वर्ष 2000 ने न्यू इअर साजरा करण्याचं ग्लोबल मार्केट तयार केलं. भारतात राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनने सलग तीन दिवस जगभरातील मिलेनिअर वर्षाचा रंगारंग सोहळा लाईव्ह दाखवला. या चॅनलवर आम्ही हा लाईव्ह सोहळा पाहिला होता. या तीन दिवसातला मोठा टाईमस्लॉट डीडीने मिलेनिअर वर्षाला देऊ केला. आज नववर्ष साजरा करण्यासाठी रोखणारा भाजप त्यावेळी केंद्रात सत्तेत होता, केंद्रातलं भाजप सरकार अधिकृतपणे नव वर्षाच्या पाश्चिमात्य सेलिब्रेशनचे प्रोमोशन करत होतं.
मला
आमची मोठी दिदी मामाकडे नळेगांवला (जि. लातूर) राहायची, ती दरवर्षी
आम्हा भावंडांना ती हमखास सुरेख ग्रिटिंग कार्ड पाठवायची. आम्ही ती जपून ठेवायचो मग आम्हीदेखील शिलाई मशिनवर तयार केलेले ग्रिटिंग ताईला पाठवायचो. महिन्याच्या शेवटी
पोस्टातून ते तिला मिळायचे. इंग्रजी कॅलेंडरचा हा नवा वर्ष असतो असं अब्बू म्हणायचे.
मग आमच्या इस्लामिक कॅलेंडरचे महत्व व उदय अब्बू आम्हाला सांगायचे. मुहर्र्म हा
इस्लामी कॅलेंडरचा नवा महिना, याच महिन्यात प्रेषित मुहम्मद (स) मक्का शहराहून
मदिना शहरातून स्थलांतरित झाले होते, त्याला हिजरत (स्थलांतर) म्हणतात. प्रेषितांचे
मदिना शहरात आगमन होताच तिथल्या स्थानिक नागरिकांना आंदोत्सव साजरा केला होता. इथून
इस्लामिक नव वर्ष सुरु झालं. प्रेषितांची हिजरत इस्लामी हिजरी सन झाला.
आमच्या घरी रमजान महिन्याच्या आरंभाचा चाँद बघून अम्मी जगशांतीसाठी
दुआ करीत. ईदच्या नमाजमध्येही जगाच्या अमन-शांतीसाठी दुआची विषेश फेरी घेतली जाते.
यात दंगली, सामाजिक
सुरक्षा, हल्ल्यापासून बचाव, संपत्तीची
सुरक्षा आदींचे मुस्लीम समुदायाचे रक्षण करण्याची अल्लाहकडे दुआ मागितली जाते.
त्यावेळी आम्हा लहानग्यांना वाटायचं की रमजान हा इस्लामी वर्षारंभ असतो. कारण
त्याच महिन्यात वर्षभरातला जकात (कर) अदा केला जायचा, घरात
एखादी नविन वस्तू यायची, दागिणे, मिळकत,
वाहन खरेदी व्हायचं, लग्न जुळायची, नवं उद्योग-धंदे सुरु व्हायचे. एकंदरीत वर्षाची नवीन सुरूवात रमजानपासून
व्हायची, पण माहे रमजान हा इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे.
पण सर्व नवे कार्य व संकल्प रमजानला सुरु होतात, अगदी गुढी
पाडवा व दिवाळीसारखेच.
वर्ष 2000 ने न्यू इअर साजरा करण्याचं ग्लोबल मार्केट तयार केलं.
भारतात राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनने सलग तीन दिवस जगभरातील मिलेनिअर वर्षाचा
रंगारंग सोहळा लाईव्ह दाखवला. आमच्या अंबाजोगाईला दूरदर्शनचं उपकेंद्र आहे, त्यामुळे
आमच्या अंबाजोगाई शहरात डीडीचं ‘मेट्रो चॅनल’ (DD-2) दिसायचं.
या चॅनलवर आम्ही हा लाईव्ह सोहळा पाहिला होता. या तीन दिवसातला मोठा टाईमस्लॉट
डीडीने मिलेनिअर वर्षाला देऊ केला होता. आज नववर्ष साजरा करण्यासाठी रोखणारा भाजप
त्यावेळी केंद्रात सत्तेत होता, केंद्रातलं भाजप सरकार
अधिकृतपणे नववर्षाच्या पाश्चिमात्य सेलिब्रेशनचे प्रोमोशन करत होतं. यंदा त्याच
सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी देशभरात गुढी पाडवा हा नवा वर्ष म्हणून साजरा करावा अशी पत्रके
व बॅनर्स लावले आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी आठ दिवस आदीपासून असे बॅनर्स
शाळा-कॉलेजच्या प्रवेशद्वारावर झळकले होते.
