रात्री अडीचला राजदनं सरकार स्थापनेचा दावा करुन शपथविधी रोखण्याची विनंती केली, मात्र होऊ घातलेला शपथविधी कदापी रोखता येणार नाही, असं स्पष्टीकरण राज्यपालांनी दिलं. सरकार स्थापनेसंदर्भात गुरुवारी सकाळी अकरा वाजता राजभवनमध्ये भेटण्याची वेळ दिली. ‘सरकार स्थापनेची संधी नाही दिली तर राजभवनसमोर धरणे आंदोलन करु’ असा इशारा देत तेजस्वी यादव निघून गेले. अर्थातच राजद सरकार स्थापन करु नये याची पुरेपूर तयारी भाजपकडून करण्यात आली होती. त्यामुळेच संध्याकाळी पाचऐवजी सकाळी दहाला शपथविधी निश्चित करण्यात आला. दुसरीकडे भेट टाळत भाजप पक्षाचे राज्यपाल पहाटेच हॉस्पिटललाईज्ड झाले. दुसरीकडे समाजवादी विचारसरणीच्या नीतीश कुमार यांनी पक्ष पोर्टिबिलिटी स्वीकारुन हिंदुत्ववादी पक्षाचे सीएम झाले. राजदला शेवटपर्यंत डावपेच आखत सत्ता स्थापनेपासून लांब ठेवलं. नीतीश कुमार यांच्या दोलायम भूमिकेमुळे समाजवाद खरंच धोक्यात आला आहे का? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.नीतीश कुमार यांना पोर्टिबिलिटी करुन भाजपने आणखी एक विरोधी पक्ष संपवला आहे. लव्ह जिहाद, घरवापसी, नोटबंदी, जीएसटीवरुन सरकारची कोंडी करणारा जदयु भाजपने खिशात घेवून ठेवला आहे. त्यामुळे तुर्तास इतर विरोधी नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. याचं निमित्त साधून समाजवाद्यांवर टिकास्त्र सोडण्याचं काम भाजप विरोधक करत आहेत. अर्थातच नीतीश कुमार यांनी आपल्याच स्वकीय बंधूंच्या हाती उगारण्यासाठी कोलित दिल्यानं समाजवादी विचारसरणीचे इतर नेते टारगेट होत आहेत.
सेक्युलर विचारसरणीचा पक्ष सत्तेसाठी हिंदुत्ववाद्यांच्या वळचणीला जाऊन बसल्यानं राममनोहर लोहिया ते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेवरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे समाजवादी विचार खरंच धोक्यात आला आहे का? अशी चर्चा सुरु आहे. नीतीश कुमार यांच्या दोलायम भूमिकेमुळे हा प्रश्न असेल तर राजकीय विश्लेषकांची भूमिका चुकीची आहे. कारण याआधीही नीतीश कुमार यांनी भाजपकडून लाभाची पदे स्वीकारली आहेत. विरुद्ध टोकाच्या पक्षासोबत सत्ता उपभोगली आहे.
त्यामुळे नीतीश कुमार यांच्या आंतररात्म्याला दोष देणारे जदयु पक्षाचे इतर नेतेही भंपकासारखे वागत आहेत. कारण भाजपसोबत जदयुची युती असतानाच हे नेते राज्यसभेवर गेले आहेत. अर्थातच भाजपच्या पाठींब्याशिवाय हे शक्य नव्हतं. ही पदे स्वीकारताना त्यांच्या आंतररात्म्यांनी आवाज दिला नाही, मात्र भाजपसोबत सत्तेचा दुसरा अध्याय सुरु करताच या नेत्यांचा आंतररात्मा भाजपविरोधी कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर भाजप युतीला विरोध करणाऱ्या जदयु नेत्यांना द्यावा लागेल.
नीतीश कुमार यांनी गुरुवारी बिहारच्या
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन लालू प्रसाद यादव यांना चेकमेट केलं. महायुतीशी
फारकत घेताच अवघ्या 12 तासात सुशासन
बाबू भगवा फेटा घालत पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. एखाद्या मसाला सिनेमाला शोभावी
अशी कथा दिल्लीच्या भाजप मुख्यालयात लिहण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या राजकीय स्क्रीप्टमागे दोन मोदी होते. एक
आपले प्रधानसेवक मोदी तर दुसरे बिहारचे सुशील मोदी हे या नाटकीय घडामोडी मागचे खरे लेखक होते.
