ही गोष्ट आहे घृणास्पद लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या भारतातील दोन लेकींची. त्यातली एक आहे २३ वर्षीय ज्योती सिंग. आपल्या परिवाराला कष्टातून बाहेर काढत सुखाचे दिवस दाखवण्याची स्वप्ने या वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थिनीच्या डोळ्यात होती. पण २०१२ सालच्या डिसेंबर महिन्यात देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. दुसरी आहे बिल्कीस बानो. २००२ साली गुजरातेत उसळलेल्या जातीय दंगलीत तिथल्याच दाहोद जिल्ह्यातील एका खेड्यात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय बिल्कीस बानोवर दंगलखोरांच्या जमावाने सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तिच्या डोळ्या देखत तिच्याच तीन वर्षाच्या मुलाला आणि परिवारातील १३ लोकांना या जमावाने ठार मारले होते. ज्योती आणि बिल्कीस ही दोन उदाहरणे खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची काळी बाजू आहे. महिलांवर होणारे अत्याचार अजूनही कमी झालेले नाहीत हेच यातून स्पष्ट होते. ज्योती आणि बिल्कीसच्या बाबतीत जे काही घडले त्यालाही दोन बाजू आहेत, दोघी घटनांच्या बाबतीत जो फरक झाला आहे त्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मागील आठवड्यात ज्योती सिंगच्या चारही मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचा अर्थ गुन्हा घडल्यापासून साडेचार वर्षांच्या आत या प्रकरणाला न्याय देण्यात आला आहे. त्याच्याच एक दिवस आधी मुंबई उच्च न्यायालयाने बिल्कीस प्रकरणात आरोपी असलेल्या अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ज्या सहा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सरकारी डॉक्टरने हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनाही तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ज्योती सिंग प्रकरणात न्यायालयाचा जो निकाल आला त्याची बातमी प्रत्येक राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्राने मथळा म्हणून छापली होती, दूरचित्रवाहिन्यांनीसुद्धा या बातमीला विशेष महत्त्व दिले होते. पण बिल्कीस प्रकरणातील निकालाला मात्र वृत्तपत्रांनी तेवढे महत्त्व दिले नव्हते आणि वाहिन्यांनी यावर चर्चा घेतली नव्हती. हा फरक फारसा आश्चर्यकारक नाही. ज्योती सिंगची उद्वेगजनक हत्या देशाच्या राजधानीत झाली होती आणि तिथे सर्वच वृत्तवाहिन्यांचे तसेच वृत्तपत्रांचे मुख्यालये आहेत. तिच्या मृत्यूनंतर काही तासातच हजारो लोक राजपथावर जमले होते. जनतेचा रोष उत्स्फूर्त होता. या रोषाचे पडसाद संसदेत उमटले होते, अखेर माजी मुख्य न्यायाधीश दिवंगत जे. एस. वर्मा यांच्या नेतृत्वात लैंगिक हिंसेच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. याच्या उलट बिल्कीस बानो ही एवढी गंभीर घटना घडल्यानंतर दाहोद येथील दंगलग्रस्तांसाठीच्या छावणीत रहात होती.बिल्कीस बानोने स्थानिक पोलिसांकडे गुन्हे नोंदवण्याचे प्रयत्न केले होते; पण पोलिसांनी तिच्या मागणीकडे दुर्लक्ष केले शिवाय तिला गुन्हा नोंदवू नये म्हणून धमकावलेदेखील होते. पण जेव्हा आमच्यापैकी कुणीतरी या प्रकरणावर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रकाश टाकला , त्यानंतर मात्र एनजीओंनी यात उडी घेतली आणि लढा चालू केला होता. दशकभराहून अधिक काळ बिल्कीस बानोने हे प्रकरण धाडसाने लावून धरले.
ज्योती सिंगच्या स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक पातळीवर माहितीपट तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते; पण कुणातही बिल्कीस आणि तिच्या कुटुंबीयांना भेटण्याची हिम्मत झाली नव्हती. जेव्हा दोघाही प्रकरणात कठोर शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा न्यायाधीशांच्या आदेशातून दोन भिन्न जनभावना अभिव्यक्त झाल्या होत्या. ज्योती सिंग प्रकरणात न्याय देताना न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले होते की, या घटनेने देशभर संतापाची त्सुनामी निर्माण झाली व तो बलात्कार आणि हत्या ही अत्यंत क्रूर व दुर्मिळातील दुर्मीळ घटना होती. बिल्कीस प्रकरणात न्यायाधीशांनी असे म्हटले होते की, हा गुन्हा हा तात्कालिक कारणाने घडला आहे. दोषींच्या मृत्युदंडाला फेटाळताना न्यायाधीशांनी असे म्हटले होते की, घटनेच्या वेळी गुन्हेगार गोध्रा रेल्वे जळीत प्रकरणामुळे सुडाने पेटलेले होते. विशेष म्हणजे मी जेव्हा बिल्कीसला विचारले होते की, ती या न्यायाने समाधानी आहे का तर त्यावर तिचे उत्तर होते की तिला फक्त न्याय हवा होता, प्रतिशोध घ्यायचा नव्हता. माझा आता जगाला साधा प्रश्न आहे की जातीय दंगलींच्या काळात सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेला मिळालेला न्याय हा दिल्लीतल्या एका बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील न्यायापेक्षा वेगळा असू शकतो का? ज्या दिवशी या प्रश्नाचे उत्तर सापडेल त्या दिवशी कदाचित आपण भारतातील कायद्यातील असमानतेविषयी जागरूक होऊ.

-राजदीप सरदेसाई
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com