टिपू सुलतान : भाजपचा स्टार प्रचारक


भाजपच्या निवडणुकांच्या प्रचार यंत्रणेसाठी टिपू सुलतान हा तुरूप का इक्काठरलेला आहे. कुठलेही निमित्त काढून भाजप व त्याच्या मातृ-पितृसंघटनेचे समर्थक म्हैसूर शासकाची विटंबना करतात. टिपूला बदनाम करणारे फक्त प्रतिगामीच नाहीत तर त्यात पुरोगामित्वाचे मिरासदारही आहेत. गेल्या १० वर्षांपासून संघ-परिवारालाकडून टिपूला दानव ठरवण्याचे प्रयत्न सूरू आहेत. त्यात उथळ न्यूज चॅनलनेदेखील आपली अग्रणी भूमिका बजावली आहे. त्यामुळे टिपू सुलतानला वादाचा केंद्रबिंदू ठरवण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो.
हा नोव्हेंबरला कर्नाटक सरकार टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहे. या निमित्तानं राज्य सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना निमंत्रण पाठवलं. हेगडे यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार देत सरकारच्या पत्रासह टिपू सुलतानबद्दल अपशब्द ट्विटरवर पोस्ट केले. यामुळे देशभरातील राजकारण पुन्हा एकदा मुस्लिम-हिंदू असं झालं आहे. या प्रकरणावर सुरू असलेल्या वादामुळे पुन्हा एकदा भाजपची हिंदु-मुस्लिम दुहीचं राजकारण काहीअंशी यशस्वी झाल्याचं दिसतंय.
उपरोक्त राजकारण पाहता मला पुन्हा एकदा ‘दी इकोनॉमिस्ट’ची जून २०१७मधील कव्हर स्टोरी आठवतेय. या स्टोरीत पत्रिकेनं भाजप सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली होती. यातून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी भाजप धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण खेळू शकतं, असा दावा ‘दी इकोनॉमिस्ट’नं केला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय. टिपू जयंती वादाला भाजपनं हिंदु-मुस्लिम रंग दिलाय. टिपूचं ऐतिहासिक पात्र २०० वर्षानंतर पुन्हा भाजपकृपेनं जीवंत झालंय.
वाचा : टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?
वाचा : द्वेषाच्या भांडवली बाजारात 'कमोडिटी शिवबा'
भाजपचा जुना अजेंडा
गेली अनेक दिवस हा मुद्दा मेनस्ट्रीम म्हणवणाऱ्या न्यूज चॅनलला पुन्हा एकदा राष्ट्रीय मुद्दा मिळाला. भाजप आणि टिपू सुलतान यांचे वैर काही नवं नाही. यापूर्वीही अनेक भाजप नेते व हिंदुत्ववादी संघटनांनी टिपू सुलतानच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल शंका उत्पन्न केली होती. त्यामुळे हेगडे यांच्या विधानाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही.
भाजपकडून सुरू झालेल्या या वादाचे मूळ कर्नाटकच्या आगामी विधानसभेत दडलेलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा कानडी राज्यात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष सुरू करण्याचे प्रयत्न केले आहेत. भाजपने सत्तेच्या राजकारणासाठी टिपूला काँग्रेसविरोधात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकात टिपू सुलतान भाजपसाठी स्टार प्रचारक ठरू शकतो, त्यामुळे हे प्रकरण गंभीरतेने घेण्याची गरज आहे.
भाजप हा मुस्लिमद्वेशी पक्ष असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळे तेही आता उघडपणे भूमिका घेत आहेत. किंबहुना ते मुस्लिमांना एका प्रकारे आव्हान देत आहेत. स्वातंत्र्य आंदोलनात काडीचाही सहभाग नसलेला वर्ग आज मुस्लिम स्वातंत्र्यसेनानींना व्हिलन ठरवण्यात अग्रेसर आहे. यातून कधी टिपू सुलतान तर कधी मुगलांना हिंदूविरोधी सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतात.
सत्तेत आल्यानंतर इतिहासाचं भगवेकरण करण्याचा सुनियोजित डाव भाजपनं सुरू केलाय. या कटशाहीवर अत्तापर्यंत बरंच लिखाण झालंय. तरीही मुस्लिम विरोधकांचे कुत्सीत मनसुबे सुरूच आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘ताजमहाल’ वादाकडे बघण्याची गरज आहे. 
