‘बेगुनाह कैदी’ : एका वेदनेचा चित्कार

‘अब्दुल वाहिद शेख’ लिखित ‘बेगुनाह क़ैदी’ नावाचं पुस्तक अलीकडे गाजत आहे. अवघ्या आठवडाभरात ‘बेगुनाह क़ैदी’ अमेझॉन या इ कॉमर्स वेबसाईटवर हे पुस्तक बेस्ट सेलरच्या पहिल्या शंभरमध्ये आलं आहे. अब्दुल वाहिद तब्बल नऊ वर्षे जेलमध्ये होते. तपास यंत्रणांनी २००६च्या ‘मुंबई घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट’च्या फसव्या आरोपाखाली त्यांना अटक केली होती. २०१५ साली कोर्टाने अब्दुल वाहिद यांना निर्दोष मुक्त केलं.

“ब्लास्टचा काहीएक संबध नसताना माझा नऊ वर्षे अमानूषपणे छळ करण्यात आला. निर्दोष सुटल्यानंतर खरं तर मी हाती बंदूक घ्यायला हवी होती. मात्र, मुस्लिम दहशतवादी नसून तो शांततावादी असतो मला हे दाखवून द्यायचं असल्याने मी लेखणी हातात घेतली”, पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीच्या प्रकाशनानंतर एका जेएनयू विद्यापीठातील एका व्यख्यानात ते पुस्तक लिहिण्यामागची गरज उपरोक्त शब्दात अधोरेखित करतात.

तब्बल नऊ वर्ष जेलमध्ये होते. निर्दोष बाहेर आल्यानंतर तपास यंत्रणा आणि व्यवस्थेवर खापर न फोडता, आरोपीचं लेबल चिकटवल्यानंतर होणारी घुसमट त्यांनी पुस्तक रुपात बाहेर काढली.

२०१७ला या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. ‘बेगुनाह क़ैदी’ शीर्षकाचं हे पुस्तक सुरुवातीला उर्दू भाषेत २०१६ साली आलं. पुस्तकाची लोकप्रियता पाहता, लागलीच हिंदी आवृत्ती काढण्यात आली. आज हिंदीतलं हे पुस्तक अमेझॉनच्या १०० बेस्ट सेलरच्या यादीत आहे.

मुंबईत एका शाळेत शिक्षक असलेल्या अब्दुल वाहिद यांना सर्वप्रथम पोलिस४नी चौकशी व विचारपूससाठी बोलावलं. नंतर वारंवार अशाच रीतीने बोलवण्यात आलं. पुढे त्यांचं अपहरण करून लॉकअपमध्ये डांबण्यात आलं. ११ जुलै २००६ला अब्दुल वाहिद यांना लोकल ट्रेन ब्लास्टच्या आरोपाखाली अटक (अपहरण) करण्यात आलं होतं. या घटनेच्या ११ वर्षानंतर पुस्तक रुपातून वाहिद यांनी आपली घुसमट व्यक्त केली आहे. २६ नोव्हेंबर २०१५ साली स्वत:ला निरपराध सिद्ध करुन ते बाहेर आले.

११ जुलै २००६ ते २६ नोव्हेंबर २०१५ हा नऊ वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. जेलमध्ये काळरात्र ठरलेल्या भयान आठवणी सांगताना ते म्हणतात, “फार वाईट दिवस होते ते, मी निर्दोष होतो, तरीही माझ्यासोबत इतर कैद्याचा व्यवहार अमानुष होता. जेलमध्ये सुरु असलेल्या इतर घटनांची माणूस मला किळस वाटू लागली त्यावेळी मी या घटनांची नोंद करायला सुरुवात केली. माझं लिखाण जेल सुप्रिटेंडेटच्या लक्षात आलं. त्यानंतर मी लिहिलेली कागदं त्यांनी ताब्यात घेऊन फाडून टाकली. त्याचवेळी मी निर्णय केला की हे लिखाण बाहेर गेलंच पाहिजे.” लोकार्पण सोहळ्यात पुस्तकाबद्दल सांगताना ते व्यथित होतात.

४०० पानांच्या या पुस्तकात खटल्यातील इतर आरोपींच्या कथा आणि व्यथा त्यांनी मांडल्या आहेत. प्रस्तावनेत लेखक लिहितात, “यह किताब ७/११ केस की वास्तविकता ही सामने नहीं लाती, बल्कि हमारे पूरे पुलिस-प्रशासन को बेनकाब करती है। न्यायपालिका का वास्तविक चेहरा सामने लाती है तथा सरकारी चरमपंथ को उजागर करती है।”