भाजपने राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्या खांद्यावर बंदूका ठेवून राजकीय नाट्याची स्क्रीप्ट लिहून घेतली, हेदेखील स्पष्ट झालं आहे. या संपूर्ण घटनाक्रमातील एक एक पैलू पुढे येण्यास सुरूवात झाली आहे. राजदनं नीतीश कुमार यांच्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केलीय, ‘भाजपविरोधात कौल असताना भाजपसोबत युती करुन नीतीश यांनी बिहारी जनतेच्या थोबाडीत मारलं आहे’ असा सणसणीत टोला लालूंनी नीतीशना हाणला आहे. तर दुसरीकडे समाजवादी गोटातून नीतीश यांच्यावर शाब्दीक हल्ले सुरुच आहेत. नीतीश कुमार हे संधीसाधू, आपमतलबी, पाठीत खंजीर खुपसणारे, स्वार्थी, छुपे हिंदुत्ववादी असल्याचं बोललं जात आहे.
राजदचे तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप आहे. 2006साली लालू प्रसाद यादव केंद्रात रेल्वे मंत्री होते. यावेळी रेल्वे कँटीनचं टेंडर देताना तेजस्वी यादव यांनी आर्थिक लाभ उचलल्याचा आरोप आहे. महिनाभरापासून तेजस्वी यादव वादात आहेत. याच कारणांमुळे राजीनामा दिल्याचं नीतीश कुमार सांगत आहेत. मात्र तेजस्वी यादवनी नीतीश कुमार यांचे आरोप फेटाळले आहेत.
‘नीतीश यांना भाजपकडे जायचं होतं माझं निमित्त करुन ते गेले’ असं तेजस्वी म्हणतात. राजीनाम्यानंतर ते तात्काळ प्रेसशी बोलले. प्रेसला माहिती देत महायुतीतून बाहेर पडल्याचं घोषित केलं. दुसरीकडे महायुतीतला मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दलाने रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेतली. यात पक्षाध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी महायुतीतील इतर पक्षांना आगामी नेतृत्व कोणाकडे असावं, याची चर्चा केली.
लालूंच्या प्रेसनंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या. याचवेळी भाजपने बैठक घेवून नीतीश कुमार यांना पाठींबा जाहीर केला. रात्री नऊच्या सुमारास नीतीश कुमार यांनी राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांना भाजप आमदारांच्या पाठींब्याची यादी देवून सरकार स्थापनेचा दावा केला.
गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी घोषणा करण्यात आली. डीडी न्यूजने रात्री साडे अकराला ट्विटरवरुन ही बातमी दिली. इकडे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जदयुचे आमदार पाठींबा देत असून बहुमताचा पक्ष म्हणून आम्हीच सरकार स्थापन करणार असा दावा ट्विटरवरुन केला. यासाठी लवकरच राज्यपालांना भेटणार आहोत, असंही सांगितलं.
रात्री बाराच्या सुमारास नीतीश कुमार यांचा शपथविधीचा टाईम बदलून सकाळी दहा वाजता करण्यात आला. यानंतर अजुन एक ट्वीट तेजस्वी यादव यांनी केलं, ‘जदयुच्या सर्व आमदारांनी नीतीश यांनी घरात का कोंडून ठेवलंय, हीच का आंतररात्माची आवाज?’ नीतीश यांना उद्देशून हे ट्वीट होतं. एवढ्यावरच न थांबता रात्री अडीचला उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत राजदनं सरकार स्थापनेचा दावा करुन शपथविधी रोखण्याची विनंती केली होती. शपथविधी रोखता येणार नाही असं स्पष्टीकरण राज्यपालांनी तेजस्वी यादव यांना दिलं.
सरकार स्थापनेसंदर्भात गुरुवारी सकाळी अकरा वाजता राजभवनमध्ये भेटण्याची वेळ दिली. ‘राजदला सरकार स्थापनेची संधी नाही दिली तर राजभवनसमोर धरणे आंदोलन करु’ असा इशारा देत तेजस्वी यादव निघून गेले, अशी बातमी दैनिक भास्करला सकाळी सहा वाजता होती. राजदच्या हालचाली पाहता सकाळी साडे सातला राज्यपाल कानाच्या आजारावर उपचारासाठी अॅडमीट झाले.
अर्थातच राजद सरकार स्थापन करु नये याची पुरेपूर तयारी भाजपकडून करण्यात आली होती. त्यामुळेच संध्याकाळी पाचऐवजी सकाळी दहाला शपथविधी निश्चित करण्यात आला. दुसरीकडे भेट टाळत भाजप पक्षाचे राज्यपाल पहाटेच हॉस्पिटललाईज्ड झाले. राजदकडे 80+27 तर जदयुकडे फक्त 71 आमदार आहेत. नियमानुसार बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापनेचं निमत्रंण राज्यपालांनी द्यायला हवं. मात्र, बहुमत असणाऱ्या पक्षाला राज्यपालांनी भेटण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला होता.