ताजमहाल संदर्भात सुरू असलेल्या वादावर अनेकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. ‘ताजमहालचं बाबरी होता कामा नयेअसा सूर एकंदरीत पॅरलल मीडियावर पाहायला मिळतोय. ताजमहालचे ऐतिहासिक दस्ताऐवज चुकीच्या पद्धतीनं सादर केले जात आहेत. त्याला पूर्वग्रहदूषीत इतिहासाचे संदर्भ देण्याची स्पर्धा पु. ना. ओकपासून सुरू आहे. त्याने आता गती घेतली आहे.
मुळात, इतिहासाचे विकृतीकरण हा भाजपचा जुनाच अजेंडा आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात संघ परिवाराने ब्रिटिश सत्तेचे लांगूनचालन केलं, हे अनेक ऐतिहासिक दस्तऐवजातून सिद्ध झालेलं आहे. भारतीयांचा इंग्रज सत्तेविरोधात असलेला सूर मवाळ करण्यासाठी संघ परिवाराने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. 
१९४२च्या चले जाव चळवळीत सामील न होण्याचे पत्रक संघ परिवाराकडून काढण्यात आलं होतं. एकीकडे संबंध भारतीय या लढ्याला पोठिंबा देत होते, तुरुंगात जात होते, त्यावेळी संघाने स्वातंत्र्य लढ्यापासून अलिप्त राहून ब्रिटिशांना सहकार्य केले होते. 
संघ व त्यांच्या सहयोगी संघटना वसाहतवादाच्या समर्थक राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आपली ऐतिहासिक चुका दडवण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामातील नायकांना बदनाम करण्याचे षडयंत्र गतीने सुरू आहे.
वाचा : लेखक व कवी होता मुघल सम्राट बाबर
वाचा : दोषपूर्ण लिखाणाला अकादमिक मूल्य धोक्याचे
वसाहतवादाचा विरोधी नायक
महात्मा गांधींपासून सुरू झालेला हा विकृतीकरणाचा प्रवास बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू करत टिपू सुलतानपर्यत आलेला आहे. भारतात टिपू सुलतानला एक महान योद्धा म्हणून ओळखलं जातं. पण अलीकडे हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
टिपू सुलतान हा ब्रिटिशांच्या वसाहतवादाला विरोध करणारा पहिला नायक होता. इंग्रजांची गुलाम नाकारणारा तो पहिला लढवय्या होता. हैदराबादचे निजाम व पेशव्यांनी धोका दिल्यानंतरदेखील म्हैसूर शासक एकटाच बलाढ्य ब्रिटिश सत्तेविरोधात उभा राहिला. 
इंग्रजांशी लढताना म्हैसूर शासक हैदरअली धारातिर्थी पडले. परंतु त्यांनी ब्रिटिशांच्या वसाहतवादाला विरोध करण्याचा वसा आपले पूत्र टिपू सुलतानला दिला.
टिपू सुलतान यांनी तहयात इंग्रजांच्या सत्तेला केवळ विरोधच केला नाही तर त्यांनी ब्रिटिशांचा वेळोवेळी पराभव कला. टिपू सुलतान कानडी अस्मिता जागवणारा महापुरुष होता. आपल्या रयतेशी प्रामाणिक राहणारा हा योद्धा सनातनी प्रवृत्तीला विरोध करत राहिला. 
टिपू सुलतान यांच्यावर मंदिरांना नष्ट केल्याचा आरोप केला जातो. परंतु इतिहास असे सांगतो की, मराठा शासकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे टिपू सुलतानने पुन्हा बांधून दिली.
जनतेच्या कल्याणासाठी या शासकाने रयतेचा जाहिरनामा मांडला होता. या जाहिरनाम्यातून त्यांनी स्वतसाठी आचारसंहिता लागू केली होती. सरकारी पैशाचा अपहार केल्यास स्वतला फाशीवर चढवा म्हणणारा हा नायक होता. जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैश्विक शांतता समितीची स्थापना टिपू सुलतानने केली होती. 
टिपू एक उत्तम वाचक व अभ्यासक होता. त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथालयात हजारो पुस्तके होती. इतकेच नाही तर त्यांने अनेक ग्रंथांची रचनादेखील केली आहे. टिपू सुलतानचा या इतिहासावर अनेक दर्जेदार पुस्तके लिहिली गेली आहेत. अनेक संशोधकांनी टिपू सुलतानच्या महात्म्यावर शिक्कामोर्तेब केलेलं आहे. 