भारतात नववर्ष
साजरं करण्याचं फॅड सन 2000 काळापासून सुरु झालं. कदाचित ही पद्धत पूर्वीपासून
असेनही पण ते उच्चभ्रू वर्गापर्यंतच मर्यादीत असावं. 2000 साली जगभरात मिलेनिअर वर्ष
म्हणून साजरं झालं. भारतात आठ दिवसापासून नव्या वर्षाची लगबग सुरू होती. जगात काही
देशांतील नागरिकांना नऊ महिने आधी नव्या वर्षाची चाहूल लागली होती. नव्या वर्षात
बाळ जन्माला यावं ही आशा बाळगून अनेक महिला प्रेग्नेंट झाल्या होत्या. नवे उद्योग,
नव्या संधी, करार, परराष्ट्र निती, घोषणा, निर्णय, आदेश या साली लागू करण्यात आले.
2000 साल या मिलेनिअर वर्षाने जगभरात नव वर्ष
सेलिब्रेशनच करण्याचे मटेरिअल मार्केट उभं केलं होतं. जगात वर्षभर चालू शतक 20वे
की 21वे अशा झडत होत्या. व्यापार-उदीमतची संधी पाहून स्थानिक व्यापाऱ्यांनी नव्या वर्षाचे उद्योग
उभं केलं.
2000 साली इंटरनेटवर चॅट मेसेजचे प्रकार सुरु झाले. आर्कूडमुळे ग्रिटिंग पाठवणे अगहदी सुलभ झाले. इंटरनेटनं ग्रिटिंग कार्ड संपुष्टात आणले. याच काळात आमच्या हाती प्रथम मोबाईल नावाचं यंत्र आलं. मोबाईल आला तसे ग्रिटिंग कार्ड अजूनही कमी झाले. मोबाईल मेसेजच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देण्यात येऊ लागलं. नवं नवं मेसेज व ग्रिटिंग तयार करून चार-दोन रुपयात पाठवले जाऊ लागले. माझ्याकडे 2005 साली मोबाईल आला. अर्थातच माझ्या स्वकमाईतून हे भ्रमणयंत्र मी घेतलं होतं. अगदी न कंटाळता वाढदिवस, मदर्स, फादर्स, वॅलेंटाईन डे, जुम्मा, ईद, दसरा, दिवाळीला फॉरवर्ड मेसेज इतरांना पाठवायचो. अगदी सकाळी उठून हा नित्यक्रम सुरु असायचा, रमजानच्या सहरीला उठल्यावर असे मेसेज न चुकता सर्वांना पाठविले आहेत.
गेल्या
दशकभरात नव वर्षाचे सेलिब्रेशन कमालीचं बदललं. मीडिया व टीव्हीमुळे असा
सेलिब्रेशनला ग्लॅमरचं स्वरुप आलं. नाईट क्लब, रेव्ह पार्ट्या, पब,
ऑर्केस्ट्रा, म्यूझीक पार्टी, सिलेब्रेशन, मद्यपार्टी आदी प्रकार व्यापार म्हणून
उदयास आले. मध्यमवर्ग घरांघरात मद्यपार्टी करून नव वर्षाचे सेलिब्रेशन करू लागला.
आज नव वर्ष साजरा करण्याचं स्वरुप कमालीचं बदललं आहे. सर्व सन-उत्सव व आनंद
सोहळ्याला कमोडिटीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. कालांतराने स्मार्ट फोन आले.
स्मार्ट फोन्समुळे हे सेलिब्रेशन लक्षणीयरीत्या बदललं. कुठल्याही प्रसंगाला शुभेच्छा
देण्यत येऊ लागल्या. अगदी वर्षश्राद्ध, पुण्य़स्मरण, तिर्थजेवण अनेकांची निमंत्रणे
स्मार्ट फोन्स देऊ लागला. कधीकधी पुण्यस्मरणाच्या शुभेच्छाही स्मार्ट फोन पाठवू
लागला. काही काळात या शुभेच्छा पत्रे असहनीय झाले. सकाळपासून रात्रीपर्यंत सलग
मेसेज सुरु झाले. नमाजला उभं राहिलो, मयतीला गेलो, हॉस्पिटलमध्ये, वर्गात, झोपेत नोटिफिकेशन
टोन्स आदळू लागल्या. काही दिवसातच शुभेच्छा संदेशाची उबळ वाटू लागली. आज शुभेच्छा
संदेश स्वीकारणे असहनीय झालं आहे. जवळजवळ सर्वाचा सारखाच अनुभव आहे.
आज
कुठलाही उत्सव व सन साजरा करायला आम्हाला मार्केटची गरज लागते. अर्थात बाजाराने
तुमच्या सायकोलॉजीवर परिणाम करून भेटवस्तू व सेलिब्रेशन पुरत्या तुमच्या भावना बंदीस्त
केल्या आहेत. त्यामुळे कुठलाही आनंद व कौतुक सोहळा बाजाराशिवाय शक्य नाहीये.
हळुहळू बाजाराने तुमच्या संवेदनावर विजय मिळवला. त्यामुळेच आपण सन-उत्सवांना घरंच
खाण्याऐवजी हॉटेलिंग स्वीकारतो आहोत. सणासुदीला घरी राहण्याऐवजी पर्यटनस्थळी जाऊन
पैसा उडवतोय. सेलेब्रेशनचे बाजारीकरण झालं पण हे आपल्या अजून लक्षात आलेलं नाहीये.
कलीम
अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com