गेला आठवड्यात अनेक बातम्यांनी भारतीय दर्शक व वाचकांचं रसिकरंजन झालं. त्यात काही राजकीय बातम्या होत्या तर काही इतिहासाच्या विकृतीकरणाच्या आरोपाच्या होत्या. यात काही सिनेमा संदर्भातील बातम्याही होत्या. आठवड्याच्या शेवटी दहशतवादी नथ्थूचं मंदीर, आयोध्या वाद, ‘पद्मावती’ ‘दशक्रिया’ सिनेमाला विरोध, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आंदोलनात गोळीबार, भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात ‘मूडीज’चे रेटींग इत्यादी बातम्यांनी वाचकांच्या ‘सोशल’ माहितीत भर घातली. याच बातम्यांच्या अनुषंगाने अनेकांची फेसबूक स्टेटस रंगली. मधल्या काळात सरदार पटेल, मौलाना आझाद व पंडीत नेहरु यांच्या जयंतीच्या शुभेच्छांचा मोठा फड फेबूवर रंगला. पण सर्वाधिक सोशल जागा घेतली ती हार्दीकच्या ‘बेड’ सीडीने.. सोशल मीडियाची चर्चा व हार्दीक विरोधकांची एनर्जी पाहता येत्या आठवड्यातही हा विषय टॉप ट्रेंडमध्ये असेल अशी शक्यता वाटते. एकूणात काय तर या आठवड्यातही नेटीझन्स भाजपला ठोकण्यात व्यस्त होते.
हार्दीकची ‘बेड’सीडीची चर्चा देशपातळीवर उगाळून झाली, पण अजूनही त्यांचा ताजेपणा काही जात नाही, एक सीडी बघून होत नाही तोपर्यत दुसऱ्या सीडीच्या बातम्या न्यूज चॅनलच्या स्लॉट भरताना दिसत होत्या. कथित प्रकार पाहून चवताळण्याऐवजी हार्दीकचा मर्दपणा चालू होता. तर नेटीझन्सनी हार्दीकची बाजू घेत आपला खाजगीपणा ‘सेफ’ केला. पाठींबा पाहून हार्दीकचा उत्साह आणखीण वाढला, शुक्रवारी बेड व्हिडिओच्या निमित्ताने त्याने ट्विटरवरुन प्रधानसेवकांना लक्ष्य केलं.
भाजप आयटी सेलच्या अमित मालवीय यांनी पंडीत नेहरुंचे कुटुंबांसोबतचे फोटो अश्लिल म्हणून पोस्ट केले. 'हार्दीकमध्ये नेहरुंचा डीएनए जास्त आहे' असा वादग्रस्त ट्विटही मालवीय यांनी केला. गुजरातमधील काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी हार्दीक पटेलची तुलना सरदार पटेलशी केली होती. यावरुन भाजपने नेहरुंना हाताशी धरुन काँग्रेसवर प्रतिहल्ला केला. या वादग्रस्त ट्विटने भाजपच्या ट्रोलिंगच्या चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरु झाली होती. ‘भाजपमध्ये दंगे, वाद व ट्रेलिंगचा डीएनए सर्वात जास्त आहे’ अशा चर्चा या निमित्ताने रंगली होती. भाजप आयटी सेलने ट्विट केलेल्या फोटोमध्ये नेहरु आपल्या बहिण व भाच्चीसोबत दिसत आहेत. एक प्रेमळ क्षणाचा तो फोटो होता. पण भाजपने नेहरुंच्या विकृतीकरणाच्या टास्कमध्ये हा फोटो प्रचारित केला. या फोटोवरुन भाजप व काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची चांगलीच खडाजंगी झाली. या फोटोवरुन भाजपच्या विकृत परंपरेची चर्चा सुरु झाली. भाजपला आपली नाचक्की होत असल्याचं दिसताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चर्चा अन्यत्र वळविली.
शशी थरुर यांनी ‘पद्मावती’ रिलीज वादावर ट्विटरवरुन राजस्थानच्या राजेंना लक्ष्य केलं.
पद्मावती वादाचे पडसाद व्यक्तीगत घेत काँग्रेसचे दिग्गज नेते समोरासमोर होते. या वादामुळे तेराव्या शतकातील ‘राणी पद्मावती’ पुन्हा एकदा जीवंत झाली. पद्मावतीच्या इतिहासासोबत विकृतीकरण करुन दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने सिनेमा तयार केला, असा आरोप राजस्थानच्या शाही कुटुंबाने केला आहे. यावरुन गेल्या वर्षाभरापासून संघर्षाचं वातावरण आहे. राणी पद्मावतीचे वंशज व कर्णी सेनेनं अनेकदा सिनेमाच्या सेटवर जाऊन धुडगूस घातला आहे. हा सिनेमा येत्या 1 डिसेंबरला रिलीज होत आहे. त्यामुळे हा वाद आणखीण वाढला. सिनेमा रिलीज होऊ नये असा प्रयत्न कर्णी सेना व राजपूत नेते करत आहेत. पण राजस्थानच्या भाजप सरकारने सिनेमा निर्मात्यांना संरक्षण दिलं असून हा चित्रपट नियोजित वेळी प्रदर्शित होईल अशी ग्वाही दिली आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारने 'सिनेमा रिलीज केल्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतं' असं वक्तव्य केलं. त्यामुळे आता या वादाने राजकीय रंग घेतला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ‘दशक्रिया’ सिनेमाच्या रिलीजवरुन वाद झाला. ब्राह्मण महासंघाने सिनेमाला विरोध दर्शवत रिलीज न होऊ देण्याची भूमिका घेतली.
