माझ्या अंबाजोगाई शहरात कामाचं कौतुक आणि सन्मान होणं यापेक्षा मोठा आनंद नसतो. त्यातही हा कौतुक सोहळा गुरुजनांच्या (या कार्यक्रमाला माझे गुरुवर्य डॉ. सुधीर गव्हाणे येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही) हाती असेल तर ‘सोने पे सुहागा’ म्हणू या.
आज २४ डिसेंबर २०१६
रोजी अंबाजोगाईत कै. त्र्यंबक आसरडोहकर स्मृती समारोह होत आहे. त्र्यंबक आसरडोहकर
ग्रामीण लेखक आणि पत्रकार अशी त्यांची ओळख, यांच्या स्मतिपित्यर्थ मला पत्रकारितील
उल्लेखनीय योगदानाविषयी पुरस्कार देण्यात येत आहे. यासाठी मी प्रथम आसरडोहकर
कुटुंबीय आणि निवड समितीचं आभार मानतो.
माझ्या पत्रकारितेतील
छोट्याशा कार्यासाठी हा सन्मान दिलं जात आहे. तसं पाहिलं तर माझा पत्रकारितेचा खूप
त्रोटक अनुभव आहे. २०१४ सालापासून मी मीडियात पूर्णपणे सक्रिय झालो. त्यानंतर
अद्याप फार अनुभव गाठीशी नाही. पण पत्रकारितेचे वेगवेगळे प्रयोग मात्र काही केलेली
आहेत. महत्त्वाचा म्हणजे माझा ‘नजरिया’ ब्लॉग! २०१० पासून मी हा ब्लॉगनियमित चालवतो.
अंबाजोगाई, औरंगाबाद, पुणे व्हाया मुंबई प्रवास तसा सोपा नव्हता. मध्यम शहरातून महानगरात स्थलांतर होताना सुरुवातीला त्रास झाला. लेखन कौशल्य शिकण्यासाठी मी वयाच्या तेविशीत अंबाजोगाई सोडलं. टेलरिंगचा जम बसलेला व्यवसाय मी सोडून औरंगाबादला गेलो. माझ्या निर्णयाचा घरच्या प्रत्येक सदस्यांनी विरोध केला. मी मात्र ठाम होतो.
कधी न बाहेर पडलेला मी औरंगाबादला आलो. घरातून थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आलो होतो. कौटुंबिक अडचणीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. अपयश आलं तरी परत फिरायचं नव्हते आणि काहीतरी करून दाखवायचं होतं.
इथं जर्नलिझम विभाग आणि विद्यापीठात रमू लागलो. ग्रंथालयातील अनेक पुस्तके मी अक्षरश: मी अधाशारखी वाचून काढली. माझं वाढलेलं अवांतर वाचन मला स्वस्थ बसू देत नव्हते. कदाचित इथलं वातावरण माझ्या आतल्या कौशल्य आणि गुणांना पोषक ठरले. किंवा वयाच्या मोठ्या टप्प्यात असल्यानं मला ते व्यवस्थित हँडल करता आलं, असंही म्हणता येईल.
इथं जर्नलिझम विभागात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढे पुण्यात मास्टर्ससाठी मुव्ह झालो. बामू ते पुणे विद्यापीठ असा जर्नलिझम शिक्षणाचा प्रवास घडला. पुणे माझ्यासाठी नवं आव्हान होतं. रानडेत शिकत असताना वैचारिक बैठका वाढल्या. कला, साहित्य, नृत्य, सिनेमा, नाटके, कवी संमेलनात सहभाग वाढला. याचवेळी डावं, उजवं, प्रतिगामी, पुरोगामी, मार्क्स, लेनिन, स्टैलिन, हिटलर, संघ, गांधी, आंबेडकर, आझाद, नेहरु, तुकाराम तत्सम व्यक्ती आणि संस्थाची पारायणं नियमीत सुरु झाली. परिणामी वैचारिक ‘लाईन’ पक्की झाली.