पुस्तकाचं पहिल्या प्रकरणात पोलिसांची कथा व त्यातील दोषांची मांडणी विस्ताराने केली आहे. सुरुवातीला संबधित खटल्याचे आरोपपत्र तयार करण्याचं काम एसीपी विनोद भट्ट (५४) यांच्याकडे सोपवण्यात आलं. परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण बनावट आहे. त्यांनी चार्जशिट तयार करण्यास नकार दिला. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. लेखक लिहितात, “विनोद भट्ट हे भक्कम आणि त्रुटीमुक्त आरोपपत्र तयार करण्यात निष्णात होते. ज्या खटल्याचं आरोपपत्र ते तयार करतात, त्यात आरोपींना शिक्षा होते, अशी पोलीस विभागात त्यांच्याविषयी ख्याती होती. भट्ट यांनी उपरोक्त फसवेगिरीला नकार दिला. त्यानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विशेषत: पोलीस आयुक्त ए.एन. रॉय आणि के.पी. रघुवंशीने त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांच्या पत्नीला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. जेव्हा दबाव खूपच वाढत गेला तेव्हा भट्ट यांनी हताश होऊन आत्महत्या केली.” दादर माटुंगा रेल्वे फाटॉकाजवळ त्यांचं मृतदेह आढळून आला. प्रसार माध्यमात बातमी होती की, त्यांनी आत्महत्या केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने लिहिलं होतं, “त्यांच्याकडे शासकीय वाहन होतं, त्यांना मग लोकल रेलवेची का गरज पडली?” 

भट्ट यांच्या मृत्युनंतर एटीएसचे सदाशिव पाटील यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलं. ते एसीपी होते. त्यांनी १४२ दिवसात १२ हजार पानांची चार्जशिट तयार करून ती दाखल केली. लेखकाचा दावा आहे की, पोलिसांचे आरोपपत्र म्हणजे बॉलीवूडच्या हिंदी सिनेमाच्या एका सुरस कथेला साजेशी होती. लेखक म्हणतात, पोलीस आरोपींना विचारपूस आणि चौकशीच्या नावाने चौकीवर बोलावून घेत. त्यांच्याकडून व्यक्तिगत माहिती, अलीकडचे प्रवास, आवडी-निवडी, नातलग इत्यादींविषयी विचारून घेत व पुढे त्याचा आरोपपत्रात वापर करत. अशा रीतीने पोलिसांनी खरी वाटावी असे आरोपपत्र तयार केले. या खोट्या व फसव्या चार्जशिटच्या आधारे खटला चालवला गेला.

खटल्यातील बरेच आरोपी पोलिसांशी झालेल्या विविध संघर्षाशी संबंधित होते. जळगाव निवासी आसिफ खान व मुंबई निवासी मुहंमद अली या व्यक्तींवर हा संपूर्ण खटला उभा केला गेला. आश्चर्य म्हणजे हे दोघेजण तुरुंगात असताना १३ नोव्हेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला. या प्रकरणात एटीएसने या दोघांना (कोठडीत असताना बाहेर जाऊन स्फोट कास घडवू शकतील!) दोषी ठरवलं.

लेखक मुहंमद अलीने कोर्टाला सादर कलेल्या शपथपत्राच्या आधारे त्याची कहानी सांगतात. मुहंमद मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी भागात राहतो. तो मेडिकल स्टोअरला जाऊन ‘तिलस्मी मोती’ नावाची वस्तु विक्री करतो. आपल्या भागातील मटका जुगार व पॉर्न सिनेमे दाखवणाऱ्या वीडियो पार्लरविरोधात मोहीम उघडली होती. त्याने जनाआंदोलन घडवून आणून हे व्यवसाय बंद पाडले. त्यामुळे त्याचे स्थानिक पोलिसांशी वाद झाले. पोलिसांच्या महसूलावर परिणाम झाल्याने ‘तुला चांगली अद्दल घडवतो’ अशी धमकी त्याला मिळाली होती. तर आसिफ खानही पोलिसांच्या सुडाचा बळी ठरला. त्याने एका (सुरेश जैन) बिल्डरच्या विरोधात मोहिम छेडली होती. त्या बिल्डरने शहरातील ख्वाजा नगर वस्ती रिकामी करण्यासाठी पोलिसांकडून स्थानिकांवर गोळीबार घडवून आणला. त्यात एका नागरिकाचा मृत्यु झाला. याविरोधात आसिफ खानने वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला एक निवदेन दिल. ते निवदन परत घेण्यासाठी त्याच्यावर इतर पोलिसांनी दवाब टाकला. परंतु त्याने तो मागे घेतला नाही. परिणामी त्याच्यावर अॅडिशनल एस.पी. नवल बजाज यांच्या इशाऱ्यावर एक खोटी एफआयआर केली गेली. तरीही आसिफ खान पोलिसांना व बिल्डरला शरण गेला नही. अखेरीस त्याला “तुला बघून घेतो” अशी धमकी बजाज यांच्याकडून मिळाली. अशा रितीने आसिफ घाटकोपर ब्लास्ट केसचा मुख्य आरोपी म्हणून गोवण्यात झाला.

दोघांना जुन्या पोलीस रेकॉर्ड व सुडनितीच्या आधारे आरोपी करण्यात आलं. इतर आरोपीही असाच रीतेन कुठे न कुठे पोलिसांशी झालेल्या वैराशी संबंधित आहेत. तर काही निरागसही आहेत..

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘बेगुनाह कैदी’ : एका वेदनेचा चित्कार
‘बेगुनाह कैदी’ : एका वेदनेचा चित्कार
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/12/blog-post_10.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/12/blog-post_10.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content