लेखक बाबा भांड यांनी लिहलेली ‘दशक्रिया’ कादंबरी 1992 मध्ये प्रकाशित झाली. पैठणच्या घाटावरील बहूजन मुलांचे चित्रण लेखक बाबा भांड यांनी साकारलं आहे. 92 साली या कांदबरीने साहित्य क्षेत्रात खळबळ उडवली होती. या कादंबरीवर सुरुवातीला दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सिनेमा तयार करणार होते. घोषणा होऊनही बरीच वर्ष सिनेमा आकाराला येत नव्हता. अखेर दिग्दर्शक संजय पाटील व रोम कोंडिलकर यांनी बाबा भांड यांच्याकडून तीन वर्ष पाठपुरावा करुन कादंबरीचे हक्क घेतले व सिनेमा तयार केला. याच वर्षी पुण्यातील ‘पीफ’ फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखविण्यात आला. दशक्रिया सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने तो जास्त चर्चेत आला. या शुक्रवारी दशक्रिया प्रदर्शित झाला. सिनेमातून ब्राह्मणांचे विदृपीकरण केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला. त्यामुळे सिनेमाचं रिलीज रोखावं अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. ही याचिका शुक्रवारी औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळून लावली. हे सुरु असताना आणखी एका नव्या मराठी सिनेमामुळे वाद निर्माण झाला. ‘भारतीय अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव’ म्हणजे इफ्फीने ‘गोवा फिल्म फेस्टीव्हल’मधून ‘न्यूड’ व ‘सेक्सी दुर्गा’ सिनेमे दिग्दर्शकांच्या परवानगीशिवाय काढून टाकले.
फेस्टीव्हलची अधिकृत इंट्री असताना हे सिनेमा केवळ नावावरुन बाद करण्यात आले. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सांगण्यावरुन सिनेमे फेस्टीव्हलमधून काढल्याचं माहिती प्रकाशात आली. या घटनेवरुन नाराज होऊन 13 सदस्याच्या ज्यूरीच्या प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिला ‘न्यूड’ हा मराठी सिनेमा होता तर ‘सेक्सी दुर्गा’ हा हिंदी-इंग्रजी सिनेमा आहे. सेक्सी दुर्गाला अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. 20 नोव्हेंबरपासून ‘गोवा फिल्म फेस्टिव्हल’ होतोय. पण ऐनवेळी सिनेमे काढल्याने निर्माते नाराज आहेत. यावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी काही बोलायला तयार नाहीत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी हार्दीक पटेलची ‘बेड सीडी’ मोठ्या चवीने बघितली जात होती, त्याचवेळी भाजप सरकारने अश्लिलतेचा ठपका ठेवत हे दोन सिनेमे बाद केले. अश्लिल सीडी तयार करुन प्रसारित करण्याचा वादग्रस्त इतिहास राहिलेल्या पक्षाने हे सिनेमे बाद करणे हास्यास्पद होतं, अशी चर्चा या निमित्ताने सुरु होती. परिणामी भापज पुन्हा एकदा टीकेचा लक्ष्य ठरला.
या सर्वांमधून लक्ष वळविण्यासाठी भाजपने सेफ गेम केला, आयोध्यामधील वादग्रस्त जागेवर तोडगा काढण्यासाठी ट्रिपल श्रींना यूपी दौऱ्यावर पाठवलं. सुप्रीम कोर्ट येत्या काही दिवसात बाबरी वादावर सुनावणी करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर राम मंदीर समर्थनाची जमीन तयार करण्याची योजना भाजपनं आखली आहे. मार्चमध्ये पुण्यातील एका मौलानांचा फोटो विनापरवानगी लावून राम मंदिरासाठी मुस्लिमांचं समर्थन मिळत असल्याचा दावा भाजपनं केला होता, यावर त्या मौलानांनी पुण्यात बदनामी केल्याची तक्रार नोंदवली होती. हरीत लवादाने ठोठावलेला दंड न भरता लोकांना मंदिर निर्मितीसाठी उपदेश करायला ट्रिपल श्रींनी यूपी दौरा केला. दुसरं म्हणजे मूडीज या संस्थेनं भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा केला. वरील दोन बातम्यांनी भाजपनं चर्चा वळविण्याचा प्रयत्न केला. पण भाजपची खेळी नेटीझन्स व विरोधकांना लक्षात आली, व वादग्रस्त मुद्द्यावर भाजपला ठोकणे सुरु झालं. हार्दिक सीडी व गोवा फिल्म फेस्टिव्हलवरुन भाजप टारगेट होऊ लागलं आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात 'सोशल मीडिया'वर भाजपवर हल्ले सुरु राहू शकतात.
*जाता-जाता
'शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला पाहीजे होती' असं विधान करुन महाराष्ट्रातील भाजपचे 'साले' पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऊसाच्या हमी भावासाठी काही शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आंदोलन केलं, या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले. यांच्या चौकशीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेले असता त्यांनी वरील निर्बुद्ध विधान केलं. यावरुन भाजप सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे, याची प्रचिती पुन्हा आली आहे.
कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com