
मंगळवारी 5 फेब्रुवारीला सादिया शेखनं पुण्यात पत्रकार परिषद घेतली व मीडियाचा फेक न्यूजचा बनाव उघडकीस आणला. तिनं मीडियाच्या ‘मुस्लीम हेटनेस’ श्रृंखलेतला ट्रायल अजेंडा हाणून पाडला. प्रसार माध्यमांनी तिला ‘आयसिसची दहशतवादी’ व ‘सुसाईड बॉम्बर’ घोषित करून ट्रायल चालवली होती. प्रेस कॉन्फ्रेसमध्ये तिनं प्रसार माध्यमांच्या ‘सुत्रीय’ लबाडीची चिरफाड केली. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर जनतेत दहशत व भीती भरण्यासाठी मीडियानं सादियाची बदनामी केली होती. काही न्यूज चॅनलनं मृत घोषित केलेल्या बगदादीची लेक म्हणत सादियाची बेअब्रू केली. या टीव्ही चॅनलविरोधात कोर्टात जाणार असल्याचं मंगळवारच्या पत्रकार परिषदेत तिनं जाहीर केलं. या ‘मीडिया ट्रायल’ विरोधात ती न्यायव्यवस्थेकडे दाद मागणार असल्याचंही तिनं सांगितलं आहे. त्यामुळे प्रसार माध्यमे आता ‘आम्ही नाही त्यातले..’ च्या बचाव मोडमध्ये गेले आहे. परिणामी मीडिया विरुद्ध गुप्तचर यंत्रणा असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
‘प्रजासत्ताक दिनी पुण्यातील मुस्लीम तरूणी काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत’ अशी बातमी 25 जानेवारीला धडकली. त्याच दिवशी भारतात संजय लीला भन्साळींचा वादग्रस्त ‘पद्मावत’ देशभरात प्रदर्शित झाला होता. सिनेमाला विरोध करत करनी सेनेच्या दहशतवाद्यांनी देशभरात धुमाकूळ घातला सुरु होता, जाळपोळ करत लाखोंच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करण्यात आले. गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात करनी सेनेच्या दहशतीचा नंगा नाच सुरु होता. धर्म व जातीय अस्मितांच्या नावानं करनी सेनेचे गुंड देशातील सर्वोच्च कोर्टाला अपमानित करत होते. ही बातमी मेनस्ट्रीम म्हणवणाऱ्या मीडियानं दुर्लक्षित केली, उलट करनीच्या गुंडाना गौरवान्वित करण्याचं काम मीडियानं यथोचित केलं. सोशल मीडियावर प्रसार माध्यमे व सरकारची छी-थू सुरु असताना सादियाची बातमी लाज राखणारे पांघरूण म्हणून मीडिया बाजारात आणली गेली. सादियाच्या ‘फेक न्यूज’नं प्रसार माध्यमांना मोठा यूएसपी तर दिलाच परंतु सदरहू बाकमी मीडियाचा मुस्लीमद्वेषी अजेंडा यथोचितपणे पार पाडून गेली.
गुप्तचर यंत्रणांचे खासगी मॅसेज लीक होऊन तो मीडियाच्या धर्मांध व तुच्छतावादी मार्केटमध्ये जागा बळकावून बसले. सुत्रांच्या माहीतीवर प्रसार माध्यमांनी सादियाच्या बदनामीचं कंत्राट नॅशनल पातळीवर चालवलं. शिक्षणासाठी काश्मीरला गेलेली एक अबोध तरुणी आयासिसची हस्तक म्हणून प्रचारित करण्यात आली. सदर तरुणीने केलेल्या दाव्यानुसार ती काश्मीरला पॅरामेडिकलच्या प्रवेशासाठी गेली होती. प्रत्येक भारतीयांना राज्यघटनेनं दिलेलं विहार स्वातंत्र्य तिनंही आपल्यासाठी लागू करून घेतलं होतं. पण मीडिया व इतर यंत्रणांना सादिया करनी सेनेच्या हिसेंच्या बातमीवरून लक्ष वळविण्यासाठी हवी होती. (नंतर कासगंजसाठी सादियाची बातमी फिरवण्यात आली) त्यानुसार सरकार समर्थक गोदी मीडिया व इतर यंत्रणांनी सादिया शेखला सरेआम अपमानित केलं. तीन-चार दिवस सादिया नियोजितपणे बदनाम करण्यात आलं. दहशतवादी म्हणून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले.
