“औरंगजेब रोडचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड केले, कारण कलाम असे महापुरुष होते की जे मुसलमान असूनही मानवतावादी व राष्ट्रवादी होते’’…आदी कोण कोणास म्हणाले? उत्तर आहे देशाचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा एका नामांकित नियतकालिकास मुलाखत देताना म्हणाले. तर अत्यंत सुसंस्कृत अशा महेश शर्मा यांना अशा अनेक गोष्टी वाटतात, ज्या सर्वसाधारण शालेय पुस्तकातील भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा मनापासून घेणाऱ्यांना कदाचित वादग्रस्त वाटू शकतात. म्हणजे `बायबल आणि कुराण हे भारताच्या आत्म्याचा भाग असू शकत नाहीत’, हे या शर्माजींचे आणखी एक वाटणे. आता भारताच्या आत्म्याचा नक्की भाग काय आहे आणि काय नाही, हे तपासले कुणी, कधी आणि तपासताना नक्की कोणते निकष लावले? असो या उत्तराची शर्माजींकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तर याच सुसंस्कृत शर्माजींनी असेही म्हटले होते की, भारताच्या ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये पाश्चिमात्य संस्कृती घुसली आहे तो तो कोपरा आम्ही स्वच्छ करू. असो हा स्वच्छ कसा करणार, असा कानाकोपरा स्वच्छ करण्याचे प्रयत्न आपल्या देशातील अनेक आक्रमक संघटना फार पूर्वीपासूनच करीत आहेत. त्यामुळे शर्मा साहेबांना स्वतःला फारसे कष्ट घेण्याची गरज नाही. त्यांनी फक्त `आखो ही आखो मे इशारा’ केला तरी अनेकजण त्यासाठी तयारच बसले आहेत. शर्माजींसारखी इच्छा असलेले अनेक तरुण असावेत. मात्र यात काही तरुण खरोखरीच भारतातील ग्रामीण भागांमध्ये राहणारे, पाश्चिमात्य संस्कृतीशी फारसा संबंध न आलेले निम्न मध्यमवर्गीय जीवन जगणारे आहेत. त्यांच्या मनात इंग्रजी बोलणाऱ्या, भरपूर पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या पिझ्झा, बर्गर, आईसक्रीमचा खुराक दररोज घेणाऱ्या शहरी मध्यम तसेच उच्च मध्यमवर्गीयांविषयी एक घृणा आहे. या घृणेकडे त्यांचा कार्यक्रम वादग्रस्त असला तरी सकारात्मक दृष्टीने पहायला हवं. मात्र अशा तरुणांना अशा ध्येयांकडे वळविणारे नेतृत्व खरोखरीच शत प्रतिशत भारतीय संस्कृतीशी इमान राखणारे आहेत का, याचा विचारही करायला हवा. आता या शर्माजींचेच घ्या ना, महेश शर्मा दररोज सकाळी उठून शरीराला व्यायाम व्हावा यासाठी काय करतात माहित आहे? काही जणांना वाटत असेल की ते बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली कपालभातीचे प्रयोग करीत असतील. कदाचित मंत्रीपदामुळे बसून काम करावे लागत असल्यामुळे स्नायूंच्या जागी जी मेदाची पुटे चढत आहेत, त्यासाठी अगदी लंगोट कसून शे-पाचशे सुर्य नमस्कार घालत असतील, अगदीच गेलाबाजार बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर किंवा मंत्रि होण्याआधी राहात असलेल्या सोसायटीच्या जवळील बागेत वगैरे चालायला जात असतील. पण नाही शर्माजी चक्क गोल्फ खेळातात. दिल्लीजवळील नोएडा गोल्फ क्लबचे शर्माजी सक्रीय सदस्य आहेत. गोल्फ हा त्यांचा आवडता खेळ आहे. म्हणजे युपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थानातील वगैरे खेड्यांमधील गरीब तरुणांना कबड्डी, खोखो वगैरे देशी खेळांचे महत्त्व सांगायचे. वर लाठीकाठी वगैरे चालविण्याचे प्रशिक्षण देशाच्या हितरक्षणासाठी कसे आवश्यक आहे, यावर प्रवचन द्यायचे आणि स्वतः मात्र गोल्फ खेळायचा? असो. भारतभूमी आणि भारतीय संस्कृती यांच्यावर निस्सिम प्रेम असलेले शर्माजी उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सुट्टीत