
इस्त्रायली पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह अनेक ठिकाणी 'नेत्यानाहू चले जाव' घोषणाबाजी करत मुस्लीम संघटनांनी आंदोलन केलं. भारतीय मुस्लिमांनी हजारो किलोमीटर लांब असलेल्या इस्त्रायलचा विरोध का करावा? हा प्रश्न अनेकांना पडला. तसं पाहता मुस्लिमांनी यहुदी पीएमचा विरोध करण्याची गरज नव्हती, त्यापेक्षा भारतातील इतर सामाजिक आंदोलनात सहभाग घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे. पण भारतीय मुस्लीम केवळ इस्लामिक असल्याने पॅलेस्टाईनच्या अरब वंशीय नागरिकांशी जैविक नातं जोडतो. जगभरातील पीडित व शोषक जाति-जमातींबद्दल मानवतेचं नातं असणे स्वाभाविक आहे, यात काही वावगं नाही, पण हेच कारण काही संघटना मुस्लिमांच्या देशभक्तीशी जोडून राष्ट्रद्रोही असल्याचे लेबलं लावतात. पाकिस्तानच्या धार्मिक जातिय शोषणाविरोधात भारतीय मुस्लीम बोलत नाहीत, त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे पाकिस्तान देशाची निर्मिती भारतीय मुस्लिमांना मान्य नाही, याच एकमेव कारणामुळे गेल्या सत्तर वर्षापासून भारतीय मुस्लीम परकेपणा व तुच्छतावादाला बळी पडतोय, दुसरं कारण म्हणजे भगव्या संघटनांकडून पाकिस्तानी समर्थक असल्याच्या आरोपांना जागा मिळू नये.

इस्त्रायलने पॅलेस्टिनींना भूमीहीन केल्याचा इतिहास सर्वांना माहितच आहे. गेल्या ७५ वर्षापासून पॅलेस्टीनी इस्त्रायलविरोधात लढा देत आहेत. पॅलेस्टाईनची तिसरी पिढी रक्तपात, बॉम्ब, गोळ्या, बंदूका आणि युद्ध बघत आहे. जरूसलेम शहरात रक्तपात नेहमीचाच झालाय. धुरांचे लोट, यहुदी सैनिकांकडून पॅलेस्टीनींचे रात्री-अपरात्री अपहरण, मोर्टार हल्ले, नित्याचेच झालेत. गेल्या वर्षापासून हा संघर्ष आणखीन पेटलाय. अशा युद्धभूमीत जन्मलेली तिसरी पिढीने संघर्ष व इस्त्रायल विरोधाचा बिडा उचलला आहे. महिला व तरूण च नव्हे तर बालकेदेखील इस्त्रायली सैन्याविरोधात डोळ्यात डोळे घालून बंड करत आहेत.
इस्लामिक तत्व व राजकीय अस्मितांचा लढा जगातील मुस्लिमांना नवा नाही. २०१०-११ साली काही इस्लामिक राष्ट्रात प्रस्थापित दंडकशाही सत्तेविरोधात लोकं रस्त्यावर उतरली. इजिप्त, ट्यूनिशिया, लिबिया, सिरिया आणि यमनमध्ये एका-पाठोपाठ सामान्य जनता रस्त्यावर आली. सोशल मीडियाचा आधार घेऊन सुरू झालेल्या या चळवळला 'अरब क्रांती' म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियानं दिलेली ही पहली प्रतिक्रीया होती. इथं सत्तेची उलाथापालथ झाली, पण राजकीय अस्थिरता आजही कायम आहे. इराक व सिरिया गेल्या पाच वर्षापासून आयसिसशी लढा देत आहेत. आयसिस या दहशतवादी संघटनेनं इस्लामच्या नावाने जगभरात उन्माद माजवला आहे. हा धर्मीय दहशतवाद बोकाळण्याचे कारण अमेरिकेच्या आर्थिक धोरणात लपलंय, पण याची चर्चा कुठेच दिसत नाही. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने दगाबाजी केल्याचा आरोप केला, अमेरिका पाकिस्तानची आर्थिक रसद बंद करत असल्याचं जाहीर केलं. काही दिवसापूर्वी जेरुसलेमला इस्त्रायली राजधानी मानण्यास काही राष्ट्रांनी नकार दिला, ट्रम्पंनी त्यांनाही आर्थिक रसद बंद करण्याची धमकी दिली होती.
नोव्हेंबर महिन्यात झिम्बॉबेच्या जनतेनं रॉबर्ट मुगाबे यांची ३७ वर्षाची डिक्टटेरशिप उलथवून टाकली. सामान्य जनतेच्या या यशानंतर यानंतर आता पुन्हा सिरिया, यमन, इराण आणि इस्त्रायलमध्ये सरकारविरोधात तीव्र आंदोलनं सुरू झाली आहे. मध्य-पूर्व आंदोलनानं हादरलं आहे. सध्या या चाारही देशाच्या राष्ट्रप्रमुखांना जनतेचा विरोधी सूर सतावतोय. म्यानमार रोहिंग्याचा प्रश्न जैसे थेच आहे. कालच यावर संयुक्त राष्ट्राने म्यानमार सरकारला रोहिंग्याच्या सुरक्षित पुनर्वसनाबद्दल फटकारलं आहे. बांग्लादेशातही राजकीय अस्थिरतेचं वातावरण आहे. युरोपमध्ये राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे. दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांची जवळीक वाढली. पण उत्तर कोरिया-अमेरिका संघर्ष जास्तच वाढलाय, इकडे भारतात चीनने डोकलाम मुद्दा पुन्हा पुढे केलाय. तिकडे अमेरिकेनं चीन विरोधात धोरणं आवळली आहेत.
जेरूसलेम व उत्तर कोरियाच्या अणू बॉम्ब कार्यक्रमानं व्यथित झालेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेत सुरक्षा धोरण आणखीन कडक केली आहेत. नुकतंच अमेरिकेनं जाहीर केलंय की 'अमेरिकेला दहशहवादाविरोध लढण्याऐवजी रशिया व चीन सारख्या प्रतिस्पर्धी शक्तिंचा सामना करावा लागेल. हा दोन देश अमेरिकेच्या सुरक्षेला धोकादायक झाली आहेत' याचा अर्थ असा होतो की अमेरिका या दोन देशाची आर्थिक घोडदौड रोखण्यासाठी तयारी करत आहे.
अमेरिकेच्या हालचाली जगासाठी धोकादायक ठरू शकतात. त्याच्या आर्थिक वर्चस्व स्थापित करण्याच्या धोरणातून तो जगाला अस्थिर करू पाहतोय. भारताने याबाबत खूप संयमाची भूमिका घेतली आहे. काही दिवसापूर्वी संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांचे ट्विटर अकाऊंट हैक झालं होतं. त्यांच्या अकाऊंटवरुन पाकिस्तानी झेंडा व राष्ट्रपतिंचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. या व्यतिरिक्त तुर्की भाषेतून काही मजकूरही पोस्ट झाला होता. पाकविरोधात अमेरिकेनं घेतलेल्या धोरणानंतर ही घटना घडली होती, याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होतं. अमेरिकापुरस्कृत राजकीय धोरणं जगाला अस्थिरतेकडे नेत आहेत, याची काळजी सर्व राष्ट्रांना करावी लागणार आहे..
कलीम अजीम

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com