अलविदा जगभर


दोस्तो..
लोकमतसाठी वर्षभर लिहीणं माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती. आपने मेरे कलम से किए प्यार ने मुझे यह मौका दिया.. इसलिए आपका भी शुक्रिया.. सुरुवातीला फक्त महिलांच्या बदलत्या घडामोडींवर लिहीणं हाच विषय मेघनाताईंसोबत झालेल्या चर्चेतून बाहेर आला होता. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पटलावर सुरू असलेल्या मीटू मुव्हमेंटवर एक सॅम्पल लेख लिहिला. तो लोकमतच्या टीमला आवडला. त्यातूनच एक लाईन मिळाली व जगभरातील महिला विश्वावर लिहिण्याचं सूचलं. स्टार्टअप म्हणून सौदीत महिलांसाठी ड्रायव्हिंग बंदी उठविल्याचा लेख लिहिला. 'राईट टू ड्राईव्ह' हा लेख नववर्षाच्या सुरुवातीलाच आला. पहिल्याच लेखाला उदंड प्रतिसाद.. बरेच ई-मेल आले, त्यापेक्षा अधिक लोकांनी फोन लावून सौदीच्या लेखाचा विस्तार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच लेखातून लिहिण्याला व सदराला दीशा मिळत गेली.

माझ्यासोबत मुकेश मास्तरांचं सदर होतं. त्यांनीच मला सोशल मीडियावरून हेरून मी मराठीत चिकटवलं होतं. त्यांचा हा विश्वास लिहिण्याला सतत बळ देत असतो. थँक्स मास्तर... जगभरनाव लेखमालेची दीशा देऊन गेला. इंटरनॅशनल इश्शूवर लिहिण्यासाठी काही बड्या वेबसाईटचा एकमेव आधार होता. बीबीसी, न्यू यॉर्क टाईम्स, डॉन, दि गार्डियन, वॉशिंग्टन टाईम्स वाचण्याची हॅबीट फायदेशीर ठरली. कुठतरी अनोखी घटना वाचनात आली की, त्याचा शोध घेत त्या-त्या देशातील स्थानिक वेबसाईट धुंडाळत असू. संबधीचे सोशल मीडिया अकाऊंट धुंडाळत होतो. त्यातून नव-नवीन माहिती मिळत गेली. अशातून जगभरआकारास येत गेलं. पॉझिटिव्ह बातम्याच शोधणं व त्यावर लिहिणं हा पायंडा मी पाडून घेतला. याच सिलेक्शनला मोठे वाचक मिळत गेले..

बुरे समय में अच्छा और पॉझिटिव्ह पढने मिलना मुश्कील बात थी.. पण त्याच अटीवर जगभरडिझाईन होत गेलं. शुरु में लगा कि दरवेळी नवे विषय कुठून मिळणार.. पर नंतर सब आसान होते गया.. जगभरातील इतक्या बातम्या मिळत गेल्या की निवड करताना अडचण व्हायची. जो न्यूज भारत के मीडिया ने कव्हर ना की वही सिलेक्ट करता रहा.. ज्यावेळी इंग्रजी-हिंदीच्या पॅरलल मीडियानं ते वृत्त कव्हर केलेलं असायचं, अशावेळी मराठीत ती बातमी आहे का याचा शोध घेत गेलो. त्यामुळे निवडीची प्रक्रिया आसान होत गेली.. कधी-कधी इतक्या बातम्या असायच्या की त्यातून निवड करणे जिकीरीचं काम असायचं.. पण त्यातही वेगळंपण देणारं वृत्त जगभरची जागा घ्यायचं.

मंगळवारी सकाळपासून मेल सुरू असायचे. अनेकदा भल्या सकाळीच बेन्नूर सरांनी फोन करून लेखाचं कौतुक केलंय. असंच लिहीत राहा... हा त्यांचा सल्ला बहुमोलाचा होता. काहीजण फोन नंबर मिळवून माझ्याशी भांडायचे. देश में मुसलमानो का क्या हाल हैं और तू मिठ्ठामिठ्ठा क्या लिखता.. देशात समाज अस्थिर झालाय तुम्हाला असे विषय कसे सूचतात? तुम्ही मुस्लिमांवर का लिहीत नाहीत? इस्लामवर लिहिलं पाहिजे? मजहबपर किचड मत उछालो..! औरतो को ऐसाच रखना पडता, तूम हमे मत सिखाओ! तुम्ही घरात बायकोशी असेच वागता का? इत्यादी आरोप-प्रत्यारोप करणारे ते मेल-फोन असायचे.

