सोशल मीडियावर मुस्लिम प्रश्नांची भाटगिरी करणाऱ्यांना स्पष्ट होत नाही की आपल्याला काय म्हणायचं आहे. अशांना मी अनेकदा सांगितलंय की 'तुला काय म्हणायचे ते नीट विस्तृत लिहून दे, मी प्रकाशित करतो' एखाद दुसऱ्यानंच ते टास्क म्हणून स्वीकारलंय, तर बाकीचे अजूनही कॉपी पेस्ट कैटगरीत राहून स्टेटस चोरीतून एकावर एक पोस्टी पाडताहेत. त्यांच्या फेसबुक पोस्टी वाचून अनेकजण मामू बनत आहेत. आता ही पोस्ट अनेकजण व्यक्तिगत घेऊन मला कुरघोड्या म्हणतील, झ्याट मारी ते अन् त्यांची बालीश समज... आपल्याला फरक पडत नाय..
हा विषय विस्ताराने लिहून दे म्हटल्यावर हातभर फाटतेय त्यांची. एअरटेल, पासपोर्ट प्रकरणावर अनेकजण निषेधाच्या पोस्टी टाकून सजग नागरिक असल्याचा पुरावा देत होते, पण कुणालाही ते प्रकरण समजून घ्यावसं वाटलं नाही.
ज्वलंत विषयावर सोशल मीडियावर लिहिणाऱ्या स्टेटस व कमेंटीतून कदाचित ते 'विचारवंत' म्हणून प्रस्थापित होऊ पाहत असावेत. फेसबुक योनीतून जन्मलेले 'इचारवंत' इथं ढिगानं पडलेत. विचारवंत म्हणून टोमणा मारला किंवा ट्रोल केलं तरी त्यांचा अहंभाव सुखावतो. कमेंटला लोकप्रियता मानणाऱ्या अशा लोकांकडून कसली डोंबल्याची अपेक्षा करायचीय आता. हिंदीत तर किमान काहीजण स्वत: विचार करून लिहितात तरी... पण मराठीत इतरांच्या कमेंटला विस्तार देत स्टेटस पाडले जातात.
जातिव्यवस्था, वर्णसमाज, दहशतवाद, रूढी, प्रथा, जमातवाद, दलवाई, मिश्र संस्कृती, सांस्कृतिक वर्चस्ववादावर एकजणही भपाऱ्या मारतात पण दीर्घ लिहा म्हटलं की डेटा आड येतो. मग ते कसली दाखवणार लिहिण्याची हिम्मत.... दोन महिन्यापूर्वी मुस्लिम विषयासंबधी रामचंद्र गुहा व हर्ष मंदेर प्रकरणावर इंग्रजी हिंदीत छान विश्लेषण लिहून येत होतं. 'मुस्लिम मीरर'नं या लेखकांची लेखमाला प्रसिद्ध केली होती. इंग्रजीत लेखस्वरूपात येतेय, ही लेखमाला...
गेल्यावर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान स्टेटस पाडणारे एक दोघांनी लेख लिहिले होते. नोटबंदी, जीएसटी, साहित्य संमेलन व मराठी भाषेवर बोलणारेदेखील दीर्घ लिहिण्यास उत्सुक नव्हते. काही मराठी वेबपोर्टलनं फेसबुकर्सना लिहितं केलंय. त्यातून अनेक चांगले सदरलेखक लिहिते झालेत. काहींनी आपले ब्लॉग सुरु केलेत. अनेकजण स्क्रॉल, फर्स्ट पोस्ट, दी वायरसाठी लिहितात. काहीजण अल झजिरापर्यंत पोहोचलेत. यांची फेसबुक पोस्टही वाचनीय असते. लेख लिहिताना उत्तम पद्धतीने संदर्भ देतात, इथं नियमित लिहिणारे कहीजण प्रिंटमध्येही उत्तम लिहितात. त्यांची विश्लेषण क्षमता कमालीची वाढली आहे. संदर्भ, मांडणी, आकलन यातून बऱ्याच गोष्टी नव्यानं कळतात. भीमा कोरेगाव घडल्यानंतर अनेकांनी विस्तारानं लिहिलं होतं, कॉ. भीमराव बनसोडनं या लिखाणाचं एक पुस्तक संकलित केलंय.
