सायबर गुन्ह्यातील राजकारणी

डिजिटल डेटा इकोनॉमीसाठी ऑक्सीजन ठरणार आहे असं विधान उद्योजक मुकेश अंबानी यांनी दिल्लीतील इंडियन मोबाइल कांग्रेसमध्ये गेल्या वर्षी केलं होतं. वृत्तपत्राच्या बिझनेस पानावर आलेल्या या बातमीवर कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही. पण याच डिजिटल डेटावरून सध्या सुरू असलेला केंब्रिज अॅनलिटीका  फेसबुक वाद जगभरात राजकीय वातावरण तापवत आहे. 
कोट्यवधीं यूजर्सचा डेटा चोरीच्या वृत्तामुळे सोशल मीडिया फर्म फेसबुकला न्यूयॉर्क शेअर बाजारात मोठं नुकसान सोसावं लागलं, त्यामुळे फेसबुक संस्थापकाने यूजर्सची माफी मागितली आहे. तर दुसरीकडे केंब्रिज अॅनालिटिकाच्या लंडनच्या मुख्यालयात छापेमारी सुरु झाली आहे. यामुळे अमेरिका भारतांसह अनेक ठिकाणी राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. भारतातकेंब्रिज अॅनलिटीका कंपनीच्या अमेरिका, भारत, ब्रिटन, केनियाब्राझिलच्या राजकीय क्लाईंटमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. 