दरवेळी सदर लिहिताना बेगमची पैनी नजर माझ्यावर असायची.. कधी-कधी ती सौम्य वाद घालायची.. घर में कबी झाडू तो मारते नैई, उष्टे भांडे तसेच पडलेले असतात आणि लागला हा गडी जगाला तत्त्वज्ञान शिकवायला..”, “पैयले मेरा सारला करो फिर दुनिया को सिखाओ..” “बडा सा पेट लेको, टेबलपर बैठकर नुसते खाते रहतैंय, और इनको है कतैं औरतो की फिकर.. हूँ..हूँ..बेगमच्या अशा टोमण्याची सवय करत गेलो. नसता लिहिणं मुश्कील झालं असतं.

मित्रों खरं सांगू तर.. जगभरमुळे बेगमशी असलेल्या माझ्या वर्तनात बदल झाला असं म्हणता येईल. थँक्स बेगम व दुसरं थँक्स मेघनाताई.. मी आत्ता झाडू मारतो, व भांडीही घासतो. (पण लिहिण्यातून वेळ मिळाला तर.. हा..हा..) लिहिताना बेगम लेमन टी आणून समोर ठेवायची, त्यातून लिहिणं जमत गेलं मित्रों.... पुन्हा थँक्स बेगमचं.. 
शब्दाच्या दुनियेत वावरणं मला सुखावणारा अनुभव असतो. शब्दांशी खेळणं मला आवडतं. लिहिणं हा माझा छंद, आवड, जगणं व रोजीरोटी आहे.. पूर्णवेळ मी लिहीत असतो. टेलंरिंगनंतर हा एकमेव धंदा मला येतो. लिहिणं बंद झालं की पोटाचे वांदे होणार.. दुनिया बहुत बडी हैं दोस्तो. मिलेंगे और कही औऱ नई-पुरानी जगहोंपर इस शब्दो की दुनिया में.. 

आज जगभर श्रृंखलेचा शेवटच्या लेख प्रकाशित झालाय.. वर्ष सरलं जगभरच्या सहवासात.. नव्या वर्षी नवी उमेद घेऊन पुन्हा भेटत राहूया... आजचा लेख..



गेली वर्षभर महिला विश्वातील अनोख्या घडामोडी ‘जगभर’ सदरातून वाचल्या. रचनाबंध व मांडणीतले प्रयोग करत असताना विषय निवडणं अत्यंत जिकिरीचं काम होतं. पण वेगळं देण्याच्या आकांक्षेनं हे कार्य अधिक सोप्पं होतं गेलं. सदरातून निरोप घेत असताना आज एक वेगळा आणि अनोखा वृत्तलेख सखींच्या मित्र-मैत्रिणींसाठी देत आहे. मलेशियन पालकांनी आपल्या मुलीला मोबाईल घेऊन देत असताना तिच्याकडून चक्क एक लिखित कॉन्ट्रैक्ट साईन करून घेतलंय. होय हे खरं आहे. या करारात मोबाईल वापरासंबधी सूचना व आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच मोबाईलच्या अतिरिक्त वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर चार पानांचा हा कॉन्ट्रैक्ट बघता-बघता चांगलाच व्हायरल झाला. तब्बल 50 हजार युझर्सनी तो शेअर केलाय. तर हजारो कॉमेंट या करारपत्राला मिळालेली आहेत. मलेशियात या कॉन्ट्रैक्टला घेऊन नेटीझन्स व पालकांमध्ये चर्चा रंगली आहे. अनेकांनी चांगली उपाययोजना म्हणून या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सजग पालक म्हणून या मलेशियन पालकांचा गौरव केला जात आहे. मोबाईलला गेऊन नव-नवे आजार उत्पन्न होत असताना मलेशियन पालकांनी मोबाईल वापरण्यावर स्वत:हून काही निर्बध लादले आहेत.  

