'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं' कवी गुलजारची ही कविता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय. या कवितेच्या अनुवादावरुन मेहता पब्लिकेशनची फेसबुकवर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. साधारण दोन तीन आठवड्यापूर्वी प्रकाशित झालेला हा काव्यसंग्रह प्रकाशकानं दोनंच दिवसापूर्वी मागे घेतला. अत्यंत सुमार दर्जाचा अनुवाद प्रकाशकाला चांगलाच भोवला आहे. मेहता पब्लिकेशन हे प्रकाशन विश्वातलं तसं मोठं नाव; मेहताकडून अनेक दर्जदार पुस्तकं अनुवादीत करण्यात आली आहेत. मेहताचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदी इंग्रजीत गाजत असेललं 'बेस्ट सेलर' लवकरात-लवकर मराठी वाचकांना उपलब्ध करुन देणं. 'अक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर' अवघ्या महिनाभरात वाचकांना मेहतानं दिलं होतं. हिंदी-इंग्रजीतले दर्जेदार पुस्तकं अल्पावधीत मराठी वाचकांना मिळवून देण्यात मेहताची ख्याती आहे. पण गुलजारच्या नुकतंच आलेल्या पुस्तकाच्या बाबतीत अनुवादाची केलेली घाई प्रकाशकाला चांगलीच नडली.
सुदर्शन आठवलेंनी अनुवाद केलेल्या गुलजार यांची ‘100 संस्मरणीय गीते’ काव्यसंग्रह 18 ऑगस्टला पुण्यात एका भव्य समारंभात प्रकाशन सोहळा पार पडला. कवी गुलजार यांच्या वाढदिवसाला मेहता पब्लिकेशनकडून भव्य कार्यक्रम घेण्यात आला. प्रकाशन सोहळ्याला खुद्द गुलजारदेखील उपस्थित होते. हा काव्यसंग्रह गेल्या आठवड्यात वाचकांच्या भेटीला आला. काव्य वाचताच गुलजारप्रेमी वाचकांचं संताप अनावर झाला. काव्यसंग्रहाचं अत्यंत रुक्ष आणि शब्दश: मराठी भाषांतर करण्यात आलं होतं. अत्यंत सुमार दर्जाचे भाव अनुवाद करताना वापरण्यात आले होते. काव्यसंग्रह वाचण्याजोगे नसल्याच्या अनेक तक्रारी वाचकाकडून मेहताकडे यायला लागल्या. तसंच मेहता पब्लिकेशनचं फेसबुक पेज शिव्या आणि कमेंटनं भरत होतं. पुस्तकाचा अनुवाद अयोग्य असल्याच्या अनेक तक्रारी मेहता हाऊसकडे पाठवण्यात आल्या. वाचकांच्या भावना व राग लक्षात घेता अखेर मेहतांकडून पुस्तक परत घेण्याची घोषणा करण्यात आली.
प्रसिद्ध गीतांची वाट लावल्यानं गुलजारप्रेमी फेसबुकवर मेहतांची खिल्ली उडवत आहेत. मुळात कवी गुलजार यांची अनेक गाणी सर्वांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे कदाचित चोखंदळ वाचकांना ही बाब पटकन लक्षात आली असावी. किंवा असंही असू शकतं की हिंदीतली गाणी मराठीत सहन झाली नसावीत. दोन्ही शक्यता नाकारली तरी, अनुवाद करताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनुवाद आणि भावानुवाद यात बराच फरक असतो. एखाद्या हिंदी किंवा इंग्रजी बातमी अथवा पत्राचा अनुवाद केला जाऊ शकतो. मात्र, गद्य किंवा पद्याचा भावानुवाद करावा लागतो. सांस्कृतिक संदर्भ, संचितं, भाव, वेदना, विचार, स्थळ, काळ इत्यादी गोष्टींचा योग्य वेळी साधर्म्य साधावा लागतो. तरंच हा अनुवाद वाचकांच्या पसंतीला उतरतो. अन्यथा लिखाण निरस आणि बोजड होतं.
गुलजारच्या या कवितासंग्रहातील अनेक कविता मुळ रुपात अनेकदा ऐकल्या आहेत. त्यामुळे याचा अनुवाद करणं जरा अवघड काम होतं. अनुवादकानं आव्हान म्हणून स्विकारायला हवं होतं. तसं आठवले हे मोठं नाव; ज्येष्ठ कवी गीतकार शांताराम आठवले यांच्या सूपुत्र सुदर्शन आठवलेंनी हा अनुवाद केलाय. अनुवाद काय तर शब्दश ट्रांसलेशन केलंय. मध्यंतरी गझलकार राम पंडित याचं असंच एक शायर मोमीनचं अनुवादीत पुस्तक वाचण्यात आलं. जुन्या शब्दकोशातून धुळ फुँकून अनेक शब्द वापरण्यात आले होते. प्रमाणभाषा वापरुन बोली भाषेतल्या गझलांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. निरस आणि पोचट लिखाण दहा मिनटंदेखील सहन झालं नाही.
