औरंगाबागदच्या तबलिगी इज्तेमाला आज एक आठवडा पूर्ण झाला. इहलोकी व पारलौकी चर्चा आता संपली असेल असं गृहित धरुन आज हा लेख प्रकाशित करत आहे. इज्तेमाच्या पहिल्या दिवशी मी साधी फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यावर अनेक जणांनी मला टारगेट करत कॉमेंट केल्या. काही जणांनी तर व्यक्तिगत संदेश पाठवून मला निकाली काढले. तर काही लेबल चिटकवून मला बहिष्कृत करून गेले. पण प्रश्न तो प्रश्न राहिला. कुणीही त्याचं अपेक्षित उत्तर दिलं नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर स्वरुपात मांडत आहे.
महाराष्ट्रात तब्बल अकरा वर्षांनंतर राज्यस्तरीय ‘तबलिगी इज्तेमा’ फेब्रुवारीत पार पडला.
2014च्या सत्ताबदलानंतर मुस्लीम समुदायाच्या सांस्कृतिक व धार्मिक अस्मितेवर घाला
घातला गेला, या ‘एथनिक’ आयडेन्टिटीची जपवणूक
करण्याच्या दृष्टीने औरंगाबादच्या इज्तेमाकडे पाहिले गेले. घरवापसी, भारत माता, वंदे मातरम, गोमांस बंदी, मॉब लिचिंग आणि
राष्ट्रियता या मुद्यावर देशातील अल्सपसंख्याक मुस्लिम समुदायाला असुरक्षित केलं
गेलं. अशा अवस्थेत पुन्हा संघटित होण्याच्या दृष्टीने या इज्तेमाकडे पाहिले गेले.
या एकत्रिकरणाचे राजकीय व सामाजिक पैलू काय आहेत, याची चर्चा व विश्लेषण होईलच, पण त्याआधी यातून काय
मिळवलं याची मिमांसा अपेक्षित आहे. या विषयावर मंथन होईल की नाही माहीत नाही. पण
काही अनुत्तरीत प्रश्न हा इज्तेमा सोडून गेला आहे त्या प्रश्नांची उकल व समाधान
शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरते.
24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2018ला औरंगाबाद शहराजवळील लिंबे जळगाव
भागात या भव्य-दिव्य अशा इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या कालावधीनंतर
आयोजन होत असल्याने साहजिकच सर्वांचे लक्ष या इज्तेमाकडे लागलं होतं. राज्यातील
तमाम मुस्लीम समाज गेल्या चार-एक महिन्यापासून मनोभावीपणे इज्तेमाच्या कारसेवेत
व्यस्त होता. स्वत;हून वेळ व पैसा खर्च करून
प्रत्येक घरातून किमान एकजण तरी अशा प्रकारे अनेकजण इज्तेमास्थळी नियोजनात बांधिलकी
जपत होते.
या भव्य-दिव्य कार्यक्रमाला
आठवडा उलटला आहे, पण नियोजन, सेवाभाव, एकता आणि सुविधेच्या कौतुकाचे गोडवे काही कमी
होताना दिसत नाही. यासोबत कार्यक्रमाच्या भव्य-दिव्यतेबद्दल अजूनही चौक-गल्ली गप्पा रंगत आहेत. इज्तेमाच्या चर्चा आणि गप्पा सोशल मीडियाची मोठी
जागा आजही बळकावत आहेत. प्रसार माध्यमांनी दिलेल्या ‘अभूतपूर्व’ प्रतिसाद
व ‘स्पेशल कव्हरेज’मुळे
महाराष्ट्रातील इस्लामच्या अनुयायांची मीडियासंदर्भातली तक्रार काहीअंशी कमी झाली
असावी अशी शक्यता आहे. कधी नव्हे ते मीडियाने यंदा मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमाला
स्पेशल कव्हरेज दिलं आहे. सुरुवातीला निगेटीव्ह वृत्तापासून सुरु झालेला हा प्रवास
मेजर हॅप्पनिंग म्हणून मीडियानं ट्रीट केलं.
प्रसार माध्यमांनी या इज्तेमाला स्पेशल कव्हरेज दिलं. सोबतीला
पॅरलल मीडियादेखील होता. त्यामुळे या इज्तेमाची भव्यता देशभरात चर्चेचा विषय झाली.
तब्बल अडीच हजार एकर जागेत याचं नियोजन करण्यात आलं होतं. मुख्य मंडप 1 कोटी 5 लाख
चौरस फूटाचा होता. इतका मोठा भौगौलिक क्षेत्रफळ पाहता इज्तेमाची भव्यता आपोआप
दिसून येते. न भूतो न भविष्यती अशी अलोट गर्दी इज्तेमास्थळी पाहायला मिळाली. आयोजकांनी
दावा केला होता की तब्बल 50 लाख भाविक येतील. पण प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार
देश-विदेशातून तब्बल 1 कोटी भाविक इज्तेमात सहभागी झाले. गर्दीचे सर्व विक्रम मोडत
कुठलीही अप्रिय घटना न घडता असा हा भव्य-दिव्य तीन दिवसीय इज्तेमा पार पडला.
नियोजन, सुविधा, सेवाभाव,
एकी इत्यादी विषयाचे मेसेज आणि फेसबुक पोस्ट व्हायरल होत असताना इज्तेमामध्ये कुठला विचार एकला याबद्दल तसूभरही चर्चा होताना दिसत नाही. कुठलीच
फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्स एप मेसेजमध्ये इज्तेमास्थळी अमूक-तमुक मोलाचे विचार
ऐकले असा आशय किमान माझ्यातरी पाहण्यात-वाचण्यात आलेला नाही. त्यामुळे आयोजकांनी
लावलेला कोट्यवधींचा ‘माल ए दिन’ पाण्यात गेला का? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
इज्तेमातील सहभागी भाविकांच्या स्पिरिच्युटींवर मला संशय किंवा आक्षेप नोंदवायचा
नाहीये, त्यात मला काडीचाही रस नाही.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com