गेल्या काही वर्षांपासून टिपू सुलतानच्या या इतिहासाला विकृत पद्धतीने सादर केलं जात आहे. अर्थातच यातून हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याच कुत्सित डाव आहे. राजकीय विश्लेषक आकार पटेल म्हणतात,  “टिपूने किती हिंदू लोकांना मारले किंवा धर्मांतर केले याचीच माहिती लोकांकडे आहे. मग ती माहिती खरी असो वा खोटी.
मध्ययुगीन इतिहासाचा आधार घेत भारतीय मुस्लिमांचे शत्रुकरण करण्याची प्रक्रिया जुनी आहे. खिलजी, तुघलक, बाबर हे परकीय शासक होते. त्यांनी सत्ता विस्तारासाठी अनेक विकृत प्रयोग केले असतील. त्यांना नाकारण्यासारखे काही नाही, पण केवळ त्यांनी रक्तपातच केला नाही तर अनेक विधायक कामेदेखील केली आहेत. परंतु भारतीय मुस्लिमांना शत्रू ठरविण्यासाठी या शासकांच्या रक्तपाताचा इतिहास अतिरंजितपणे वारंवार सांगितला जातो. 
याउलट हिंदू शासकांचा इतिहास सोयीने सांगितला जातो दडपला जातो. इतिहास असे कितीतरी हिंदू राजे होऊन गेले ज्यांनी सत्तेसाठी नरसंहार केला. त्यांची आमचे अभ्यासक माहिती दडवून ठेवतात, किंवा चर्चेत त्याला स्थान देत नाही. या वृत्तीवर पटेल म्हणतात, अशोकासारख्या राजाने काही विदेशी नागरिक किंवा मुस्लिमांना ठार मारले नाही तर त्याने आपलेच लोक ठार मारले. ओरिया भाषा बोलणाऱ्या हिंदूंनाच लाखोंच्या संख्येने त्याने ठार केले. म्हणजेच आपला इतिहास कथांच्या साहाय्याने जाणून घेतला तर हे समजेल.
पटेल पुढे म्हणतात, आपण अशोकाला ‘सर्वश्रेष्ठ’ मानतो. त्याचे सिंहस्तंभाचे प्रतीक हे भारताचे अधिकृत चिन्ह आहे. भारतीय झेंड्यातील गोल चक्राला आपण अशोकचक्र मानतो. मग प्रश्न असा येतो, अशोकाला एवढा मान देतो तर टिपूला का देत नाही? या दोघांनीही एकाच तऱ्हेचा गुन्हा केलेला असला तरीही. याचे उत्तर सोपे आहे. हिंदू राजाने जे केले तेच मुस्लिम राजाने केलेले चालत नाही. 
अगदी तेच परिमाण टिपूसाठी प्रतिगामी वापरू पाहात आहेत. इथे त्यांचे गणित चुकलेलं आहे. टिपू हा परकीय शासक नव्हता. तो एतद्देशीय भारतीय राजा होता. तो भारताच्या मातीत जन्मलेला, वाढलेला एक शूर व पराक्रमी योद्धा आहे.
महात्मा गांधींनी टिपूच्या राज्यकारभाराचे कौतुक करीत लिहिले, “म्हैसूरचा फतेहली टिपू सुलतान हा एक धर्मांध म्हणून दाखवला गेला ज्याने आपल्या हिंदू प्रजेवर अत्याचार केले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले; पण तो तसा काही नव्हता. दुसरीकडे, त्यांचे हिंदू प्रजेशी असलेले संबंध अगदी सौहार्दपूर्ण होते.”
टिपू भारतीय़ अस्मितेचे प्रतीक आहे. या शुरवीर योद्धाच्या सन्मानासाठी २०१५ साली कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं शासकीय खर्चातून ‘टिपू सुलतान जन्मोत्सव’ सोहळा साजरा करण्याची घोषणा केली. याला भाजपनं विरोध केला. 
भाजपला मुस्लिमांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान पुसून टाकायचे आहे. याचाच भाग म्हणून भाजपने ही विकृत केळ सुरू केला आहे. केवळ विरोध करायचा म्हणून दरवर्षी टिपू सुलतानबद्दल वाद उकरुन काढला जात असतो. हेगडेंचे विधान या श्रृखलेची एक कडी आहे.
म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्याविरोधात अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री हेगडे यांच्याविरोधात पहिली तक्रार नोंदवण्यात आली आहे. बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यात ही तक्रार दाखल करण्यात झाली आहे. यानंतर हैदराबादनागपूर इत्यादी ठिकाणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारकर्त्यांनी महामहिम राष्ट्रपतींना हेगडेंंविरोधात कारवाईसाठी हजारो पत्र पाठवली आहेत.