अमेरिकन राष्ट्रपदाची निवडणूक व भारतातील 2014च्या सार्वत्रिक निवडणूकीत डिजिटल डेटा चोरीवर मीडिया रिपोर्टमधून अनेक नव-नवे खुलासे बाहेर येत आहेत. बुधवारी केंद्रीय आयटी आणि कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या प्रकरणाची दखल घेतली. फेसबुकवरील आरोप सिद्ध होत असतील तर नियमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली जाईलवेळेप्रसंगी फेसबुक सीईओ मार्क जकेरबर्ग यांची भारतात आणून चौकशी करू असंही प्रसाद म्हणाले. 
इतकंच नाही तर 2019 साठी काँग्रेसने केंब्रिज अॅनालिटिकाशी सूत जुळवल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला. तर दुसरीकडे एनडीटीव्हीने एक धक्कदायक खुलासा करत भाजपच या कंपनीचा मोठा क्लाईंट असल्याचा गौप्यस्फोट केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने काँग्रेसची छबी खराब करण्यासाठी या डिजिटल डेटाचा वापर केल्याचा कंपनीचे भारतातील भागीदार अवनीश रॉय यांनी दावा केला. चॅनलने दाखवलेल्या विषेश मुलाखतीत अवनीश रॉय यांनी व्हिसलब्लोअरची भूमिका बजावत भाजपच्या अनेक नेत्यांची नावे जाहीर केली. अवनीश रॉय यांनी भाजपचा खोटारडा चेहरा चॅनलवर उघड केला.
कैंब्रिज अॅनालिटिका कंपनीची भारतीय पार्टनर ओव्लेनो बिजनेस इंटेलिजेंस’ (ओबीआई) ने भाजपसोबत जेडीय़ू काँग्रेसलाही आपला क्लाईंट घोषित केलं आहे. या डेटा ट्रेड फर्मच्या संचालकामध्ये अवनीश रॉय सोबत जेडीयूचे खासदार के. सी त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी आहेत. पण के. सी. त्यागी व त्यांच्या मुलाने फेसबुक डेटा ट्रेड’ केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. 
याऊलट 2016 मध्ये भारतीय मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्पसोबत काम करत असल्याचे अमरीश त्यागींनी कबुली दिली होती. याच केंब्रिज अॅनालिटिकावर अमेरिकेतील 5 कोटी फेसबुक यूजर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप आहे. अमरिश त्यागींनी अमेरिकन भारतीयांच्या सवयी जाणून घेऊन ट्रम्पसाठी राजकीय मतप्रवाह बदलण्याचं काम केलं होतं. (15 सप्टेबर 2016, न्यूज वर्ल्ड इंडिया)
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या तीन महिन्यापासून डिजिटल डेटा चोरी व राजकीय मतं परावर्तीत केल्याचे आरोप होत आहे. अमेरिकन मीडिया संस्था या आरोपावरून ट्रम्प यांच्यावर तुटून पडल्या आहेत. जनतेचा मत प्रवाह बदलणे, त्यांना पैसा पुरवणे,निवडणूक जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करणे इत्यादी आरोप ट्रम्पवर होत आहे. यामुळे महत्त्वाच्या किमान डझनभर प्रशासकीय लोकांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच ट्रम्प सरकारमधील सात मंत्र्यांनी एक तर राजीनामे दिले किंवा त्यांना काढून टाकण्यात आले. 
अमेरिकेन सिनेटने किमान एवढं तरी औदार्य दाखवलं,पण भारतात मोठं-मोठ्या आरोपावरून सरकार व विरोधकांमध्ये कुठलीच हालचाल होताना दिसत नाही. भारतात 2014च्या लोकसभा निवडणुकानंतर डिजिटल डेटा चोरीचे अनेक आरोप भाजपवर झाले आहेत,त्यामुळे आत्ताच काहीतरी नवीन घडले असं नाही, फक्त या आरोपांना दुजोरा देणारे ऑफिशियल संदर्भ मीडिया रिपोर्ट झाले इतकेच.
भारतात गेल्या दोन-तीन वर्षांत यूआयडी म्हणजे आधार कार्ड धारकांच्या डिजिटल डेटा चोरींच्या घटना घडत आहेत. भाजप सरकारने अध्यादेश काढत विविध योजनांसाठी आधार नंबर सक्तीचा केला आहे. यावरून देशात गदारोळ माजला आहे. सुप्रीम कोर्टात आधार सक्तीवर सुनावणी सुरू आहे, पण सरकारने आधार सक्तीचा धडाका लावला आहे. 
ऑगस्ट 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने सामान्य जनतेच्या राईट टू प्रायव्हसीसंदर्भात महत्त्वाचा निकाल देत जनतेच्या गोपनिय अधाकाराचे जतन केले. तसेच आधार संदर्भातही काही दिशा-निर्देश जारी केले होते. यावर गोपनिय अधिकार मुलभूत काय तर सामान्यही असू शकत नाही असा युक्तीवाद सरकारने सुप्रीम कोर्टात केला होता.
ऑगस्ट 2017मध्ये आलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये देशभरातील 80 हजार नागरिकांची आधारची गोपनिय माहिती खाजगी कंपन्यांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. गुरुवारी 22 मार्चला सरकारकडून आधारवर युक्तीवाद करण्यात आला. यात सरकारने म्हटलंय की 10 फुट चौरस आणि 15 फूट लांब अशा एका भींतीत आधारचा डेटा स्टोर करून ठेवला आहे. अशा प्रकारे आधार डेटा सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा सरकारने वारंवार केला आहे, पण तरहीही आधार डेटा लीक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आधार डेटा सुरक्षित आहे, हे भाजप सरकारचे दावे फोल ठरत आहेत.  आधार डेटा चोरीच्या घटनेनं नागरिकात भीतीचं वातावरण आहे.
