पश्चिम बंगाल व राजस्थानच्या पोटनिवडणुकीचा निकाल धार्मिक विद्वेषाचं राजकारण करणाऱ्यांना मोठी चपराक ठरली. स्थानिक
उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये विखारी प्रचार करून दंगल पेटवली गेली, तर कर्नाटकमध्ये सत्ताधारी मुख्यमंत्र्यांना हिंदूविरोधी ठरवून मतपेटी मजबूत करण्याचा डाव भाजप आखत आहे. वरील दोन्ही राज्यात भाजप समर्थक संघटनांनी गेल्या चार वर्षात दोन-समुदायात दुही पसरवण्याचं काम नित्यक्रमानं केलं. राजस्थानमध्ये राजसमंदच्या घटनेआधी अलवरमध्ये गोरक्षकांनी गौमांस बाळगल्याच्या संशयावरून तिघांची निर्घूण हत्या केली.
कासगंजमध्ये हिंदूवादी गटाने वाद कसा वाढवला याचे स्थानिक जनतेनं नवं-नवे व्हिडिओ प्रसारित करत भाजपविरोधात ढिगाने पुरावे दिले आहेत. दंगलीवरून सत्ताधारी मंत्री व प्रशासनाने स्थानिक भाजप सरकारच्या साधू मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केली. पण केंद्रीय सरकारने योगींनी राजधर्म पाळावा अशा सूचना केल्या नाहीत. उलट संघ सरकारचे समर्थक राकेश सिन्हा मुस्लिमांना संपवण्यासाठी 15 सेकंड लागतील असं जाहीर विधान केलं. यावर अकबरुद्दीन ओवैसींसारखा गदारोळ सोशल मीडिया व वृत्त वाहिन्यावर झाला नाही. सिन्हा जाहीरपणे मुस्लिमांना ठार करण्याचे संकेत देत होते, पण कुठल्याही पुरोगाम्याने यावर साधी निषेधाची प्रतिक्रीया दिली नाही.
भाजपनं 2019ची तयारी म्हणून स्वप्ने विकणारा बजेट गुरुवारी सादर केला.
‘
दोन महिन्यापूर्वी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा व खासदार नाना पटोलेंनी सरकारला तिहेरी तलाक देत बाहेर पडले. आर्थिक धोरणावर सरकारला धो-धो धुतल्यानंतर
शत्रुघ्न सिन्हांदेखील अधून-मधून भाजपविरोधात बोलत असतात. कदाचित यातले काहीजण खरंच भाजपविरोधात बोलत असतील, पण ही मंडळी भाजप व संघाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्यावर का बोलत नाही
पुरोगामी संघटनांनी केवळ पोकळ विरोध करून
देशात मुस्लिमांना लाचार करण्यासाठी काँग्रेसनं पुन्हा सॉफ्ट हिंदूत्वाची लाईन स्वीकारली आहे. काँग्रेस हिंदूंविरोधी नाही असा प्रचार काँग्रेसनं देशभरात सुरु केला आहे. दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हैसूर टीपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला, यावर भाजपने पुन्हा घाण ओकली. भाजपच्या राष्ट्रपतींनी टीपू वादावर पडदा टाकला होता, पण तो बाजूला सारत भाजपने टीपूआड हिंदू-मुस्लीम द्वेषाचं राजकारण पुन्हा सुरु केलं आहे. यावर कर्नाटक सरकार व केंद्रातले काँग्रेसनचे बडे नेते चिडीचूप आहेत. दोन्ही पक्षांसाठी आगामी निवडणुकांत टीपू सुलतान स्टार प्रचारक आहे, दोघांनाही यावर राजकारण करायचे ही बाब क्रिस्टल क्लीअर आहे. गेल्या महिन्यात भीमा कोरेगावचा ऐतिहासिक वाद उकरून काढण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजून नव्या ऐतिहासिक संदर्भाची तोडफोड केली जाऊ शकते.
कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com