भाभी
लग्न होऊन
आली त्यावेळी भाभी 15 वर्षांची असावी, तिची पूर्ण शारिरीक
वाढही झाली नव्हती.
भैय्याचा चेहरा बघून ती खाटकाच्या गायीसारखी भेदरायची. पण वर्षभरातच न उमललेल्या
कळीपासून खुलून ती फूल झाली होती. तिचं शरीर भरलं होतं. केस काळेशार व
दाट झाले. डोळ्यात हरणासारखी भीती दूर होत तेज व चपळता आली. भाभी स्वतंत्र
विचाराच्या कुटुंबातून आली होती. कॉन्व्हेटच्या शाळेत तिचं शिक्षण झालेलंं.
गेल्या वर्षी तिच्या मोठ्या बहिणीने एका इसाई मुलासोबत पळून जाऊन
लग्न केलं. याच भीतीपोटी
तिच्या आई-वडिलांनी तिला कॉन्व्हेटहून काढून लग्नमंडपात बसवलं होतं.
भाभी स्वतंत्र वातावरणात लहानाची मोठी झाली होती, हरणासारखी हुदडंग तिच्यात होती, पण
सासर आणि माहेरकडील सर्वांच्या नजरा तिच्यावर रोखलेल्या असायच्या. भैय्याचादेखील नेहमी प्रयत्न असायचा की तिला
गृहकर्तव्यदक्ष बनवावं, नसता विवाहित असतानाही मोठ्या बहिणासारखी काहीतरी उद्योग करायची, अशी भिती भैय्याला
सतत वाटायची. यातून मार्ग काढण्यासाठी भैय्या तिला पूर्ण गृहिणी बनवायला प्रयत्नशील असायचा.
चार-पाच वर्षात भाभीला घासून-पसून सर्वांनी एक टिपीकल गृहिणी
बनवलं. ती आता तीन मुलांची
जाडजूड आई होती. अम्मी तिला चिकन, कोंबड्याचा
रस्सा खाऊ घाली. तर भैय्या
टॉनिक पाजवत, तीन
मुलांनंतर ती अधिकच जाडजूड दिसायला लागली होती. प्रत्येक अपत्यानंतर तिचं वजन दहा-पंधरा पौंडाने वाढे.
हळुहळू करत तिनं श्रृंगार पूर्णत: सोडला. भैय्याला लिपिस्टिक
बिलकूल आवडत नसे, डोळ्यात
कच-कचून भरलेलं काजळ बघून ते चिरडायचे. भैय्याला फक्त हलका गुलाबी रंग आवडायचा, भाभी
नेहमी गुलाबी रंगच परिधान करायची, गुलाबी
साडीवर हलक्या रंगाचा
ब्लाऊज किंवा गडद गुलाबी ती वापरायची.
लग्नाच्या वेळी तिचे केस लहान होते,
पण नवरी सजविताना तिच्या केसांना तेल लावून बांधण्यात आलं होतं. एका मागोमाग मुलं झाल्यानं ती आता
थोडीशी टक्कल पडल्यासारखं
दिसायची. तसंही ती केस करकचून बांधायची, त्यामुळे
ते जाणवायचे नाही.
नवऱ्याला ती अस्तव्यस्त व मळकट अशीच छान वाटायची आणि सासर व माहेरचे साधी-सुधी म्हणून तिचं कौतुक करायचे. भाभी खरंच फार गोड
दिसायची. मस्क्यासारखी
ती उजळ होती, हात-पाय
सुडौल पण तिने स्वत:ला खूप वाईट पद्धतीने
लोंबतं सोडलं होतं. जमिनीवर पडलेल्या पीठासारखी ती पसरत जात होती.
इस्मत चुगताई य़ांच्या 'भाभी' कथेतील
एक अनुवादीत तुकडा
*उर्दूतून
मराठीत करण्यासाठी बेगमची बरीच मदत होतीय, तिच्याशिवाय
हे शक्य नाहीये..

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com