नोटबदलीनंतर भाजपने कॅशलेस व डिजिटल व्यवहारांचे मार्केटिंग केलंपण सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने कुठलेच पाऊल उचलेलं नाहीये. ऑनलाईन बँकिंग व्यवहारात दररोज फसवणुकीच्या बातम्या येत असतात. डिजिटल व्यवहार प्रणालीत दिवसागणिक फ्रॉड होत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. दिवसाढवळ्या सामान्य जनतेच्या पैशांवर दरोडे घातले जात आहेत. आधार, पॅन कार्डमधून तुमचा गोपनीय डेटा चोरून हे डाके घातले जात आहेत. ऑनलाईन बँकिंग पासवर्डएटीएम पासवर्ड चोरून पैसे परस्पर लंपास केले जात आहेत. 
पण सरकारने जनतेचे पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी अजूनही कुठलीच यंत्रणा अस्तित्वात आणलेली नाही. त्यामुळे सरकारच्या भरवश्यावर बसण्याऐवजी आपल्यालाच आपला डिजिटल डेटा सुरक्षित करावा लागणार आहे. थर्ड पार्टीकडून येणाऱ्या तुम्ही कुठले राजकारणी होणार?, कुठला पक्ष तुम्हाला जवळचा आहे?, तुमची गर्ल/बॉयफ्रेड कसा असेल? अशा अवांछित मेसेजला प्रतिसाद देण्याची गरज नाही. 
तसेच असे मेसेज रोखण्यासाठी फेसबुकच्या सेटिंगमध्ये एप्सवेबसाइट्स आणि प्लग इनच्या खाली दिसणाऱ्या एडिट बटनावर क्लिक करून प्लेटफार्मला डिसेबल करा. तसेच इतर कॅटेगरीना देखील अनक्लिक करा जे तुम्हाला नको आहेत. शक्य झाल्यास खासगी माहिती फेसबुकला स्टोअर करू नकामुली व महिलांनी वारंवार फोटो व अन्य माहीती अपलोड करण्यापासून स्वत:ला रोखावे.
फेसबुकच्या डेटा चोरीवरून खूप काही घाबरून जाण्याचं कारण नाहीभाजप सरकारने जरी हात वर केले असले तरी इथल्या लोकशाही निवडणूक प्रक्रियेत कुठलीच बाधा पोहचणार नाहीये. निवडणूक जिंकताच फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणारे आपले प्रधानसेवक अजूनही या विषयावर गप्प आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या आयटी सेलनं आधिक सजगपणे आरोप फेटाळून लावण्याचं काम सुरु केलं आहे. दुसरीकडे प्रधानसेवकांच्या नमो अॅपसंदर्भातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. नमो अॅपवरुन यूजर्सची माहिती चोरली जात आहे, असे दावे सोशल मीडियावर सुरु आहेत.. यासंदर्भात आलेला एक मेसेज असा, 
"आपण नरेंद्र मोदींचे चाहते असा किंवा विरोधक. तो लोकशाहीतील आपला हक्क आहे. मात्र सध्याNarendra Modi हे ॲपवर जी गंभीर चर्चा सुरू आहे, त्याकडे  गंभीरपणे पहा. तंत्रज्ञानाचा गैरवापर आपल्या घरात शिरला नाही, ना याची खात्री करा. आपल्या स्मार्ट फोनमध्ये जाणीवपूर्वक किंवा चुकून Narendra Modi हे ॲप डाऊनलोड केले असेल तर सावधान. सर्वप्रथम ते डिलीट करा. इंडियन एक्स्प्रेस या विश्वासार्ह दैनिकात आलेल्या माहितीनुसार फ्रेंच सिक्युरिटी रिसर्चर इलियट अँडरसन यांनी आरोप केला आहे की हे अँड्राइड ॲप डाऊनलोड करताक्षणी संबंधित व्यक्तीची सगळ्या प्रकारची वैयक्तिक माहिती (कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक वा आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा उपयोग करुन आपण जे जे गुप्त किंवा वैयक्तिक व्यवहार करता ती सगळी माहिती) या ॲपच्या माध्यमातून एका अमेरिकन कंपनीकडे जाते. आपला पूर्ण अभ्यास करुन ही माहिती ही कंपनी मोदी यांच्या माध्यम टीमकडे पाठवली जाते.
इलियट अँडरसन यांनी गेल्या शुक्रवारी यासंदर्भात व्टिटरवर यासंदर्भात माहिती दिली की Narendra Modi  हे ॲप डाउनलोड होताच आपले प्रोफाइल तयार होते. त्याचक्षणी आपल्या डिव्हाइसची (फोन, टॅबलेट इ.) संपूर्ण खासगी माहिती एका थर्ड पार्टी डोमेनसोबत in.wzrkt.comशेअर केली जाती. हे डोमेन अमेरिकेतील क्लेव्हर टॅप या कंपनीचे आहे. आपल्या फोनची वा आपण वापरत असलेल्या उपकरणाच्या माहितीमध्ये ऑपरेटिंग सॉफ्टवेअर, नेटवर्क टाइप, कॅरिअर आदी माहिती समाविष्ट आहे. क्लेव्हर टॅप ला दिल्या जाणआऱ्या खासगी माहितीत यूजर चा ईमेल आयडी, फोटो, नाव, लिंग आदी माहिती असते. ज्याचा हे ॲप वापरणाऱ्याला पत्तादेखील नसते.
Narendra Modi  ॲप ही सगळी माहिती एकत्र करुन in.wzrkt.com. या डोमेनसोबत शेअर करते. इलियट अँडरसन  यांनी सांगितले की या डोमेनला जी-डेटा (G-Data) कंपनीने फिशिंग लिंक स्वरुपात वर्गीकृत करुन ठेवले आहे. फिशींग लिंक अशी वेबसाइट असते की जो त्या व्यक्तीची सत्यता पडताळून अकाऊंट पासवर्ड आणि अन्य गोपनीय माहिती चोरुन घेतो
अँडरसन यांनी पुढे नमूद केले की in.wzrkt.com डोमेन क्लेव्हर टॅप या अमेरिकन कंपनीचे असून या कंपनीद्वारे ‘नेक्स्ट जनरेशन ॲप एंगेजमेंट प्लेटफॉर्म आहे. जोमार्केटिंग करणआऱ्यांना यूजर्स ला ओळखणे, त्यांच्याशी जोडून रहाणे आणि संपर्कासाठी मदत करतो. मोदी ॲप प्रकरणात wzrkt.com ची माहिती क्लेव्हर टॅप ही कंपनी का लपवीत असल्याचा सवाल अँडरसन यांनी केला आहे.
अँडरसन यांनी ही शुक्रवारी भानगड उजेडात आणताच नरेंद्र मोदी यांचे ॲप तयार करणाऱ्या टीमने त्यांच्याशी शनिवारी संपर्क केला. या चर्चेचा तपशील खालील व्टिट करुन उघड केला आहे....