पुण्यात येताच लेखन वाढलं. लेखक, कवी, साहित्य, सिनेमा क्षेत्रातील मित्रमंडळाचा गोतावळा वाढला. सर्वजण विशिष्ट वैचारिक ‘लाईन’चेच होते. याच काळात कम्युनिस्ट, सोशालिस्ट, गांधीवादी विचाराकडे आर्कषण वाढलं. परिणामी आपोआप सुधारणावादी चळवळीशी जोडलो गेलो. हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की पत्रकारिता करत असताना या गोष्टी मला खुप उपयोगी पडल्या. विचारसरणीचा पगडा वाढल्याने माझं लिखाण धारदार होत गेले.
धारदार लिखाणाला मेनस्ट्रीम मीडियात जागा नव्हती. विचारांची खाज भागवण्यासाठी ‘सुंबरान’ मासिक निर्मितीची संकल्पना पुढे आली. अल्पावधीतच ‘सुंबरान’ तरुणात लोकप्रीय झालं. खऱ्या अर्थानं सुंबरान मासिकच माझी दिशा ठरवून गेलं. ‘सुंबरान’ हे आमचं साईड प्रोडक्ट होतं. याव्यतिरिक्त ‘सकाळ’ आणि नंतर ‘मी मराठी’ पत्रकारिता केली. इथं विविध बीट कव्हर केली. सांस्कृतिक आणि राजकीय बीट माझ्या आवडीचे विषय, बातमीदारी करताना अनेक गोष्टी जवळून पाहिल्या.
‘सुंबरान’च्या निमित्तानं अनेक ठिकाणी फिरता आलं. कार्यकारी संपादकाची जबाबदार पार पाडताना ‘पत्रकारितेची मुल्ये’ जपणं हा भाग अंगळवणी पडला. आणि आज त्यामुळेच माझं लिखाण सलेक्टीव्ह झालं. मुख्य प्रवाहातील अनेक मासिके आणि वेबसाईटला माझं लिखाण सुरु असतं. याव्यतिरिक्त नियमीत ब्लॉग लेखन हा माझा आवडता छंद माझ्या याच ब्लॉगसाठी माझा आसरडोहकर ट्रस्टनं सन्मान केला आहे.
अंबाजोगाईच्या याच ‘विवेक सिंधू’ दैनिकातून मी खऱ्या अर्थानं माझी पत्रकारितेला (इंटर्नशिप) सुरुवात केली. इथं नानासाहेबांकडून पत्रकातून बातमी कशी काढायची हे शिकता आलं. आज मी महाराष्ट्र१ या आघाडीच्या न्यूज चैनलमध्ये बुलेटीन प्रोड्यूसर अशा महत्वाच्या पदावर आहे. इलेक्टॉनिक मीडियात काम करणं खुप आव्हानाचं आहे. सतत अपडेटच्या मागे पळावं लागतो. त्यामुळे मुळ बातमी काही क्षणात स्क्रीन वरुन गायब होते. प्रिंट सारखं शब्दांचं स्वातंत्र्य इथं नाही. पण हे माध्यम खुप प्रभावशाली आहे. त्यामुळे या माध्यमाला नाकारता येत नाही.
इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना काहीवेळा प्रचंड नैराश्य येतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी मी लिखाण करतो. सध्या मी एक दिर्घ कादंबरी लिहितोय, यासह काही पुस्तकाच्या अनुवादाचं काम हातात आहे. येत्या काही दिवसात माझं स्वतंत्र पुस्तक वाचकांच्या भेटीला येईल. या भविष्यातील गोष्टी आहेत. माझ्या या कामाचा सन्मान केल्याबद्दल मी आसरडोकर ट्रस्ट आणि निवड समितीचा आभारी आहे. हा पुरस्कार म्हणजे जबाबदारी आहे. सतत काम करत राहण्याचा हा एक ठेवा आहे.
![]() |

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com