पहिली आझाद-इकबाल कॉन्फरन्स संपन्न


नोव्हेबरच्या ११ तारखेला लातूरमध्ये पहिली आझाद-इकबाल कॉन्फरन्स पार पडली. गाजियोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे घेण्यात आलेल्या या एकदिवसीय परिषदेत राज्याच्या विविध भागातून आलेले रिसर्च सेंटरचे प्रतिनिधी व अभ्यासक हजर होते. कॉन्फरन्सच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.म. शहाजिंदे होते.
परिषदेला लातूर शहरातून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या परिषदेचे वृत्तांकन नजरिया वाचकासाठी आम्ही देत आहोत.

प्रास्ताविक- कलीम अजीम
भाजपच्या सत्ताकाळात राष्ट्रवादाच्या नावाने आदिवासी, दलित, ख्रिश्चन आणि मुसलमानांवर हल्ले होत आहेत, त्यांची प्रार्थनास्थळे लक्ष्य केली जात आहेत, भारत माता की जय, वंदे मातरम म्हणणेच राष्ट्रवाद आहे, सिनेमा थियटरमध्ये राष्ट्रगीतावेळी उभंच राहिलं पाहिजे, अशी सक्ती केली जात आहे; अशा परिस्थितीत तुम्ही जे सांगता तो राष्ट्रवाद नसून जमातवाद आहे आणि तो आम्हाला मान्य नाही, यासाठी या कॉन्फरन्सचं आयोजनाची गरज असल्याचे कलीम अजीम यानी म्हटलं. मौलाना शिबली नोमानी, हुसेन अहमद मदनी, मौ. हाली, सर सय्यद अहमद खान, मुहंमद इकबाल, मौलाना आझाद इत्यादी मुस्लिम राष्ट्रपुरुषांच्या विचारांची पुनर्मांडणी करणे, त्यांना महापुरुष म्हणून त्यांना वैचारिक दिशादर्शक समजून त्याच्या विचारांवर मार्गक्रमण करणे आदी उद्दीष्टे त्यांनी प्रास्ताविकात मांडली.
आझाद-इकबाल कॉन्फरन्सचे मुख्य आकर्षण प्रा. मुजीब हमीद यांनी मुहंमद इकबाल यांच्यावर केलेले बीजभाषण होते. सुमारे तासभर त्यांनी 'डॉ. मुहंमद इकबाल यांचे राष्ट्रचिंतन' या विषयावर सविस्तर मांडणी केली. जागतिक विश्व शांती आणि वसुदैव कुटुंबकम यांची कल्पना मांडणाऱ्या मुहंमद इकबाल यांना इतिहासकार व राजकीय अभ्यासकांनी बदनाम केले. तर दुसरीकडे मुसलमानांतील धर्मवाद्यांनी त्यांना धार्मिक विचारवंत म्हणून इस्लाममध्ये बंदीस्त केले. खरे इकबाल समजून घ्यायचे असतली तर या प्रतिमा आधी तोडून टाकल्या पाहिजेत, असे मत मुजीब हमीद यांनी मांडले. इकबाल यांचे तत्त्वज्ञान मानवतेच्या कल्याणासाठी होते, पण दुर्दैवाने त्याला इस्लाम व मुस्लिमांपुरते बंदीस्त करण्यात आले, अशी खंत प्रा. मुजीब यांनी व्यक्त केली.
इकबाल यांच्यावर फक्त धार्मिक अंगाने पॅन-इस्लामची मांडणी व द्वि-राष्ट्राची मागणी केल्याचा आरोप केला जातो, ती मांडणी मुळातून समजून घेण्याची गरज आहे. तो काळ, त्याची वास्तविकता व त्या मांडणीतून इकबालना नेमकं काय अभिप्रेत होते, याची तटस्थपणे मांडणी करणे व ती समजून घेण्याची गरज आहे. पॅन इस्लामची मांडणी समजून घेतली तर इकबाल यांच्यावरील पक्षपाती आरोप आपोआप नाहीसे होतील. पॅन-इस्लाममधून त्यांनी 'वसुदैव कुटुंबकम'ची मांडणी केली होती. पण दुर्दैवाने ती कुणी समजून घेतली नाही, अशीही खंत प्रा. मुजीब हमीद यांनी व्यक्त केली.
इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी आपल्या मांडणीत इकबाल यांच्या अनेक आरोपांची चर्चा करत त्यांच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केलं. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी आपल्या लोकप्रिय आत्मचरित्रात डॉ.  इकबालना त्यांच्या मृत्युनंतर पाकिस्तानला पाठवले आहे, असा खुलासा सरफराज यांनी केला. 'राष्ट्रप्रेम व देशभक्तीवर अप्रतिम भाष्य करणारा एक राष्ट्रकवी फाळणीनंतर पाकिस्तानला निघून गेला' असा दावा जाधवांनी आपल्या पुस्तकात केल्याचे ते म्हणाले. पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणवणाऱ्या एका विद्यापीठाचे कुलगुरू इकबालबद्दल खोटी व थोतांड मांडणी करतात, तर इतर अभ्यासकांचे काय? अशा उद्धिग्नता सरफराज यांनी बोलून दाखवली.
इकबालांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना सरफराज म्हणतात, इकबाल हे कार्ल मार्क्सचे कठोर टीकाकार होते. त्यांनी आपल्या काव्यातील एका पात्राच्या साहाय्याने मार्क्सच्या चिंतनाला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. इकबालांचे मार्क्सच्या शोषणविरहित समाजाच्या संकल्पनेशी मतैक्य होते. मात्र वर्गसंघर्षाचा सिद्धान्त मांडून माणसाला नैसर्गिक अवस्थेची समता स्थापित करता येणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते, असे सरफराज म्हणतात. इकबाल यांची खुदीची संकल्पना स्पष्ट करत ते म्हणाले की, स्वत:चा (खुदी) विकास केल्याशिवाय माणूस शोषणाचा सामना करण्यासाठी सिद्ध होऊ शकत नाही, असे इकबालांचे चिंतन होते. समतेसाठी सांगितलेल्या मार्क्सच्या पायाा व सिद्धान्ताच्या पुढे जाऊन इकबाल अतिनिसर्गवादी भूमिका मांडत होते. मार्क्स इश्वराच्या अधिसत्तेला आव्हान देत असल्याची टीकादेखील इकबाल यांनी त्यांच्या काव्यातून केली आहे. इकबालांनी मांडलेली खुदीची संकल्पना नित्शेच्या अधिमानवच्या संकल्पनेसारखी असल्याची मांडणी सरफराज यांनी केली.  
इकबाल यांच्या कवितांवर भाष्य करताना सरफराज म्हणतात, भांडवलदारी मानसिकतेला  उघडे पाडून इकबालांनी मजुरांच्या जागृतीचा एल्गार कवितेतून पुकारला. त्यांनी आपल्या काव्यातून कष्टार्जन, भूमिपुत्रांचा राष्ट्रधर्म, वसाहतिक भांडवलदारी, शोषण या अन्यायाविरोधात आपल्या शब्दांची शस्त्र उगारली. ‘बांगे दिरा’ हा इकबालांचा काव्यसंग्रह इतिहास आणि कल्पनांचे मिश्रण आहेभावना आणि बुद्धिवादाची सांगड घालून इकबालनी आपल्या चिंतनाला त्यात शब्दबद्ध केलं आहे, असेही सरफराज अहमद म्हणाले.
डॉ. फारुख तांबोळी यांनी आपल्या बीजभाषणातून मौलाना आझाद यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. राष्ट्रीय हित राष्ट्रीय ऐक्य जपताना देशातील दोन समुदायात कोणतीही फूट पडू नये, याचा प्रयत्न आझादांनी तहहयात केला. हिंदु-मुस्लीम ऐक्याशिवाय राष्ट्रनिर्मिती शक्य नाही असे मौलानांचे मत होते. पाकिस्तानची मागणी ही धार्मिक नसून आर्थिक आहे असा विचार आझादांनी प्रथमच मांडला. वेगळ्या राष्ट्राला त्यांचा विरोध केवळ सांस्कृतिक आणि राजकीय आधारावर नसून तो धार्मिक आधारानेही होता, असे तांबोळी म्हणाले. फाळणी भारतात सर्वच नागरिकांसाठी अपायकारक आहे असे मत आझादांनी मांडले. आझादांचे असे मत होते की मुस्लिम देशातील विविध प्रादेशिक भागात वेगवेगळ्या स्वरुपात विखुरलेले असल्यानेच त्यांची प्रगती होईल, असे मौलाना आझाद यांना वाटायचे, असे तांबोळी म्हणाले.
प्रादेशिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करणारे मौलाना आझाद स्वातंत्र्यानंतर ही धर्मनिरपेक्ष, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा पुरस्कार त्यांनी सातत्यानं केला. भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानला जाऊ नये म्हणून त्यांनी दिल्लीच्या जामा मस्जिदीतून भारतीय मुस्लिमांना उद्देशून जाहीर प्रवचन दिले. आपली मायभूमी सोडून पाकिस्तानला जाणार्‍या लोकांना त्यांनी विरोध केल होता, आजची पाकिस्तानमधील परिस्थिती पाहून मौलानांची दुरदृष्टी किती व्यापक होती, हे यातून प्रतित होते असेही तांबोळी म्हणाले.