नीतीश कुमार यांची जडणघडण जेपींच्या
आंदोलनातून झाली. लालू-नीतीश जेपींच्या संपूर्ण क्रांती आंदोलनापासून एकत्र होते.
नंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. नीतीश यांनी समता पक्ष व नंतर जनता दल युनायटेड पक्षाची स्थापना केली. 1999 साली ते भाजपच्या वाजपेयी सरकारात
रेल्वे मंत्री झाले. 2005 साली राज्यात जदयु-भाजप युतीचे
ते मुख्यमंत्री झाले.
नीतीश कुमार 2019 साठी विरोधी पक्षाकडून पीएम पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा बिहार निवडणुकीनंतर झाली. नीतीश कुमार यांची सुशासन बाबू अशी ‘क्लीन छबी’ भाजपला अडचणीची वाटू लागली. यातून मार्ग काढण्यासाठी भाजपने पक्ष पोर्टिबिलिटी करुन नीतीश यांना सीएमच्या खुर्चीवर बसवलं. नीतीश कुमार यांच्यावर आर्म्स एक्टसह 1991च्या एका प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल आहे. पाटणा हायकोर्टाने या खटल्यात सध्या स्थगिती आणली आहे. यावरुन भाजप अडचणीत आणू शकतं हे नीतीश कुमार यांना आधीच कळालं होतं.
भाजपने लालू आणि मीसा भारती यांच्या कार्यालयावर सीबीआयला हाताशी धरुन छापे टाकले. हे छापे नीतीश कुमार यांना अप्रत्यक्ष इशारा होता. जुलैमध्ये अखेर मी 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या शर्यतीत नाही, असा बचावात्मक पवित्रा नीतीश कुमार यांनी अचानकपणे घेतला. इतर सहकारी पक्षांचा विरोध असतानाही कोविंद यांच्या राष्ट्रपती निवडणुकीला त्यांनी पाठींबा दिला. चक्क महायुतीतून बाहेर पडत भाजपच्या कुबड्या घेत सरकार स्थापन केलं.

भाजपकडून 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली
आहे. सुरुवातीला दिल्लीत केजरीवाल यांना अडचणीत आणून आमदार फोडणे, प्रसंगी तुरुंगात टाकणे, सीबीआयच्या धाडी
टाकणे असे प्रकार सुरु होते. तामिळनाडुत राज्यपालांना हाताशी घेत सत्तापालट केलं.
यानंतर गोवा, मणिपूरमध्ये भाजपविरोधी कौल असताना अपक्षांच्या
मदतीने स्थानिक जनतेवर भाजपचं सरकार लादलं.
पश्चिम बंगालमध्ये गोरखालँडचं आंदोलन, राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्या खांद्यावर बंदूका ठेवून हिंदू-मुस्लीम दंगलीत वातावरण बिघडवण्याचं काम भाजपनं केलं होतं. यातून ममता बॅनर्जींना अडचणीत आणून पश्चिम बंगालची विधानसभा बरखास्त करण्याचा भाजपचा डाव होता. हेच त्रिपाठी बिहारचे प्रभारी राज्यपाल आहेत, इथंही राज्यपालांना हाताशी धरुन सत्तापालटाची स्क्रीप्ट लिहली गेली.
बिहारमध्ये भाजपविरोधी कौल होता. अशावेळी विधानसभा भंग करुन जनतेला कौल देण्याची संधी देता आली असती. पण हे भाजपला मान्य नव्हते. बिहारी जनतेसोबत विश्वासघात करुन भाजपने सत्ता स्थापन केली आहे. इतर राजकीय पक्ष खासदार, आमदार, नगरसेवक फोडतात. मात्र, भारताच्या प्रधानसेवकांनी चक्क मुख्यमंत्री फोडला’ अशा आशयाचे मेसेज गुरुवारी व्हॉट्सअपवर फिरत होता.
यातली विनोदबुद्धी बाजूला ठेवली तर हा संदेश इतर राजकीय पक्षाला खूप काही शिकवून गेला. बिहारच्या सत्ताबदलानं दोनच महिन्यांपूर्वी जदयुत प्रवेश केलेले महाराष्ट्राचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांची पुरती गोची झाली. यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं, गुरुवारी पत्रक काढून त्यांनी सत्ताबदलाबाबत चिंता व्यक्त केली. दुसरीकडे उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना जदयुनं पाठिंबा जाहीर केला आहे. आता बदलत्या परिस्थितीत पक्ष काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com