Elliot Alderson

@fs0c131y
One minute after my post on@narendramodi's #android app, the "App team" created a new Twitter profile to discuss with me. We had a nice discussion. In order to be fair, here their first answer.
13:24 - 24 Mar 2018

आज मोदींच्या नावाचे ॲप आहे. उद्या राहुल गांधींच्या, ममता बॅनर्जींच्या, शरद पवारांच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावाचेही ॲप येईल. ते चुकूनही डाऊनलोड करण्याच्या भानगडीत पडू नका. हा ज्याला नसती आफत ओढवून घ्यायचीच आहे, त्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष करा."

दुसरं म्हणजे यात फक्त भाजपच आहे असं नाही तर काँग्रेस, जेडीयू, समाजवादी पक्ष सारखे इत्यादी राजकीय पार्टींनी केंब्रिज अॅनालिटिकाच्या सेवा घेतल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व नेत्यानी तुम्हा-आम्हा सर्वांनाच  गंडवलं आहे, याचं दुख: करत बसण्यापेक्षा आपला 'डिजिटल डेटा' ट्रेड होता कामा नये याची काळजी करावी लागणार आहे..

Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: सायबर गुन्ह्यातील राजकारणी
सायबर गुन्ह्यातील राजकारणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihxhC2PTUvg7hE-RwJ3hgUI0rKCKnzZU5LVKlgCRrFs1guazo93ZNZHpp1vuWExxvI5r0kthzWFwxjzfJdyNn2RH-zb8WVshxOf_iTGSpRSLhLYpUfjJKUKEy3eH3JTVMm052rIOhLg0TD/s640/FB_IMG_1521958643073.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihxhC2PTUvg7hE-RwJ3hgUI0rKCKnzZU5LVKlgCRrFs1guazo93ZNZHpp1vuWExxvI5r0kthzWFwxjzfJdyNn2RH-zb8WVshxOf_iTGSpRSLhLYpUfjJKUKEy3eH3JTVMm052rIOhLg0TD/s72-c/FB_IMG_1521958643073.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/03/blog-post_25.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/03/blog-post_25.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content