पालकत्त्वाची जबाबदारी


काही वर्षांपूर्वी पाकिस्तानची एक टेलिफिल्म पाहण्यात आली होती. सिनेमा व सिरियलमध्ये काम करणाऱ्या एका एक्स्ट्रा मुलीची ही कथा होती. एकल महिला असलेली ही कलाकार आईकडे राहते. घरात तिच्याशिवाय भाऊ आणि भावजय आहे. या मुलीला एक वर्षांचं बाळ आहे. बाळाला ती आज्जीकडे सोडून कामाला जाते. नणंदेच्या बाळाला सांभाळावं लागतं म्हणून भावजयीची सतत कुणकुण असते. वरून घरखर्चासाठी भावजय सतत तिच्याकडे पैशाचा तगादा लावते. एकटी महिला घरात खर्चासाठी वेळोवेळी पैसे पुरवते. वेळेप्रसंगी प्रोड्यूसरकडून सतत अडव्हॉन्स घेत असते. रोजच अडव्हॉन्स मागणारी आर्टिस्ट म्हणून तिची स्टुडिओत ओळख आहे. दुसरी ओळख म्हणजे ती नेहमी लेट येतो. उशीरा येण्यामुळे तिचं काम अन्य कुणालातरी दिलं जातं. भावजयीच्या पैशाच्या हट्टापायी तिला रोजच डिरेक्टरकडे कामासाठी विनवण्या कराव्या लागतात.
एका दिवशी बाळावरून घरात भावजय व तिच्यात जोरदार भांडणं होतात. ती बाळाला घेऊन स्टुडिओत जाते. बाळाला एका सुरक्षीत ठिकाणी झोपवून ती शुटींग करते. मध्येच बाळ जागे होऊन कल्ला करायला लागतो. डिरेक्टर व इतर क्रू मेंबर बाळाच्या आवाजानं वैतागतात. ती शुटींग सोडून बाळाला कवेत घेते. शुटींग ढेपाळते. दुसऱ्या दिवशी तेच.. पण कामाची गरज म्हणून तिला व तिच्या बाळाला शुटींगस्थळी अॅडजस्ट केलं जातं. एकेदिवशी एका सीनसाठी शुटींगला लहान बाळाची गरज असते. पण काही कारणामुळे शुटिंगसाठी येणारं बाळ येऊ शकत नाही. मग डिरेक्टरला एक्स्ट्रा मुलीच्या बाळाची आठवण होते. पण हे बाळ इतकं अॅक्टिव्ह असतं की तो शुटींगमध्ये व्यत्यय आणतो.
आईला बाळाच्या कामाचे पैसे मिळणार असते, म्हणून ती त्याला शांत करते. पण तो काही करेना शांत होत नाही. डिरेक्टर तिचे बाळ शुटींगसाठी रिजेक्ट करतो. आईची चिंता वाढते. तिला हातातून निसटून जाणारा पैसा दिसतो. ती बाळाला आतल्या खोलीत घेऊन जाते. काही वेळानं बाळ शांत होऊन आईच्या खांद्यावर पहुडलेलं असतं. शुटींग व्यवस्थित पार पडतं. डिरेक्टर बाळाचे पैसे देऊ करतात. आनंदाने ती घरी परतते. दुसऱ्या दिवशी बाळ स्टुडिओच्या खोलीत गप्प झोपलेलं असतं. ती शुटींग आवरून घरी जाते. तिसऱ्या दिवशी ती शुटींग संपवून घरी जाण्याआधी बाळाला उचलून घेते. बाळ शूपच शांत असते. ती बाळाला थापा मारते, पण बाळाची काहीच हालचाल नसते. बाळ थंडगार पडलेलं असतं. तिचं बाळ कायमचं शांत झालेलं असतं. म्हणजे आईनं बाळाला अफीमची गुंगी देऊन शांत केलेलं असतं. बाळाचा अॅक्टिव्हनेस अफीमच्या गुंगीनं मारलं जातं. बाळ नशेत असतं. कामात अडथडा नको म्हणून ती रोजच बाळाला अफीम पाजत असते. अफीमचं ओव्हरडोस होऊन बाळ दगावते.
