चालू महिन्यात टिपू सुलतान, डॉ. मुहंमद इकबाल, मौलाना आझाद आणि जवाहरलाल नेहरू या चार महापुरुषांचा जन्मदिवस आहे. (९ नोव्हेबर इकबाल, १० टिपू आणि ११ नोंव्हेबर आझाद, १४ नोव्बेबर नेहरू) या चारही विद्वानांनी भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना मानवी ऐक्य व त्याच्या उत्थानासाठी वापरली आहे. २०१४च्या सत्ताबदलानंतर ज्या प्रकारे सोयीचा (भगवा) राष्ट्रवाद घेऊन मुस्लिम व अल्पसंख्य़ाकांना असुरक्षित केलं जात आहे, त्यावेळी या महापुरुषांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करणे क्रमप्राप्त ठरते.
११ नोंव्हेबरला (रविवारी) अशीच एक ‘आझाद-इकबाल कॉन्फ्रेस’ लातूररमध्ये पार पडणार आहे. गाजियोद्दीन रिसर्च सेंटरच्या पुढाकारानं होत असलेल्या या परिषदेचा उद्देश मुस्लिमातील वाढती अपराध भावना (गिल्ट) कमी करणे आहे.
मानवी समाजाअंतर्गत लोकसमूह समान जाणिवा आणि मुल्यांच्या निष्ठांआधारे जन्मतात. एकाच तत्वज्ञानावरच्या निष्ठा असणारा वर्ग वाढत गेला की त्याला समाजा अंतर्गत समुहाचे स्वरुप येते. प्रेषित मुहंमद (स) यांच्या माध्यमातून जन्मलेल्या तत्वज्ञानच्या आधारे मुस्लिम समाजसमूह विकसित झाला आहे. अनके प्रतिकांच्या माध्यमातून त्याच्या निष्ठा या तत्त्वज्ञानवर विकसित होत गेल्या आहेते. गेल्या काही वर्षांपासून मात्र त्याच्या या निष्ठांना हादरे दिले जात आहेत.
भाजपशासित सत्ताकाळात इस्लामी तत्वज्ञानाचा आधार असणाऱ्या प्रतिकांचे विकृत स्वरुप समाजासमोर मांडले जात आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिम समाजासमोर पुन्हा वैदिकीकरणाचे संकट उभे राहिले आहे. ज्या वैदिक गुलामीला लाथाडून आपण सुफींच्या अवैदिक इस्लामी समाजक्रांतीच्या माध्यमातून अवैदिक भूमिका घेतली, त्यालाच आव्हान दिले जात आहे. अशा काळात प्रतिकांच्या पुनःप्रस्थापनेची गरज असते. प्रतिकांची (आयकॉन्स) पाळेमुळे समाजात खोलवर रुजलेली असतात. त्या अधिष्ठानावरच समाज उभा राहतो. मुस्लिमांच्या अस्तीत्वाला आव्हान दिले जात असताना. संघप्रमुख सरसकट त्यांना हिंदू (वैदीकवादी) ठरवून त्यांच्य अप्रत्यक्ष वैदिकीकरणाची प्रक्रिया घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला संघाच्या पुरक संस्था ‘घरवापासी’ मोहीमेचा आधार देत आहेत.
योगींच्या नामांतरामागे याच निष्प्रतीकीकरणाची मोहीम आहे. समाजाचे निष्प्रतीकीकरण झाले की त्याच्या गुलामीकरणाची प्रक्रीया राबवणे सोपे जाते. म्हणून कधी अकबरपूरचे आंबेडकरनगर तर कधी इलाहाबादचे प्रयागराज तर कधी फैजाबादचे आयोध्या, बिजापूरचे विजयपूर आणि गुलबर्गाचे कलबुर्गी केले जात आहे. अशा काळात प्रतिकांवरील आपली पकड घट्ट करण्यासाठी त्यांचे काळानुरुप सामाजिक सादरीकरण महत्वाचे असते.