अध्यक्षीय भाषण व समारोप- फ. म. शहाजिंदे

महापुरुषांच्या विचारांबद्दल वाद घालण्यापूर्वी त्यांना समजून घेण्याची मानसिकता हवी. मौलाना आझाद असो वा इकबाल ते काय म्हणतात हे किमान समजून तर घ्या, मग ठरवा कोण महापुरुष खरे आणि कुठले खोटे! बापाने त्याची बुद्धी धर्मवाद्यांकडे गहाण ठेवली होती, तसेच तुम्हीही केले आहे. बुद्धी गहाण ठेवलेला माणूस गुलाम नाही तर काय होणार? अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे यांनी पहिल्या आझाद-इकबाल परिषदेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात फ. म. शहाजिंदे यांनी मुस्लिम राष्ट्रपुरुषांना समजून न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली. मुसलमानांतदेखील या महापुरुषांचे विचार समजून घेण्याची कुवत नाही म्हणत त्यांनी उद्धिग्नता व्यक्त केली.
ते म्हणतात, जो माणूस विचारच करत नाही त्याला आपल्याविरोधात सुरू असलेले राजकारण कसे कळणार? त्यातले डावपेच त्याला कसे कळणार? पुढे बोलताना शहाजिंदे म्हणतात, आपण कुठे चुकलो हे तपासण्याची वेळ आत्ता आली आहे. पूर्वजांचे गुण सांगून काय होणार? या कौतुकाने तुमच्या आयुष्यात काही फऱक पडणार आहे का? त्यामुळे आपल्यातले अवगुण आधी शोधले पाहिजे. धर्मवाद्यांच्या मक्तेदारीवर टीका करताना शहाजिंदे म्हणतात, इकबाल, सर सय्यद, मौलाना आझाद आणि असगरअली इंजिनिअर यांनी सोप्या भाषेत कुरआन भाष्य लिहिले आहे, ते कुणीच वाचत नाही. हे वाचल्यास कळेल की तुम्हाला कुठं-कुठं गंडवलं जात आहे. इकबाल, आझाद, असगरअली वाचल्याशिवाय तुम्हाला इस्लाम व भारतातला मुस्लिम समाज समजणार नाही. या चौघांचे कुरआन भाष्य वाचल्यावर तुमच्यात उलेमांना प्रश्न विचारण्याची ताकद येईल, हा विद्रोह तुमच्यात वैयक्तिक व सामाजिक विकास घडवू शकेल.
आजचा मुस्लिम तरुण विचार करत नाही, अशी खंत बाळगत शहाजिंदे म्हणतात, मुसलमानांत तीन वाईट सवयी आहेत. पहिली ते संघटित होत नाहीत. दुसरी ते वाचाळवीर असतात आणि तिसरा अवगुण म्हणजे त्यांना अजूनही आधुनिक राष्ट्रवादांची चर्चा व मांडणी समजली नाही. भाजपच्या सत्ताकाळात भीतीत राहण्यापेक्षा आपले अधिकार व त्यातील दोष समजून घेतले नाही तर अशीच संधी तुम्ही शत्रुपक्षांना देत राहणार व भीतीच्या दडपणाखाली जाणार, अशी टोचणी शहाजिंदेंनी उपस्थितांना मारली. आपल्या पूर्वजांचे नाव व कुळ माहीत नाही, पण परकीय मुस्लिम शासकांच्या नावे घेत उगाच छाती का फुगवायची? तुम्हाला खेड्यात राहणाऱ्या मुसलमानांची मने कळली आहेत का? एकमेकांच्या सहकार्याने ते राहतात, हे जगणं म्हणजेच गंगा-जमुनी संस्कृती आहे.
आधुनिक भारतात अज्ञानाच्या अंधकारातून मुसलमानांमध्ये सर सय्यद, इकबाल, आझाद आणि इंजिनिअर हे चार समाजाला दीशा देणारे मुसलमान विचारवंत झालेले आहेत. त्यांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. हे चारही प्रकांड धार्मिक विद्वान होते. या विवेकी महापुरुषांचे विचार आपण समजून कधी घेणार असा प्रश्न शहाजिंदेंनी समाजाला विचारला.
अंबाजोगाई रस्त्यावरील मीजान रिडिंग रुममध्ये पार पडलेल्या या परिषदेला लातूरकरांनी मोठी गर्दी केली होता. कार्यक्रम सुरू व्हायला बराच उशीर झाला. तरीही लोकं बसून होती. सेमिनार हॉल तुडंब भरला होता, त्यामुळे ऐनवेळी बाहेर खुर्च्या टाकाव्या लागल्या. 
समारोपाच्या वेळी काही ठराव मांडण्यात आले.
  • इकबाल यांच्यावर अजून एकही पुस्तक मराठीत नाही, त्यांचे मूळ ग्रंथ मराठीत आणणे.
  • गाजियोद्दीन रिसर्च सेंटरच्या माध्यमातून इकबालांवर नवीन ग्रंथमाला प्रकाशित केली जाणार.
  • मौलाना आझाद, सर सय्यद अहमद खान यांची मूळ पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करणे.
  • आधुनिक भारतातील मुस्लिम विचारवंतांची माहिती संकलन करून त्यांची पुनर्मांडणी करणे.
  • मध्ययुगीन इतिहासावर चर्चासत्रे व परिषदा आयोजित करणे.
  • इतिहासाच्या विकृतीकरणाला थांबवणे.
  • मुसलमानांचे जगणे, राहणे खाणे, त्यांच्या उपासना पद्धती, त्यांचे अधिकारांचे जतन करून त्यांना नागरी कर्तव्याची जाण करून देणे.
  • मुस्लिम महापुरुषांच्या विचारांची पुनर्मांडणी करणे, त्यांचे विचारांचा प्रसार-प्रचार करणे.
  • महापुरुषांवर भाषणे, व्याख्याने देऊन समाजात प्रबोधन करणे.
  • महापुरुषांच्या संघर्ष, त्यांचे राष्ट्र उभारणीत योगदान, सामाजिक व ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातील विचारांची पुनर्मांडणी करणे.
  • आदी ठराव या परिषदेत मांडण्यात आले.

