अलीगड वाद सुरु असताना कुठेतरी उभं राहून ओरडून सांगावसं वाटतं की, ‘हो मी मुस्लीम मार्क्सवादी आहे.’ कारण, अलीगड विद्यापीठाच्या संघर्षाला अनेक पैलू आहेत. या संघर्षाचे काही पदर आणि त्यावरील चर्चा मुस्लिमांना देखील बोचणारी आहे. त्यामुळे अलीगडचा बळी ठरलेला आहे का? अशी शंका यायला मोठा वाव आहे. एखादा समाज गुलाम करायचा म्हटला की त्याच्या मूल्यनिष्ठा आणि सांस्कृतिक धारणा व त्याला अधिष्ठान देणारे सामाजिक बिंदू यावर आघात करायला लागतो. तो आघात आता होत आहे. अशावेळी नेहमीच ‘‘दिन बचाओ दस्तूर बचाओ’’ किंवा ‘खतरे में’ चे तुणतुणे वाजवणारे कुठेच दिसत नाहीत.
अलीगड चर्चेला धर्मकेंद्रीत ठेवणारे कुणीही या संघर्षात उतरणार नाहीत. अलीगड आणि देवबंदच्या समर्थकांकडून देवबंद की अलीगड हा चॉईस एकेकाळी विचारला जायचा. काही सुबुद्ध समर्थक त्याला देवबंदसोबत अलीगड किंवा अलिगडसोबत देवबंद हे उत्तर देऊन सदसद्विवेक जागृत असल्याचं दाखवून देत होते. आता काही दिवसांपूर्वी ’मैं मदरसे के बच्चो के हाथ में कुरआन के साथ कम्प्युटर का माऊस देना चाहता हूँ’ ही घोषणा करणारे जिथे विवेकाचा माऊस सदैव हलता ठेवला जायचा त्या विद्यापीठात घुसखोरी करताहेत. त्याला बंद पाडण्याचं प्रयत्न करताहेत. अलीगडवर आघात करुन एका समाजवर बौद्धिक पंगूत्व लादण्याचा प्रयत्न होत आहे. बौद्धीकदृष्ट्या एखादा समाज पंगू बनला की, त्याचा संवेदनाविरहीत गुलामांसारखा यांत्रिकी वापर सुरु होतो. मुस्लीम समाजाचा असा वापर जितका संघाला करायचा आहे. तितका उलेमांनादेखील करायवया आहे. त्यामुळे संघासोबत उलेमांना देखील अलीगडचे अस्तीत्व खुपत आहे. या कारणानेच उलेमा अलीगडच्या समर्थनार्थ समोर येणार नाहीत.
मुस्लीम धर्मपंडिताचा अलीगडला विरोध असण्याचं आणखी एक कारण म्हणजे अलीगड विद्यापीठ मार्क्सवादी चळवळीचे एक केंद्र आहे. मोहम्मद हबीब यांच्यापासून सुरु झालेला हा साम्यवादी मुस्लीम प्रवाह एम. अतहरअली आणि आता इरफान हबीब यांच्यापर्यंत निरंतर वाहत आहे. आम्ही डावे आहोत. सुबुद्ध आहोत. मुसलमान आहोत. पण आमचे डावेपण. खल्दुनवादी आहे. कम्युनिस्ट डावेपणा आम्हाला मान्य नाही. आम्ही स्वीकारलेला मार्क्स इब्ने खल्दूनच्या कबरीवर फातेहा पठन करणारा मुरीद आहे. पण यावर चर्चा सहन होते कुणाला? आणि करु पाहिलीच तर जेथे या चर्चा होणार त्या मंचाला देखील तुम्हाला उद्धवस्त करणार. अलीगड खल्दूनपंथी मुस्लीम मार्क्सवादी आंदोलनाचे मंच आहे. ज्यांना धर्माच्या माध्यमातून शोषण अबाधीत ठेवायचे आहे. त्या अल्याड-पल्याडच्या लोकांना हा मंच बोचत राहणार. मुस्लीम साम्यवादाची कबर अलिगडच्या माध्यमातून खोदली जाणार आहे. म्हणून कुठेतरी उभं राहून ओरडून सांगावसं वाटतं ‘होय, मुस्लीम मार्क्सवादी आहे’ पण सांगता येत नाही. कारण जिथे प्रबोधनाचे बी पेरायचे त्या मातीशी वैर पत्करुन चालेल कसे. म्हणून व्यक्त न होणारी जीवघेणी घुसमट मागील काही दिवसांपासून अनुभवत चाललोय.
एक विवेकवादी
#मुस्लीम_मार्क्सवाद
(एका अस्वस्थ मित्राने 'नजरिया' साठी इनबॉक्स केलेली पोस्ट)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com