वाचा : दोषपूर्ण लिखाणाला अकादमिक मूल्य धोक्याचे
वाचा : ‘हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’
अकारण वाद
भाजपच्या सत्ताकाळात स्वातंत्र्य आंदोलनातील इतिहासाला मोडून-तोडून सादर करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अर्थातच सत्ताबदलाचं हे प्रयोजन आहे. मागील सरकारनेही आपल्या सोयीप्रमाणे इतिहास वळविला होता. पण त्यांनी मुस्लिम शासक किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेला धक्का लावला नव्हता. पण भाजपने सत्तेवर येताच दिल्लीतील औरंगजेब रोडचं नामकरण केलं. हा मुस्लिम प्रतीकांचा इतिहास पुसून टाकण्याची पहिली पायरी होती. 
राष्ट्रीय पातळीवर मुगलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून वगळण्याची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी नियोजितपणे मुस्लिम प्रतिकांना हिंदूविरोधीराष्ट्रविरोधी सिद्ध करण्याचा आटा-पिटा सुरू करण्यात आला. कोणीतरी सुमार नेता उठून मुस्लिम प्रतीकांबद्दल अपशब्द वापरतो. 
पक्षातील वरीष्ठ मंडळी काही न बोलता फक्त वाद कसा वाढेल याची काळजी घेतात. अखेर वाद विकोपाला गेला तर काहीतरी सौम्य भूमिका घेऊन वादावर पडदा टाकायचा, अशी पद्धत सत्ताधारी पक्षाने सुरू केली आहे. 
मागे मुगलांच्या इतिहासासंदर्भात वाद सुरू असताना पीएम अचानक म्यानमारमधील मोघल बादशहा बहादूरशहा जफर यांच्या मजारीवर गेले. त्यामुळे हा वाद शमला. काही दिवसांपूर्वी ताजमहाल वादावर यूपीच्या सीएमने ताज परिसरात झाडू मारुन दिलगिरी व्यक्त केली.
२०१२ साली भाजपच्या बी. एस. येड्डियुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना टिपू सुलतानबद्दल अपशब्द काढले होते. त्यावेळी ते कर्नाटक जनता पक्षात होते. कानडी जनतेनं त्यांना विरोध केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येड्डियुरप्पांनी टिपू सुलतानची पगडी घालून म्हैसुरच्या मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रचार केला होता. 
याच येड्डियुरप्पांनी सत्तेवर आल्यांवर पुन्हा टिपू सुलतानचे विकृतीकरण केले. येड्डियुरप्पांची वागणूक दुटप्पीपणाची होती. आता काँग्रेस सरकारच्या काळात त्यांचा हा विरोध अधिक तीव्र झाला आहे.
भारतात इतिहास लेखनाची परंपरा मुळातच द्वेशधारी राहिलेली आहे. इतिहास लिहिणाऱ्या वर्गाने सबंध इतिहास द्वेश व कमी लेखण्यातून रचला आहे. यातून इस्लाम व मुस्लिमद्वेशी राजकारण जन्माला आलं आहे. 
यावर अभ्यासक राम पुनियानी म्हणतात, “भारतात गेली काही दशके मुस्लिम शासकांचे दानवीकरण करुन हिंदुत्ववादी इतिहासकार प्रस्थ माजवताना दिसत आहेतजमातवादी शक्ती नेहमी इतिहासातील घटनांचा वापर त्यांच्या राजकारणासाठी करुन घेताना दिसतात. त्याच सुत्रांद्वारे भूतकाळातील मुस्लिम शासकांचेच प्रतिनिधी आजच्या मुस्लिम समाजाला ठरवूनआजचे हिंदू हे त्या मुस्लिम शासकांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या हिंदूंचे वंशज आहेत असे मांडून मुस्लिमांचे दानवीकरण करण्यात येत आहे.
इतिहास संशोधक सरफराज अहमद या प्रक्रियेला स्वातंत्र्य आंदोलनाची प्रतीकं मोडून टाकण्याचं षडयंत्र म्हणतात, “स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लिमांचा सहभाग मोठा होताया उलट संघानं स्वातंत्र्यविरोधी धो़रणं आखली होतीहे पुराव्यातून सिद्ध झालंयअशावेळी शत्रुपक्ष आमच्यापेक्षा वरचढ ठरता कामा नये, यातून मुस्लिमांची ऐतिहासिक प्रतिकं नष्ट करण्याचा कट राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आखत आहे.