वरील कथा विस्तृत पद्धतीने मांडण्यामागे अनेक पैलू आहेत. बाळाच्या आईची सामाजिक, आर्थिक व वर्गीय स्थितीचा या मांडणीतून बोध होतो. हिरोईन म्हणून करियर करण्याची तिची धडपड असते. पण नियतीमुळे ती एक्स्ट्रा बनते. पैशासाठी मुख्य कलाकाराची बहिण, भावजय, ननंद, सासू, मुलीची भूमिका ती करत असते. आर्थिक विवंचनेचा सामना करत ती जगत असते. नवऱ्याकडून मिळालेल्या घटस्फोटानंतर ती आईकडे राहायला येते. स्वाभाविक तिथं तिला सन्मान मिळत नाही. त्यातून ती कशीतरी सावरायचा प्रयत्न करते. वेळेप्रंसगी बाळाला नशा करवून ती काम करते. आणि...
ही कथा प्रातिनिधिक आहे. पण अशा असंख्य कथा समाजात पाहायला मिळतात. मेट्रो शहरात एकल पालकांच्या व्यथा फार वेगळ्या व धक्कादायक आहेत. शहरात आई-वडिल नोकरी करतात. अशावेळी पालकांना घराला बाहेरून लॉक लावून जावं लागतं. मुलं आत एकटेच असतात. टिव्ही बघत, व्हीडिओ गेम खेळत, खेळण्याशी खेळत ते एकटेच राहतात. भीती दाटून येऊन रडणे, शी-शू करणे, त्यातच खेळणे अशा इत्यादी कृती भेदरलेल्या लहान मुलांकडून होतात. अलीकडे लहान मुलांना मोबाईल देऊन पालक बाहेर पडतात.
पालकत्त्व निभावताना अनेक गोष्टींचा कस लागतो. अनेकजण पालनपोषणाच्या भीतीपोटी ‘चान्स’ घेत नाही. जबाबदारी पेलू न शकणारे जोडपे मुल नको म्हणतात. कारण मुलांना ‘सांभाळायला कोण?’ या प्रश्नात अडकतात. मुंबई-पुणेसारख्या शहरात पाळणाघर ही आधुनिक संकल्पना रुजली आहे. पालकत्त्वाच्या संस्कृतीमध्ये पाळणाघर एक सोय म्हणून पुढे आली आहे. पण ती सगळ्यांनाच सोयीची ठरेल असं नाही. अनेकजण पर्याय नाही म्हणून हृदयावर मोठा दगड ठेऊन पाळणाघर स्वीकारतातपण त्याविषयी त्यांच्या मनात सल राहते. एकत्र कुटुंबपद्धतीत बाळाचा सांभाळ करायला वडीलधारी मंडळी असतात. नोकरी आणि शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात स्थायिक व्हावं लागतं. अशावेळी पालकत्त्वाची जबाबदारी घेताना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यामुळे अलीकडे पालकत्त्व नको असणारे मंडळी वाढली आहेत. गैरसोय व करिअर या दोन्ही घटक पालकत्त्व नाकारण्यामागे कारणीभूत असतात.
आमच्या बिल्डिंगमध्ये एक उत्तर भारतीय कुटुंब राहाते. निम्न आर्थिक गटातल्या या कुटुंबात तीन मुलं आहेत. साडे तीन व दोन वर्षांची दोन मुलं. तर सहाएक महिन्याची छोटीसी मुलगी. मुलांचा बाप भल्या सकाळीच कामावर निघून जातो. रात्री उशीरा घरी येतो. मुलांची व बापाची सहसा भेट होत नाही. आई काहीतरी सामान आणायचं असेल तर मुलांना आत ठेवून बाहेरुन कडी लावून जाते. मुलांकडे मोबाईल दिलेला असतो. दोन्ही मुलं मोबाईलमध्ये यूट्यूब बघत असतात. तर सहा महिन्याचं ते छोटसं बाळ पाळण्यात पहुडलेलं असतं. तास दोन तासात आई परत येते व आपल्या कामाला लागते. कधी-कधी छोटीशी मुलगी आई न दिसल्याने भयभीत होऊन किंचाळ्या आवाजात रडू लागते. पूर्ण बिल्डिंगमध्ये तिचा आवाज दुमदुमतो. आवाज एकून कुणीतरी बाळाला उचलून घेतात.
मुळात घरात लहान मुलांना एकटे सोडणे धोक्याचं आहे. सततच्या एकटेपणामुळे मुलं भित्रे होतात. त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. सतत रडणे, हट्ट करणे, आपलीच मागणी पूर्ण करणे, वेळेप्रसंगी जिद्द करणे अशा अनपेक्षीत घटना लहान मुलांकडून घडत असतात. मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी पालकांकडे त्यांची मागणी मान्य केल्याशिवाय अन्य कुठला पर्याय नसतो. परिणामी मुलांच्या पालनपोषण व जडणघडणींवर त्याचा विपरित परिणाम पडतो. मुलं हिंसक व रागीट होतात. एक काळ असा येतो, जिथं पालक आपल्याच मुलांना आवरू शकत नाहीत. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.