आगामी काळात आझाद-इकबाल कॉन्फरन्सला व्यापक स्वरुप प्रदान करण्यात येईल, असंही आयोजकांनी सांगितलं. दरवर्षी नोव्हेबर महिन्यात ९, १० आणि ११ या तीन दिवसात ही परिषद भरवली जाणार आहे. तसेच राज्यातील तालुका व जिल्हा पातळीवर ही आझाद-इकबाल परिषद भरवण्यात येणार आहे. छोट्या शहरातून मुस्लिम महापुरुषांच्या विचारांचे प्रसारण करण्याचे धोरण परिषदेतर्फे ठरवण्यात आले आहे.

संकलन-कलीम अजीम

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: पहिली आझाद-इकबाल कॉन्फरन्स संपन्न
पहिली आझाद-इकबाल कॉन्फरन्स संपन्न
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjlLYHBXQexsICnj13MRiPmikjB-y4kR3vEkntUFyZbpv58f9heX5eicBXhc5rqU8tsJxQ1q9GWeTLvDpjJmR0fcsf-GaxaPa6W0cXhNjwRG9wwyIQSOMSmHRFwSBvgJMr8E5sQv8T7Ct1_/s640/IMG_20181112_213154.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjlLYHBXQexsICnj13MRiPmikjB-y4kR3vEkntUFyZbpv58f9heX5eicBXhc5rqU8tsJxQ1q9GWeTLvDpjJmR0fcsf-GaxaPa6W0cXhNjwRG9wwyIQSOMSmHRFwSBvgJMr8E5sQv8T7Ct1_/s72-c/IMG_20181112_213154.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_12.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_12.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content