कुटुंबाबरोबर भारतभ्रमाणासाठी जात असतील, असेही अनेकांना त्यांच्या भारतीय संस्कृतीवरील निस्सीम प्रेमामुळे वाटत असेल. वाराणसी, हरिद्वार वगैरे पवित्र स्थळे फिरून झाल्यावर शिमला, मसुरी, मनाली, काश्मीर वगैरे तिकडे दक्षिणेत कोडई कनाल, कोची,कुर्ग, कन्याकुमारी वगैरे अशा एकापेक्षा एक सरस ठिकाणी शर्माजी पर्यटनासाठी जात असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र शर्माजींनी संपूर्ण भारतभ्रमण करण्याआधीच अर्ध्याहून अधिक जग पालथे घातले आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्र्टेलिया, कॅनडा, बेल्जियम, इटली, स्पेन स्वित्झर्लंड वगैरे वगैरे बापरे. पाश्चिमात्य देशांची इतकी अगबंब यादी शर्माजींच्या पासपोर्टवर नोंदली आहे की विचारता सोय नाही. अर्थात शर्माजी त्यामागे या पाश्चिमात्य देशातील असंस्कृत लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी गेले होते, असे सांगू शकतात व त्यात काही वावगेही नाही. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे भारतीय भाषा. प्रत्येकाला मातृ भाषेतून शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार आहे, असे गणेश देवींसारखे भाषातज्ज्ञही सांगतात. शर्माजींची जडणघडण ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुशीतून झाली आहे त्या संघटनांमध्ये तर भारतीय भाषा सोडा हिंदी भाषा परमपुजनीयच समजली जाते. शर्माजींची मुले मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. इतकेच कशाला स्वतः शर्माजींचे शिक्षणही इंग्रजी माध्यमातूनच झालेले आहे.
सांगण्याचा मुद्दा हा की, यात शर्माजींच्या व्यक्तिगत आयुष्याचा हिशोब मांडण्याचा अट्टाहास नाही. तर भारतात सरळ सरळ दोन भारत आहेत ही जी मांडणी शरद जोशी किंवा इतर अनेकजण करत असतात, त्यातील त्या सुंदर गुडी गुडी भारताचे इंडियाचे शर्माजी प्रतिनिधी आहेत. मात्र भारतातील खेडोपाड्यात धूळ खात जगणाऱ्या, रॉकेलच्या दिव्यात अभ्यास करणाऱ्या अर्धपोटी राहून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबांना शर्माजी भारतीय संस्कृतीचे जे विश्लेषण सांगतात त्याच्याशी प्रामाणिक का राहात नाहीत या प्रश्नाची उकल व्हायला हवी. त्यावर शांतपणे विचार करायला हवा. ज्या महात्मा गांधींचे गोडवे शर्माजी व त्यांच्या राजकीय परिवारातील सगळेजण तोंडदेखले गात असतात, त्या गांधीजींनी इंग्लंडमधून बार अॅट लॉ केले होते. मात्र भारतात आल्यानंतर ९० टक्के भारत ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीत राहायचे म्हणून कंबरेला पंचा लावून त्यांनी आयुष्य काढले. इंग्लंडच्या थंडीतही गोलमेज परिषदेला गांधीबाबा पंचा लावूनच गेले होते. गांधीजींच्या अहिंसेवर कायम भंकस करणाऱ्या शर्माजींच्या राजकीय परिवाराला हे समजायला हवे की, आक्रमक भाषा करण्यापेक्षा बोलू तसे वागण्यासाठी खूप हिंमत लागते. शर्माजी आणि त्यांच्या राजकीय परिवारातील त्यांच्या भावांनी अशी हिंमत अंगी बाणवायला हवी. अन्यथा शर्माजी आणि त्यांच्या राजकीय परिवाराकडे आज ना उद्या लोक बोट दाखवू लागतील. हळू हळू त्यांना प्रश्नही विचारू लागतील. किती काळ सव्वाशे कोटींची तोंडं छप्पन इंची छातीच्या भितीने दडपून टाकणार, हो की नाही!!
(ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांचा हा लेख २९ ऑक्टोबर २०१५ला महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेले आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com