देशभरात एकटी सादियाच का? असा प्रश्न काही मीडियाकर्मींनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला. त्यावर तिनं दिलेलं उत्तर खूपच मार्मिक होतं. ‘एका भूतकाळासाठी वर्तमान खराब करण्याचा अधिकार कुणी दिला?’ असा प्रतिप्रश्न तिनं केला. 2015 साली काही संशयित चॅट अकाऊंटच्या संपर्कात आल्याचं तिनं सांगितलं. ही बाब तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानं एक मौलाना तिला एटीएसच्या डी-रॅडिकलायझेशन कॅम्पला घेऊन गेले. एटीएसच्या जवळ जाण्यासाठी त्या कथित मौलानानं सादियाला आधार केल्याची माहीती पुढे आली. केवळ या कॅम्पचा आधार घेऊन सादिया पुन्हा ‘धोकादायक’ झाल्याचा निर्वाळा काही मीडिया न्यायाधिशांनी दिला. कदाचित तपास यंत्रणांना वाहवाही हवी होती, त्यामुळे ही फेक बातमी त्यांनी घडू दिली. तीन-चार दिवस प्रसार माध्यमांनी सादियाच्या बातमीला फॉलोअप चालवला. पण त्याचवेळी कासगंजमधील नवं-नवे खुलासे मीडियानं दुर्लक्षित केले. कासगंजच्या मुस्लीम वस्तीत जाऊन पाकविरोधी घोषणाबाजी झाली, प्रथम फायरिंग विरोधी गटानं केली. मुस्लिमांना हिसेंसाठी चेतवण्यात आलं. याचकाळात हरयाणामध्ये काश्मीरी मुस्लीम मुलांना ‘हेट क्राईम’ मधून मारहाण झाली, या घटना प्रसार माध्यमांनी हेतूत: दुर्लक्षित केल्या.
देशभरात एकटी सादियाच का? असा प्रश्न काही मीडियाकर्मींनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला. त्यावर तिनं दिलेलं उत्तर खूपच मार्मिक होतं. ‘एका भूतकाळासाठी वर्तमान खराब करण्याचा अधिकार कुणी दिला?’ असा प्रतिप्रश्न तिनं केला. 2015 साली काही संशयित चॅट अकाऊंटच्या संपर्कात आल्याचं तिनं सांगितलं. ही बाब तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानं एक मौलाना तिला एटीएसच्या डी-रॅडिकलायझेशन कॅम्पला घेऊन गेले. एटीएसच्या जवळ जाण्यासाठी त्या कथित मौलानानं सादियाला आधार केल्याची माहीती पुढे आली. केवळ या कॅम्पचा आधार घेऊन सादिया पुन्हा ‘धोकादायक’ झाल्याचा निर्वाळा काही मीडिया न्यायाधिशांनी दिला. कदाचित तपास यंत्रणांना वाहवाही हवी होती, त्यामुळे ही फेक बातमी त्यांनी घडू दिली. तीन-चार दिवस प्रसार माध्यमांनी सादियाच्या बातमीला फॉलोअप चालवला. पण त्याचवेळी कासगंजमधील नवं-नवे खुलासे मीडियानं दुर्लक्षित केले. कासगंजच्या मुस्लीम वस्तीत जाऊन पाकविरोधी घोषणाबाजी झाली, प्रथम फायरिंग विरोधी गटानं केली. मुस्लिमांना हिसेंसाठी चेतवण्यात आलं. याचकाळात हरयाणामध्ये काश्मीरी मुस्लीम मुलांना ‘हेट क्राईम’ मधून मारहाण झाली, या घटना प्रसार माध्यमांनी हेतूत: दुर्लक्षित केल्या.

