मा. सपांदिका, (मिळून साऱ्याजणी)
विद्या बाळ, पुणे
महोदया,
एप्रिल २०१८च्या ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या अंकात तमन्ना इनामदार यांचा ‘मदरसा’ शिक्षणपद्धतीसंदर्भात लेख वाचला. संबध लेख वाचल्यावर असे लक्षात आले की लेखिकेने शब्दबद्ध केलेला मजकूर दीशाभूल करणारा व मूळ विषयापासून पळ काढणारा आहे.
सुरुवातीलाच लेखिकेने ‘मद्रसा’ शब्दाच्या उत्पत्तीबाबत तर्क मांडला आहे, पण त्याचे ऐतिहासिक संदर्भ दिलेले नाहीत. दुसऱ्या वाक्यात मदरसामध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, या आरोपाची सरळ मांडणी केली आहे.
२०१४ साली भाजप सरकार सत्तेवर येताच वरील कथित आरोपावर त्यांच्याच गृहमंत्रालयाने स्पष्ट निर्वाळा दिला होता की अशा प्रकारची कुठलीच कारवाई मदरसामध्ये होत नाही. इतकच नाही तर भाजप सरकारने १०० कोटींचं अनुदानही देऊ केले होते.
लेखिकेने बिहारमध्ये ‘दारूल उलम देवबंद’ स्थापित केले आहे. सर्वज्ञात आहे की देवबंद विद्यापीठ हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण लेखिकेने क्रास संदर्भ न तपासता जाहीर दावा केला. दुसरं म्हणजे बरेलीत कुठलही विद्यापीठ नाही.
देवबंद हे तबलिगी विचारसरणीचा मदरसा असून तर बरेलीत ‘सुन्नी जमात’ या विचारशाखेतून चालणारे मदरसे व मकतब (पुस्तकालय व अभ्यास सेंटर) आहेत. हजरत मुहंमद (स) पैंगबर हे शेवटचे प्रेषित होते, मग ते इस्लामचे संस्थापक कसं काय ठरू शकतात? कारण बहुतेक मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की, पैगंबरापूर्वीदेखील अनेक प्रेषित होऊन गेलेले आहेत. ज्याचा दाखला कुरआनही देतो. जसे प्रेषित एडम, प्रेषित मोजेस, प्रेषित इसा, प्रेषित जेकेब इत्यादी... उपरोक्त सर्वांनी एकेश्वरी तत्त्वाचा (इस्लाम, अल्लाह) पुरस्कार केलेला आहे.
तिसऱ्या मुद्द्यात, मदरशामध्ये दिले जाणारे शिक्षण हे धार्मिकच असते, हे काहीअंशी खरं आहे, पण अलीकडे काही मदरशामध्ये कौशल्य विकासासह, कलाकुसर, तंत्रज्ञ, मराठी (प्रादेशिक भाषा), इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान, असे विषय विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी असतात.
मदरसा आधुनिकीकरण धोरणानंतर राज्य व केंद्र सरकारने मदरसा बोर्ड उभा केला असून ज्या मदरशांनी सरकारी धोरणं स्वीकारली आहेत, तिथं पूर्णवेळ आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळादेखील उभ्या झाल्या आहेत.
मुळात महिलांविषयक मासिकात लेख लिहिण्याची संधी उपलब्ध झाली असताना, मुलींच्या खास मदरशाविषयी लिहिणे अधिक महत्त्वाचे होते, पण लेखिकेने दोन वाक्यात मुलींच्या शिक्षण परंपरेला संपवलं आहे.
मुलींच्या मदरसा कशा प्रकारचा असतो, त्यांचा दिनक्रम, सुरक्षा, आरोग्याचे प्रश्न, निवासाची व्यवस्था इत्यादींबाबत अनेक मुद्दे अजूनही गुलदस्त्यात आहेत. या बद्दल थोडासा प्रकाश टाकला असता तर सर्वच वाचकांना ती उपयोगी पडली असती.
शेवटचा मुद्दा म्हणजे ‘मदरशातले शिक्षण आणि वास्तव’ या शिर्षकासंदर्भात कुठलीच परिपूर्ण माहिती लेखात अधोरेखित होत नाही. खेदाने सांगावे लागते की, मराठी वाचकांच्या मनातील गैरसमजूती काढण्यास सदर लेख अपूरा पडला आहे.
कलीम अजीम, पुणे
मेल-kalimazim@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com