क्वालालंपूर शहरात राहणारी 10 वर्षीय सराह यास्मीन गेल्या काही महिन्यांपासून पालकांकडे आयफोनची मागणी करत होती. जगभरात फोफावलेला ‘मोबाईलमेनिया’ पाहता पालकांनी मुलीची मागणी फेटाळली. पालकांना मुलींचा अभ्यास व तिच्या भविष्याची चिंता होती. अभ्यास सोडून नसत्या उद्योगात ती अडकून बसेल अशी भितीदेखील पालकांना होती. तसंच यास्मीनचं बेजबादार वागणं हेदेखील नकारामागे महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे ते यास्मीनला महागडा मोबाईल घेऊन देण्याच्य़ा विरोधात होते. पण सततची कुणकुण व वैताग लक्षात घेता, पालक काही अटींवर यास्मीनला सेल घेऊन देण्यास तयार झाले. तत्पूर्वी पालकांनी मोबाईल वापरासंबधी नियम व शर्थी यास्मीनला सांगितल्या. मोबाईलची हौस पूर्ण होत आहे, यामुळे तिनं प्रत्येक अटींना पटकन होकार दिला.

काय आहेत नियम

  1. मोबाईलवर जास्त वेळ वाया घालवायचा नाही.
  2. शाळेत सेल घेऊन जाण्यास मनाई.
  3. जेवताना नो मोबाईलचा वापर करायचा नाही.
  4. अभ्यासात पूर्ण लक्ष द्यायचे.
  5. पहाटे लवकर उठून फजरची नमाज अदा करायची.
  6. पूर्ण चार्जिंग झाल्याशिवाय फोन काढायचा नाही.
  7. आयफोन बाथरुमध्ये घेऊन जायचा नाही.
  8. कुठलाही एप डाऊनलोड करताना पालकांची परवानगी घ्यावी. त्याशिवाय एप इन्स्टॉल करता येणार नाही.
  9. इंटनेट डेटा काळजीपूर्वक वापरावा. अतिरिक्त डेटा मिळणार नाही.
  10. आठवड्यातून किमान सहावेळा कुरआन पठण करावे.
  11. कुटुंबासोबत असताना मित्रांशी फोनवर बोलायचे नाही.
  12. कुठल्याही परिस्थितीत ट्य़ूशन मीस होता कामा नये.
नोव्हेबरच्या 29 तारखेला यास्मीनच्या हाती नवा करकरीत आयफोन पडला. फोनच्या बॉक्ससोबत एक चार पानी करारनामा म्हणजे लिखित कॉन्ट्रैक्ट पालकांनी यास्मीनकडे सोपवला. चार पानी करारपत्र काळजीपूर्वक वाचून सही करण्याची गळ तिला घालण्यात आली. सर्व अटी मंजूर असतील तरच हा मोबाईल मिळेल अन्यथा नाही, अशी सक्ती तिच्यावर केली गेली. यास्मीनने पटकन होकार देत करारपत्रावर सही केली.

तब्बल 12 नियमांचा हा कॉन्ट्रैक्ट वर्षभरासाठी असून मुदतीनंतर तो रिन्यूअल केला जाईल, असा आदेश पालकांनी काढला आहे. यास्मीनची बहीण सैफुलनं हा कॉन्ट्रैक्ट सोशल मीडियावर अपलोड केलाय. यास्मीनने  पोस्ट शेअर करत मोबाईल मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यास्मीनला मोबाईल वापराबद्दल अनेक सूचना सोशल मीडियावर मिळत आहेत. काहीजण तिला नव-नवे सल्ले देत आहेत.

कलीम अजीम, पुणे
Twitter@kalimaajeem

(सदर लेखाची इ-पेपर लिंक)

 




वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: अलविदा जगभर
अलविदा जगभर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi5YEffax2yDH53GLDp3ch4wc36re12H2Vir-PGaGzJABrrluaYKalSfwqmHLnCr5ZVnpauoZdyyinFFfvZ8wS5PpkLKJC1eEC4mj_3R_aGiLoUK9UNJgFU42VTMKmcCljRNOwH6P6JNgXV/s640/Jagbhar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi5YEffax2yDH53GLDp3ch4wc36re12H2Vir-PGaGzJABrrluaYKalSfwqmHLnCr5ZVnpauoZdyyinFFfvZ8wS5PpkLKJC1eEC4mj_3R_aGiLoUK9UNJgFU42VTMKmcCljRNOwH6P6JNgXV/s72-c/Jagbhar.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/12/blog-post_25.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/12/blog-post_25.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content