अजुन एक उदाहरण द्यायचे म्हटलं तर उर्दूचे ज्येष्ठ साहित्यिक सआदत हसन मंटो यांच्या काही कथा हिंदीतून मराठीत अनुवाद करण्यात आल्या आहेत. या कथा वाचून मंटो सडकछाप लेखक होते असा भ्रम व्हायला लागतो. मुळ उर्दूतल्या कथांचं वाणी प्रकाशननं उत्तम भावानुवाद केलाय. मात्र, याच कथा हिंदीतून मराठीत येताच भिकारवस्तु झाल्या. याउलट नॉनफिक्शन कैटेगरीतलं अनुवादीत लिखाण वाचण्यासारखं असतं. पण फिक्शन अनुवाद करताना मात्र बराच गोंधळ केला जातो. वाटसरु किंवा मुक्तशब्दमध्ये येणारे अनुवादीत लेख अथवा कथा वाचनीय असतात. म्हणजे फैक्चुअल लिखाणाचा अनुवाद बरा होतो असं नाईलाजानं म्हणावं लागेल. अनुवाद करताना एक गोंधळ हमखास केला जातो. तो म्हणजे शब्दश मांडणी, जे की चुकीचं आहे. भांषातराचं एक तंत्रज्ञान असतं, त्याचे नियम असतात. काही आडाखे आणि चौकट असते यातंच भांषातर किंवा अनुवाद बसवावा लागतो. या चौकटीबाह्र लेखन गेलं की निरस आणि रटाळ होतं. वाचताना कंटाळवाणं वाटतं. मिर्जा हादी रुसवा यांची 'उमराव जान' कांदबरी मुळ उर्दू भाषेत आहे. या कादंबरीला हिंदीतल्या एक प्रकाशकानं प्रकाशित केलंय. उर्दूत उमरावला तवायफ म्हंटलंय. मात्र हिंदीत उमरावला वेश्या नावानं संबोधन केलंय. एका शब्दामुळे कांदबरीचं स्वरुर आणि मतितार्थ बदलून जातं. निव्वळ वेश्या म्हणून प्रकाशक थांबत नाही तर हिनकस आणि तुच्छतावादी दृष्टिकोनातून नायिकेला वारंवार संबोधलं जातं. मुळ कादंबरीत नायिका सोज्वळ शांत आणि संयमी रेखांकित केलीय. मात्र अनुवादात कोठेवाली वेश्याच वाटते. अनुवादाचा असा हा गोंधळ नॉनफिक्शनमध्ये पहायला मिळतं. त्या पद्याचा अनुवाद हा गद्यपेक्षा जास्त अवघड प्रकार मानला जातो. यात बऱ्याच गोष्टींचा बारीकसारिक विचार करावा लागतो. सांस्कृतिक संदर्भांचा अर्थ बदलू नये याचा वारंवार विचार करावा लागतो.
तसं मराठीमध्ये भांषातराची परंपरा मोठी असली तरी त्यामानानं अनुवादाची पाहिजे तेवढी नाहीये. काही मासिक साप्ताहिकात अनुवादाची परंपरा ठरवून जोपासली जाते. दैनिकात मात्र अनुवादाचा अजुनही वानवाच आहे. असं असलं तरी प्रकाशन संस्थेनं अनुवाद बऱ्यापैकी जपलाय. मेहतानंतर रोहन, चिनार, शब्द, काही प्रमाणात समकालिननं वेळोवेळी उत्तम ग्रंथ अनुवादीत केली आहेत. मेहतांचं गुलजारचं मागे घेतलेलं पुस्तक पोरकटपणाचा कळसंच म्हणावं लागेल. भाषांतर आणि शब्दांतराच्या कैटेगरीत मोडणाऱ्या या पुस्तकानं वाचकांचा चांगलाच मनस्ताप केला. वाचकांच्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेऊन मेहतानं पुस्तक मागे घेऊन झालेली चूक सुधारण्याचे ठरवलं. अनुवादाच्या दर्जाबाबत तडजोड नसावी असं म्हणत १५०० प्रतींची अख्खी आवृत्ती मागे घेतली आहे. वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून पुस्तक मागे घेण्याचा निर्णय प्रकाशनातर्फे घेण्यात आला आहे. ज्या वाचकांना हे पुस्तक परत करायचे असेल त्यांनी ते जिथून विकत घेतले आहे त्या विक्रेत्याला परत देऊन टाकावं असंही मेहतांकडून सांगण्यात आलं आहे. पुस्तकाचं नव्या व्यक्तीकडून अनुवाद करून घेण्यात येणार आहे.
कलिम अजीम
मुंबई
पुस्तकाची काही पानं सोशल मीडियाच्या सहकार्यानं इथं पोस्ट करतोय
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com