3 फेब्रुवारीला करनी सेनेनं पद्मावत व भन्साळींचा विरोध अचानक बासनात गुंडाळला. रिलीजपूर्वी दीपीकाचं मुंडकं छाटण्याची भाषा, सिनेमाच्या काल्पनिक कथेवरून वर्षभर हिंसा, सेट जाळणे, हल्ले करणे, रिलीजनंतर देशभरात जाळपोळ, लहान मुलांच्या शालेय बसवर हल्ला करून ती जाळणे, असे देशविघातकी कृत्य करून ‘विरोध मागे घेतो’ हा एक शब्द वापरून करनी सेनेनं सर्व पाप धुवून घेतले. सालभरापासून सुरु असेलला जाळपोळ व हिंसा एका शब्दानं पवित्र होऊन एकाएकी चर्चेतून नाहीशी झाली. ‘भाजपच्या पराभवाचा सूड आम्ही पुरा केला’ म्हणत करनी सेनेनं माघार घेतली. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक भन्साळींनी राजपुतांचं गौरवीकरण (?) केल्याचं सांगत करनी सेनेनं त्यांच्यावरील दाखल सर्व गुन्हे मागे घेतले. कदाचित पद्मावत पाहून ‘मुस्लीमद्वेशी श्रृखलेतलं पुढचं पाऊल’ म्हणून करनी सेनेनं ‘सर्टीफाईड’ केलं असावं. त्यामुळे छुप्या समझौत्यानुसार अचानक सालभराचा विरोध एका रात्रीतून मावळला. सिनेमा व त्याला जोडलेली माणसे एकाएकी पवित्र झाली. करनी सेना, कासगंज, सादिया अशा एका-पाठोपाठ एक बातम्या निकाली निघाल्यानं हॉलमध्ये बसून टीव्ही बघणारा प्रेक्षक पुरता गंडला गेला. काहीच हाती न आल्याची भावना याहीवेळी दृढ झाली. आता तो राफेल ‘डील’वर प्रश्न न विचारता काँग्रेसविरोध, पकोडे, सरदार पटेल इत्यदि खेळणं खेळत बसला आहे.
सादियानं तिच्याविरोधात चालवलेल्या मीडियाच्या ट्रायलमुळे कुटुंबीयाला व तिच्या जीवाला धोका पोहचल्याचा आरोप केला आहे. बदनामीमुळे काश्मीरच्या कॉलेजमधील तिचा पॅरामेडिकलचा प्रवेश रद्द झाला. एक सामान्य तरूणी शिक्षणासाठी काश्मीरला जाणं मीडिया व गुप्तचर यंत्रणांना पचनी पडलं नाही. तिचं आयुष्य उधवस्त करण्याचा डाव त्यांनी साधू पाहिला. इतर बातम्या व घोटाळ्यावरून लक्ष वळविण्यासाठी निरपराध सादियाला टूल्स म्हणून वापरण्यात आलं. विषेश म्हणजे फेक न्यूज दिल्याबद्दल साधी माफीही कुणी अजून मागितली नाही. धर्मद्वेषी राजकारणाचा सादिया नाहक बळी ठरली.
देशात गेल्या अनेक वर्षापासून सुप्त मुस्लीमद्वेशी अजेंडा राबवला जात होता, आता तो उघडपणे राबविला जात आहे. दहशतवादी घोषित करणे, पाकप्रेमीचा डाग लावणे, अण्टी नॅशनलचा शिक्का मारणे, तुच्छतावादी दृष्टिकोन बाळगून हल्ले करणे, प्रेमधर्मयुद्धाचं नाव देऊन तरुणांच्या हत्या करणे, मुलींच्या अब्रूंची लक्तरे फाडणे, इतिहासाची साधने उधवस्त करणे, देशद्रोही म्हणून हिनवणे अशा विविध प्रकारातून भारतीय ‘एथनिक’ मुस्लिमांना बदनाम करण्यात येत आहे. अशा प्रकारची कुठलीही कृती गुन्हा आहे, पण यावर कुठलीच शिक्षा दोषींना नाही. त्यामुळे मुस्लीमाविरोधात शासन, प्रशासन व सामान्य नागरिकातही धर्मद्वेषी व तुच्छतावादी वृत्ती वाढली आहे. नुकतंच खासदार असदुद्दीन ओवैसींनी ‘भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात जा’ म्हणून हिनवणाऱ्यांविरोधात अट्रोसिटीसारखा कठोर कायदा करावा अशी मागणी संसदेत केली आहे. एमआयएमनं ही मागणी लावून धरली तर कदाचित असा कायदा होऊ शकेल.
कलीम अजीम, पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com