इस्लामी तत्वज्ञानाला भारतीय परिप्रेक्ष्यात पुनर्चिंतनाचे सामाजिक आधार मुहंमद इकबाल यांनी प्रदान केला. मौलाना आझाद यांना सौहार्द व सदभावनेच्या सबलीकरणाची भूमिका घेउन समन्वयशील समाजिक संरक्षण मुस्लिम समाजाला प्रदान केले आहे. वर्तमानकाळात या दोन प्रतिकांच्या माध्यमातून मुस्लिम समाज आपली सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अधिष्ठान आधिक घट्ट करु शकेल. त्यामुळे गाजियोद्दीन रिसर्च सेंटरकडून त्यांच्या पुनःसादरीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी यावर्षीपासून ‘आझाद-इकबाल कॉन्फ्रेस’ आयोजित केली जात आहे. यंदाची पहिली आझाद इक्बाल कॉन्फरन्स लातूरात होत आहे.
या माध्यमातून प्रतिकांच्या सामाजिक सादरीकरणाची एक मोहीम आम्ही राबवतोय. या चळवळीत प्रत्येक जातिधर्माच्या सजग नागरिकांना सामील होण्यचे आवाहन या निमित्तानं करण्यात येत आहे.
आज मुस्लिमांचे भूमिपुत्र असणे किंवा त्यांची प्रादेशिक अस्मिता नाकारली जात आहे. भाजपशासित राज्यकारभारात मुसलमान ओळख दाखवणे गुन्हा झालाय. त्यांचे अलगीकरण करून त्यांना एकटे पाडण्याचे डाव साध्य केले जात आहे. समाजात कुठलाही घटक एकटा असणे भयावह असते, एकटेपणाची हा जाणीव त्या समूहघटकांना संपवण्यासाठी व समूबळ नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरते. पाश्चात्त्य राष्ट्रात कृष्णवर्णीय वंशांच्या माणसाचे अलगीकरण केले जात असे त्याला ‘अपर्थिड’ म्हटले जाई. त्यांना हीन वागणूक दिली जात असे. या प्रक्रियेत कृष्णवर्णीयांचे केवळ वेगळे आणि हीन अस्तित्व शिल्लक असे. आज भारतात हिंदुत्ववाद्यांनी नेमकं हेच तंत्र अवलंबिले आहे. मातृभूमीत मुस्लिमांचे नागरी अस्तित्वच नाकारले जात आहे. त्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्याची भाषा केली जात आहे. त्याचे वेगळे दिसणे त्यांला संपवण्याचे निमित्त ठरत आहे. एका एर्थाने आज भारतात मुस्लिमांची स्थिती अपर्थिडपेक्षाही वाईट आहे.
भारतीय़ मुस्लिमांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान काय? तुमच्यासाठी पाकिस्तान दिलंय मग तुम्ही का जात नाही? फाळणीला मुसलमानच जबाबदार आहेत? तू आज पाकिस्ताननं क्रिकेट मॅच जिंकावा म्हणून दुआ केली ना? असे प्रश्न शाळेतून आता मेनस्ट्रीम मीडियातून विचारले जात आहेत. अशावेळी त्यांना उत्तर देण्याऐवजी तो अपराधभानवनेत जातो. या आरोपांना अनेक मुस्लिम भाऊबंद मनोमन कबूल करतात. नेमकं हेच विरोधी प्रचार करणाऱ्यांना अपेक्षित असतं.
शहरांचे, परिसराचे नामकरण करून मुस्लिमांचे असित्व देशातून पुसून टाकण्याचा डाव साध्य केला जात असताना ‘आझाद-इकबाल कॉन्फ्रेस’ महत्वाची ठरते. मुळात या परिषदेचा उद्देशच भारतातील मुस्लिमांचे राष्ट्रीय प्रतिके जतन करण्याचा आहे. भारतीय मुस्लिमात असलेली एका प्रकारची पराभूत मानसिकता नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. सततच्या मुस्लिमविरोधी प्रचारामुळे निर्माण झालेली अपराधित्वाची भावना काढून टाकणे या कॉन्फ्रेंसचे उद्दीष्ट्ये आहे.
-गाजियोद्दीन रिसर्च सेंटर

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com