२००० साली अवांतर वाचनाला सुरूवात केली होती. सुरुवातीला मिळेल ते वाचलं, अरुण शौरींचा आंबेडकर, आसाराम ट्रस्टचा पंचामृत, भगवतगिता; हळुहळू चांगलं शोधायला लागलो. ताई इतिहासाची विद्यार्थिनी व दादा हिंदीचा; रशियन राज्यक्रांती पासून माओ, मार्क्स, चीनचा इतिहास, मुघलशाही नजरेखालून जात होतं. महाश्वेता देवी, ममता कालिया, यशपाल, प्रेमचंद यांनी वाचनात रमवलं. इतिहास खेचत होतं तर साहित्य खुलवत होतं.
१९९५ पासून घरात किराणा दुकान होतं. फाडण्याआधी सर्व रद्दी वाचून काढायचो. हाय राणी, सुट्टीचे पान आवडायचं. १९९७-९८ पासून चंपक, लोकमतची चित्रगंधा, रविवार पुरवणी (नाव आठवत नाही) सकाळचं सुट्टीचं पान, रविवार पुरवणी (नाव आठवत नाही) तरुण भारतची सदाफुली, नवभारतची ग्लैमर पुरवणी, चित्रलेखा, श्री तशी सौ, सरस सलिल, मार्मिक वाचायचो. दर रविवार अंबाजोगाईचं साहित्य निकेतन ग्रंथालय खुनवायचं. ललित व कथा वाचायला जाम आवडायचे. अठराव्या वयात हिंदी पाक्षिकात कथा छापून आली. वयाच्या २००१ साली अमेरिकेत हल्ला झाला, तसा वृत्तपत्र वाचनाकडे वळलो. २००९ साली अंबाजोगाई सोडेपर्यंत हिंदी दैनिकाचा नियमित वाचक होतो. सध्यानंद, आज, मटा, लोकसत्ता, लोकमत, इंडियन एक्सप्रेस, मिलाप वाचनालयात मिळायचे. आलटून-पालटून सर्व चाळायचो. अनेक दैनिकांना वाचकांची पत्रे लिहली, काही छापूनही आली. वाचनाच्या गोडीने जर्नालिझमपर्यंत पोहचवलं.
औरंगाबादला आल्यावर बामूची भली-मोठी लायब्ररी पुढ्यात होती. आठवड्याला दोन पुस्तके इश्शू व्हायची. अख्खी लायब्ररी झटकून पुस्तकं शोधायचो. हिंदीचा रुममेट होता, त्यानं अनेक पुस्तकं सुचवली. समग्र मंटो, शरतच्चंद्र वाचला. विभागातही छोटेखानी पुस्तकालय होतं, तिथं विषयाची हिंदी-इंग्रजी बरीच दुर्मिळ पुस्तकं हाती आली. फकरूद्दीन बेन्नूर, फ म शहाजिंदे, रफीख सूरज, यूम पठाण मराठीत वाचलं. अण्णाभाऊ आठवड्यात समग्र संपवला. फिल्मवाला इसाक मुजावर समग्र संपवला. बाबू मोशाय, शिरिश कनेकर, देव आनंद, सत्यजित रे, गोल्डी, अनुराधा औरंगाबादकर या मंडळीनी सिनेमाकडे वळवलं. यूजीला असताना सिनेमावर बरेच प्रकाशित झाले. या वेडातून पुण्याच्या एफटीआयचं वेड लागलं. एकदा सीईटीदेखील दिली, अवघ्या काही मार्कानं हुकलो.
एफटीआयचा नाद सुटला रानडेत आलो. रशियन राज्यक्रांती, माओ, मार्क्सशी उजळणी झाली, समाजवाद, डावं, उजवं वाचून काढलं. उजव्या लिखाणानं बरंच डिस्टर्ब झालो. पुन्हा फिक्शनकडे वळालो. समाज-संस्कृती वाचलं. हिंदीचा मुरब्बी वाचक झालो. नवभारत टाईम्स, जनसत्ता, जागरण, अमर उजाला बुकमार्कमध्ये आले. मध्यंतरी टीवी जॉईन केला. वाचन सुटलं. दोन वर्षात फक्त तीन एक पुस्तकं वाचली. टीवी सुटला तसा पुन्हा वाचनाकडे वळलो. बीबीसी, एनडीटीव्ही, सत्याग्रह, वायर हैबीट झाली. सध्या इंग्रजी वाचनावर भर देतोय, एक्सप्रेस, एचटी, हिंदू, क्वेंट, डॉन लिस्टमध्ये आहेत. वैचारिक पुस्तकं जमवतोय. चर्चगेट व लकडी पुलांवरुन अनेक पुस्तकं मिळवली. महिनाभरात दोनएक हजाराची खरेदी हमखास होते.
इंटरनेटनं माहितीचा मारा सुरु आहे. बीबीसी, सत्याग्रह छान माहिती व विश्लेषण देतात. डेली ओ, डॉयच्च न्यूज, जागतिक घडामोडी उलगडतात. फेबू लिस्टमध्ये चांगले लिहणारे अनेकजण आहेत. मराठीपेक्षा हिंदीभाषी गोतावळा जास्तच. रोज नवी इन्फो वाचायला मिळते. पण स्मरणशक्तीचा लोचा होतोय. न्यूज फीडमध्ये सगळं विरुन जातंय. गेल्या काही महिन्यापासून हार्ड कॉपी वाचण्यावर भर सुरु आहे. जमवलेलं एक-एक करुन वाचतोय.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com