सोशल मीडियाच्या डेली अल्गोरिदमवर व्यक्त होणारे प्रासंगिक विषयावर भिकार न्यूज वेबसाईटच्या बातम्या पेस्ट करतात. एकाने जिओची मारली, की सगळेजण एकसुरात मारायला येतात. काहीजण प्रासंगिक घटनांवर उत्तम उपहास मांडतात, तर काही खुसखुशात विडंबन करतात. राम जगताप व मुकेश माचकर मास्तरनं अशांना लिहितं केलंय. हे लिहिणारे सध्या छानपैकी लिहिताहेत. मध्यतंरी एका मराठी वृत्तपत्रानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व आत्महत्यावर थट्टा केली होती, यावर सोशल मीडियावर बरीच आदळापट झाली. पण हर्शलनं अशा बोलणाऱ्याकडून पैसे देऊन चांगले लेख लिहून घेतले होते. अजूनही ते लेख त्याच्या ब्लॉगवर आहेत.
फॅसिझम, नक्षलवाद, काश्मीर आणि मुस्लिम प्रश्नांवर झाटभर माहिती नसलेले लोकं आक्रमक पोस्टी पाडत असतात. तेच सरकारच्या आर्थिक धोरणासंदर्भात होतं. अपुऱ्या माहितीवर इथं रियक्शनरी फौजा तयार होत आहेत. वस्तुनिष्ठ मांडणीला लाथाडत 'कही सुनी बातो पर' चर्चा जिंकायला सरसावतात. परवा एकानं पुण्यातील जंगली महाराजांचं मुस्लिमीकरण का करतोय?, अशी भाटगिरी एकाच्या वॉलवर केली. पोस्टकर्ता त्याला उत्तरे व संदर्भ देऊन थकत होता, पण हा बहाद्दर इतिहासाचं इस्लामीकरण होतेय असा सूर आळवत होता.
धुळेच्या मॉब लिचिंगवर लाखो पोस्टी पडल्या, पण त्यांनी झारखंड, अलवर, मालेगाव, अहमदनगर, युपीच्या मॉब विचिंगवर बोटं झिजवली नव्हती. काश्मीर, झारखंड, आसाममध्ये मारल्या गेलेल्या हिंदुंवर ते तटस्थ होते, झारखंडची घटना तर इतकी विदारक होती की, पीडित हिंदू असल्याचे आयडी कार्ड पुरावे म्हणून दाखवत होते. पण उन्मादी झुंड 'तूम मुस्लिम बच्चाचोर हो!' म्हणत त्यांना कुटुंबासमोर शिरच्छेद करत होते.
धुऴे घडताच अनेक मान्यवर वृत्तपत्र व वेब पोर्टलमधून अनेेकजण बोलते झाले. एकानंही गेल्या वर्षातील मॉब लिचिंगचा आकडेवारीनुसार उल्लेख केला नाही. किंवा झुंडीच्या मानसिकतेवर प्रहार केला नाही. इतरांवरहल्ला करणारे ही झुंड आता सामान्यावर हल्ले करू का लागली? याची चर्चा कुणाही 'माय का लाल'ने आपल्या लेखात केली नाही. एकूणात काय तर फेसबुक अल्गोरिदमच्या कंटेनवर मत प्रदर्शित करण्याची स्पर्धा लागलेली असते, पण फेसबुक त्या विषयावर लिहायला भाग का पाडते
याचा विचार करायला कुणाकडेही वेळ नसतो.
(फेसबुक पोस्ट)
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com