मुलं मोठं होताना त्याच्या वाढीला अनेक घटक पोषक असतात. कुठल्याही पिढीत सुरक्षित, सुसंस्कृत आणि निरोगी वातावरणात मुलांचे संगोपन होणे आवश्यक असतं. पूर्वी एकत्र कुटुंबात मूल आपसूकच लहानाचे मोठे व्हायचे. इतर भावंडांच्या सान्निध्यात व संगतीत ते खेळत असत. सहजीवनातून समजूतदारपणा व चांगल्या सवयी मुलांच्या अंगी आपोआप येत. वेळेप्रसंगी भांडून पुन्हा निखळ मनोमिलन होतो. थोडक्यात काय तर, वडिलधाऱ्या मंडळीच्या सोबतीत त्यांच्यावर योग्य संस्कार होतात. साहजिकच एकत्र कुटुंब पद्धतीत संगोपन किंवा पालकत्त्व ही गोष्ट आई-वडिलांकडे सहसा येत नसते. घरातील सर्वच घटक मुलांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढवतात. पण शहरात विभक्त कुटुंब पद्धतीत मुलांच्या संगोपनात अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळे मुलांचे संगोपन हा एक बिकट प्रश्न म्हणून अलीकडच्या काळात पुढे आलेला आहे.
या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न मोठा आहे. कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन सामंजस्याने होणाऱ्या बाळाचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस मोलाचे असतात. त्यात गर्भावस्थेतील २७० दिवस आणि जन्मानंतरची पहिली दोन वर्षे यांचा समावेश असतो. हा काळ बालकांच्या पालनपोषणासाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बाळाची देखरेख व निगा योग्य पद्धतीने झाली पाहिजे. नोकरदार मातांसाठी कामाच्या ठिकाणी मुलांची देखरेख करण्याकरिता पाळघर व विशेष सोय असते. प्रत्येक अस्थापनेत अशी सोय पुरवावी असा कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे मुलं मातेसोबत असावी, ही बाळाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पालकांनी आपल्या बाळाच्या संगोपनामध्ये ही बाब प्राधान्यक्रमाने लक्षात घेतली पाहिजे की, त्यांचा एकटेपण बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घातक ठरू शकतो. त्यांच्या प्रगतीत बाधा बनू शकतं. मेडिकल सायन्सचंदेखील म्हणणे आहे की, मुलांना लहानपणापासून माणसांची सवय असेलतर त्यांची मानसशास्त्रीय प्रगती योग्य पद्धतीने होते. त्यामुळे हेवे-दावे व जबाबदारीतून पळ काढण्यात त्यांचे बालपण अडकता कामा नये. पालक म्हणून मुलाच्या वडिलाचीदेखील तेवढीच जबाबदारी आहे. आपल्याकडे बाळाचा बाप आजही पुरुष म्हणून मिरवतो. हरयाणात तर बापाने बाळाला खांद्यावर घेणे पुरुषत्वाचं लक्षण समजलं जात नाही. बाळाचं एकूण संगोपनात वडिलांचा रोल महत्त्वाचा असतो. त्यातून पळ काढणे हा मार्ग असू शकत नाही. तसंच बाळाला मातेनंच सांभाळणे हि मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. हे लक्षात असू द्यावे की कोवळ्या जीवाचे बालपण तुम्ही पर आणू शकत नाही.

कलीम अजीम, पुणे
Teitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: पालकत्त्वाची जबाबदारी
पालकत्त्वाची जबाबदारी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI2CTQlQZNslIHqHHuWrG6crrLt2gASaiu45ysLr6Oyr59zhTXxiro4ACeGsLAqMi6yjHKz3IP_ZaoUSzXjpzcUqMy4vyJy7WmV8CLYKlRPflU6ea5l1ATHjLiWZnN0IEOVJ-90auNPtmB/s640/IMG_20180516_183010.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI2CTQlQZNslIHqHHuWrG6crrLt2gASaiu45ysLr6Oyr59zhTXxiro4ACeGsLAqMi6yjHKz3IP_ZaoUSzXjpzcUqMy4vyJy7WmV8CLYKlRPflU6ea5l1ATHjLiWZnN0IEOVJ-90auNPtmB/s72-c/IMG_20180516_183010.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/12/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/12/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content