सरफराज अहमद यांच्या वक्तव्याला पुनियानीदेखील दुजोरा देतात, ज्येष्ठ विचारवंत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यावर एकदा म्हणाले होते, “चिकित्सक व सुधारणावादी इतिहास लेखकाची समाजाला गरज आहे. त्यामुळे तरुण अभ्यासकांनी समतोल इतिहास लेखनाची जबाबदारी स्वीकारावी.
इतिहासाच्या सांप्रदायिकरणाबद्दल चर्चो करू तेवढी कमीच आहे. भाजप-संघ समर्थित कथित बुद्धिजिवींनी हिंन्दुंचा इतिहास लिहिण्याच्या नावाने इतिहासलेखनाच्या प्रक्रियेत नव-नवे प्रक्षेप घडविले आहेत. त्यातून नेहमीच काही न काही वाद उभे करून त्यावर निर्रथक चर्चा रंगवली जाते. 
टिपूच्या बाबतीत हे घडणे नेहमीचे झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार आकार पटेल म्हणतात, टिपू सुलतानबद्दल नुसतीच चर्चा करत राहंण्यापेक्षा इतिहासाची पुस्तके वाचून कोणाही व्यक्तीने अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. मुख्य प्रश्न हा आहे, भारतामध्ये यासंदर्भात फार कमी पुस्तके लिहिली गेली आहेत. जगातील इतर सुसंस्कृत भागात अशी परिस्थिती नाही.
टिपू सुलतानविरोधात भाजपनं सुरू केलेल्या इतिहासाच्या राक्षसीकरणाच्या मोहिमेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चांगलंच उत्तर दिलंय. २५ ऑक्टोबर २०१७ला कर्नाटक विधानसभेत झालेल्या एका कार्यक्रमात मा. राष्ट्रपतींनी टिपू सुलतानबद्दल गौरवोद्गार काढले. भाजपची भूमिका तोडून काढताना कोविंद म्हणाले, “टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सेनानी होताइंग्रजांशी लढताना त्याला वीरमरण आलं. टिपू सुलतानने रॉकेटच्या विकासात सर्वात मोठे योगदान दिलं आहे.”
पढे : दारा शिकोह के प्रति RSS के झुकाव का मतलब
पढे : क्या सचमुच औरंगजेब हिन्दुओं के लिए बुरा शासक था?
राष्ट्रपतींनी नवं काही सांगितलं नाही. पण भाजपकडून सुरू असलेल्या बदनामीकरणाला हे उत्तर पुरेसं होतं. उपरोक्त विधान करून राष्ट्रपतींनी भाजपच्या इतिहास विकृतीकरणाला मोहिमेला चाप लावली आहे. 
कारण, काही दिवसांपूर्वीच टिपू सुलतानच्या जयंतीला केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी विरोध दर्शवला  होता. त्यानंतर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही टिपू सुलतानबद्दल अपशब्द काढले होते. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे भारतात पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीतील व स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम प्रतिकं नष्ट करण्याच्या षडयंत्रावर चर्चा सुरू झाली आहे.
टिपू सुलतानच्या राक्षसीकरण चालू असल्याने ही जाहीर चर्चा सुरू झाली आहे. पण अंतर्गत पातळीवर ऐतिहासिक प्रतिकं बदलण्याचं षडयंत्र हाणून पाडावं लागेल. इतिहासाच्या भगवेकरणामुळे आगामी काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतातमुस्लिम शासकाचं दानवीकरणारचं षडयंत्र भारतात विवेकशील समाजनिर्मितीला बाधा पोहचवणारं आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेतलेली बरीअन्यथा ताजमहलचंही बाबरी व्हायला वेळ लागणार नाही.

कलीम अजीम
Twitter@kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: टिपू सुलतान : भाजपचा स्टार प्रचारक
टिपू सुलतान : भाजपचा स्टार प्रचारक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXjisiPLd_uw7Y2boJjaG3UjF4V9HFB8Y1dJOLHTMv2VinU19v9rmd5H2JEH8L9zzrZc2OeMGa3guXdignksgQ6DnzEvLBI6Edd1wRQ4gZKcBr71mvHXWu4Zq-uxC0DgJ9mbn-RCs9nwWX/s640/Screenshot_20171105-081645-1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXjisiPLd_uw7Y2boJjaG3UjF4V9HFB8Y1dJOLHTMv2VinU19v9rmd5H2JEH8L9zzrZc2OeMGa3guXdignksgQ6DnzEvLBI6Edd1wRQ4gZKcBr71mvHXWu4Zq-uxC0DgJ9mbn-RCs9nwWX/s72-c/Screenshot_20171105-081645-1.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/10/blog-post_29.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/10/blog-post_29.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content