमेनं भारतातही शिरकाव केला आहे. भारतात अशा प्रकारचं आंदोलन सुरू होणं नवीन नाही. सौंदर्याबद्दल खोटे दावे केल्यानं भारतात सौंदर्यप्रसाधन कंपन्याविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. ‘नो सेल्फी डे’ हा त्यातलाच एक प्रकार आहे. मुळात दक्षिण भारतातील सावळ्या वर्णाच्या महिलांनी ब्यूटी प्रॉडक्टना नाकारले आहे. कोरियात या कॅम्पेनचे यश पाहून भारतातही या निमित्तानं कथित सौंदर्यशास्त्राचे कथित टैबू तोडण्याची प्रक्रिया सुरू होण्यास हरकत नाही.
(हा लेख लोकमतमध्ये 4 डिसेंबर 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com